Sanyog aani Yogayog - 4 in Marathi Magazine by Gajendra Kudmate books and stories PDF | संयोग आणी योगायोग - 4

Featured Books
Categories
Share

संयोग आणी योगायोग - 4

भाग-४
अशाप्रकारे संयोग यावर योगायोग हा वरचढ होऊ लागला होता. आम्ही दोघेही गप्पा मारत गांधी चौकात पोहोचलो. मी नंतर सिमला विचारले, “ आता कुठे आहे तुझे घर. ” त्या छोट्याशा प्रवासाने आम्हा दोघांना जवळ आणण्याचे अल्प से काम केले होते. म्हणून मी ती वरून थेट सीमा वर आणि तुम्ही वरून थेट तू वरती आलेलो होतो. सीमा सुद्धा माझ्याबरोबर फारच सहज आणि मोकळी होऊन गेलेली होती. तिने सांगितले, “ ते दिसतेय ते आहे आमचे घर.” त्यानंतर मी म्हटले, “ तर ठीक आहे , तू आता घरी जा मी निघतो.” परंतु मी विसरलो होतो, कि गाडी खेचताना मला जो त्रास झाला होता , तो त्रास मला सिमला द्यायचा नव्हता. म्हणून मी मुद्दाम करून सिमला आणि तिचा गाडीला तिचा घरापर्यंत सोडण्यासाठी गेलो. घराजवळ गेल्यावर सीमाने तिचा घराला जे कुंपण होते त्याचा गेट उघडला आणि मी तिची गाडी आतमध्ये अंगणात ठेवण्यासाठी गेलो. गेटचा आवाज आल्यामुळे सीमाचे आई आणि बाबा बाहेर आले होते. मुलीला सुखरूप पोहोचली बघून त्यांनी सीमाला विचारले, “ कशी आलीस बेटा तू, एकटीच आलीस काय?” त्यांचे माझ्याकडे लक्षच नव्हते. मी गाडी लावून जेव्हा आलो तेव्हा तर मला बघून त्यांनी सीमाला विचारले, “ बेटा हे कोण आहेत, तू यांचाबरोबर आलीस.” सीमाने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. मी स्वतःशीच बोललो, “ चला आपल्याला उशीर होत आहे, आपल्याला निघायला पाहिजे.” म्हणून मी सीमाची आणि तिचा आई बाबांची परवानगी घेऊन माझ्या घराकडे जाण्यास निघालो असतांना न जाणे मला काय होत होते. माझे पाऊल तर पुढे निघाले परंतु माझे मन मात्र तिथेच राहिले. मी मोठ्या अनमनाने एक नजर सीमाकडे वळून बघितले आणि आपल्या घराकडे निघालो. मी संपूर्ण रस्त्याभर माझ्या आणि सीमाचा दरम्यान जे घडले आणि माझ्यात कसे आणि काय परिवर्तन आले याबद्दल विचार करत घरी गेलो.
मी माझ्या घरी पोहोचलो आणि घराचे दार उघडून आत गेलो. घरी पोहोचता पोहोचता मला रात्रीचे १० वाजले होते. आज मी फारच थकलेलो होतो, कारण एकतर मला पायदळ यावे लागले आणि परस्पर सीमाची गाडी सुद्धा मीच खेचत आणली होती. माझ्या घरातील एकांतपणाचे वातावरण बघून आपोआप माझा एकांकी स्वभाव माझ्यावर हावी होऊ लागला होता. पुन्हा मी तोच जुना धीरज होऊ लागलो होतो. माझ्या डोक्यात विविध विचारांचे युद्ध सुरु झाले होते. म्हणून मी काहीच न जेवता तसाच झोपून गेलो. दुसरा दिवस उजेळला, योगायोगाने म्हणा कि संयोगाने तो दिवस रविवारचा होता. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि मला त्याची फारच आवश्यकता होती. मी सकाळी उठल्यावर माझे सर्वांग दुखू लागलेलं होत. त्या वेदनेवरून मला रात्रीचा तो प्रसंग आठवला. रात्रीचा त्या छोट्याशा संयोगमात्र भेटीने सिमाबद्द्ल माझ्या हृदयात काही तरी होऊ लागले होते. त्याच बरोबर एक हताशापण होत होती आणि त्या भेटीला एकमात्र संयोग मानून सगळ काही विसरून मी आपल्या दैनंदिन कामाला लागलो.
परंतु यावेळेस संयोग काही माझा पिच्छा सोडायला तयार नव्हता. मी कितीही त्याचापासून लाब होण्याचा प्रयत्न करत होतो, तोच संयोग माझ्या सोबतच चालत होता. मी कुणाला तरी फोन करण्यासाठी फोन हातात घेतला आणि न बघतच फोन लावला. फोन लागला घंटी वाजू लागली आणि नंतर समोरून कुणीतरी फोन उचलला. माज्या कानावर सकाळी सकाळी एक गोड आवाज आला. तो आवाज ऐकून माझ्या हताशलेल्या मनाला खूपच आनंद झाला होता. कारण कि तो गोड आवाज आणखी कुणाचा नव्हे तर चक्क सीमाचा होता. समोरून सीमा बोलली, “ Good Morning ” अनपेक्षित सीमाचा गोड आवाज ऐकून मी माझे भानच हरवून बसलो होतो. सीमाने पुन्हा हेलो म्हटल्यावर मी खडबडून जागा झालो. मग मी हळूच घाबरत हेलो म्हणालो आणि तिला फोन करण्यास तिची क्षमा मागितली. मी सीमाला सांगितले कि माझ्या हातून अजाणतेपणी तुझा नंबर डायल केला गेला होता. यात माझ्या कसलाही वाईट हेतू नव्हता. त्यानंतर सीमा समोरून बोलली, “ अहो, यात क्षमा मागण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. मला फारच आनंद झाला, चुकीने का नाही असोत तुमचा फोन आला याचाच मला फार आनंद झाला. तसे रात्री मी तुम्हाला धन्यवाद हि बोलू शकले नाही म्हणून माझ्या मनात सारखी कुजबुज सुरु होत होती. परंतु आता माझ्या मनाला समाधान मिळाले.” त्यानंतर ती पुढे म्हणाली, “ तुम्ही माझा हा नंबर सेव करा आणि हक्काने मला फोन करा मला कसलेच वाईट वाटणार नाही. ” एवढे बोलून तिने फोन ठेवला आणि मी मंत्रमुग्ध्द होऊन तिचे बोलने ऐकत राहिलो. येथे संयोगाने योगायोग होण्याकडे एक पाऊल पुन्हा वाढवले होते.
आता आमचा दोघांतील संवाद फारच वाढला होता. आता आमचा दैनंदिनचा नित्यक्रम होऊन गेला होता. रोज कामावर जातांना किंवा येतांना एकदा तरी आमची भेट व्हायची आणि फोनवर तर बोलन रोजचं व्हायचं. आता तर मला वाटू लागले होते आमचे ऋणानुबंध आकार घेऊ लागले आहे. तर यावेळेस मी या प्रश्नात अडकलो आहे कि, हा संयोगच आहे कि खरच दैवाने घडवून आणलेला योगायोग आहे. मागील आठवड्यात या योगायोगाने आणखी आपली कला दाखवली. नेमका एक नातेवाईक कुणाचा तरी लग्नाची पत्रिका घेऊन माझ्या घरी आला होता. पुन्हा योगायोग म्हणावा तर त्याला गांधी चौकात कुणाचा तरी घरी ती पत्रिका द्यायची होती. काही कारणास्तव त्याचे तिकडे जाने रद्द झाल्यामुळे त्याने ती पत्रिका माझ्या माथ्यावर मारली आणि तो गावाला परत निघून गेला. आता ती पत्रिका मलाच गांधी चौकातील त्या व्यक्तीचा घरी नेऊन देण्याचा योग आला. तर मी रविवार बघून सहजच नाही म्हणता येणार मुद्दामच ती पत्रिका देण्यासाठी गांधी चौकावर गेलो होतो. तेथे जाऊन मला कळले कि तो इसम दुसऱ्याच एका गावाला गेलेला आहे. त्याक्षणी न जाणे माझे मन आणि माझे पाऊल सीमाचा घराकडे अनायासपणे मला ओढत होते. तसा आता मी तो जुना चीढणारा धीरज राहिलेला नव्हतो. किंवा असू शकते कि, योगायोगच मला तिकडेच घेऊन जात असेल. तर मी सीमाचा घराजवळ गेलो.
तर मी सीमाचा घराजवळ सहजच गेलो, तर तिचा अंगणातील कुंपणाचा गेटला स्पर्श करणार तोच सीमा दाराचा बाहेर निघाली. सीमाची आणि माझी नजर एकमेकांशी भेटली आणि अन्यास सीमाचा मुखातून शब्द निघाले, “ अय्या, काय योगायोग आहे हा. आज मला तुमची फारच आठवण येत होती आणि परस्पर भेटण्याची इच्छाही फारच होत होती. म्हणून मी तुम्हाला फोन करून कुठे तरी नाहीतर आमचा घरीच भेटण्यास बोलावणार होते. योगायोगाने तुम्ही स्वतःच माझ्या घरी आलात, न जाणे आज सकाळ पासूनच मला सारखा तुमचा आभास होत आहे आणि मनाला सारखे वाटत होते कि तुम्ही येणार. म्हणून मी सारखी दाराचा बाहेर निघून वारंवार गेटकडे बघत होती आणि योगायोगाने तुम्ही खरच माझ्या घरी आलात.” ती बोलत होती आणि मी निशब्द उभा होतो फक्त.
शेष पुढील भागात ........