Narakpishach - 6 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | नरकपिशाच - भाग 6

The Author
Featured Books
Categories
Share

नरकपिशाच - भाग 6

द-अमानविय सीजन 1
आग्यावेताळ भाग 6

रात्री : 8:30 वाजता ....
शहरातल ..सिद्धांतच घर..

-------------------------
--------------------------

शहरातल्या एका मोठ्या इमारतीत सिद्धांतचा 3 बीएचके 2T फ्लैट होता. जो की राकेशनेच त्याने बांधलेल्या इमारतीत त्यास घेण्यास सूचवलेला .सिद्धांतच्या फ्लैट नंबर 160 मध्ये आज खुप सारी माणस जमली होती . पुर्णत लाईव्हिंग रुम वेग-वेगळ्या, महागड्या लाईटस्नी
, लाल रंगाच्या फ़ुग्यांनी , प्लास्टीकच्या happy birth day नावानी सजवल होत . वातावरण तस पाहाता मन-मोहुन टाकणार होत,
तिथे जमलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या चेह-यावर हास्य झलकत होत.
गम्मत म्हणायली अशी की ते आनंद, आजुबाच्या चांगल्या सजावटीने पसरलेल? की हातात असलेल्या काचेच्या ग्लासात प्यायला घेतलली ब्रेंडेड दारुने पसरलेल. तेच समजुन येत नव्हत , आहे की नाही गम्मत.!
सिद्धांत आलेल्या पाहूण्यांच स्वागत करत, त्यांच्याशी दोन शब्द बोलून
हात मिळवनी करत पुढे-पुढ जात होता.त्याची हीच क्रिया परत -परत घडत होती . काहीवेळ निघुन गेला, त्यासरशी केक कापण्याच कार्यक्रम सुरु करण्यात आल. एका चौकोनी टेबलावर गुलाबी रंगाचा गोल केक ठेवला होता , केक समोरच मनस्वी ऊभी होती .आज मनस्वीचा दहा...वा वाढदिवस असल्याने ती छानशी नटलेली , तीने फ्रोजन मुवी मधल्या आपल्या आवड़त्या पात्राचे कपडे घातलेले . ज्याने ती खुपच सुंदर दिसत होती, एका राजकुमारी प्रमाणे.
मनस्वीच्या डाव्या बाजूला तिची मम्मा मायरा ऊभी होती . गोल चेहरा , टपोरे डोळे, लाल रंगाच्या लिपस्टिकने रंगवलेले ओठ जे की स्ट्रॉबेरी सारखे दिसत होते , मायरा रंगाने गोरी पान असुन तीने लाल रंगाची स्पेशली मॉडर्न डिजाईन असलेली साडी व मॉडर्न साडीला शोभेल असाच black कलरचा ब्लाऊज घातलेला. तिला पाहताना कोणी म्हणणार सुद्धा नाही की ही एक लग्न झालेली स्त्री आहे. मनस्वीच्या उजव्या बाजुला तिचा ड्याडू सिद्धांत उभा होता, सिद्धांतने वर एक निळ्या रंगाचा जैकेट आणि आत एक व्हाईट शर्ट , व जैकेट ला शोभेल अशी निळ्या रंगाची पेंन्ट घातलेली, आणि हातात एक महागडा घड्याळ घातलेला.
" मनु बेबी..! कापायच केक आता..? "
हातात प्लास्टीकची सुरी घेतलेल्या मनस्वीकडे पाहतच सिद्धांत म्हणाला . तस त्याच्या लहानग्या मनस्वीने हस-या चेह-याने आपल्या वडीलांकडे पाहत डोक हलवल. तस सगळ्यांनी
एका सुरात" happy birth day to you " अस म्हणण्यास सुरुवात केली. मनस्वीने एकवेळ हसूनच आपल्या मित्रांकडे पाहील , त्यानंतर प्रथमतिने केकवर लावलेल्या केंन्डल्स फूंकर मारुन विझवल्या,मग प्लास्टीकच्या सुरीने v आकार करत केक कापला, पुर्णत लाइव्हींगरुम haappy birthday आवाजाने भरुन निघालेल , आवाज बिल्डींग बाहेर सुद्धा जात होता.
□□□□□□□□□□□□□

सिद्धांतच्या फ्लैट असलेल्या इमारतीबाहेर, रसत्यावरुन एका विशिष्ट प्रकारचा आवाज म्हंणजेच (व्व,व्व, व्व, ) सायरन वाजवत एक एम्बुलेंस जात होती . की अचानक त्या एम्बुलेंसला न जाणे काय झाल की ती धक्के खातच थोडी दुर जाऊन बंद पडली.
" अर्र..काय झाल ह्या..गाडीला..? " एम्बुलेंस मध्ये ड्राइव्ह सीटवर एक
माणूस बसलेला, त्याच्या अंगावर पांढ-या रंगाचे कपडे घातलेले होते.
त्याच नाव गुंज्या होत. तो शहरातल्या एका हॉस्पिटल मध्ये एम्बुलेंस चालक होता . मृत शरीर तो ह्या गाडीने रात्री-अपरात्री मृतांच्या नातेवाईंकाच्या घरी पोहचवायचा.
" हा तिच्या आईला..! ह्या गाडीस्नी आज काय झाल कुणास ठाऊक"
गुंज्याने अस म्हणतच ड्राइव्हिंग हेंन्डलवर हात मारला. तस मागुन कसलातरी विचीत्र प्रकारचा आवाज आला, तस त्याने ड्राइव्हसीट जवळ मागे एक छोठीशी काचेची खिडकी होती. त्याच खिडकीतुन डोकावून मागे पाहिल , तस त्याच्या नजरेस मागे:-पेटलेल्या एम्बुलेंसच्या सफेद रंगाच्या बल्बच्या प्रकाशात रुग्णांसाठी वापर जाणार आपत्कालीन साहीत्य दिसल व त्यासहीत पांढ-या कापडात गुंडाळलेली दोन प्रेत स्ट्रेचरवर ठेवलेली दिसली. त्या प्रेतांच्यावर ठेवलेल्या पांढ-या कापडांना खुपसार काळपट रंगाच रक्त लागलेल .जणु दोन्ही प्रेतांतुन खुप सार रक्तस्त्राव होऊन गेला असावा . तस म्हणायला गुंज्याला ह्या सर्व दृष्यांची सवय झाली होती. नाहीतर कोणी सादरण मनुष्य इतक्यारात्री हे भयंकर दृष्यपाहून हदयविकारात गड़बड होऊन लागलीच राम नाम झाला असता. गुंज्याने मागे पाहील परंतू सर्वकाही शांत होत. "मेलेली माणस कुठे हालचाल करतात का..? आपण पण वेडे आहोत मागे पाहातोय ? "
गुंज्या आपल्या मनातच ,स्वत:शीच म्हणाला. पुढे पाहुन गुंज्याने एम्बुलेंसची चावी पिलायला सुरुवात केली, परंतु एम्बुलेंसचा फक्त खर-खरण्याचा आवाज होत-होता .गाडीकाही केल्या सुरु व्हायच नाव घेत नव्हती. शहरातल्या सुनसान रस्त्यावर आतल्या लाईट चालू असलेल्या अवस्थेत, ती एकमेव एम्बुलेंस सुनसान रस्त्यावर ऊभी होती. रातकिंडयाचा(किर्र,किर्र) आवाज ,गल्ली-बोलातील हिंडणा-या शहरातील भटकी कुत्र्यांच भेसूर रडस्ंगीत, गुंज्याच्या कानांवर ऐकू येत होत. गुंज्या आपल्या पुर्ण ताकदीने चावी पिळत होता-फिरवत होता .परंतू एम्बुलेंस मात्र चालू होत नव्हती. गुंज्या एम्बुलेंस चालू करण्यात गर्क होता, त्याची एकप्रकारे तंद्रीच लागली होती . की अचानक मागुन कसलातरी , काहीतरी खाली पडल्याचा धप्प आवाज झाला . शांतता इतकी पसरलेली की त्या आवाजासरशी गुंज्याने चावी फिरवण बंद केल, व पुन्हा एकदा मागे पाहील . परंतू दोन्ही प्रेत स्ट्रेचरवर ठेवलेल्या अवस्थेतच होते.
" गप्प बसा रे तुमच्या आईला भो==××नो ! काय चाललय तुमच..!"
गुंज्या रागानेच आपल्या दोन्ही भुवया ताणत त्या प्रेतांकडे पाहत म्हणाला.काहिक्षण तो दोन्ही भुवया ताणलेल्या अवस्थेतच त्या प्रेतांकडे पाहत होता. की अचानक तो एका वेड्या सायको सारखा आपल्या स्व्त:च्या वाक्यावरच खिखी, खीखी,खीखी करत डोक खाजवत दात काढत हसू लागला.
" काय गज्या तु पन? हे मढ काय तुझ्याशी बोलतत व्हय.! हिहिही, खिखिखी.. " गुंज्या स्वत:शीच म्हणाला . एका विचित्र वेड्या सारख्या त्याच्या हालचाली आणि बोलण होत-होत. न जाणे का परंतू अशा विकृत बुद्धीच्या माणसांची समाज्यात मुखवटा लावुन फिरण्याची कला अद्याप सुद्धा उपस्थीत आहे . सर्वांन समोर जरी तों चांगला वागत असला तरी त्याच वागण मात्र वेड्या सायको सारख होत .गुंज्याने एकदा त्या दोन्ही स्ट्रेचरवर ठेवलेल्या प्रेतांकडे पाहत , आपल्या तोंंडावर बोट ठेवल व उद्दारला.
" मस्ती करु नका रे ..! न्हाय तर फटकवील एकेकाला..!हिहिही,
खीखी..!" गुंज्याने पुन्हा एकदा विकृत उच्चारासरशी दात काढत पुढे पाहिल व एम्बुलेंसची चावी फिरवु लागला . विशिष्ट प्रकारचा आवाज एम्बुलेंस मधुन चावी फिरवताक्षणीच बाहेर पडत होता . जो की त्या स्मशान शांततेला तोडत दुर-दूरपर्यंत जात होता, त्या आवाजाने एकवेळ अस भासत होत, की कोणीतरी खिखिखी, किखिं, करत हसत आहे . कालोखात लपुन बसत मज्जा पाहत आहे . गज्या एम्बुलेंसची चावी फिरवत होता , परंतू यश काही केल्या हाती येत नव्हत .खर, खर करत एम्बुलेंस हलत होती . वातावरणातल्या शांततेला तो आवाज, भेदत होता .रातकिंड्याची किर, किर्र अंधारातले चित्र विचित्र, किड्यांचे आवाज आता बंद व्हायला सुरुवात झालेली , कारण कोणीतरी येत होत.
ज्याच्या आगमनाने शांतता पसरायला सुरुवात झालेली .गुंज्या खाली पाहतच चावी फिरवत होता. त्याच्या पुढ्यात थोडवर मागे पाहण्यासाठी एक आरसा होता. त्या आरशात मागे ठेवलेले पांढ-या कापडात गुंडाळलेले दोन प्रेत, व रुग्णासाठी लागणारे आपत्कालीन सामान दिसून येत होत. गुंज्या आपला एकटक चावी फिरवत होता . की अचानक त्या आरशात मागचे दोन्ही दरवाजे आपो-आप उघडायला सुरुवात झाली अस दिसून येऊ लागल. दरवाजा उघडल गेल त्यासरशी आत पांढ-या रंगाच धुक शिरायला सुरुवात झाली . त्या पांढ-या रंगाच्या धुक्याने ज्यासरशी स्ट्रेचरव ठेवलेल्या प्रेतास स्पर्श केला , त्यासरशी त्या निर्जीव प्रेतास एक झटका बसला , झटका बसला गेला त्याचक्षणीच ते प्रेत पांढ--या कापडासहित स्ट्रेचरवर ऊठून उभ राहील . त्या प्रेताच्या अंगावर असलेल्या पांढ-या कापडास लागलेल कालपट रक्त भयाण दिसुन येत होत. गुंज्याच लक्ष त्या प्रेतावर बिल्कुल नव्हत. तो एकटक आपल्या तंद्रीतच चावी फिरवण्यात व्यसत झालेला . इकडे त्या प्रेताने आपले पाय स्ट्रेचरवरुन अलगद उचलत खाली ठेवले . त्याच्या प्रत्येक हालचाली सरशी हाडांचा कट,कट आवाज होत-होता . जणु त्या प्रेताची हाड गोठली असावीत, गंज लागली असावी. पाय खाली ठेवल तस एकदमच ते प्रेत उभ राहील गेल , उभ राहताक्षणीच त्याच्या गुढग्यांच्या दोन्ही वाट्यांचा आवाज होऊन जात अंगावरच पांढर-कालपट रक्ताने माखून निघालेळ .कापड सर्व अंगावरुन खाली पडल . तस त्या प्रेताच भयंकर किळसवाण मन हादरवुन टाकणार रुप समोर आल. गुंज्याला कसलीतरी जाणीव होऊ लागली, मागे कोणीतरी असल्याची. त्याने एम्बुलेंसची चावी फिरवण बंद केल.त्यासरशी एम्बूलेंसच होणारा इंजिनचा आवाज थांबला गेला .

 

गुंज्याने एकवेळ आपले डोळे डावी-उजवीकडे फिरवले. व थेट एक कटाक्ष जोरात मागच्या खिडकीत टाकला, तस त्याच्या नजरेस एम्बुलेंसच्या दोन्ही झापा उघड़लेल्या दरवाज्यातुन काहीतरी बाहेर पडल्याच, व पुन्हा एकदा मोठा धप्प आवाज झालेच ऐकल .आवाज होताक्षणीच गुंज्याच्या हदयात एक छोठीशी कळ आली, श्वास फुलले गेले , घामाचे द्रव बिंदू कपाळावरुन क्षणार्धात ओघळू लागले, रिकाम्या स्ट्रेचर कडे नजर जाताच मनात असलेल्या भीतीच्या स्ंदुकात न जाणे कित्येक भयानक, भीतीने हादरवणा-या विचारांनी एका-पाठोपाठ रांग लावण्यास सुरुवात केली .
जोराचा जमिन हादरवुण टाकणारा भुकंप यावा आणि जमिन थर-थर करत थंडी भरल्यागत काफरुन जावी त्याचप्रकारे गुंज्याचे हात पाय काफू लागले . त्या काफरणा-या हातांनीच गुंज्याने आपला कपाळावरचा घाम पुसला . मग ड्राईव्हसीट जवळ असलेळ दरवाजा त्याने हळूच उघड़ला . त्या निरव शांततेत त्या दरवाजा उघडण्याचा आवाज दुर -दूर पर्यंत हवेच्या झुलकाप्रमाणे वाव्हत गेला. गुंज्याने एकवेळ डावी-उजवीकडे पाहिल,काळाकुट्ट अंधार त्या व्यतिरीक्त असेल तर ती होती. मुर्दाघरात असलेली हाड घोटावणारी थंडी सफेद रंगाचा जाड धुक, आणी स्मशानभूमीत असलेली अघटिताची चाहूल देणारी स्मशान शांतता. गुंज्या एम्बुल्ंस मधुन बाहेर उतरला, तस त्याच्या नजरेस दुर-दुरपर्यंत पसरलेल गुढग्यांन इतक धुक दिसुन आल. व एकक्षण डोक्यात विचार तरळून गेला की आपण दुस-याच कोणत्या तरी ठिकाणी तर नाही आलो ना.?
" आईशप्पथ येवढ धुक..!"

गुंज्या डोक्यावरचे केस चोलतच म्हणाला. व पाण्यातुन वाट काढत जाव. तस तो त्या गुढग्यांन इतक्या धुक्यातुन वाट काढत एम्बुलेंसच्या मागच्या बाजूस जाऊ लागला. कारण एम्बुलेंसचा मागचा दरवाजा उघडा असुन प्रेत गायब होत. ज्याने आप्ल्या व्यतिरिक्त ह्या जागेत कोणितरी असल्याची जाणीव त्यास झालेली .आजुबाजुचा कानोसा घे त एक-एक पाऊल पुढे -पुढे सारत गुंज्या मागच्या बाजुस चाललेला. भयाण अंतराळातला विशिष्ट प्रकारचा मनधुंद करुणी येणारा आवाज त्या कालोखातुन चारही दिशेंनी गुंज्याच्या कानावर येत होता . इतक्या वर्षाच्या नोकरीत गुंज्याने आजपर्यंत कित्येक प्रेत पोहचवा-पोहचव केलेली , आजपर्यंत त्यास कसलीही भीतीवगेरे मनात ऊठून आली नव्हती.परंतू आजचा दिवसा त्या दिवसांपेक्षा काहीतरी आगळा -वेगळा होता. मनात कसलीतरी भीती उत्पन्न होत चाललेली , पुढच्या संकटाची ,अनाहुतपणाची चाहूल
काहीतरी आपल्यासमवेत घडनारे ह्याची शाश्वती देऊन जात होती.
एकदाच गुंज्या मागच्या बाजुस आला . तस त्याने एकवेळ एम्बुलेंसच्या आत पाहील . आणि एम्बुलेंस मधल्या आत पेटलेल्या सफेद दिव्याच्या प्रकाशात त्यास दोन स्ट्रेचर दिसले. त्या दोन्ही स्ट्रेचरवर दोन प्रेत जशीच्या तशी मृत अव्स्थेत झोपलेली होती .प्रेत वगेरे गायब झाल नव्हत मग आपण पाहिल ते न्क्कीच मनाच भास असायल हव हा विचार गुंज्याच्या मनात आला .
" हे मढ तर इथच हाय...? मंग ह्यो दरवाजा कसा उघडला..?"
हाताची तर्जनी विशिष्ट प्रकारे गालावर चोलत गुंज्या म्हणाला . व त्याने
आजुबाजुचा परिसर न्याहाळण्यास सुरुवात केली . कारण त्याच्या मनात विचार आला ! की कोणीतरी मुद्दामुन आपल्या सोबत ही चेष्टा
केली असावी .परंतू दूर-दुर पर्यंत वाळवंटातल्या रेतीसारख गाढ धुक पसरलेल. ज्याने नजरेस काही दिसन म्हंणजे असंभवच म्हणायला हव!
शेवटी गुंज्याने तो प्रयत्न सोडून दिला. व पुढे ड्राइव्हसीट कडे जाण्यासाठी निघाला. तसही लवकरात- लवकर मृत प्रेत मृताच्या नातेवाईकांकडे पोहचायला हव होत . परंतु ड्राईव्ह सीटकडे जाताक्षणीच एम्बुलेंस मधुन बाहेर पडणा-या सफेद रंगाच्या दिव्याच्या प्रकाशात , गुंज्याला धुक्यात खाली तोंडावर पडलेली पाठमोरी बाहुली दिसली .
" अर तिच्या आयला ! ही बाहूली पडली व्हय खाली ? तरी
म्हंटल ह्यो आवाज कसला ! " अस म्हंणतच गुंज्याने ती खाली पडलेली बाहुली आपल्या हाती घेतली , व तिला गोल -गोल फिरवत न्याहाळू लागला .कापसासारखी मऊ-मऊ लागणारी बाहूली होती ती , त्या बाहूलीच्या डोक्यावर एक निळ्या रंगाची गोल टोपी होती, व त्या उलट लाल रंगाची फ्रॉक घातलेली दिसुन येत होती. जणु रक्ताने भिजवली गेली असावी , लाल रंगाच्या गरम रक्ताने न्हाऊन निघाली असावी. त्या बाहुलीच्या लाल रंगाच्या फ्रोकवर चिऊ ची साजिरी डॉल अस ईंग्रजीत काळ्या रंगात नाव लिहीलेल,
... " काय बकवास बाहुली ये..! नुस्त गु ..हाय ...गु! थु..." गुंज्याने तिच्या एक डोळ्याकडे पाहत हे वाक्य उच्चारल .कारण बाहूलीवर एकच डोळा आस्थित्वात होता दुस-या डोळ्याची जागा रीकामी होती.मग तिच्या चेह-यावर थुंकत गुंज्याने ती बाहुली जाड धुक्यात भिरकाऊन दिली. व लागलीच ड्राइव्ह सीटच्या दिशेने जाऊ लागला . ज्यासरशी ती बाहुली धुक्यात भिरकावली गेली .त्यासरशी त्या दिशेने एक भसाड्या आवाजात उच्चारल जाव तस गीत ऐकू येऊ लागल .
" टपा , टप , टपा , टप आवाज करती , इवल्याश्या पावलांनी घर ही हूंदडती.! " सामान्य मनुष्याने न ऐकलेला आवाज, घोगरा, क्लिष्ट , भरडा अशा विविध प्रकारांनी नटलेला हा आवाज ताळ सुर लावुन
हे मृतगीत गाऊ लागलेला, जो की गुंज्याच्या कानांवर पडताच त्यांने आपले पाऊल जागेवरच थांबवले , व एक आवंढा गिळून भेदरलेल्या नजरेने धुक्यात पाहु लागला .
" ए टक ,मक टक, मक ... टक,...मक .. बघती !
...टपो-या डोळ्यांनी तिच्या ती टक, मक बघती.!"
पुन्हा एकदा आलेल्या ह्या ताळ सुर लावून बोललेल्या संगितासरशी
दोन पिवळ्याजर्द रंगाचे डोळे त्या जाड धुक्यात चमकले .जे पाहुन गुंज्याच्या अंगावर , नसा-नसांतुन सर्रकन काटा उभा राहीला .
हातपाय जागेवर थिजले गेले .
" रक्ताचा पाट जस , आहे इचा थाट
तोडील लचका , आण घेइल घास ..हिहिही, खिखिखी! धम, धम
भयंकर पाश्वी हास्य घुमल . आणि त्यासोबतच एक ढोल बदडवण्याचा आवाज
" ए .को...को..कोण हाय रे ? .समोर ये ..!"
तुटक , मुटक शब्दांत गुंज्या उच्चारला .
" नक्की येऊ का..? खिखिखिखिक....!
खोळ गेलेला आवाज , व त्या आवाजात होता एक प्रश्न .ज्या प्रश्नाच उत्तर म्हंणजेच ( .हो-मृत्यू,) (नाही -जिवन ) असा होता . जर गुंज्या प्रथमदर्शनी हो म्हणाला , तर म्रुत्युस मुकणार होता, आणि जर नाही म्हणाला तर मात्र जिवन मिळण्याची शक्यता 1 प्रतिशिंत वर्तवली जात होती . परंतु सैतान तोंडात आलेला घास असच सोडून देइल तर नवलच म्हणाव लागेल. घाई-गडबडीत घेतलेला निर्णय नेहमीच चुकीचा असतो असे आपले आई-वडिल म्हणातात. परंतु गुंज्याने आप्ल्या आईवडिलांच कधी ऐकलच नव्हत. त्याने कसलाही विचार न करता " हो" म्हंटल तस त्या धुक्यातुन एक शेवटची संगीत ओळ बाहेर पडली.
"घाई नको करुस , तू खेळ आरामात
केलीस ना घाई , तर होईल घात...हिहिहिहिही!"
घोग-या , खोळ आवाजात उच्चारलेल शेवटच जे वाक्य ज्यासरशी संपल गेल .त्यासरशी धुक्यात ज्या दिशेला ती बाहुली फेकली गेलेली .तेवढ्या जागेत लाल रक्तासारखा जाडसर रंग पसरल लाल प्रकाश पसरला .कावरा बावरा होउन गुंज्या आजुबाजुला पाहत होता. की अचानक त्याच्या भिरभिरणा-या नज-यास ते लाल रंगाच प्रकाश दिसल . व त्या प्रकाशात ऊभी राहीलेली एका 6 -7 वर्षाच्या लहान मुलीची आकृती. पांढरा फट्ट चुन्या सारखा चेहरा ,कालपट विषारी ओठ , पिवळ्या रंगाचे डोळे त्यात एक काळा टीपका, व मोकळे सोडलेले केस, तिच्या अंगावर एक काळ्या रंगाची फ्रॉक होती . व हातात हदयायाशी कवटाळुन धरलेली ती बाहूली जी गुंज्याने थुंकत फेकून दिली होती.
" तु माझ्या साजिरीला फेकून दिलस..? तु थुंकलास तिच्यावर..? "
पिवळ्या डोळ्यांची चमक आता आग ओकू लागली. एक रुपयांच्या नाण्या येवढे तिचे डोळे मोठे होऊन जात विस्तवाप्रमाणे तापल्या सारखे दिसु लागले. गुंज्याचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता . कारण त्या 6 -7 वर्षाच्या लहान मुलीचा आवाज अगदी भयंकर कानठळ्या बसवल्या जातील इतका मोठा होता.
" न्हाई! न्हाई! म्या न्हाई...! मला.जाऊदे ..? को ..को..कोण हाईस तु..म्या काय बिघडवलत तुझ..? " काय ते मानवी कल्पनेच्या बाहेर अवतरलेल्या ह्या विचीत्र चेष्टेला पाहुन गुंज्याची पुर्णपणे वाचा बसली गेलेली . घश्यातुन निघणार आवाज आता ह्याक्षणी अशक्त झालेल्या रोग्या प्रमाणे बाहेर पडू लागलेला.थर -थर त्या पावलांनी तो मागे-मागे सरकू लागलेला , कारण ती पूढे-पुढे चालत येत होती . गुंज्याचा घास घ्यायला येत होती . म्रुत्युचा घास शरीरातुन प्राण बाहेर पडणार होता. मित्रांनो मृत्युची भीती बलाढ्य शक्तिहिंत मानवास सुद्धा आपल्या पुढे गुढगे टेकवण्यास भाग पाडते , तु कितीही बलाढ्य, ताकदवर असशील परंतु मृत्यु कोणास मुकत नाही . तो केव्हा, कस , कोठून , कशाप्रकारे कोणत्या रुपात अवतरेल सांगता येत नाही . समोरुन येणा-या आपल्या मृत्युस पाहुन एक -एक पाऊल मागे -मागे टाकत जाणारा गुंज्या अचानक कशासतरी धडकला गेला . धडकताक्षणीच पाठीला कसला तरी थंडगार लादी सारखा स्पर्श काहीक्षण झोंबला जात सर्व अंग शहारल , . तस त्याने लागलीच मागे वळून पाहील आणि समोरच दृष्य पाहताक्षणीच भीती जणु तुडूंब मनात उसलुन गेली. दोन्हीच्या दोन्ही कालपट रक्ताने माखलेली प्रेत जागेवर ऊभी राहीलेली . त्यातल एक जाड-जुड हडळी सारख फुगलेल नग्न प्रेत होत राम्याच . ज्याची डोक्याची कवटी फुटली होती, त्या कवटी मधुन मेंदू बाहेर आला होता, एक हात पुर्णपण तुटला गेलेला ज्याप्रकारे नळामधुन एक -एक थेंब मंदगतीने टप, टप पाण्याच्या आवाजासहीत गलाव त्याच प्रकारे लाल रंगाच रक्त बाहेर पडत होत , त्यासोबतच पोट फाटले जाऊन आतल्या सफेद रंगाच्या आतड्या बाहेर आल्या होत्या, दुसर प्रेत होत राम्याच पांढर फट्ट चेहरा व शरीरावर न जाणे कित्येक चाकूने वार केलेले त्याच ते प्रेत माती चालण्याच्या चालणीप्रमाणे दिसुन येत असंख्य बारीक-बारिक छिद्र पडलेली . गुंज्याचा मेंदू आत्ता बधिर झालेला! विचार करण तर सोडाच . मुळात ह्या संकटातुन सुटण्याची धडपड सुद्धा मावळली होती. त्याने जणु आपला आत्मा त्या सैतांनांना अर्पणच केलेला. आता आपल्याकडे वाचण्याचा कोणताच मार्ग नाही ! जे आहे ते उभ्या डोळ्यांनी पाहत मृत्यु स्विकारायच बस्स इतकच. काजळी फासलेला अंधार जणु मनात असलेल्या प्रयत्नांच्या विचारांवर धुळ फुंकून गेलेला . ज्याने सर्व काही अंधारमय झालेला .
खीखी, हिहि, खिखिखी पाश्वी हास्य करत राम्याच्या जाड-जुड प्रेतान गुंज्याला पकडून ठेवल. गुंज्याची काडीचीही हालचाल होत नव्हती जणु पुढे काय घडणारे ही भविष्यकाळवाणी त्यास कळाली होती . चेह-यावर छद्मी हास्य करत एक एक पाऊल वाढवत चिऊच पिशाच्च गुंज्या जवळ आल.
" माझ्या साजीरीचा डोळा कुठे गेला..?" चिऊ आजुबाजुला इकडे तिक्डे अंधारात पाहु लागली. व काहीक्षण झाल्यावर पुन्हा एकदा तिने आसुरी हास्य करत गुंज्याकडे पहिल!
" तु डोळा नाही म्हणून तिच्या तोंडावर थुंकलास ना ! आता
बघच...!" चिऊच वाक्य संपतोनी संपतोच की तोच तीने वा-याच्या वेगाने आपला पांढराफट्ट हात गुंज्याच्या एका डोळ्यात घुसवला, विशिष्ट प्रकारचा कातडी फाटल्यासारखा आवाज झाला .
विज कडाडली , सर्व काही उजळून निघाल व गुंज्याच्या तोंडून निघालेली आर्त किंकाळी विजेने आपल्या आत सामावुन घेतली.
" wow तुझे डोळे किती छान आहेत ना..!"
पुन्हा एकदा तोच प्रकार घडला , चिऊने गुंज्याचे दोन्ही डोळे उपटून काढले . गुंज्याच्या डोळ्यांच्या जागी आता फक्त कालोखाची पोकळी ऊरली . त्या पोकळीतुन लाल रंगाच जाड रक्त आसवांप्रमाणे बाहेर पडू लागल. भयंकर एकापाठोपाठ आर्त किंकाळ्या त्याच्या मुखातुन बाहेर पडु लागल्या परंतु प्रत्येक निघणा-या आर्तकिंकाळी सरशी एक विज कडाडली जाऊ लागली. ज्याने गुंज्याचा आवाज दबला जाऊ लागला.
चिऊने आपल्या साजिरी नामक बाहूलीच्या आप्ल्या अमानविय शक्तिने गुंज्याचे डोळे बसवले .व हळूच दुर दिसणा-या एका इमारतीच्या फ्लैटकडे पाहील ज्या फ्लैटमधुन एका सुमधुर आवाज येत होता.
"happy birth day to you manasavi "
□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□
पाषाणवाडी जंगल
वेताळ मंदिर...

" अर कमल्या ...!.. ही ...तलवार खरच सोन्याची हाय लेका.?"
वेताळाच्या हाती असलेल्या सोन्याच्या तलवारीकडे पाहतच परश्या म्हणाला .
" अबे चुतिया ती तलवार सोड! त्या तलवारीवरच हीर बघ..?"
वेताळाच्या हाती असलेल्या तलवारीच्या पातीवर खालून वर-पर्यंत एकूण चार हिरे बसवलेले जे की टॉर्चच्या प्रकाशात चमकत होते .
" अर त्या ही-यांच्यात काय हे येवढ..?" गंग्या म्हणाला.
" अय गंग्या.! तु नावाप्रमाणाच बुल्ला माणूस हाईस लेका..! "
कमल्या म्हणाला .

 

" अरे अस हिर बाजारात बी भेटतत की..!" ग्ंग्या पुन्हा उच्चारला .
" ये परश्या समजव लेका ह्याला..? काय येड हाय हे..!"
कमल्या परश्याकडे पाहुन म्हणाला. तस परश्याने हात दाखवतच मी समजावतो असा इशारा केला.
" अर ग्ंग्या ! " परश्याने अस म्हंणतच ग्ंग्याच्या खांद्यावर हात ठेवला व पुढे बोलू लागला.
"हे हिर हाईतना लेका..? ते हिर खर हाईत..! आण ह्या एका
हि-याची किंमत इतकी हाय ..? " ग्ंग्याने परश्याकडे पाहतच
दोन वेळा भुवया उडवल्या . जणु किती किंमत आहे हे विचारत असावा.
" ग्ंग्या ह्या हि-यांची किंमत इतकी हाय.. की तु अक्खा आयुष्य
इंग्लीश दारु पीत बसशील..! ते बी गो-यापान बायकांमधी..!"
परश्याच्या ह्या वाक्यावर गंग्या आपल्या स्वप्नांच्या नगरीत हरवुन गेला,
तस परश्याने कमल्याकडे पाहतच मान हलवली. इकडे ग्ंग्या स्वप्नात हरवला, महागड्या दारुच्या बाटल्या, गो-यापान विदेशी बायका त्याच्या नजरेसमोर दिसुन येत तो जिभळ्या चाटत हसू लागला .
" मंग काय प्लान हाय..?" कमल्या कसतरीच हसत म्हणाला.त्याच्या डोळ्यांत जणु पैशाचा मोह उठुन दिसत होता. जिभळ्या तलवारीकडे पाहताच चाटल्यात जात होत्या .
" मला माझा हिस्सा भेटस असल.! तर म्या तैयार हाई..! "
गंग्या आपली जीभ चाटत म्हणाला . तस परश्याने लागलीच ती तलवार वेताळाच्या हातुन काढून, हिसकावुन घेतली. त्यासरशी आकाशात एक विज कडाडली. वेताळाच मंदिर उजळून निघाल . व वेताळाचे डोळे अंगार भरल्यासारखे त्या तिघांकडे पाहू लागले.□□□□□□□□□□□□□□□□□
" पाऊस येणार हाई वाटत..?" भग्या आकाशात चमकणा-या विजांकडे पाहत म्हंणाला.
" व्हय की..! आण ही तिघ अजुन आली न्हाय म्हणायची..?"
फुग्या म्हणाला. की अचानक त्याच्या मागुन एक ओळखीचा आवाज आला .
" अर आलू की..आम्ही..!" गंग्या मंदिराची चौकट ओलांडून बाहेर आला, त्याच्या मागो-माग परश्या, मग कमल्या अस तिघे ते बाहेर आले
" काय र इतका ऊशीर..?" फुग्याने त्या तिघांकडेही पाहिल .
" फुग्या सगळ सांगतु म्या..! तु आण भग्या फक्सत लवकर तैयार व्हा
आपल्याला इथन..निघायचय..?" परश्या एका सुरात म्हणाला त्याच्या बोलण्यात एकप्रकारचा आनंद दिसुन येत होता .
" निघायचय म्हंजी .! कुठ जायचय.?" फुग्या त्या तिघांकडेही पाहत म्हणाला. तस त्याच्या ह्या वाक्यावर परश्याने फुग्याला अक्षरक्ष मिठी मारली . त्याच हे अस वागण-मिठी मारण फुग्याला अनपेक्षित होत.
" अर फुग्या आम्हाला मंदिरात बघ काय सापडलय..! गंग्याने अस
म्हंणतच वेताळाची सोन्याची तलवार दाखवली , पुर्णत सोन्याने
भिजवलेली व पातींवर बसवलेली चार प्रकाशमय हि-यांची ती
तलवार पाहुन फुग्याने लागलीच आपल्या हाती घेतली व आवासुनच तिच्याकडे पाहु लागला.
" फुग्या ..! आता आपण श्रीमंत व्हणार! ही तलवार इकुन बक्कल
पैसा कमवणार..बोल देशील आमची साथ !"
परश्या आपला डावा हात फुग्याकडे पुढे करत म्हणाला. फुग्याने एकवेळ तलवारीकडे पाहील मग समोर परश्याच्या पसरलेल्या हाताकडे कटाक्ष टाकला.
" नाही ..! नाही ..! नाय..नाय...! ही तलवार म्या तुम्हांस्नी इकुन देनार .. न्हाय ! " फुग्या डोक नाही -नाही हलवतच तलवार पाठीमागे लपवतच म्हणाला. फुग्याच्या ह्या असा वागण्यावर एकवेळ त्या तिघांनाही झटकाच बसला , कमल्याने तर तोंडातली बिडी थुंकली व रागातच त्याच्याकडे पाहू लागला .
" आर पन का इकु देनार नाय..?" ग्ंग्या फुग्याकडे पाहतच
.... " आर दीड शहाण्यानो येताळ देवाचा कोप लागल तुमास्नी ..!
जिव घेईल -जिव ! आण म्या तस व्हऊन देणार न्हाई..!"
" ये फुग्या ? आम्हाला आमच भल कळतय कशात हाय ..?
आण कशात न्हाय..! तु मुखाट्यान ती तलवार परत कर
न्हाय तर..?" येवढ वेळ गप्प बस्स बसलेला कमल्या मध्येच
म्हणाला .! पैस्याच्या मोहपायी मैत्री, किव, दया सर्वकाही विसरुन गेलेल्या नशेत कमल्या धुंद झालेला .
" न्हाय तर काय करशील...र .! तुह्या सर्वांच्या भल्यासाठीच बोलू
राहिलो मी!" अरे -तुरे करता करता भांडण होऊ लागल. शब्दांचा
बार जणु माजला हाहाकार , शब्दांची चकमक होउ लागली . फुग्या कमल्या दोघेही भिडू लागले . की अचानक कोणीतरी फुग्याच्या मागुन आल आणि त्याच्या हातुन तलवार हिसकावुन घेत पाठणात घुसवली .
विशिष्टप्रकारचा स्प्प्प आवाज, झाला . फुग्याच्या शरीरास मांसातुन घुसलेल्या तलवारीने त्याच्या पुर्णत शरीरास एक झटका बसला , डोळे मोठे झाले. श्वास अडकू लागला , तस त्याच्या ह्या अवस्थेवर गंग्या, कमल्या, परश्या, विकृतपणे गालातच कुत्सिकपणे हसू लागले .तो जो कोणी होता ज्याने तलवार फुग्याच्या पाठणात घुसवली होती . तीच तलवार त्याने पुन्हा एकदा पाठणातुन स्प्प आवाज करत उपटून काढली .तस फुग्याच्या शरीरास एक झटका बसला व आपल्यावर कोणी हल्ला केला हे पाहण्यासाठी मोठ्या कष्टाने मागे वळून पाहिल . आकाशात दोन ढग घासले गेले . एकमेकांवर दगड आपटावी तस ठिंणग्यांण रुपी प्रकाश पसरला , त्या प्रकाशात तो आपल्या हाती ती रक्ताने माखलेली तलवार घेऊन उभा होता . वटारलेल्या डोळ्यांनी भुवया ऊडवत दात दाखवत खदा, खदा हसत होता . त्याला पाहताच फुग्याच्या तोंडून रक्ताची एक गुलनी बाहेर पडली जात त्याच नाव निघाल.

भग्या........!!!!!!!!

भ..भ भग्या...! रक्ताने भरलेल्या तोंडाने फुग्या आपल पुढच वाक्य पुर्ण करणार की तोच. भग्याने ने पुन्हा एकदा ती तलवार फुग्याच्या पोटात घुसवली. रक्ताची पिशवीफाटावी तस पोट फाटून जात, तलवार पोट चीरत रक्त उडवत आत घुसली. रक्ताच्या चिलकांड्या उडाल्या जात भग्याच्या तोंडावर बसल्या. फुग्याच्या डोळ्यांतुन अश्रु बाहेर पडू लागले, तोंडातुन फेसासारख लाल रक्त बाहेर पडू लागल.
" चो, चो, चो, चो ! बिचारा फुग्या देव कोपल म्हंण! हिहिहिहिह.
परश्याने दात विचकत हसत ग्ंग्याला टाळी दिली .
" माद××त साला ! भोग स्व्त:च्या कर्माची फल! अस म्हंणतच कमल्याने त्याच्या पाठीवर वार केलेल्या जागी एक लाथ बसवली.
त्यासरशी फुग्या , भग्याच्या अंगावर जाऊन आदळला. अर्धवट घूसलेली तलवार पुर्णत आत घूसली गेली . एकदाच शेवटच फुग्याच्या तोंडून श्वास उसासा, एकसाथ निघाल जात डोळे लाल रक्तासारखे लाल झाले तोंड आ वासल गेल व त्याच निर्जीव प्रेत जमिनिवर तलवारीसहत त्या चारही जनांनसमोर खाली पड़ल.
" आता ह्याच काय करायच..?" गंग्या फुग्याच्या उघड्या डोळ्यांच्या जमिनीवर खाली पडलेल्या निर्जीव देहाकडे पाहत म्हणाला.
" ए भग्या ! ह्या गंग्याला बी भोसक भोस××च्याला ! काय साला प्रश्न इचारतू !" परश्या मुद्दामुनच म्हणाला. तस भग्याने फुग्याच्या पोटावर पाय देतच तलवार पोटातून जोरात उपटून काढली.व बेडका सारखा फुगलेल्या, घुबडासारखा वटारलेल्या डोळ्यांचा भग्या खिदी, खिदी ग्ंग्याकडे ती तलवार दाखवत हसू लागला .
" ह्याला ह्या जंगलात गाडु .! " येळ घालून जमणार न्हाय..!" कमल्या आपल डोक चालवतच पुढे बोलू लागला .
" परश्या ..! तु एक काम कर ? online तिकिट बूक कर...! आण म्या ग्ंग्या, भग्या, ह्यो मढ गाडून आलू . मंग लागलीच निघू स्टेशनवर जायाला..!" कमल्या आपली युक्ती त्या तिघांसमोर मांडत म्हंणाला.
एक दीड तासात सर्व काही काम उरकल गेल . फुग्याच प्रेत गाडुन टाकल. online तिकिट बूक केली गेली. चारही जनांनी नवे कपडे घातले बैगीत तलवार ठेवली व अंधा-या पायवाटेने..चालत निघाले.
पाषाणवाडीतल्या बसस्टॉपच्या दिशेने....!


क्रमश:.....

... टपा , टप , टपा , टप आवाज करती !
इवल्याश्या पावलांनी घर ही हूंदडती.!
ए ...टक ,मक टक, मक टक,मक बघती !
टपो-या डोळ्यांनी तिच्या ती टक, मक बघती.!
रक्ताचा पाट जस , आहे इचा थाट
तोडील लचका तुझा .. , आण घेइल घास ..हिहिही, खिखिखी!, घाई नको करुस , तू खेळ आरामात
केलीस ना घाई , तर होईल घात...हिहिहिहिही!"
बगा , बगा , बगा, बगा आली कोण...पाहा ..
इवल्याश्या चिऊची.....सजिरी डॉल......!
..😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈

: