Narakpishach - 2 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | नरकपिशाच - भाग 2

The Author
Featured Books
Categories
Share

नरकपिशाच - भाग 2

द- अमानविय..... सीजन 1 ...
..... आग्यावेताळ भाग 2 ...
 
 
" स्स्स ... स्स्स्स साहेब.! आम्हाला तिथ येताळाची मूर्ती
सापडलीया.!"
फुग्याच्या तोंडून निघालेल्या ह्या वाक्यासरशी वातावरणात काहीक्षण विशिष्ट प्रकारच्या ( व्हू, वूहू ) आवाजासहित हवा वाहू लागली . हवेने जंगलातली झाड डावीकडून-उजवीकडे झुकली जात हेलकावे खावू लागली, हवेच रुपांतर वादळी हवेत होऊन जात आकाशात काळे ढ़ग जमा होऊ लागले. हवेने प्रत्येकाच्या डोक्यावरचे केस उडत होते . फक्त राकेश सोडुन कारण त्याच्या डोक्यावर safety hat होती. वातावरणात काळपट ढगांचा कालपट प्रकाश पडला जात वा-याचा वेग वाढू लागला . डोळ्यात कचरा नको जायला म्हणून प्रत्येकाने आप-आपल्या चेह-यासमोर हात धरुन ठेवलेला. त्याच क्षणी एक ढोल बदडवण्याचा मोठा ,आतिशक्तिशाली (धम) आवाज पुर्णत वातावरणात घुमला. एकापाठोपाठ सलग 10-12 ( धम , धम, धम, भम , भम ) अशे ढोल बदडवण्याचे सुर त्या सर्व जनांच्या कानावर पडला जात वादळ शम्ळ
गेल . वातावरण पुन्हा एकदा पुर्ववत झाल. कालपट ढग नाहीसे , झाले , वारा थांबला गेला , पुनच्छ सूर्यप्रकाश पसरला. काहीक्षण त्या सर्वांमध्ये मृत्यंजय शांतता पसरली. सिद्धांतने एक कटाक्ष राकेशवर टाकला , त्याच्या चेह-यावर बारा वाजले जात भीतीचे ठसे उमटलेले . मग शेवटी सिद्धांतने आपली नजर त्या सर्व मजुरांवर टाकली. ते सर्व तर आधीच भेदरलेले होते . त्यातच हा वातावरणात झालेला बदल पाहुन ते सर्वजण एकमेकाचा हात धरुन थर-थर कापुच लागलेले. सिद्धांत वर-वर जरी आपल्या चेह-यावर नॉर्मल भाव दाखवत असला. तरी तो आतुन राकेश व मजुरांच्या ह्या अवस्थेवर हसत होता, कारण त्याच्या मते हे सर्वकाही मूर्खपणाच प्रदर्शन होत. अचानक सिद्धांत एका वेड्या सारखा मोठ -मोठ्याने हसू लागला
"हाहाहाहा , हाहाहा ..! " राकेश व सर्व मजुर सिद्धांतकडे आश्चर्यकारक नजरेने पाहु लागले.
" सिद्धांत..! काय झाल...? ठिक आहेस ना तु..?" राकेश सिद्धांत जवळ येत त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला.
" हात काढ.? काय करतोयस..?" सिद्धांतने राकेशच्या हात बाजुला काढला.
" अरे मग अस हसतोयस...का..?" राकेश पुन्हा उच्चारला .
" अरे हसू नको नाहीतर काय करु..? तुम्ही सर्व असे वेडे सारखे जे
वागताय!" सिद्धांत पुन्हा हसला .
" म्हंणजे.?" राकेशला सिद्धांत च्या वाक्याचा अर्थ कळाल नाही..!
" अरे म्हंणजे..! मी आताच काहीक्षणापुर्वी माझ्या मोबाईल वर एक
न्यूज पाहिली .की ह्या भागात 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता
वर्तवळी गेलीये ! आणि आता जे काही वातावरण बदलल होत.
सिद्धांत राकेश व मजुरांकडे पाहत पुन्हा एकदा हसला. व पुढे
म्हणाला . " ते कोणि वेताळाच नाव वगेरे घेतलेल म्हणून बदलल
नव्हत."
"म.....म...म....स्स्स्स....स्स...साहेब ...त्यो ढोल चा आवाज..?" आजुबाजूला थर-थरणा-या नजरेने पाहत बोबडी वळलेल्या अवस्थेतच फुग्या म्हणाला.
" ते ढोल वगेरे मला काही माहीती नाही..! पण एक गोष्ट माहितीये! " सिद्धांतने आपल हसण थांबवल व आपल्या हाताची तर्जणी त्या मजुरांच्या दिशेने केली व एक भुवई उंचावुन त्या मजुरांकडे पाहत गंभीर आवाजात म्हणाला." ह्या सरकारी प्रोपर्टीला मिळवण्यासाठी मी खुप खटाटोप केलेत. कारण ही जागा मला खुप आवडलीये. आणि ह्या जागेत माझ फ़ार्म हाऊस बांधण्याच काम रोखण्यासाठी ! कोणीही मध्ये आल.? तर त्या गाववाल्यांना आणि त्या वेताळाला ही. " अस म्हणतच सिद्धांत पुन्हा एकदा थांबला आणि त्याने आपली भुवई the rock प्रमाणे उंचावली व पुढे म्हणाला. " मातीत मिसळायला मी मागे पुढे पाहणार नाही.!"
सिद्धांत एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कामाला असल्याने त्याची ओळख-पालख इतकी मोठी होती. की सरकारी कामगार वकील , पोलिस, तलाठी सुद्धा त्याला सलाम ठोकायचे . शहरातल्या मोठ-मोठ्या गुंड़यांचेही कॉन्टॅक्ट सिद्धांत कडे होते. जे तो वेळ आल्यावर वापरायचा .
" श्हहह्ह्ह्ह साहेब !.. वेताळाला अस काही बोलू नका...? त्याच अपमान म्हंजी मौत हाय साहेब..! कोपल त्यो साहेब अस बोलू नका..!"
फुग्या आपले दोन्ही हात जोडत म्हणाला .
कधीही देवावर विश्वास न ठेवणा-या सिद्धांतला आता मात्र फुग्यावर खुपच राग आला . का तर आपण इतके श्रीमंत , हुशार, उच्चशिक्षीत , आणि हा दीड-कोडीचा अडाणी मजूर असून आपल्याला ज्ञान पाजत आहे. त्याचा अहंकार जणू दुखावला जात तो वर-वर येऊ लागलेला . परंतु कसे तरी त्याने स्व्त:वर कंट्रॉल ठेवल व शांत पणे म्हणाला.
" मग काय म्हणायचय तुला? ती निर्जीव.. मूर्ती जिवंत आहे ..?
की जिव घेणारे माझा ? बर चल ठीके दाखव मला.. कुठे आहे
ती वेताळाची मूर्ती..?"
सिद्धांतच्या ह्या वाक्यावर फुग्याने त्याच्या मागे उभ्या असलेल्या राकेश कडे पाहिल. राकेश नाही अस म्हणतच नकार कळवत होता. जणू सिद्धांत रागाच्या भरात काही उलट-पालट करुन बसायला नको . नाही तर त्याच्या नास्तिक बुद्धीच परिणाम पुर्णत परिवारास भोगावा लागणार होता.राकेशला आपल्या मित्राची काळजी जी होती.त्याच कारणाने तो नकार दर्शवता होता . फुग्या एकटक राकेश कडे पाहु लागलेला .जे सिद्धांतने त्याच्या चेह-याकडे पाहुन हेरल . तस त्याला समजल की तो आपल्या मागे पाहत आहे. त्याने एक गिरकी घेत मागे वळून पाहील. त्याला नाही असा इशारा करत डोक हलवणारा राकेश दिसला . राकेश आणि सिद्धांतची नजरा- नजर झाली . राकेश सिद्धांत कडे पाहत कसतरीच हसला .
" काय चाललंय तूझं..?"
" कुठे काय..! काही नाही..!" राकेश आपल्या दोन्ही हात एका विशिष्ट प्रकारे हवेत फिरवत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर सिद्धांतने फक्त मान हळवली व पुढे पाहील
" चला पाहुयात वेताळाची मूर्ती..?" सिद्धांतने फुग्याकडे पाहील. परंतु फुग्याला राकेश नाही म्हणुन खुनावत होता . सिद्धांतने पुन्हा एकदा मागे वळून पाहील. पुन्हा एकदा तोच प्रकार घडला नकारार्थी मान हळवणारा राकेश पुन्हा सिद्धांतच्या नजरेस पडला .
" अव साहेब ! न्हाय ना तुमच देवावर विश्वास. मग सोडा की तो ईषय..? फुग्या समजवण्याच्या सुरात म्हणाला . परंतु सिद्धांत आपल्या हट्टाला पेटला होता . तो असच हार मानणार नव्हता.
" आता ती मूर्तीं पाहील्या शिवाय मी इथुन जाणार नाही...? आणि जर तुम्हा लोकांना ती मूर्ती दाखवायची नसेल? तर मग ठिक है... !मीच शोधतो..?"अस म्हणतच सिद्धांत तणतण त्या पावलांनी फार्म हाऊसच्या दिशेने ती मूर्ती शोधण्यास जाऊ लागला .
" साहेब ! थांबवा त्यांना ..? ते नास्तीक आहेत . त्यांनी येताळ देवा बदल काय माहीती नाय ! ते काय विपरीत बोलले ना.. तर अनर्थ घडल..! " फुग्या सिद्धांत कडे पाहत म्हणाला. फुग्याचा जाडजुड चेहरा आता ह्याक्षणी एका अनामिक भीतिने ,चिंतेच्या लाटेने फुलला होता. कसलीतरी भयानक विकृत चाहूल त्याच्या चेह-या वरुण राकेशला दिसून येत होती .सिद्धांत आजुबाजुला कुठे ती मूर्ती दिसते का ते पाहु लागला . परंतु त्याच्या नजरेस फक्त बांधकामाच विटा,ब्लॉक, सिमेंट, पिवळ्या रंगाच्या हातगाडया, रेती, इत्यादी सामान दिसून येत होत . सिद्धांत ची नजर वेताळाच्या मूर्तीला शोधत होती. की अचानक त्याच्या आजुबाजूला भिर-भिरणा-या नजरेस एका मोठ्या खोदकाम केलेल्या खड्डयाच दर्शन घडल, ज्यात ती मूर्ती होती. सिद्धांतच्या मनाला कसलीतरी चुणूक लागली. व एक-एक पाऊल वाढवत तो त्या खड्डयाच्या दिशेने निघाला . ज्याला पाहून सर्व मजुरांच्या चेह-यावर आठ्या जमा होउ लागल्या.
" राकेश शेट.! सिद्धांत साहेब त्याच खड्डयाच्या दिशेने चाललेत
ज्यात ती मूर्ती आहे..! " एक मजूर म्हणाला.
" काय ...? " राकेश मोठ्याने ओरडलाच . तस त्याच्या ह्या
वाक्यावर त्या मजूराने फक्त मान हळवली.
" साहेब..? काय तरी करा साहेब? न्हाय तर ते गाववाले काय म्हणाले होते माहीतीयेना? ...सैतानाचा नंगानाच माजल , रक्त मांसाची होळी खेळल, येताळ जेव्हा बाहेर पडल..! " फुग्या सिद्धांतच्या पुढे-पुढे जाणा-या आकृतीकडे पाहत म्हणाला . राकेशच लक्ष सुद्धा समोरच होत . सिद्धांत आपले पाऊल वाढवत-वाढवत पुढे जात होता , त्याच्या पायांखाली खड्डयातली माती येत होती . जो तो पावलांनी तुडवत निघालेला . एकदाच तो त्या खड्डयाजवळ येऊन पोहचला.खड्डयात पाहण्या अगोदर त्याने प्रथम मागे उभ्या त्या सर्वांच्या चेह-याकडे पाहील. प्रत्येकाच्या चेह-यावर चिंता , दिसून येत होती .त्याने त्या सर्वांकडे पाहून एक हास्य दिल.व समोर त्या खड्डयात पाहील . ज्यासरशी त्याने पुढच दृष्य पाहील त्याचक्षणी त्याच तोंड आ वासल्या सारख मोठच्या-मोठ झाल . राकेशला सुद्धा सिद्धांत प्रमाणे वेताळाची मूर्ती पाहण्याचा मोह आवरला नाही .तो सुद्धा सिद्धांत जवळ पोहचला. मग त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवतच एक कटाक्ष त्या खड्डयात टाकला. तस त्याला आपल्या नजरेसमोरच एक मंदिर दिसल वेताळाच मंदिर . काळ्या दगडांपासुन बनलेल ते मंदिर होत .दगडांच रंग काळा असल्याने मंदिराकडे पाहताना थोडीफार भिती वाटत होती.
बाहेरुन मंदिरातल्या दरवाज्यात पाहिल असता आतमध्ये काळा कुट्ट अंधार दिसुन येत होता.
" राकेश ! हे तर मंदिर आहे ..? आणि ते मजूर म्हणत होते की मूर्ती
सापडलीये !
सिद्धांत मंदिराकडे पाहत म्हणाला .
" हो ना ! आणि मूर्ती नक्की आत असेल .! " राकेश सिद्धांतच्या वाक्यास दुजोरा देत म्हणाला.
" मग आत जायच का..? " सिद्धांत उत्सुकते पोटी म्हणाला . त्याच्या ह्या वाक्यावर राकेशने फक्त मान हळवत होकार दर्शवला . तसे दोघेही सांभाळून खड्डयात उतरले त्यांच्या मागो-माग ते मजूर सुद्धा आले .
सिद्धांत, राकेश , फुग्या व त्याचे मजूर मित्र वेताळाच्या मंदिरा बाहेर उभे होते. सिद्धांतने आपल्या खिशात हात घालून आपला महागडा
i phone 13 बाहेर काढला.त्याने एक कटाक्ष त्या सर्वांकडे टाकतच टॉर्च ऑन केली. व आपला एक पाऊल त्या दरवाज्यात टाकण्यासाठी पुढे सरसावला. सिद्धांत दरवाज्यात पाऊल टाकणार होताच की तोच मध्ये फुग्याने त्याला अडवल व म्हणाला.
" साहेब ?" फुग्याच्या ह्या वाक्यावर सिद्धांतने त्याच्या कडे पाहील तस फुग्या पुढे बोलू लागला.
" साहेब बुट बाहेर काढा की ! मंदिरात बुट घालून जात
नाहीत..!" फुग्याच्या ह्या वाक्यावर सिद्धांतने कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याने थेट बुटांसहित आत प्रवेश केला. सिद्धांतला फुग्याच्या वाक्याचा जरासाही अर्थ किंवा वेद जाणुन घ्यायचा नव्हता, आणि नाही त्याला देवाच्या आदरपुर्वक नियमांवर विश्वास होता. सिद्धांत दाराची चौकट ओलांडून आत गेला . मग नंतर राकेश सुद्धा त्याच्या मागोमाग आत शिरला . परंतु त्याने आपले बुट बाहेर काढले. सिद्धांतने हातात फोनची टॉर्च ऑन करत मंदिरात प्रवेशकेला .सर्वप्रथम टॉर्चचा प्रकाश त्याने आपल्या पायांवर मारला, तस त्याला टॉर्चच्या प्रकाशात आपल्या पायांजवळून खाली-खाली जाणा-या मंदिरातल्या काळ्या रंगाच्या जुनाट प्रजातीच्या दगडी पाय-या दिसल्या . सिद्धांतची उत्सुकता शिंगेला जात वाढतच चालली होती. त्याने टॉर्चचा प्रकाश जागेवर उभ राहून खाल पर्यंत फिरवण्यास सुरुवात केली. म्हंणजेच जागेवरुनच तो टॉर्चचा प्रकाश एक -एक पायरी वर टाकू लागला. मोजून -एकूण वीस पाय-या होत्या . ज्या सिद्धांतने मनो-मन मोजल्या होत्या. पाय-या संपल्या गेल्या तस पुढे-पुढे सरसावणा-या प्रकाशात सिद्धांतला पाषाणस्वरुपी दोन पाय दिसले . त्या काळ्या पायांसमोरच एक काळ्या रंगाचा एक दिवा होता ज्यात काळी झालेली वात होती .
" सिद्धांत ! तिथे मूर्ती आहे वाटत .? टॉर्च वर घे ..?"
राकेश म्हणाला . तस त्याच्या ह्या वाक्यावर सिद्धांतने मागे पाहातच होकारार्थी मान हळवली. सिद्धांतने हळके-हळकेच टॉर्च मूर्तीच्या पायांवरुन वर-वर घेण्यास सुरुवात केली. तस प्रकाशात सर्व प्रथम वेताळाच्या चंदेरी रंगाच्या धोतीच दर्शन घडल. मंद गतीने टॉर्चचा प्रकाश वेताळाच्या मूर्तीवरुन फिरत होता. चांदेरी रंगाची धोती संपली तस वेताळाचे दोन्ही हात दिसले . उजव्या हातात एक सोन्याची तलवार होती. तर दुस-या डाव्या हातात एक कोमजुन गेलेला हार होता.
" राकेश..? ती तलवार सोन्याची असली तर..? जाम पैसे भेटतील
नाही..! " सिद्धांत आपली मनातली भावना पुढे मांडत म्हणाला.
परंतू राकेश त्याच्या ह्या वाक्यावर फक्त पुढे आवासुनच पाहत होता .सिद्धांतने आता टॉर्च वर-वर नेण्यास सुरुवात केली .काहीसेकंदातच वेताळाच्या पाषाण स्वरुपी मूर्तीचा चेहरा आता त्या दोघांनाही दिसणारा होता .की तोच त्याच क्षणी सिद्धांतच्या हातात असलेल्या फोनची battrey संपली जात टॉर्चप्रकाश बंद फुस्स झाला . पुर्णत वेताळ मंदिरात घन-घोर अंधारमय शांतता पसरली .
" अरे टॉर्च चालू करना ! काय करतोयस ..? " राकेश म्हणाला .
" अरे फोन स्विच -ऑफ़ झालय !"
" wait माझ काढतो ..? " अस म्हणतच राकेशने आपला
स्मार्टफोन बाहेर काढुन तो ऑन करण्यास सुरुवात केली . परंतु स्मार्टफोन काहीकेल्या चालू होत नव्हता .एकप्रकारे त्याचा ही फोन स्विच-ऑफ़ झाला असावा .
"अरे हा पन स्विच-ऑफ़ झाला वाटतंय.!" राकेश मोठ्यानेच म्हणाला . तस त्याच्या ह्या वाक्यावर सिद्धांतने शांत राहण्यास सांगितल.
" श्ह्ह्ह्ह..कोणीतरी आहे? " सिद्धांत आपला हात पुढे कालोखाच्या दिशेने करत म्हणाला. कारण अंधारात चांदीसारख काहीतरी लुक-लुकत होत. ज्याचा आकार एका नाण्या येवढा होता.
 
 
 
क्रमश :
 
 
पुढील भागात पाहुयात!
1 ] सिद्धांत पाहु शकेल का वेताळ मूर्ती .आणी नास्तिक असल्याचा परिणाम काय होईल.
२] कोण होते ते गावकरी ...? काय म्हणाले होते ते..? ..