Narakpishach - 10 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | नरकपिशाच - भाग 10

The Author
Featured Books
Categories
Share

नरकपिशाच - भाग 10

अमानविय सीजन 1
आग्यावेताळ भाग 10..


पाषाणवाडी .....


महादेवाच्या गळ्यात असलेल्या नागराजच्या मुखातुन निघालेल्या शक्तिशाली प्रहाराने विघ्नेशचा अंत झालेला .! वार इतक शक्तिशाली होता की क्षणार्धात विघ्नेशच्या शरीराची हाड-मांसाची राख-रांगोळी झालेली.आंणि आता ह्या क्षणी त्याच जमिनीवर पसरलेल्या राखे समोर
महांक्राल बाबा शोकहिंत होऊन बसलेले,एकटक त्या राखेत शुन्यात नजर लावून बसलेले .त्या शुन्यात असलेल्या नजरेत विघ्नेशच्या लहानपणा-पासुन ते किशोरवया पर्यंतच्या सर्व आठ्वणी महांक्राल बाबांच्या डोळ्यांसमोरुन एका चित्रफीती प्रमाणे फिरल्या जात होत्या.
त्या आठ्वणींच्या एका-एका झलकेने महांक्राल बाबांचे नेत्र पाणावले जात थेंब थेंब अश्रु हलक्याश्या गतीने राखेवर पडले जात होते.
महांक्राल बाबा आपल्या दुखात इतके बुडाले गेलेले..... की त्यांना आपल्या पाठिमागे काहीतरी विळक्षण कृती घडत आहे.काहीतरी दिव्यशक्तिचा-प्रकार घडत आहे हे सुद्धा कळून येत नव्हत.
महांक्राल बाबांच्या पाठमो-या आकृतीपासून ठिक 20-25 मीटर अंतरावर एक सफेद रंगाचा प्रकाशमय दरवाज्यासारखा चौकट आकार तैयार होत-होता. आणि त्या दरवाज्यातुन डोळे दीपवणारा सफेद रंगाचा प्रकाश सूर्यकिरणां प्रमाणे बाहेर येत होता. जर कोणी साधारण मनुष्याने त्या प्रकाशाकडे पाहील असत तर त्याचे डोळे काहीमिनिटां पर्यंत दीपले असते...इतका तो अफाट शक्तिशाली प्रकाश होता. त्या दरवाज्यातुन निघणारा प्रकाश आजुबाजुच थोडफार भाग का असेना परंतु उजळून टाकत होत. काहिक्षण त्या दरवाज्यातुन अशाच प्रकारे क्रिया घडत राहिली. आणि काहीवेळांनी त्या प्रकाशमय आकाराच्या चौकट रुपी दरवाज्यातुन सफेद रंगाच धुक बाहेर येऊ लागल! आणि त्या हलके-हलके बाहेर येणा-या धुक्यासरशी त्या दरवाज्या आतुन येणा-या प्रकाशात एक मनुष्याची आकृती दिसुन येत पुढे-पुढे चालत येऊ लागली.
पाच -सहा पावलांत त्या मनुष्याच्या आकृतीने त्या प्रकाशमय दरवाज्याची चौकट ओलांडून थेट पाषाणवाडीत आगमण केल.
तसे त्या मनुष्याच्या देहाच-शरीराच वर्णन दिसुन आल.
त्या मनुष्याच्या शरीरावर खालून वर पर्यंत पांढ-या रंगाचे वस्त्र होते.
वयाने जरी ते 70-80 वर्षाचे प्रौढ वाटत असले! तरी सुद्धा त्यांच्या मंद स्मित हास्याने फुललेल्या एका विशीष्ट प्रकारच तेज पसरलेल्या त्या चेह-याकडे पाहुन हे मुळीच वाटत नव्हत..की ते प्रौढ असावेत.
त्यांच्या गळ्यात व हातामध्ये काहीबाही रुद्राक्ष माळा होत्या.
पांढरट मोठे डोक्यावर महादेवां सारखे बांधलेले केस होते.व त्याचसफेद रंगाची मोठी खाली लोंबकणारी दाढी होती. आणी ह्या दिव्य पुरुष्यांच नाव होत धवलयोगी ते महादेवाचे परम भक्त होते. ज्याप्रकारे महांक्राल अघोरी भक्त होता. त्याच प्रकारे धवलयोगी हे एक साधु भक्त होते. आणि हे तेच दीव्य पुरष होते जे त्या हिमालयातल्या गुहेत महादेवाच्या मोठ्या मूर्तीसमोर ध्यानास्थ बसलेले.
धवलयोगींना महादेवाने कसलीतरी सूचना दिली होती .जी की त्यांस महादेवाने महांक्राल यांस कळवण्यास सांगितलेली.आणी ती सूचना सांगण्या करीता धवलयोगी आपल्या शक्तिचा उपयोग करुन पाषाणवाडीत अवतरलेले.धवलयोगी ज्या शक्तिचा वापर करुन पाषाणवाडीत अवतरलेले! ज्या चौकट रुपी लक्ख प्रकाश द्वारा मार्फत
पाषाणवाडीत आले गेलेले. त्या दरवाज्याच त्या शक्तिच नाव (सर्व-द्वार )
असं होतं.त्या सर्व-द्वारा मार्फत त्या शक्तिचा वापर करुन तिचा हक्कदार कोणत्याही क्षणी कोठेही-कधी जाऊ येऊ शकत होता. कितीही लांबवरच ठिकाण क्षणात सेकंदात पोहचून पार करु शकत होता.
परंतु ह्या शक्तिस म्हंणजेच सर्व-द्वार मिळवण्याकरीता खुप मोठी मेहनत घ्यावी लागत होती .वर्षोनूवर्ष हिमालयात-गुफेत तप-तपस्या करुन महादेवास प्रसन्न करुन मग ह्या शक्तिच वरदान प्राप्त कराव लागत असे.
परंतु ही तप-तपस्या करणारा तपस्वी मनाने शुद्ध असायला हवा.. त्याच्या मनात क्प्टी,नीच , क्रुर, असत्यतापणाचा वाव नसायला हव अन्यथा तपश्चर्या करताक्षणी तपस्वीचा मृत्यु ओढावण्याची संभावणा तीव्र पटीने जास्त होती.
परंतु मित्रांनो धवलयोगींनी सर्व -द्वार मिळवळ नाही! आणि नाही धवलयोगींना सर्व-द्वाराची आवश्यकता -आवड़ होती !आणि नाही त्यांनी कोणतीही तप -तपश्चर्या केली होती! मग तुम्हा वाचकांना खुपसारे प्रश्ण नक्कीच पडले असतील! जर का धवलयोगींना सर्व-द्वाराची कोणतीही आवश्यकता नव्हती आणि नाही त्यांनी तप -तपश्चर्या केली होती. तर मग त्यांना सर्वद्वार मिळाल का व कस..?
तर वाचक मित्रांनो !तुम्हा सर्वांच्या प्रश्णांच उत्तर हे आहे ! की धवलयोगींना साक्षात महादेवांनीच सर्व-द्वाराच वरदान दिल होतं.
धवलयोगींच मन हे शुद्ध होत.त्यांच्या मनात भक्तिविर्भावात असत्याला मारुन पुरुन टाकणारी सत्यता होती.स्व्त:च्या शक्तिवर त्यांना काडीचाही गर्व नव्हता.आपल्या शक्तिचा वापर सुद्धा ते एन-वेळेस काही संकटमयी
कार्यातच करत असत.अन्यथा त्या शक्तिचा उपयोग त्यांच्यासाठी शुन्य होता.धवलयोगींच्या स्वभावात देहात चांगुलपणा जणु ठोसूण-ठोसूण भरलेला.रक्त-रक्तातांत सत्यता आणि त्या सत्याचा अंश भिन-भिनलेला.आणि ह्याच अंशावर प्रसन्न होऊन महादेवांनी धवलयोगींना हिमालयात आपल्या शक्तिने एक त्रिकाळ शक्तिशाली गुहा निर्माण करुन दिलेली.आणि त्याच गुहेत धवलयोगींनी आपल्या पुर्णत तरुण ते प्रौढ कालावधीत ..गुहेत असलेल्या एका मोठ्या दगडावर महादेवाची भक्ति-प्रेम-भावाने एक मूर्ती साकारलेली जी की आपण सर्व वाचकांनी गेल्या भागांत पाहिली.
महादेवांनी सुद्धा मग आपल्या प्रिय भक्ताच्या ह्या कला-कृतीवर खुष होऊन सर्व-द्वार वरदान आणि त्या मूर्तीत आपल स्व्त:च आस्तित्व
निर्माण केल आणि एक वरदान दिल . " की ह्या मूर्तीत आता माझ आस्स्तित्व नेहमी असेल.! ज्याक्षणी तु मला साद देशील त्याचक्षणी ह्या त्रिकाळ गुहेत ॐ नामाचा जप सुरु व्हायला सुरुवात होईल आणी मी महादेव तुला हे वचन देतो ..!की ज्या-ज्या वेळेस तुझी हाक येईण त्या-त्याक्षणी मी कोणत्याही परिस्थितीतुन तुझ्या मदतीला धावून येईण! महादेवांकडून मिळालेल्या ह्या वरदानाने धवलयोगी पुर्णत भारावुन गेलेले! त्यांच्या नेत्रांवाटे आनंद-अश्रु गळाळे जात ! त्यांच्या मनात असलेल महादेवांवरच भक्तिप्रेम अजूनच घट्ट झाल गेलेल.
एक-एक पाऊल वाढवत धवलयोगी महांक्राल बाबांच्या दिशेने निघालेले. त्यांच्या नजरेस महांक्राल बाबांची जमिनीवर दोन्ही गुढग्यांवर बसलेली पाठमोरी आकृती दिसुन येत होती. महांक्राल बाबा एकटक
खाली जमिनीवर पसरलेल्या विघ्नेशच्या शरीराच्या सफेद राखेकडे पाहत बसलेले ! कि अचानक रात्रीच्या अंधारमय काळ्या रंगाच्या ढगांमधुन एक सोनेरी रंगाच किरण आकाशातुन खाली आल व त्या सफेद रंगाच्या राखेवर पडल त्यासरशी ती राख सोन्या सारखी सोनेरी रंगाने चमकुन निघाली. व बिना हवेच्या झोतानेच वर आकाशात वर-वर उडून जाऊ लागली. महांक्राल बाबांच लक्ष ज्यासरशी ह्या कृतीवर पडल गेल...त्यासरशी जमिनिवर दोन्ही हात टेकवुन ते आपल्या जागेवर उभे राहिले व विघ्नेशच्या वर-वर जाणा-या सोनेरी रंगाच्या राखेकडे पाहत म्हणाले.
" काय होतंय.....हे!?"
महांक्राल बाबांनी आपल्या स्व्त:लाच प्रश्न केला..! आणि त्यांच्या ह्या वाक्यरुपी प्रश्णासरशी मागुन एक आवाज आला.
" जयविक...पुन्नरजन्म! "
□□□□□□□□□□□□□□□□□
पाषाणवाडीतल्या जंगलात रात्रीची स्मशान शांतता पसरलेली आणि त्या स्मशान शांततेला जोड म्हणून अंग गोठावणारी थंडी सुद्धा पहुडली गेलेली.थंडीमुळे जंगलातल्या झाडांच्या आजूबाजूला सफेद रंगाच धुक पसरलेलजणु झाडांवर कोणीतरी- कित्येकांनी आपला ठाव-ठिकाणा बस्तान त्या झाडांवर मांडुन ठेवलेला..आणि त्यांना लपण्याच काम ते गडद धुक झाडांसमोर पसरुन करत आहे.
जंगला-आतुन कोठूनतरी कोण्या श्वापादाचा विव्हळण्याचा तर कधी रडण्याचा भेसूर अपशकुनी विशिष्ट प्रकारचा आवाज येत होता.जो की थंड हवेच्या झुळकेनी पुलावर उभ्या असलेल्या कमल्याच्या कानांवर पडला जात होता.
कमल्या आणि परश्याच्या रुपात आलेला सर्प पिशाच्च हे दोघेही मिळुन
पुलावर उभे राहून खाली असलेल्या नदीच्या पाण्यात पाहत होते.कालपट रंगाच एकाच जागेवर थांबून असलेल पाणी होत ते.
पाणि एकाच जागेवर थांबल होत ह्याचा अर्थ असा होता की खालचा भाग खोल(वंड) होता.
" परश्या ! "
कमल्याने खाली पाण्यात पाहत हे वाक्य उद्दारल व थोडवेळ थांबून पुढे म्हणाला.
"... ले ऊशीर झाला रे..! आण त्या दोघांचा अजुन पत्त्या
नाय..?"
कमल्याने आप्ल्या ह्या वाक्यासरशी आपल डोक हळुच परश्याच्या दिशेने वळवल आणि त्याच क्षणी काळ्या ढगांमध्ये एक विज चमकली जात त्या विजेचा खाली जमिनिवर गुलाबी रंगाचा प्रकाश पसरला चर-चरणा-या बल्ब प्रमाणे काहीक्षण क्रियेनुसार सर्व काही उजळून निघाल .. त्या प्रकाशात कमल्याला मेलेल्या म्हड प्रेतासारखा एकटक शुन्य नजरेने , व भुकेल्या भस्म्यासारखा आवासुन जीभ बाहेर काढलेल्या .. तोंडातुन लाल गळणा-या अवस्थेतला ..! ज्याप्रकारे मुर्दाघरातल्या बर्फाच्या थंड लादीवर कास्केट मध्ये झोपलेल्या निर्जीव चुना पोतलेल्या शवाचा चेहरा असतो .त्या चेह-याला पाहताच ज्याप्रकारे ह्दयात धडकी भरली जाते. त्याच प्रकारे परश्याचा चेहरा कमल्याला त्या विजेच्या गुलाबी प्रकाशात दिसुन आला व त्या चेह-याला पाहणारा कमल्या जागेवरच 440 व्होल्टचा झटका बसावा..तसं..
शोक लागल्या प्रमाणे थिजला गेला. हे पुढील द्रुश्य पाहुन मनातल्या काळ्य अंधारातल्या गर्तेत वावरना-या भयाच्या काळ्या दुनियेत कमल्याला असा काही झटका बसलेला..की वर-वर जरी तो कितीही
नॉर्मल वाटत असेल परंतु आतुन भ्याला, घाबरला, गेलेला..
आपल्या पाठीमागुन कोणीतरी चोर पावलांनी यावे आणि मागून जोरात भौ असा मोठ्याने कानांजवळ भीतीयुक्त आवाज काढव आणि त्या आवाजाने घाबरलेल्या त्या मनुष्याच ज्या प्रकारे चेहरा दिसुन यावा ...तसे भाव कमल्याच्या चेह-यावर होते....जे पाहताक्षणीच
परश्याच्या रुपात असलेला सर्पपिशाच्च म्हणाला.
" काय ...! झाल ....!"
चेह-यावरचे ते विचित्र हाव-भाव क्शणार्धात मावळले जात संशयित नजरेने कमल्याकडे पाहत सर्प-पिशाच्च रुपी
परश्या म्हणाला. तसे त्याच्या ह्या वाक्यावर कमल्याने फक्त काही नाही असं इशारा करत आपल डोक डावी-उजवीकडे चार -पाच वेळा
फिरवल व एक आवंढा गिळून पुन्हा पाण्यात पाहु लागला. कमल्या जरी मौन बाळगुन उभा असला.
तरीही त्याच्या मनात असंख्य प्रश्णांनी काहूर माजवल होतं.
परश्याचा स्वभाव तो पुर्णत-रित्या ओळखून होता.लहानपणापासुनचे मित्र जे होते ते.परंतु आताच्या ह्या क्षणी परश्याच हे अविचित्र वेड्यावाणी वागन पाहुन त्याच्या मनात चर्चेला उधाण फ़ुटलेल.त्याच हे वागण कुठेतरी परश्याला टोचत-बोचत होत.
" हा परश्या असा का वागत आहे? ह्या अगोदर तर तो असा कधीही वागला नाही ?.मग आजच असा का वागत आहे ? आण परश्याचा चेहरा असा जाड-जुड प्रेतावाणी सूजल्यासारखा पांढराफट्ट का झालाय.? आण त्याच पोट येवढ फुगलय का? "
कमल्याने ह्या वाक्यासरशी परश्याकडे पाहील त्यासरशी त्याला विजेच्या कडाडण्या सहित त्या उजेडात हाडकुल्या देहाच्या परश्याच पोट अगदी बेडकावाणी फुगल्यासारख दिसल.जे की खुपच अक्ल्प्नीय-अविचारी द्रुश्य होत! कमल्याने परश्याकडे पाहिल तत्क्षणी दोघांची ही नजरा-नजर झाली. नी त्या नजरेसहित दोघांनीही आप-अपल्या चेह-याकडे पाहिल आणि त्याचक्षणी परश्या कमल्याकडे पाहुन कसतरीच विचित्रपबे दात विचकुन हसला. पांढ-या फट्ट चुना पोतलेल्या काळ्या निळ्या झालेल्या त्वचेच्या त्या चेह-यावर ते दात विचकत हसण एक मेलेल शवगृहातल शव जणू उभ राहत हसुन पाहत आहे अस वाटलं!...दात विचकत हसणा-या परश्याला पाहुन कमल्याच्या ह्दयाच जागीच भीतीने पाणी-पाणि झाल ! खाली पायांवरुण ते वर मेंदू पर्यंत एक विशिष्ट प्रकारचा भीतीजनक काटा कमल्याच्या अंगावर 160 च्या स्पीडने सर्रकन येऊन गेला.त्या काट्याने अंगावरचा एक केसनी केस आतील सर्व स्नायु ताठले गेले आणि शरीरास एक झटका बसला.कमल्याने लागलीच परश्याच्या दिशेने पाहण टाळून मान फिरवून घेत पुन्हा खाली नदीत पाहिल .
वर आकाशात एकावर एक ढग घासले जात विज चमकत होती. काळ्या ढगांआतुन एक आसुरी कानठळ्या बसवणारा आवाज होत चंदेरी रंगाचा प्रकाश ढगांत दिसुन येत होता. त्या काळ्या ढगांत काहीक्षण जणु पाहिल गेल्यास काहीतरी विचित्र-अघोरी-बुद्धीचा-हिडीस ध्यानाचा चेहरा दिसुन येत होता.
ढगांमधुन एक-एक पाऊसाचा थेंब-नी -थेंब जणू पाण्याचा नसुन रक्त मांसाचा बनला आहे अस भासत होत. वर आकाशातुन पाऊसाची रिप-रिप जोराने सुरु झाली तर त्या ढगांमधुन पाऊसाची नाहीतर विंच-सर्प-विषारी कीटकांची बरसात होईल असं वाटत होत.
□□□□□□□□□□□□□□
रातकिंड्यांच्या कीर-किरीत..आणि भयकाल युक्त कालोखात
जखमी अवस्थेतला फुग्या झाडा-झुडपांचा आधार घेऊन त्या झुंडपांन जवळ दोन्ही गुढगे वाकवुन खाली लपुन बसला होता.
झुडपांचा आडोसा घेऊन तो समोरच शरीराचा मेंदूचा अंगावर सर्रकन भयकारीक्त काटा आणणार दृश्य डोळ्यांत साठवुन घेत होता.
वेताळाचा आवाज हुकूम ऐकुन सर्व भुत,पिशाच्चसेना जागेवरच स्टेच्यु सारखी थिजली गेलेली...! सर्वच्या सर्व हिडीस -अघोरी अक्ल्प्नीय ,अकल्पित थरथराट सैतानांचा नंगानाच माजवणारे हे पिशाच्च एकाच जागेवर पुतळ्यासारखे उभे राहिलेले.त्या अंधा-या कालोख्या रात्री त्यांची न होणारी हालचाल पाहुन एकवेळ असं वाटत होत...की साक्षात कित्येकतरी जिवंत प्रेत एकाच जागेवर ठाव मांडून ऊभी आहेत...! त्यांच्या हाती असलेल्या स्मशालीचा तांबड्या रंगाचा प्रकाश काय तो morgue रुम मधल्या सडक्या कुज्क्या वासाच्या हवेच्या एका झुलकेने हलत होता आणि तो सडका..कुजका..पांचट..ओकारी आणणारा वास ..त्या विचित्र ..अमानविय सैतानांच्या हिडिस कुरुप काळ्या शक्तिच्या लागल्या गेलेल्या वाईट,क्रूर विचारांच्या देहांतुन येत होता..मृत शरीरातुन येत होता.
तो मशालींचा तांबड्या रंगाचा प्रकाश त्या सर्वांच्या चेह-यावर पडला जात त्या सर्वांच भीतीजनक पोटात गोळा आणणार हिडिस आकार-उकार बिभित्स, घाणेरड रुप दिसुन येत होत.
फुग्या एकटक त्या सर्व पिशाच्चांकडे पाहत होता. त्याच्या नजरेसे ते भयानक दृश्य पाहुन भीतिने काय करु काय नको असं झाल होत.
वेताळा बदल फुग्याला थोडीफार माहीती होती. म्हणुनच त्याने आपल्या मित्रांना ते कारस्थान चोरी करण्यापासुन विरोध केला होता. परंतु त्याच्या विरोधास पाहता पैशाच्या, वासनेत मोहात तुडूंब बुडालेल्या त्याच्या चारही मित्रांनी अक्षरक्ष मैत्रीच्या नावाला काळीमा फासला होता .... फुग्याला मारुन त्याच्या शरीरावर वार करुन त्या चौघांनी त्या जागेतुन वेताळाच्या हि-याधारी तलवारी सहित तिथून पळ काढला होता.आपल्या जिवलग मित्रांनी आपल्या समवेत जे काही द्रुश कृत्य केल ते आठवुन फुग्याचे डोळे पाणवले गेलेले..डोळ्यांतुन दोन थेंब का असेना परंतु वाहून गेलेले...! परंतु पुढच्या क्षणालाच अचानक आलेल्या बुलेट ट्रेनच्या वेगाने वेताळाच्या वातावरणातल्या आवाजास ऐकून त्या घोग-या भरड्या किन्नरि स्त्री मिश्रीत हास्यास कानांच्या पदद्या रुपी स्टेशनवर आदळून जात आपल्या मित्रांची दशा काय झाली असेल ..हे त्यास कळाल होत ...वेताळाने कोण्यातरी त्याच्या पिशाच्च सेनेमधल्या अमानविय शक्ति असलेल्या ध्यानास त्या चौघांच्या मागावर आपल शस्त्र
परतुन आणण्यासाठी धाडल होतं...आणि ते दया-माया नसलेल ध्यान तलवारच आणणार होत का? कि त्या तलवारी सहित अजुन काहीतरी घडवुन आणणार होत...? की मृत्युचा खेळ रचुन त्या खेळात सावजाच आपल्या मित्रांच शिकार करुन..मग त्या शिकाराच देह भक्षण करत.. त्या भक्षाच्या रक्ताच पाट वाहुन त्या रक्ताच्या पाटात ती तळवार धुवून ते ध्यान ती आणणार होत? फुग्याच्या मनात हा प्रश्न आला आणि ह्या प्रश्नासहित उत्तर सुद्धा येऊन गेलेल. आता ह्या क्षणापर्यंत त्या चौघांन मधुन कोणिही जिवंत नक्कीच उरल नसेल .त्या अकल्पित शक्तिचा थरथराट माजवणा-या ध्यानाने आतापर्यँत त्या चौघांच्या हाडारक्तमांसाची रांगोळी नक्कीच काढली असेल.आणि ती हि-यांची रक्तपिपासु वेताळाची शस्त्रधारी तलवार लवकरच त्या चौघांच्या देहातल्या लाल रक्तातुन भिजवुन तो ध्यान इथे घेऊन येईण..आणि तो येण्या आधीच आपल्याला येथुन पळ काढायला हवा अन्यथा वेताळ बाहेर आल्यावर त्याच्या विराजमान झालेल्या पालखीस आपण पाहिल तर पुढच्या अमावास्याला त्यात आपण दिसल्या वाचुन राहणार नाही!
फुग्याने आपले लक्ष पुढे ठेवतच मनात ह्या सर्व वाक्यांची उच्चारना केली..होती! तसे त्याने आपला एक हात हळूच पुढे पाहत जमिनिवर टेकवला आणि उभ राहण्याचा प्रयत्न करु लागला..! फुग्याच्या आजुबाजूला चारही दिशेंना धनदाट जंगल होत.रात्रीच्या अंधारात ती घनदाट जंगलातली झाड चित्रविचित्र आकार-उकार धारण करत होते..! अमावास्या असल्याने काजळी फासल्या सारखा कालोख पसरुन जात त्या झाडांवर विष पसरल्या सारख काळ-अंधार चिकटलेल ज्याने ते झाड खालून-वर पर्यंत काळ्या रंगा सारख दिसुन येत होत.जणु काल चिप-चिपचीत चिकट द्रव त्यास चिकटल असाव.
फुग्याने आपला एक हात जमिनीवर टेकवल त्यासरशी त्याच्या डाव्या बाजुला झुडपांत कसलीतरी सळ-सल झाली काहीक्षण ती झुडप हाळली गेली.तसे फुग्याच्या कानांनी तो आवाज वेगाने टीपळा आणि धड-धडत्या छातीने वेगाने त्याने आपल डोक त्या डाव्या दिशेने वळवळ आणि त्याच क्षणी त्याला समोर एक भयंकर द्रुश्य दिसल..! ज्यास द्रुश्यास पाहुन तो तोंडावाटे श्वास सोडत म्हणाला..
" हुश्श्श. ससा ..आहे..! " फुग्याने आपल हे वाक्य उच्चारल आणि त्या पांढरट रंगाच्या दोन मोठाले कान, असलेल्या सशाकडे पाहत जागेवर उभ राहिला.
उभ राहताक्षणी च त्याने तोंडावाटे पुन्हा एक सुस्कारा सोडला आणि हळुच आपल डोक समोर वळवल .ज्याप्रकारे स्मार्टफोन मध्ये camera open झाल्यावर दोन हातांनी टच करुन झुम वाढवला जातो..त्याचप्रकारे फुग्याच्या स्मोर असलेल्या अंधाराने आपला झुम जणु वाढ़वला आणी त्याच क्षणी फुग्याच्या समोरा-समोर कालोखात सफेद रंगाच धुक जमा होत एका शक्तिशाली पिशाच्चाच भयकालच बिभत्स रुप अवतरल.
त्या भयकाल पिशाच्चाचा पुर्णत देह काळ्या रंगाचा होता. डोक गोल टक्कल पडलेल असुन अर्धा चेहरा काळा तर अर्धा निळा होता.
लहान मोती सारखे डोळे जे की पिवळ्याजर्द रंगाचे असुन त्यात काळा टिपका होता..व ते डोळे कालोखात काजव्या सारखे चमकत होते...!
लकाकत होते अंगावर सर्र्कन काटा आणत मनाचा भयाने थरकाप उडवत होते. त्या भयकाल पिशाच्चा च्या देहाची शरीर यष्टी पातळ काळ्या जळालेल्या लाकडा सारखी होती.हात पाय शरीर सर्व काही काळ होत..! भयकालच्या शरीरा मागे कमरेवर एक सापासारखी वळ-वळनारी शेपटी होती..त्या शेपटीला एक कर्सरच्या रचनेप्रमाणे जाड लोख्ंडासारख शस्त्र होत..जे की सावजाच्या हाडा मांसात रुतून त्याच मांस -रगत लुचत असायच. फुग्याच्या देहाचा सेकंदात जलद वेगाने घडलेल्या अवतरलेल्या भयकालच्या आगमनाने अंगावर सर्रकन विंचवाचा काटा लुचाव तसं काटा लुचला होता. शरीरावर भीतीने एक नी एक झटका बसत होता. भीतीने डोळे पांढरे पडलेले ..मुखाचा असा काही आ-वासला गेलेला की त्यातुन किंकाळी बाहेर पडण्यासाठी धड-पडत होती.परंतु मुखातुन किंकाळी ऐवजी फक्त हवा बाहेर पडत होती. सर्व काही घटना जलद वेगाने घडत होत्या..आणि त्याच जलद वेगाने भयकालने आपल्या शरीराची हालचाल करत मुखातुन एक भयंकर आर्त किंकाळी ठोकत फुग्याच्या छातीवर आपले दोन्ही हात आपटले ..छातीवर प्रहार होताच...भयकालचे काळेकुट्ट हात निळ्या रंगाने चमकुन निघाले आणि त्या हातांमधल्या निळ्या रंगाच्या प्रकाशातुन अमानविय शक्तिमार्फत विद्युतउर्जेचा पुरवठा तैयार होऊन
हातांमधुन छातीत घुसला..त्यासरशी फुग्याच्या शरीरात मार्गक्रमण करताच निळ्या रंगाच्या त्या विद्युत अमानविय वाराने फुग्याची छाती निळ्या रंगाने चमकुन निघाली..मग तो निळ्या रंगाचा प्रवाह फुग्याच्या छातीतुन सापासारखा सळसळत वर-वर जात..थेट डोक्यात मेंदुत शिरला..! त्याचक्षणी फुग्याच डोक निळ्या बल्ब सारख चमकुन निघाल जात मुखातुन एक आर्त-किंकाळी बाहेर पडली आणि किंकाळी साठी उघडलेल्या मुखातून व विस्फारलेल्या डोळ्यांतुन निळ्या रंगाच धुर बाहेर पडु लागल! आणि पुढच्याक्षणी फुग्याच शरीरा ट्रेन ने धडक माराव तसे दुर हवेत हिबाळल गेल! 20-25 फुट मागे फुग्याच शरीर उडून जात मागे असलेल्या ऊतरन रुपी जागेवरुन खाली दगडासारख घरंगळत काट्या-कुट्यांतुन घसरत जात एका दगडावर आदळल! फट्ट आवाज करत डोक त्या दगडावर आदळल जाऊन मेंदूवर मार. बसला..आणि पुढच्या क्षणाला त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी पसरली. व तो बेशुद्धावस्थातेत निघुन गेला..!
□□□□□□□□□□□□□□□□□□□
महांक्राल बाबांच्या कानांवर तो आवाज पडला! कानांवर पडणारा आवाज कानातल्या पडद्यांमार्फत आत मेंदूत जात मग त्यांना त्या आवाजासरशी त्या योगपुरुषाचे रुप- चित्र क्षणात डोळ्यांसमोर दिसुन आल.इतकी त्या योग पुरुषांची ख्याती होती.
महांक्राल बाबांच्या डोळ्यांसमोर त्या योग-पुरुषाचे प्रतिबिंब उमटताच एक उच्चार बाहेर पडला!
" धवलयोगी..!!!!"
पाठमो-या अवस्थेतच महांक्राल बाबांनी हे वाक्य उच्चारल ..!
उच्चारलेल हे वाक्य धवलयोगींना ऐकू जाताच त्यांच्या ओठांवर एक मंद स्मितहास्य येऊन जात एक उच्चार बाहेर पडला.
" होय ..! महांक्राल..मीच..!"
पुन्हा एकदा आलेल्या आवाजासरशी महांक्रालबाबा आपल्या जागेवरुन उठले व त्यांनी मागे वळून पाहिल. तसे त्यांच्या नजरेस त्या योगपुरूषाच रुप दिसुन आल . त्या योग्पुरुष्याच्या शरीरावर खालून वर पर्यंत पांढ-या रंगाचे वस्त्र होते.वयाने जरी ते 70-80 वर्षाचे प्रौढ वाटत असले! तरी सुद्धा त्यांच्या मंद स्मित हास्याने फुललेल्या एका विशीष्ट प्रकारच तेज पसरलेल्या त्या चेह-याकडे पाहुन हे मुळीच वाटत नव्हत..की ते प्रौढ असावेत.त्यांच्या गळ्यात व हातामध्ये काहीबाही रुद्राक्ष माळा होत्या.
पांढरट मोठे डोक्यावर महादेवां सारखे बांधलेले केस होते.व त्याचसफेद रंगाची मोठी खाली लोंबकणारी दाढी होती. आणी ह्या दिव्य पुरुष्यांच नाव होत धवलयोगी ते महादेवाचे परम भक्त होते. योगी -पंडित अघोरी तांत्रिक सर्वांना ठावुक होत..की धवलयोगी हे महादेवाशी संपर्क साधु शकतात..त्या सर्वांन करीत धवलयोगी म्हंणजे साक्षात महादेवाचच रुप होत..मोठ-मोठे साधु पंडित,तांत्रिक,अघोरी..धवलयोगींच दर्शन घेण्याकरीता हिमालयात जात असत.परंतु ती मायावी गुफा कोणालाही अथक प्रयत्नांसहित सुद्धा सापडत नव्हती..कारण त्या सर्वांच्या मनात पाप होत हव्यास..शक्तिची वासना..होती. ज्याकारणाने ती मायावी गुफा कोणालाही आपल दर्शन घडवुन देत नव्हती..महांक्राल बाबांनी आश्चर्यचकित होऊन धवलयोगींना पाहाताच आपले पाऊल त्यांच्या दिशेने वाढवले ..व त्यांचे दोन्ही पायांना स्पर्श करुन त्यांच दर्शन घेतल..

. " नमस्कार .योग पुरुष..! तुम्ही इथे..? "
महांक्राल बाबा आपले दोन्ही हात जोडत म्हणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर
धवलयोगी मंद स्मितहास्य करत म्हणाले.
" होय..महांक्राल ..! तुझ्या पुत्राच्या अंतावर झालेल्या तुझ्या पितारुपी क्रोधाला आवर घालण्याकरीता साक्षात.. महादेवांनी तुझ्यासाठी एक संदेश मला दिलेल आहे! तेच संदेश-निरोप घेऊन आलो आहे..!" धवलयोगी म्हणाले.त्यांचा आवाज स्पेस मध्ये पसरणा-या विशिष्ट प्रकारच्या गुंजणा-या आवाजासारखा होता..जो की बाहेर पडताक्षणीच ऐकतच रहाव असं वाटत होत..!
धवलयोगींच्या ह्या वाक्यावर महांक्राल बाबांची मान किंचीत खाली झुकली व त्या खाली झुकलेल्या मानेसरशी डोळ्यांतुन एक अश्रु बाहेर पड़ला..व ते खाली पाहत म्हणाले.
" धवलयोगी .. ! .." महांक्राल बाबा काहीक्षण थांबले व पुन्हा म्हणाले..." जर का महादेवांना माझ्या पुत्र-पिता क्रोधाबदल ठावुकच होतं! तर मग माझ्या विघ्नेशच अंत का केलत .? त्याची काय चुकी होती..!" महांक्राल बाबा खाली पाहातच म्हणाले. तसे त्यांच्या ह्या वाक्यावर धवलयोगी मंदस्मितहास्य करत म्हणाले.
" महांक्राल..! विघ्नेशच अंत होणारच होतं .! " आज ह्याक्षणी..ह्या वेळेत..! " धवलयोगी काहिक्षण थांबले व पुन्हा म्हणाले" त्या नियतीने ही वेळ आधीच रचली होती..! महादेवांना सुद्धा हे ठावुक होत ! कारण " धवलयोगींचे हे वाक्य ज्यासरशी बाहेर पडल त्यासरशी महांक्राल बाबांनी आपली मान वर केली व म्हणाले.
" कारण..?" महांक्राल बाबा आपले डोळे छोठे करत म्हणाले.
तसे त्यांच्या ह्या वाक्यावर आकाशात एक च्ंदेरी रंगाची विज कडाडली व त्या विजेसरशी रात्रीच्या अंधारातल्या काळ्या ढगांमधुन एक सूर्यकिरणांचा प्रकाश खाली जमिनीवर येत धवलयोगींच्या शरीरावर पडला.प्रकाश पडताक्षणीच धवलयोगींनी आपले डोळे मिटले व काहीसेकंदात ज्यासरशी तो प्रकाश नाहीसा झाला.. मग त्यासरशी त्यांनी हळुच आपले दोन्ही डोळे उघडले.तसे धवलयोगींना आपल्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहणारे
महांक्राल दिसले .
" कारण हवंय..?" मंद स्मितहास्य करुणीया धवलयोगी महांक्राल यांस उद्दारीले. तसे महांक्राल यांनी होकारार्थी मान हळवली .
तसे धवलयोगी बोलू लागले.. "ठिके ऐक तर.." असे म्हणत धवलयोगी सांगू लागले.
......
"फार वर्षापुर्वीची

सत्ययुगातली सत्यकथा आहे.."...

क्रमश:

माफ करा..जास्त मोठ्या भागाला क्ंमेंटस येत..नाहीत..
त्याकारणाने अंत ..पुढील भागात 2 दिवसांत..भाग रेडी आहे.!
भेटू लवकरच...🙏🏼😊