Indraza - 21 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 21

Featured Books
Categories
Share

इंद्रजा - 21

भाग - २०
(दुरावा💔)
.
.
.

इंद्रजीत - गुड मॉर्निंग ऑल ऑफ you.....


समर - गुड मॉर्निंग सर....


अनुसया - गुड मॉर्निंग.....


माधुरी - गुड मॉर्निंग सर...


इंद्रजीत - स्टाफ, अर्जंट मिटिंग आहे दहा मिनिटं मध्ये मिटिंग रूम मध्ये या.....


अनुसया - इंद्रा, अचानक मिटिंग.....?


इंद्रजीत - सांगतो सांगतो...सगळ्यांना येऊ दे....


माधुरी - सर...


इंद्रजीत - या या सगळ्यांनी आत या....


समर - हो सर...


इंद्रजीत - तर आज अचानक मिटिंग बोलवण्याचं कारण सांगतो.....खरंतर कारण म्हणजे एक गुड न्यूज आहे....
आपल्या कंपनी ने इतर कंपनीच्या लिस्ट मधून सेल्स,प्रॉडक्शन मध्ये खूप मोठं टारगेट अचिव्ह केलंय...आपण लिस्ट मधून फस्ट आलोयत.....सगळ्या न्यूज पेपर्स मध्ये बातमी आले.....बिजिनेस वर्ल्ड मध्ये आपल्या कंपनीच नाव गाजलंय आज.....वाव!! im so happy...


सगळे - Yehhhh 👏👏


अनुसया - अभिनंदन!!


समर - वाव सर we are happy too💕







माधुरी - खूप भारी न्यूज आहे सर....


इंद्रजीत - हो खरं तर तुमच्या सर्वांमुळे मी काहीच करू शकलो नसतो.....माझा हुशार स्टाफ, आणि कामसू इमानदार कामगार, आणि सगळ्यांचे आशीर्वाद हेच माझं बळ आहे माझ्या यशाचं रहस्य आहे.....धन्यवाद सर्वांना.....


समर - सर आम्ही आमचं कामं केल शेवटी या मागे तुमचं ही हार्ड वर्क आहेच.....


जोया - हो सर तुमचं पण यात कष्ट आहेतच...


अनुसया - काय मग? It's time to celebrate now....


इंद्रजीत - हो मग होणार....आज सर्वांना माझ्याकडून बोनस आणि मिठाई....आणि उद्या धम्माल करायला शानदार पार्टी माझ्याकडून.....


सगळे - yehhhh..... hip hip Hurrey....... ❤️
.
.
.

ममता - काय गं काय झालं???


जिजा - वैतागले मी माई उलट्या करून करून....आता तर वाढल्यात....कां असं कळत नाही? सर्वांना इतका त्रास नाही होतं मला....?


ममता - चालायचं गं,तुला आता तिसरा महिना लागला ना......
म्हणून...आणि असा विचार बंद कर प्रत्येकाचं शरीर काय सारखं असतं का? बाकीच्यांना नाही झालं तर तुला नाही व्हायला पाहिजे कां? असं नाही बोलायचं हम्म...अग तु नाजूक आहेस जास्त काळजी घ्यावी लागते.....आणि जस जस महिना उलटेल ना बग उलटी बंद होईल.....आणि मळमळ न हे चालूच राहत गं...


जिजा - बरं सॉरी माई...


तारा - हाय दिदा...हाय माई....


ममता - या राणी सरकार...


तारा - हे घे...माझा ओपन डे झालं आज, पेपर्स....


जिजा - अरे वाह! तारा बाळा अग फस्ट फस्ट आलीस सगळ्यात......फुलं मार्क्स....वेल डन बाळा....


ममता - वाह वाह! गुणांची लेक माझी.... ❤️


तारा - थँक्यु माई....


अभिजीत - माई...माई आबासाहेब....भाऊ......


ममता - अरे अरे काय झालं?? हे नाही आहेत....अर्चू सोबत गुजरात ला गेलेत आठवण नाही कां तुला....


अभिजीत - अरे हो..मी मी त्यांना कॉल करेन....अअअ
एक गुड न्यूज आहे......
मला नोकरीं मिळाली......


ममता - काय वाह! अभिनंदन.....


तारा - अभिनंदन अभि दादा.....


जिजा - congress पार्टनर.....

अभिजीत - थँक्यु थँक्यु....
बँकेत मॅनेजर ची पोस्ट आहे....Deputy Manager in HDFC.....


जिजा - वाव ग्रेट यार...!! शेवटी केलंस तू....






ममता - वाह वाह असाच पुढे जा बाळा खूप मोठा हो.....








अभिजीत - हो, सगळं तुमचाच स्पोर्ट आहे....
तुमच्याच आशिर्वादामुळे....







तारा - आज सगळ्या गुड न्यूज आपल्या वाड्यातच आहेत वाटतं माई....







इंद्रजीत - माई......अभ्या....... जिजा.....ए डार्लिंग....






जिजा - अरे हो हो हळू.....







इंद्रजीत - ऐका ऐका.....मला सगळ्यांना......







माई / तारा / अभिजीत / जिजा - हा हा एक गुड न्यूज द्यायची असेल........ 😂😂😂
(एका सुरात....)








इंद्रजीत - अरे तुम्हाला कस समजलं?? 🙄







ममता - आज सगळ्यांच्या चांगल्या बातम्याच येतात ना....







जिजा - बरं तुझी न्यूज सांग...







इंद्रजीत - आपण बिजिनेस वर्ल्ड मधलं सेल्स च खूप मोठं टारगेट अचिव्ह केलंय.......आपली कंपनी नंबर वन ला गेले......आपल्याला बराच नफा झालाय....आणि बिजिनेस फॅमिली मध्ये आपलं मोठं नाव झालंय.....माझं आणि आबासाहेबांच ड्रीम पूर्ण झालंय आज.....वाव! ग्रेट फिलिंग.....







जिजा - वाव.....इंद्रा......😍
(हळू उड्या मारत......)







इंद्रजीत - ए ए ए ज जिजा..... अग.....






ममता - जिजा अग उड्या नको मारू....







जिजा - अय्या..... हो सॉरी सॉरी....
इंद्रा खूप अभिनंदन ❤️i am So Happy 💕
(मिठी मारताना......)








इंद्रजीत - अअअअ जिजा..... 😅ते माई....?






जिजा - 😅







अभिजीत - भाऊ हे सगळं तुझ्यामुळे झालंय....तुझ्या कष्टमुळे.....रात्रंदिवस आपल्या कंपनीकडे पुरेपूर लक्ष दिल्यास तू.....







ममता - हो ना माझी दोन्ही मुलं तशी हुशार आहेत....इंद्रा खूप अभिनंदन बाळा...








तारा - अभिनंदन पार्टनर....








इंद्रजीत - थँक्यु...मी सगळ्यांना उद्या पार्टी द्यायचं ठरवलंय....सगळ्यांना इंव्हाईट करा ओके....







अभिजीत - हो हो...






तारा - अरे पार्टनर अभि दादा ला नोकरीं मिळाली...Deputy Manager ची..... आणि मला फुलं मार्क्स मिळाले सगळ्यात.....







इंद्रजीत - काय अभिनंदन डार्लिंग ❤️वेल डन..! आता फस्ट ये.... आणि
अभिनंदन अभ्या...







अभिनंदन - थँक्यु भाऊ...







इंद्रजीत - सगळं आनंद आज आपल्याच घरी आलाय वाटतं.....वाव यार.....







ममता - बाळाचा सुद्धा पायगुण आहे हा.....❤️







इंद्रजीत - हो नक्कीच 💕







जिजा - हो गं माझं बाळ.....❤️😍





****************************



इंद्रा रेडिओ वर गाणी ऐकत,बाल्कनी मध्ये बसला......हातात सिगरेट होती........
जिजा तीच कामं आवरून खोलीतं आली......
जिजाला पाहताच इंद्राने सिगरेट ठेवली.....
खोळीतील वातावरण एकदम रोमँटिक झालं होतं.......
जिजा जाऊन इंद्रा जवळ बसली......त्याच्या मिठीत.....






📻🎶


ओढ तुझी छळते मला....
भास असा कां तुझा सारखा?...
आस तुझी लागे जीवा....
भास असा कां तुझा सारखा....
झूलते कां असे?
भवती तुझ्या मन बावरे......
ओढ तुझी छळते मला...
भास असा कां तुझा सारखा..... 💕








इंद्रजीत - बोला, झालं कामं?






जिजा - हम्म झालं...
तू सोडणार कधी???






इंद्रजीत - काय?






जिजा - सिगरेट, बियर्स Etc..






इंद्रजीत - सॉरी जिजा बग मी हळू हळू कमी करतोय बाळा लवकरच बंद ही करेन....






जिजा - ह्म्म्म ठीके तुझ्यावर माझा विश्वास आहे....






इंद्रजीत - थँक्यु!
कस वाटतय आता??






जिजा - ठीक वाटतय...
किती दिवसानंतर आपण असं जवळ बसलोय....







इंद्रजीत - महिन्यांनी म्हण 😂






जिजा - हो 😂
आज तुझ्यावर खूपच प्रेम आलंय..... 👀 हँडसम आहेस ना खूप म्हणून..... 👀💕
( त्याला एकटक बघत.....)








इंद्रजीत - हो कां 😂 चला झोपूया.....
काय झालं?? असं कां पाहतेस? जिजा 👀







जिजा हळू हळू त्याच्या ओठांकडे जात असते.......
जिजाच्या अचानक जवळ येण्याने तो जरा सावरतो.......
इंद्रा ही तिच्या डोळ्यांमधल्या जादूत हरवतो....






📻🎶

दूर दूर कां अशी तू गं राहते........
ये न ये तू जरा रात सांगते....
धुंद या क्षणात मोहुनी तू लाजते......
पाहता मी तुला वेळ थांबते.....
झूलते कां असे?
भवती तुझ्या मन बावरे......
ओढ तुझी......







बऱ्याच महिन्या नंतर जिजा आणि इंद्रा जवळ आले.......
जिजाने हळूच इंद्राच्या ओठांवर तिचे ओठ ठेवले.....
इंद्रा सगळं काही विसरून गेला,
आणि जिजाला प्रतिसाद देऊ लागला.......💕
तिच्या ओठांच्या स्पर्शनी इंद्राचा सगळा ताण निघून गेला......
जिजा सुद्धा आनंदी होती ❤️






शारीरिक सुखं ही एक गरज आहे,पण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत,दोघांची इच्छा असताना झालेला स्पर्श केव्हा ही सुखच देऊन जात....

.
.
.
.
.

इंद्रजीत - माईsss गुड मॉर्निंग!!






ममता - गुड मॉर्निंग बाळांनो...






जिजा - माई तारा?






ममता - गेली सुद्धा शाळेत....







जिजा - अरे देवा.... सॉरी माई मी नेहमीच उशीर करते ना उठायला......सगळं तुम्हाला करावं लागतं...






ममता - अग त्यात सॉरी काय...गप्प..लग्न झाल्यापासून सगळं तू करतं होतीस तेच काय?? आता चल ये नाश्ता करूया तुझ्या आवडीचे पोहे केलेत....








इंद्रजीत - वाह पोहे वैगेरा..... 😂थाट आहे बाबा....








जिजा - हो मग.... 😅







इंद्रजीत - माई अभि गेला कां कामावर? आज त्यांचा पहिला दिवस होता ना....







ममता - हो गेला बाळा..लवकर येईल. म्हणाला आज पार्टी आहे ना....







जिजा - माई तुम्ही पण येणार ना....








ममता - छे! मी असल्या पार्टीज मधे नाही जात...मला आवडत नाही..... आणि अग हे पण नाहीत आर्ची नाही मी काय करणार येऊन त्यापेक्षा मी अराम करेन घरात उषा असेल माझ्यासोबत......तुम्ही तिघे जा मज्जा करा पण काळजी घ्या..... इंद्राsss









इंद्रजीत - हो हो माई..








जिजा - काय तुम्ही माई 🤧
ठीके..... 😅








इंद्रजीत - एक मिनिटं..... 📲

हॅलो,हा डॉक्टर अंकल बोला ना........ 📲







डॉ.अंकल - अरे कुठे आहात? आज येतंय ना? चेकअप आहे जिजाच........ 📲








इंद्रजीत - अंकल तारीख तर नाही आली अजून वेळ आहे ना........ 📲








डॉ.अंकल - हो नाही आली पण आज जिजाची पहिली सोनोग्राफी करायचीय ना....सॉरी मी विसरलो असावं सांगायला......तिला तिसरा महिना उलटत आला......आज पहिल्यांदा बाळ दिसेल त्याची हालचाल दिसेल....बघायचीय ना?.?........ 📲








इंद्रजीत - काय सांगताय अंकल...हो मग मला मला ब अ...🤧📲
येतोय आम्ही लगेच.....
जिजा.....








ममता - काय रे काय झालं?








जिजा - अरे काय?







इंद्रजीत - चल लवकरच डॉक्टर अंकल नी बोलवलय तुझी पहिली सोनोग्राफी करायची आहे.....आज बाळाला बघायचंय आपण..... 😃जिजा... माई.... बाळाला....








ममता - काय वाह! 😃







जिजा - काय खरं 😃चल मग निघू....








इंद्रजीत - हो चल आवरून ये...







जिजा - आलेच.....








ममता - हळू हळू गं....
इंद्रा मी खूप खुश झाले बग ऐकून....








इंद्रजीत - मी पण माई...😃







ममता - नीट जा हा बाळा....







जिजा - चला....








इंद्रजीत - अरे लगेच आली...








ममता - उत्साही बग किती 😂बाळा नीट जा हा...









जिजा - हो हो माई....
चल चल लवकर......








इंद्रजीत - हो हो अग....
जीवा गाडी काढ रेssss
.
.
.
.
.
.

डॉ. अंकल - काय झालं?? जिजा घाबरलीस कां?






जिजा - हो ते सोनोग्राफी म्हणजे सगळं दिसणार? बाळ नीट असेल ना सगळं ठीक आहे ना? हे टेन्शन...






डॉ. अंकल - अम्म हं अजिबात टेन्शन नको घेऊ हम्म फ्री रहा.....आता आपण फक्त ही मशीन पोटावर फिरवणार मग तुला दिसेल बाळ.....हू...







इंद्रजीत - हो अंकल.....







जिजा - हो...







डॉ. अंकल - बग हू...







जिजा / इंद्रजीत - नाही दिसत आहे अंकल......
(एका सुरात.......)







डॉ. अंकल - बाळ म्हणजे पूर्ण बाळच दिसणार नाही..थोडा तो पता होगा ना आप लोगो को 😂







इंद्रजीत - सॉरी अंकल....







जिजा - हम्म 😂







डॉ. अंकल - अब दिखेगा देखो..और हर्ट बिट्स भी सुनाई देगी सुनो.... और देखो....







जिजा - हा हा...दिसलं....
(इंद्राचा हातं पकडून म्हणाली......)







इंद्रजीत - हो अंकल...








जिजा / इंद्रजीत - आई शपथ! आमचं बाळ...😃💕








डॉ. अंकल - सगळं नॉर्मल आहे.....वाह वाढ पण छान झाले......असच काळजी घेत रहा....
सिस्टर याची कॉपी घेऊन या आणि रिपोर्ट पण....







सिस्टर - हो डॉक्टर








जिजा आणि इंद्रा बाळाला बघताच इमोशनल झाले.....त्यांना त्यांचा आनंद एक जोडपं म्हणून व्यक्त करता येतं नव्हतं........कळत नव्हतं काय प्रतिक्रिया द्यावी.....सगळं बोलणं करून दोघ तिकडून निघाले.....






गाडीत बसताच क्षणी इंद्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.....आज त्याला पहिल्यांदा इतकं रडताना पाहून जिजा चकित झाली.....





जिजा - इंद्रा काय झालं....?
 
 
 
 
 
 
 
जीवा - भाऊ काय झालं?
 
 
 
 
 
 
 
मल्हार - काय त्रास होतोय कां भाऊ?
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - नाही रे, ते आत आज पहिल्यांदा आमच्या बाळाला पाहिलं ना तर...थोडं इमोशनल झालो...आतमध्ये रडता नाही आलं कारण ते सगळे होते तर....पण कंट्रोल नाही झालं....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - भाऊ रडू नका आम्ही तुमची फिलिंग समजू नाय शकत..... पण..
 
 
 
 
 
 
 
 
मल्हार - हो भाऊ..वहिनी ते कॉपी की काय म्हणता ते दाखवा की बाळाची....
 
 
 
 
 
 
 
जिजा.- हो हे घ्या....
 
 
 
 
 
 
 
मल्हार - आई शपथ भाऊ, कसलं भारी आहे ओ...हे वेगळंच काय तर वाटायलय पण लई भारी हाय...
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - होय की राव..कसलं गोड आहे...
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - ह्म्म्म चला आता घरी...
 
 
 
 
 
 
 
जीवा - हो भाऊ...
.
.
.
.
.
 
जिजा - हो हो हो....सगळं नॉर्मल आहे....चांगली वाढ ही झाले बाळाची...... 📲(कॉन्फरेन्स कॉल....)
 
 
 
 
 
 
 
मनाली - बरं झालं बग..📲
 
 
 
 
 
 
 
अजिंक्य - व्हय की...बाकी जिजा तू जे कॉपी पाठ्वलीस की नाय लई भारी आहे गं कसलं गोड आहे ते राव..मस्त वाटलं बग काय तरी यगळं...... 📲
 
 
 
 
 
 
 
मनाली - वेगळं रे.......... 🤦‍♀️📲
 
 
 
 
 
 
 
निलांबरी - आता इकडे सुरु नका करू.. 🤦‍♀️ बरं जिजा काळजी घे गं जरा आता.....खाण पिणं जप हा....... 📲
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - हो हो 📲
 
 
 
 
 
 
 
निलांबरी - तारा कशी आहे? 📲
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - एकदम मस्त..मॅडम दहावीत आहेत यंदा.. नववीत फस्ट आले क्लास मधून...एक्सट्रा कलासेस ला जातात आता....📲
 
 
 
 
 
 
 
 
मनाली - अरे वाह!📲
 
 
 
 
 
 
 
अजिंक्य - भारी झालं बग...तिला सांग अभ्यास कर आता 😃📲
 
 
 
 
 
 
 
जिजा - हो करते रे...आई बाबांची खूप आठवण काढत असतो आम्ही दोघी.......पण काय करणार मी तर फार रडू ही शकत नाही लगेच बीपी लो होतेय........ 📲
 
 
 
 
 
 
 
 
मनाली - जिजा जे घडून गेलं ते बदलणार नाही..मग त्यात जगण्यात काय अर्थ....जे गेले त्याचा दुःख तुलाच समजतं असेल आम्ही तुझी भावना कधीच नाही समजू शकत कारण आमचे आई बाबा सोबत आहेत....पण atleast एवढंच बोलू की आम्ही सोबत आहोत कायम......नको टेन्शन घेऊ हम्म 📲
 
 
 
 
 
 
 
अजिंक्य - होय बरोबर बोलत्या ती..आता तुला जास्त गरज वाटतं असणं त्यांची पण आपण यावर काय करू शकत नाय म्हणून उदास नको होऊ 📲
 
 
 
 
 
 
 
 
निलांबरी - हो गं 📲
 
 
 
 
 
 
 
जिजा - हो तस नाही होतं कारण माई आबा खूप काळजी घेतात 📲
 
 
 
 
 
 
 
 
मनाली - हो ना मग..... 📲
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - आणि आहात आहात म्हणता पण सगळे लांब गेलात ना.....मन्या ला नोकरीं मिळाली आणि ती नाशिक ला शिफ्ट झाली........आज्या गेला परत कोल्हापूर ला पोलीस भरती साठी......आणि निलू गावी जाऊन बसले आता काय तर लग्नाचं बघते....आणि अभ्या पण नोकरीला लागला तो ही बिझी...... इंद्रा पण कामात बिझी मी एकटी...... 😔काय यार...... 📲
 
 
 
 
 
 
 
 
मनाली - अग तुझ्यासाठी नाशिक पण पार करेन मी....कुठे फार लांब आहे 📲
 
 
 
 
 
 
 
 
अजिंक्य - तू कधी पण. बोलीव हा आज्या उभा राहील तिकडं....... 📲
 
 
 
 
 
 
 
 
 
निलंबरी - मी सुद्धा...... 📲
 
 
 
 
 
 
 
अजिंक्य - आणि जिजा अग जरा समजून घे की, येणाऱ्या बाळाला आपण हे दाखवणार कां की त्यांचा आज्या मामा असा बेरोजगार आहे, आणि बापाच्या व्यवसायमध्ये मदत करतोय स्वतःच असं काय नाय...त्याला पण दाखवायला नको आज्या मामा ने काय केलंय कोण हाय....पुढ जाऊन त्यो म्हणला पाहिजे ह्यो माझा आज्या मामा आहे. म्हणून........... 📲
 
 
 
 
 
 
 
 
 
मनाली - हो ना..... बाळा समोर काय तरी इमेज हवी ना आपली.....नायतर आपल्याकडून काय शिकणार ते... 📲
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - खरंय 💔📲
.
.
.
.
.
.
.
 
जिजा रात्री इंद्राची वाट बघत बागेत उभी होती......तो अजून आला नव्हता.......म्हणून ती वॉल्क करतं होती......डोक्यात सतत विचार चालू होते.......तेवढ्यात मागून एक माणूस आला आणि जिजाच्या गळ्या भोवती दोरी टाकली........तो दोरी जोरात खेचू लागला......जिजा घाबरली, तिला कोणाला आवाज देणं ही शक्य होतं नव्हतं.......दोरी जोरात पिळली जात होती, जिजा ने खूप झटपट केली.....काही केल्या तिचे प्रयत्न सफळ होतं नव्हते.....
 
 
 
 
 
 
 
तेवढ्यात मागून इंद्राची गाडी आली....समोर होणारा प्रकार इंद्राने पाहिला.......तस जीवा, मल्हार आणि इंद्रा जोरात पळत आले......आणि त्या माणसाला पकडलं.......जिजा ने दोरी बाजूला काढली, तिचा श्वास गुंतू लागला.......ती जोरजोरात खोकायला लागली....एक. क्षण जिजाला वाटलं हाच तिचा शेवटचा काळ असावा..... 💔
जीवा आणि मल्हार ने त्या माणसाला खूप मारलं.....ताबडतोब पोलिसांना ही फोन केला.....
 
 
 
 
 
 
जिजा जागीच बेशुद्ध पडली.........इंद्रा खूप घाबरला.......
त्याने लगेचच डॉक्टर अंकल ला फोन केला......अंकल काहीच वेळात आले.......जिजाच्या गळ्यावर अगदी हलकेसे डाग उठले होते.......अंकल नी जिजाला तपासलं......इंजेक्शन दिले तस जिजा नॉर्मल झाली....
 
 
 
 
 
 
 
डॉ. अंकल - काय हे? इंद्रा? अशी काळजी घेतोयस तू जिजाची......
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - नाही अंकल मला नव्हतं माहित ती गार्डन मध्ये होती आणि......
 
 
 
 
 
 
 
 
डॉ. अंकल - अजून फक्त दोन मिनिटाचा उशीर झाला असता ना तुला यायला जिजा आणि तुझं बाळ जागीच गेलं असतं......मी स्पष्ट बोलतोय, एवढं होऊन पण तुझं बाळ आणि जिजा सुखरूप आहेत नशीब चांगल समज तुझं.....नाहीतर एवढ्यात तुझं.बाळ....💔
 
 
 
 
 
 
 
 
ममता - भाऊ असं नका बोलू....असं काय झालं तर आम्ही यांना काय उत्तरं देऊ......ते अजून आले पण नाहीत.....😔😭
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - अंकल प्लिज..अहो आमची चूक झाली माफ करा.....खरच माफ करा....पण असं नका बोलू जिजा आहे ना बरी आणि बाळ...
 
 
 
 
 
 
 
 
डॉ. अंकल- मग काय बोलू....? तुमच्या देवाची कृपा आहे.... दोघ सुखरूप आहेत.....
आधीच सांगितलेलं मी जिजाची ही डिलिव्हरी खूप काळजी घ्यायची आहे...... त्यात हे असं.... अरे करा ना सगळं काही बंदोबस्त ठेवा चांगला तिच्या सोबत रहा सतत....माझा हक्क आहे म्हणून बोलतोय, राग नका येऊ देऊ लोकांची मदत करणं बंद करा यात तुम्ही अडकताय समजलं.....कधीतरी स्वतः पुरता ही विचार करा.....
 
 
 
 
 
 
 
 
तारा - अंकल, 😭दिदा आणि बेबी बरा आहे ना....
 
 
 
 
 
 
 
डॉ. अंकल - हो रडू नकोस तू बाळा बरे आहेत ते....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - पार्टनर रडू नकोस ती झोपले फक्त हू...बाकी काही नाही झालं.......माई जा तुम्ही दोघी आता सगळं नीट आहे ना...जिजाला जाग आलीच तर मी बोलवतो जा.... रडत बसू नक्का दोघीना त्रास होईल....
 
 
 
 
 
 
 
 
ममता - बरं ठीके चल तारा...
 
 
 
 
 
 
 
डॉ. अंकल - काळजी घे इंद्रा.... आणि काही जानवल....तर ये उद्या.....येईल आता ती शुद्धीत.....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - ओके अंकल..थँक्यु....
 
 
 
 
 
 
 
जीवा - भाऊ ते पोलीस आणि त्यो....
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - शुईईईई.....चल.....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत खाली गार्डन मध्ये गेला......पोलीस ही तिकडे आलेले......त्या माणसाला समोर बांधून ठेवलेला.....इंद्राला प्रचंड राग आला होता....त्याचे डोळे रागाने लाल बुंद झालेले.......इंद्राने त्या माणसाला खूप मारलं........लाथेने तुडवलं.......त्याचा रक्त बाहेर येईपर्यंत मारलं......त्याला मारून झाल्यावर समोर खुर्चीवर बसला....हातात सिगरेट घेतली......आणि त्याच्याकडे रागाने बघत बघत राहिला.....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - कोण आहे रे तू??? कोणी पाठवलं तुला...? 😡माझ्या बायकोला कां हातं लावला......???
 
 
 
 
 
 
 
मल्हार - भाऊ हा तोच आहे.....आता परवा आपण बघा ते जमिनीच कामं केल त्या माणसाचं....तो..
 
 
 
 
 
 
 
समोरील व्यक्ती - मग बरोबर हाय ना तू माझी जमीन हडप करून त्यांना देशील मग मी गप्प बसू कां?
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - तुझी जमीन काय. म्हणालास ए भाड्या.&₹&%😡 तुझी जमीन होती कां ती..?....तू त्या गरीब शेतकऱ्यांना त्रास देतं होतास त्यांना फसवून जमीन घेत होतास.......मी त्यांची मदत केली ते ही कायदेशीर तर ते चुकलं.......आणि तू आज माझ्या घरी येऊन माझ्या बायको-पोराला मारण्याचा प्रयत्न केला......आता बग कायदेशीर पणे तुला शिक्षा देतो....कोणाला कळणार पण नाही तुला मी मारलंय😡
 
 
 
 
 
 
 
 
स. व्यक्ती - ए तू तू असं नाही करू शकत.....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - मग तू माझ्या बायकोला कसा हाट लावलासsssssss 😡😡😡 तुझी हिंम्मत कशी झालीsssssssss 😡 कशी झालीssssss😡
(त्यांचा गळा पकडून...सिगरेट त्याच्या मानेला लावत म्हणाला........)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
व्यक्ती - अअअअअअअअअ
 
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - भाऊ भाऊssss भाऊ सोडा......कशाला तुमच्या हातानी खून करताय आधीच कमी केलेत कां तुम्ही....आता बंद केलंय ना सगळं तर राहूदे.....आम्हाला माहित हाय तुम्ही बेकसूर माणसाला कधी बी नाय मारत पण नको....या टाइम ला....नको भाऊ.....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मल्हार - हो भाऊ सोडा त्याला....
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - ए पोलीस...याला घेऊन जा एका जंगलात आणि तिकडे याचा एंकाउंटर करा आणि रिपोर्ट लिहा की याने भोसले निवास मध्ये जाऊन इंद्रजीत भोसले ला मारण्याचा प्रयत्न केला.....सापडला असता पळून जात होता गरज लागली म्हणून आम्ही एंकाउंटर केला....जाsss काहीही करा.....😡पण हा मला जिवन्त नको.....नकोsss😡
 
 
 
 
 
 
 
मल्हार - ए पोलीस जा ना आता समजलं नाय कां...हा जिवन्त नको......उद्या न्यूज आली पाहिजे.....
 
 
 
 
 
 
 
 
पोलीस - हो भाऊ समजलं समजलं.....
हवालदार घ्या याला....ए चल चल....आज तुझा शेवटचा दिवस.....
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - भाऊ शांत व्हा...
भाऊ......
 
 
 
 
 
 
 
 
मल्हार - हा तर तुमचा शत्रू निघाला भाऊ...आम्हाला वाटलं वहिनीच्या माग असलेला तो व्यक्ती हाय...आता तरी त्यांच्यावरच संकट टळून जाईल वाटलेला.....पण....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - मला पण तेच वाटले होते....मी खूप घाबरलो होतो.....माझं 😔माझं बाळ आणि माझी बायको आज 💔आज मरण्याच्या वाटेतून परत आलेत....जीव नुसता वरखाली होतोय आता......मीच हदरलोय आता तर....कळत नाही आहे काय करू??
 
 
 
 
 
 
 
 
 
मल्हार - भाऊ असं हिंम्मत नका हारू...
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - त्या माणसांचा पत्ता लागला कां?
 
 
 
 
 
 
 
मल्हार - त्याचा नाव संजू यादव असं कायतरी होतं...शिवराज काका आणि त्याचा लई वैर होती म्हण......शिवराज काकांनी संजू यादव ला पकडून दिल होतं पण तो पळून गेलेला आणि त्याचा वेळी काकांनी त्यांच्या सिनियरच्या ऑर्डर वरून संजू यादवचा इंकाउंटर केला होता....त्यात संजू मारला गेला....पण संजू यादव तर जिवन्त नाही मग आता कोण हे करतं असलं?
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - तेच मला पण कळत नाही आहे.....त्याची मुलं?
 
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - त्याला मुलं - मुली नव्हते भाऊ.....खबर तर अशीच होती.....
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - मग कोण?? कदाचित त्याच्याच जवळच कुणीतरी......त्या माणसाला लवकरात लवकर शोधा आपले खबरी पसरवा सगळीकडे,पोलिसांची मदत घ्या....पण मला आताच खबर पाहिजे....
 
 
 
 
 
 
 
 
मल्हार - हो भाऊ करतो आम्ही......
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - एक गोष्ट डॉ अंकल समजवत आले नेहमी....ती खरी हाय, भाऊ तुमचा मागचं हे शत्रू प्रकरण नाही संपणार ओ लवकरं...आमच्या बी.....तस आपण लढायला समर्थ हाव.....पण..... कधीतरी मला बी विचार येतो.......उद्याच्या ला वहिनीच्या माग लागलेला तो माणूस सापडला त्याचं ते संकट संपलं......पण तरी बी शत्रू तर आपले बी हायतच की.....दुसऱ्यांच्या भलं करण्यात आपला मार्ग चुकीचा ठरला हाय भाऊ.....हा पण गुंडा गर्दीचा च मार्ग झाला ना भाऊ.....मार पिट, भांडण, राडे....मग वाईट करणाऱ्या माणसांसोबत आपला वैर होतंय........माझा पण जीव केव्हा वैतागतो, म्हणून म्या लगीन नाही करतं....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जीवा हे तू अचानक कां बोलतोयस?
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - भाऊ तुम्ही गैरसमज नका करू..मी माझा विचार करून न्हाय तुमचं विचार करून बोलतोय.....ते बाळाचं फोटू कॉपी बघून मन लई भरून आलात भाऊ.....त्या बाळाची काळजी वाटती.....वहिनी सारखी बहीण भेटली आमहाला....त्यांनी या एक दोन वर्षात लई सभाळून घेतलं मला....अजून काय हवं?
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - बरोबर बोलतोस पण.....





जीवा - यात तुमची चूक नाय भाऊ घरचं वातावरण असं हाय म्हणून तुम्ही यात पडलात ना....भाऊ हा जीवा असाच मरणार बघा तुम्ही आणि आबासाहेबांच लई उपकार आहेत....ज्या दिवशी माझं आई बाप गेलं ना तेव्हाच ठरवलं शेवटचा श्वास घेणारं तर भाऊसाठीच..म्हणून तुमच्या सगळ्या कामात आम्ही होतो.....तुम्ही कधीच चुकीचं कामं नाही केल उलट चुकीचं कामं अडीवलं....चांगल्यासाठी झटत आलात.....बेरोजगार लोकांना रोजगार दिलात....आता तर नवीन योजना बी अखताय मोफत हॉस्पिटल बांधताय....अहो पण या सगळ्यात आपले शत्रू झाले ना..... कारण लोकांना चांगल झालेलं नाही बघवत...त्यात आबासाहेब राजकारणात....म्हणजे अजून गुंतागुंत....
 
भाऊ हे सगळं आता थांबायला हवं कुठेतरी....कारण पैसा, सत्ता याने काही नाही होतं....माणूस पाहिजे....आपला माणूस असला ना जवळ की कशाची गरज नाही लागतं....पैसा आपण थोडी वर घेऊन जाणार हाव...माफ करा भाऊ जास्त बोलो असलं तर पण आज बोलावंसं वाटलं कारण आता फक्त आपण नाही ते लहान लेकरू पण आहे.....आता हे बंद तर नाय होणार पण काय तरी उपाय काढा....यात पडणं कमी करा..वहिनीला हे सगळं आवडत नाय हाय....देव न करो आज उद्या यावरण तुमच्या मदी कायतर होईल आणि वहिनी तुम्हाला सोडून जात्याल.....भाऊ काय तरी विचार करा...
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मल्हार - जीवा....शुईईई जीवा....
अरे वहिनी.... वहिनी...
(इशारा करतं....)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - बरोबर बोलतोयस जीवा पण...मी कस यातून बाहेर.... अअअअ..
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - अअअअ हं अ भाऊ भाऊ...ते व वहिनी...
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - इंद्रा ss
(हळू आवाजात...)
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजा....जिजा.....
अग अग तू बाहेर कां आलीस...? तुला बरं वाटतय कां बाळा? कस वाटतय? घसा दुखतोय कां?
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - मी नीट आहे...मला बोलायचंय तं तुझाशी.... चल खोलीत......
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हो हो चल चल सावकाश....
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - आम्ही येतो भाऊ...
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हो हो...
 
 
 
 
 
 
****************************
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजा काय झालं??? अग अराम करायचा सोडून तू बाहेर कां आलीस? काय होतंय कां गं??
 
 
 
 
 
 
 
जिजा - नाही न न नाही....मी तं ठीक आहे....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजा मी खूप घाबरलो होतो गं 😭 तुला आणि बाळाला काय झालं असतं ना तर मी मी कस जगू शकलो असतो....? तुम्हा दोघांशिवाय माझा संसार अपूर्ण आहे....माझं जगणं अधुरं आहे....म्हणून सांगतो काळजी घेत जावा अग....
(मिठी मारून...)
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - इंद्रा...बस्स झालंय आता...काळजी म्हंज किती घ्यायची अजून आपल्याच वाड्यात होते मी....तरी हे झालं ना.....जीवा भाऊ काय बोला समजलं नाही कां तुला?
अरे,आता तरी विचार कर इंद्रा...माझ्या बाबांच्या शत्रूने आधीच मनात घर करून भीती घातलीस त्यात हे...आज तुझे शत्रू उद्या माझे....माझे संपतील ही पण तुझे काय? म्हणून सांगते आता हे सगळं बंद कर....
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जीवा काय बोला बाकीचं हे नाही ऐकलंस कां? मी काय मुद्दाम केला कां? माझं घरातील वातावरण तस होता आणि तुला सगळं माहिती आहे ना.....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - लोकांना मदत करणं चूक नाही...तो जो मार्ग निवडला आहेस तो चूक आहे.....अरे कधीतरी आपला पण विचार कर....आपल्या येणाऱ्या बाळाचा विचार कर इंद्रा....सतत असं जगायचं का आपण...अरे आपला परिवार पूर्ण होतोय.....आपलं पहिलं बाळ आहे हे.... काय झालं तर?
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - मी पण टेन्शन मदे असतो ना.....सतत काळजीत असतो मी तुझ्या....काय करू समजतं नाही...... काय करू मग आता मी तरी?
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - यावर उपाय आहे बग झालेल्या गोष्टी नाही बदलणार.... मग तू बदल ना...पुन्हा IPS साठी तयारी कर.....IPS Officer बन...बग सगळं बदलून जाईल....आपल्या बाळासमोर पण चांगल उदाहरणं असेल तुझं.....आणि जे चालय यातून बाहेर निघायचा हाच मार्ग आहे.....अरे ३०-३१ वर्षाची वयो मर्यादा आहे....तू अजून पण प्रयत्न करू शकतोस कर ना प्लिज..... सगळं नीट होईल....
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - नाही जमणार मला आता....नाही करायचंय मला....समजतं नाही कां तुला सांगितलेला....
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - इंद्रा माझी खूप इच्छा आहे तू IPS व्हावं......तुझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे....आपल्या बाळाचा बाबा IPS असेल तर आपण त्याला ही चांगला माणूस बनवू शकतो पण हेच त्याच्यासमोर चालू असला त्याची पण मानसिकता तेच होईल ना वडिलांच्या बिजीनेस मध्ये जान...गुंडगिरी, मारपीट,.....नाही मला नाही पटत हे....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - मग मी काय करू जिजा? यावर मला काहीच उपाय नाही दिसत......हे सगळं सोपं नाही आहे....मला यातलं काही सांगू नकोस......स्वतः पण शांत रहा मला पण राहूडे.....
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - मी सांगते ना तो उपाय करूया ना...अरे लोक तुला घाबरतात म्हणून तुझा शब्द खाली पडू देतं नाहीत...त्यांच्या मनात आदर नाही तुझी भीती आहे...भीती.....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - असेल ही पण बऱ्याच लोकांच्या मनात आदर तर आहे ना....
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - उद्या तुला गरज लागली तर ही लोक येणार आहेत कां इंद्रा सांग ना..... तेव्हा आपलीच माणसं असणार आहेत ना..... तू त्यांना पण धोक्यात टाकतोयस.....मदत करू नकोस असं नाही कर ना पण कायदेशीर पद्धतीने कर ना....असं नको...हा गुन्हा आहे इंद्रा गुन्हा.....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - मी आता यावर काही करू शकत नाही.....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - कां नाही ऐकत आहेस माझं तू इंद्रा....मी सांगते म्हणजे चूक आहे कां...😡
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - चूक नाही..पण आता ते शक्य नाही मी आहे ना माझ्यावर विश्वास ठेव.....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - कां तू....
अअअअअ ऊ हू उहूं उहूं....
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - काय होतंय जिजा...हे घे पाणी घे....
अग तू जास्त बोलू नकोस जिजा अराम कर प्लिज...प्लिज आराम कर....
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - ह्म्म्म..
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - आपण यावर नंतर बोलू...हम्म बरं मी जरा आलोच तू झोप....
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - अअअ इंद्रा...
.
.
.
.
.
.
.
प. व्यक्ती - आता वेळ आले डाव टाकायचा.....आता युक्ती करून फायदा नाही किती दिवस प्लॅन करू..सगळे प्लॅन फुकट जातायत....आता डायरेक्ट त्यांना उचलायचं आणि सरळ मर्डर......जिजा....आणि इंद्रजीत चा अंत.....
 
 
 
 
 
 
 
 
 
दु. व्यक्ती - तुला भेटायला कुणीतरी आलंय....त्याला भेट.....भोसले चा कट्टर दुश्मन.....
 
 
 
 
 
 
 
 
प. व्यक्ती - काय? पण मला कां भेटायला आलाय..?
 
 
 
 
 
 
 
 
दु. व्यक्ती - समजतं कस नाही तुला..हा भोसलेंचा दुष्मन आणि आपण प्रधानांचे.....दुश्मन दुश्मन एक व्हा......त्यांना बरबाद करा.....अजून काय पाहिजे....
 
 
 
 
 
 
 
 
 
प. व्यक्ती - बरोबर बोलतोस......बोलावं त्याला.....
.
.
.
.
.
.
 
जिजा चे महिने उलटत होते......इंद्रा तिच्यासोबत राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतं होता......पण कामाच्या नादात त्याला काहीच जमत नव्हतं....जिजाची वरवरची चिडचिड त्याला सहन नव्हती होतं....दोघांमध्ये खटके उडत होते.......एका वर्षात त्यांचा एकही सण त्यांनी एकत्र साजरा नाही केला......
 
 
 
 
 
 
 
 
सकाळी इंद्रा लवकरच ऑफिस ला जायला निघाला.....जिजा त्याच सगळं सामान बेडवर ठेवून.....जाऊन खुर्चीवर बसली.....इंद्रा त्याच आवरून जिजाच्या जवळ आला....बसला पण तिने नजर फिरवली.....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजा...जिजा ऐक ना....
 
 
 
 
 
 
 
जिजा - ऐकते बोल....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - Happy First Anniversary बायको❤️
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - अअअ 😃
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - तुला काय वाटलं मी विसरलो कां?? अग असं कस....हा मान्य करतो आपल्यात खटके उडतायत पण याचा अर्थ असा होतो कां की आपण सगळंच विसरणार....? अग रात्रीच बोलणार होतो पण रात्री मला यायला उशीर झाला तू झोपलेलीस....एकतर तुला जाग आली की झोप नाही येतं....म्हणून नाही उठवलं.... मला माफ कर जिजा....पुढचं पुढे बघू...आजचा दिवस तरी भांडण नको.... आपली पहिली Anniversary आहे...हू....
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - हो..... Happy Anniversary अहो ❤️
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - बापरे किती ते प्रेम....पचलं नाही 😂
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - हम्म😂
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हे घे.... तुझं गिफ्ट.....
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - काय हे??
आई शपथ....❤️
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - आवडल? नवीन मंगळसूत्र माझ्या नावाचं....
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - वाव तुझं नाव आहे यात....*इंद्रजीत*❤️ खूप आवडल मला....थँक्यु इंद्रा..... ❤️🌈
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - खुश आहेस ना झालं तर मग....अअअ आज मी माझी सगळी कामं संपवून येतो लवकर फिरायला जाऊ हा....
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - ओके.... 😃
बाळा आज तुझा बाबा खूप खुश आहे हा...आईचे जास्तच लाड करतोय.....❤️😂
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हो मग कारण बाबा आई आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून...पण गेले काही महिने तुझे आई बाबा नुसतं भांडतात.....ते हे विसरलेच की तू पण सगळं ऐकतोयस ना.....❤️
(पोटावर हाट फिरवत......)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - आम्ही तुला माफ केल बाबा... 😂
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हो हो चल मी आता जाऊ...
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - सुनो ना, मेरे राजा....👀
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - बोलो ना मेरी राणी...🦋
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - आज ना खूप मनापासून इच्छा आहे...तुला किस करायची आणि मिठी मारायची.....कां माहित कां?
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - ले कियो पूछ पूछ..इसके लिये तो हम हमेशा तयार हैं😂.....ये ना बाळा......तुझाच आहे ना मी....
(हातं पुढे करतं...)
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - हम्म... 🤧
 
 
 
 
 
 
 
 
जिजा इंद्राला एकदम घट्ट मिठी मारते.....खूप घट्ट मिठी.....इंद्रा सुद्धा तिच्या डोक्यावरून हात फिरवतो...जिजा इंद्राच्या डोळ्यात पाहते.....त्याचे अश्रूच तिला सांगतात तो किती प्रेम करतो तिच्यावर...❤️
जिजा इंद्राच्या ओठांवर तिचे ओठ अलगद ठेवते....
इंद्रजीत तिच्या ओठांचा ताबा घेतो....किती तरी काळाचा विरह मिटतो....👀🌈
 
 
 
 
दोघांचा ही आत्मा शांत होतं असतानाच,तेवढ्यात इंद्राचा फोन वाजतो.....स्क्रिन वरील नंबर पाहून इंद्रा लगेचच जिजा पासून दूर होतो.....
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - अअअअ हं ज जिजा बाळा बस्स आता हू मी निघतो मला वेळ होतोय....
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - काय रे इंद्रा,कोणाचा फोन येतोय इतका...
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - कामाचा आहे गं..मी निघतो हू...बाय...
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - अ अ अरे..
असो संध्याकाळी तर येईलच ना.....
 
 
 
 
 
 
 
सगळे विचार बाजूला झटकून जिजा फोन मध्ये बिझी होते....तिला सगळ्यांचे मेसेज, कॉल येतं असतात....ती मनोमन सगळ्यांना रिप्याय देतं आनंदी होते...
 
 
 
 
 
 
 
 
 
संध्याकाळी जिजा तयार होऊन इंद्राची वाट बघत बसते.....फोन केल्यावर तो उचलत ही नाही.....जिजाला राग यायला लागतो......मग ती अनुसया ला फोन लावते....
 
 
 
 
 
 
जिजा - हॅलो...... 📲
 
 
 
 
 
 
 
अनुसया - बोल ना जिजा.... 📲
 
 
 
 
 
 
 
जिजा - इंद्रा कुठंय? 📲
 
 
 
 
 
 
 
अनुसया - अग तो दोन तीन तास झाले निघून गेलाय.📲
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - काय...बरं ठीके..... ठेवते...📲
 
 
 
 
 
 
 
 
ममता - काय झालं गं??
 
 
 
 
 
 
 
राजाराम - काय झालं बाळा?
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - तो कधीचा निघून गेलाय....कुठे गेलाय काय माहित.....
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - असं कस आज तो लवकर येणार होता...अअअ मी आलोच.....
जीवाला फोन लावायला हवा.....नाहीतर ही भडकेल खूप.....
 
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - हॅलो...हा अभि भाऊ बोला...... 📲
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - अरे कुठे आहात? भाऊ आला नाही अजून घरी जिजा तांडव घालेल आता..... 📲
 
 
 
 
 
 
 
जीवा - काय सांगताय, अहो ते अभि दादा..... 📲
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - काय झालं मला तरी सांग..मी तस इकडे हॅन्डल करतो.....📲
 
 
 
 
 
 
 
जिजा - याच काय चाललंय...?
(मागून येतं....)
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - अहो दादा..ते एक....... 📲
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - अअअ तू तू इकडे....
 
 
 
 
 
 
 
जिजा - फोन दे.... लवकर दे...... 😡
 
 
 
 
 
 
 
 
जीवा - अभि दादा अहो एक मॅटर झाला..ते जरा बिजिनेसच हाय...त्या माणसाने गुंड पाठवली आपल्या इंद्रा भाऊ ला मारायला ऑफिसत...भाऊ ने तिकडं काय नाय केल पण आता इकडं येऊन हाणला त्यास्नी....हा आता येऊच आम्ही तेवढं हे वहिनीस ला सांगू नका हा.... त्यांना टेन्शन यल........ 📲
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - जीवाssssssssss😡 इंद्राला फोन दे...... 📲
 
 
 
 
 
 
 
जीवा - वहिनी....त त त त प तुम्ही? 📲
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - फोन दे...📲
 
 
 
 
 
 
 
जीवा - ते तिकडं कामात हायत...मी...थांबा देतो देतो...... 📲
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - अअअ अअअ हं हॅलो हाय बाळा. अ मी ऑन दी वे आहे........ 📲
 
 
 
 
 
 
जिजा - कोणता वे इंद्रा 😡खोटं बोलतोयस माझ्याशी लाज नाही वाटतं आहे.....परत मारहाण करतोयस ना कोणाला तरी....आताच्या आता घरी ये नाहीतर मी.... जीव देईन.....📲
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हा काय पण काय गप्प बस..कामं झालं की येतो.... प्लिज समज ना...... 📲
 
 
 
 
 
 
 
जिजा - अच्छा...आता माझ्या जीवाची परवाह नाही....ठीके....माझ्यासोबत तुझं बाळ ही आहे लक्षात ठेव........ 📲
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजा..... 😡📲
 
 
 
 
 
 
 
जिजा - हम्म आता वाईट वाटलं असेल ना..लवकरात लवकर घरी ये. Sssssss 😡📲
.
.
.
.
.
तारा - दिदा काय झालं कां चिडली आहेस?
 
 
 
 
 
 
जिजा - खूप झालं आज फायनल होईल इंद्राला काय हवंय...
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - काय बोलतेस हे जिजा... यात त्याची काय चूक गं?
 
 
 
 
 
 
जिजा - मग यात माझी आणि माझ्या बाळाची तरी काय चूक अभि.....रोज रोज नवीन संकट...जीवाशी खेळ...तुम्हाला यावर उपाय मी सांगितलं ना? पण इंद्रा तयार नाही....आणि तुम्ही पण नाही आहात....मी सगळं स्वीकारते आता पण याने हे गुंडगिरी कमी नको करायला....ज्यांची आज मदत करतं आहे ते उद्या वाचवायला येतील कां आपल्याला? सांगा ना माई...
 
 
 
 
 
 
 
ममता - तू बोलतेस बरोबर पण....
 
 
 
 
 
 
राजाराम - बाळा शांत हो...असं रागात निर्णय नको घेऊ....
 
 
 
 
 
 
 
तारा - दिदा अग तू...
 
 
 
 
 
 
 
जिजा - तारा आत जा...आणि झोप तुला मोठ्यांमध्ये बोलायला नाही सांगितलं..... जा म्हंटल ना... 😡
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - तारा जा..आज जिजा पहिल्यांदा इतकी भडकले...... जा तू..
 
 
 
 
 
 
तारा - ओके.... 😔
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हाय बायको.
अअअ अरे सगळेच जागे आहेत?
 
 
 
 
 
 
 
ममता - इंद्रा अरे किती उशीर....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - सॉरी माई....
जिजा जिजा मला माफ कर बग आपण खोलीत जाऊन बोलूया हा...चल...
 
 
 
 
 
 
 
जिजा - नाही कशाला खोलीत.... 😡
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजा हळू ओरडू नकोस त्रास होईल तुला आणि बाळाला.....
 
 
 
 
 
 
जिजा - होउदे यापेक्षा जास्त अजून काही नाही....तू ना आधीपासून च असं आहेस मीच ओळखायला चुकले सतत समजवते असं नको वागूस....तरी तेच पुन्हा..किती समजून घेऊ....? सांगितलं होता यावर उपाय पण नाही बनायचं तुला पोलीस...... माझी इच्छा आहे तू आपल्या बाळा समोर पोलीस बनून यावं....पण तुला मारहाण, भांडण हेच हवंय आयुष्यभर आम्ही लपडावं खेळतो....
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - आपलं यावर बोलणं झालंय....
(शांतपणे...)
 
 
 
 
 
 
 
जिजा - हो झालंय पण आजच असं केलंस ना....? अरे निदान या गोष्टी कमी तरी कर...आज आपली पहिली anniversary ना....? आलास कां वेळेत?
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - मी मुद्दाम करतो कां? प्लिज तू पण समज ना यार जरा....
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - समजून घेतलं ना...अजून किती? आपल्या लग्ना नंतर दिवाळी,गणपती,नवरात्र,गुढीपाडवा,वाटपौर्णिमा कधी काय साजरा केला सांग? नेहमी कामात असायचास,वेळेत नाही यायचास...कधी आपण एकतर घालवले सण?
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हो नाही घालवले बाळा,पण आपलं आयुष्य इतर जोडप्या सारखं आहे कां सांग ना??....मी मुद्दाम नाही गं करतं.....कां भांडतेस बग माझा ही पारा चढेल आता...मग आपले वाद.....आपण शांत होऊया ना....
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - नाही व्हायचं मला शांतssss.....आज फायनलच होणार.....असं वाटतय मी एका गुंडाशी लग्न केलाय....गुंड आहेस तू गुंड....ज्याला नाही वागायची पद्धत नाही बोलायची....समजवल चांगला मार्ग दाखवला पण तो वाईटच मार्गांवर जाणार....😡
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजा शांत हो...
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - हे येणार बाळ ही नको ठेवायला याला ही जन्म नकोच द्यायला, तुझ्यासारखंच हे ही बनेल गुंड...
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजाssssssss 😡🖐️
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - अअअअ
 
 
 
 
 
 
 
 
राजाराम - इंद्रा...काय केलंस हे?? 😡
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - भाऊ.... अरे.....
 
 
 
 
 
 
 
ममता - इंद्रा जिजावर हात उचललास....? लाज नाही वाटतं असं करताना.....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हिला वाटतेय कां? असं बोलताना...? रागात काय बोलतेय समजतंय कां? आणि प्लिज कुणी आमच्यात नका बोलू..... 😡बोल गं बोल...
 
 
 
 
 
 
 
जिजा - माझ्यावर हात उचलायची हिंम्मत कशी झाली तुझी......😡😔💔
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - काय बोलीस तू? बाळ पण गुंडच...? या गुंडावर प्रेम करताना तुला काही नाही वाटलं कां? तुला फसवून तर लग्न नाही ना केला सांगून केलेला.....
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - असं होईल मला नव्हतं ना माहित...नाहीतर नसतं केल मी लग्न...वाटायचं तू सुधारशील सगळं बंद होईल पण आपलं लग्न सुद्धा घाईत झालं....त्यानंतर कधीच वेळ मिळाला कां हे बोलायला....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हा मग....आणि मी काय मुद्दाम करतो कां सांग....सतत आपलं गुंड गुंड..... करायच nअ मग चांगल्या पोराशी लग्न कां केलास माझ्याशी....काय बोलीस मी गुंड अग मग या गुंडासोबत कां प्रेम केलंस? कां एका गुंडासोबत रात्र घालवल्यास? कां हे बाळ पोटात ठेवतेस गुंडाच 😡 हा..... बोल आता....
 
 
 
 
 
 
 
ममता - इंद्रा ss काय बोलतोयस हे लाज सोडलीस कां सगळी?😡
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - माई थांब....
 
 
 
 
 
 
 
जिजा - हा हा चुकलं माझं....😭😡चुकलं....😭आता नाही राहायचं मला तुझ्यासोबत.....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हा नको राहू जा चल...😡तुझ्यासाठी एवढं केल कारण प्रेम होता...अशा किती आल्या आणि गेल्या.... पुढे ही येतं राहतील इंद्रजीत भोसले आहे मी..... समजलं 😡
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - तुला कोण हवंय आपलं बाळ मी की तुझा हे कामं.....😭
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - नको मला तू आणि तुझं बाळ जा चल...💔😡
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - ठीके...
गुड बाय इंद्रजीत भोसले.....
 
 
 
 
 
 
 
 
 
ममता - जिजा अग कुठे चालीस?
 
 
 
 
 
 
 
 
 
राजाराम - जिजा अग बाळा कुठे चालीस....
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - जिजा बाहेर खूप पाऊस आहे नको जाऊस जिजा....अग भांडण होतात पण असं नाही वागायचं.....
 
 
 
 
 
 
 
जिजा - त्याला समजवा...मला नको....
 
 
 
 
 
 
 
 
राजाराम - जिजा.... जिजा.....
 
 
 
 
 
 
 
 
ममता - अरे देवा....काय केलंस हे इंद्रा..... 😭
.
.
.
.
.
.
बाहेर खूप जोरदार पाऊस पडत होता.......सगळीकडे अंधार झालेला........जिजा रडतच घराबाहेर पडली.....पुढे निघून आल्यानंतर मागून एक गाडी आली आणि जिजाला ते गाडीत टाकून घेऊन गेले....
इकडे सगळे इंद्राला शांत करतं होते......इंद्राला कळत होतं त्याचा चुकलंय?पण जिजाच समजून न घेणं त्याला खटकत होता....
तेवढ्यात त्याला एक फोन आला....
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हॅलो कोण आहे रे...... 📲
 
 
 
 
 
 
 
स. व्यक्ती - काय भोसले स्वतःच्या चार महिन्याच्या प्रेग्नेंट बायकोला असं पावसात एकटं सोडलेत....ते पण आम्ही असताना?...... 📲
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - ए कोण आहे तू?? तुझा हा शेवटचा फोन समजला ना...तुझी तर लवकरच वाट लावणार आहे..काय केलंस तू तिला? 📲
 
 
 
 
 
 
 
 
व्यक्ती - ओहो एवढा भरोसा, ठीके उचली तिला आम्ही आता लवकरच तिचा गेम करणार आहोत...पत्ता पाठवतोय ये लवकर.....अर्ध्या तासात तुझी बायको आणि बाळ देवाला प्यारे होणार...... 😈📲
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हॅलो हॅलो....हॅलो ए.....
 
 
 
 
 
 
 
 
 
ममता - काय रे काय झालं?
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजाचा जीव धोक्यात आहे...मी तिला घेऊनच येईन....तुम्ही थांबा काळजी घ्ययेतो.
 
 
 
 
 
 
 
 
 
राजाराम - आम्ही पण येतो....
 
 
 
 
 
 
 
 
अभिजीत - हो
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - नको नको कुणी नका येऊ...मी येईन नक्की येईन..... जिजाला सोबत घेऊन....माझं चुकलंच...तिला जाऊ दिला आता तिला नाही जाऊ देणार...आज सगळंच फायनल करायचंय आबासाहेब....आलोच मी.....सगळे हिशोब चुकते करून 😡
काळजी घ्या.....
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत गाडी घेऊन त्या व्यक्तीने सांगितलेल्या जागी जातो........डोक्यात अनेक विचार.......जिजाची काळजी.....त्याला खूप रडू येतं होतं.....पण आता असं खचून चालणार नव्हतं.....
 
 
 
 
 
 
******************************
 
 
 
 
 
 
 
जिजा - अअअअअ सोडा मला.....कोण आहात तुम्ही....😭
 
 
 
 
 
 
 
पहिली व्यक्ती - ए ओरडू नकोस समजलं ना..खाल्ला तेवढा मार पुरेसा नाही कां?? 😡
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - कां मारताय मला सोडा....😭वाचवा...वाचवा.....
 
 
 
 
 
 
 
 
दु. व्यक्ती - राणी इकडे कोणी नाही येणार.....जंगल आहे हे जंगल......😈
 
 
 
 
 
 
 
 
सगळे - hahahaha 😂😈😈😈😈
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - मला कां आणल्यात इकडे....? काय दुष्मनी माझी...... 😭
 
 
 
 
 
 
 
 
 
दु. व्यक्ती - ते तुझा नवरा आला की कळेल.....
 
 
 
 
 
 
 
 
प. व्यक्ती - जास्तच ओरडते ही.....😡हिला तर...... 🖐️
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - ए 😡खबरदार माझ्या बायकोला हात लावला तर.....जिवंत नाही सोडणार एकाएकाला.....😡
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - जिजा...जिजा...किती लागलंय तुला....
ए 😡कुणी मारलं हिला हा....?
आणि कोण आहात तुम्ही चेहरे तर दाखवा...आता कां लाज वाटतेय कां? 😡
 
 
 
 
 
 
 
 
 
प. व्यक्ती - लाज आम्हाला कशाला वाटेल....तुला वाटायला हवी 😡
 
 
 
 
 
 
 
दु. व्यक्ती - आमचे चेहरे बघायचेत काय?? 😡
बघ.....
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - तू?
तू नायक भाईचा पोरगा विशाल ना? अच्छा तर तू माझ्याशी दुश्मनी काढायला आलायस....😡तुझा बापाला मारलं म्हणून...... 😡
 
 
 
 
 
 
 
 
विशाल - हो माझ्या बापाला मारलस मला अनाथ केलंस.....😡कस सोडू तुला हा 😡तुला. पण बरबाद केल्याशिवाय राहणार कां मी सांग....😡
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - अरे पण तुझ्या बापाने खून केले होते खून....अशा माणसाला मारलं मी म्हणजे घाण संपवली मी या जगातून घाण...... 😡
 
 
 
 
 
 
 
 
विशाल - तू स्वतः ळा पोलीस किंवा मुख्यमंत्री समजतो कां 😡आमचे मर्डर करायला..... 😡
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - अरे हे पोलीस मुख्यमंत्री ना इकडे घेऊन फिरतो मी.....नावच काफी आहे...... 😡समजलं....
 
 
 
 
 
 
 
 
विशाल - वाह वाह 😡आता दाखवतो तुला मी...आता ते मुख्यमंत्री पण तुझ्या कामी नाही येणार आहेत...😡
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हा हा दाखव पण आधी हा दुसरा कोण आहे ते सांग....😡मग तुम्हाला दोघांना बघतो मी😡
 
 
 
 
 
 
 
 
दु. व्यक्ती - हम्म घे मला ही बघून घे...... 😡
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - काय.....तू? 🙁 माधुरी? तू तू इकडे कशी? म्हणजे तू?
 
 
 
 
 
 
 
 
माधुरी - हो डियर सर माझ्याशिवाय कोण 😡 मनात नसताना पण तुमच्यावर जास्त लक्ष ठेवता यावं म्हणून तुझ्या ऑफिस मध्ये भरती झाले.....😡तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं....😡एक एक वार माझे खाली गेले लग्नाच्या आधी पासून तुमच्या....तुझ्यामुळे जिजा तारा वाचत राहिल्या.....माझा प्रत्येक वार खाली गेला....
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - पण तुझं आम्ही काय वाईट केल माधुरी
 
 
 
 
 
 
 
माधुरी - माझा बाप संजू यादव.... आठवलं कां?
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - हम्म आठवलं ना? दहा रेप केसं, लहान मुलांची किडनॅपिंग, शरीराचे अंग विकणे हेच करत आला तुझा बाप..... 😡आणि प्रधान काकांनी त्याला इंकाउंटर मदी मारलं कारण त्यावेळी त्याने लहान मुलांना किडनॅप केलता..... समजलं त्यांनी खूप चांगल कामं केला वाईट काहीच नाही केल 😡
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - त्यासाठी तू बदला घेतलास 😭माझ्या आई बाबाना तूच मारलस 😭
 
 
 
 
 
 
 
 
 
माधुरी - ते काय पण असो पण मला पोरक केल तुझ्या बापानं, माझा बाप माझा जीव होता....माझा शान होता....... पण मी तुझ्या बापाला आईला मारून तुम्हाला पोरक केल आणि आता तुला इंद्राला मारून सगळ्यांना.....😈 पूर्ण खानदान मीठवणार मी शपथ घेतलेली.....😡म्हणून मी आणि विशाल ata एक झालो.....तुम्हाला मिटवायला.......
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - काका काकू ना मारलस....पण माझ्या बाकीच्या घरच्यांना मी तुला हात ही लावू देणार नाही...आज तुम्हाला संपवूनच गप्प बसणार हा इंद्रा भोसले 😡
 
 
 
 
 
 
 
 
 
विशाल / माधुरी - पोरांनो हल्ला करा याच्यावर..... 😡
 
 
 
 
 
 
 
 
 
विशाल आणि माधुरीची माणसं इंद्रावर हल्ला करतात.......इंद्रा एकटाच त्या सगळ्यांवर वार करतं असतो.....एकटाच त्यांच्याशी लढत असतो.....जिजा खूप रडते.....तिला इंद्राची काळजी वाटू लागते....
 
 
 
 
 
 
 
इंद्राने सोबत ठेवलेल्या चाकूने सगळ्यांवर हल्ला केला......तो जीवाचा अंकात करून सगळ्यांशी लढत होता....सगळीकडे बंदूकीचा आवाज.....गोळीबार चालू झाला......जिजा हे सगळं बघून खूप घाबरली....
इंद्राच्या डोक्यात एकच चालू होता,फक्त त्याला जिजाचा जीव वाचवायचा होता....💔
 
 
 
 
 
 
 
माधुरी - विशाल ह्याने तर सगळ्यांना मारलं.....आता?
 
 
 
 
 
 
 
विशाल - आपण त्याच्यावर वार करू आता मी मेलो तर तू कर 😡
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - आहे कोणी अजून....आहेsssssss 😡
अ हं जिजा....जिजा.....
 
 
 
 
 
 
 
 
जिजा - अअअ हं इंद्रा....हे हे काय?
तू एवढ्या लोकांना मारलस..
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इंद्रजीत - अग मी त्यांना नसतं मारलं तर त्यांनी आपल्याला मारलं असतं....जिजा अग मी तुझ्यासाठी सगळ्यांना मारलं....माझ्या मनात जिद्द आहे तुझ्यासोबत मला आयुष्य जगायचंय जिजा....अग आपलं बाळ येणारे....माझं चुकलं मला माहिते पण....
 
 
 
जिजा - अअअअ इंद्रा....अरे पण काय चाललंय हे 😭सगळीकडे असं वातावरण मी मी या वातावरणात बाळा बाळा ज जन्म........अअअअअ इ इंद्रा मागे बग......
 
 
इंद्रजीत - जिजा.....ए....
(दोघेही खाली झुकताना.......)
 
 
विशाल - ए ए 😡
(हातात रॉड घेऊन.....)
 
 
जिजा - इंद्रा....
 
 
इंद्रजीत - मागून वार करतोस....हा....तुला आज सोडणार नाही......
 
विशाल - हा मारून टाक भोसले...आज जरी मी मेलो माधुरी पण मेली तरी लक्षात ठेव ही आजची रात्र तुझं पूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे.....आयुष्यभरासाठी तुला दुःख मिळणार आहे.....तड्पत राहशील तू कायम......सगळी व्यवस्था केले आम्ही.....😈hahahaha आम्हाला हेच पाहिजे.....
 
 
इंद्रजीत - काय... काय केलंस..... 😡सांग.... अअअअअ ✊️👊
 
 
इंद्रा आणि विशालची झटपट होते.......इंद्रा बंदूक काढून विशाल ला गोळी मारतो......माधुरी मागून जाऊन जिजावर हल्ला करते.....जिजा तिचा वार चुकवून तिच्यापासून दूर पळू लागते......माधुरी तिच्या मागे पळते......माधुरीचा पाठलाग करतं इंद्रा तिच्या मागे गेला....
 
 
 
माधुरी गोळीबार करतं होती......जिजा तिचा जीव वाचवत पळत होती......तिला पळण आता असह्य झालं होतं.....पोटात दुखायला लागलं होता......असंख्य जखमा अंगावर झाल्या होत्या......जंगलातील काटे पायात ऋतले होते......पण बाळासाठी ती पळत होती....
त्या भयानक अंधारात काही दिसत नव्हतं......त्या एका रात्रीतच सर्व काही बदलून गेलं...
इंद्रा माधुरीचा पाठलाग करतं होता....आणि माधुरी जिजाचा......माधुरी ने बंदूक काढली.....
 
 
"ढिशकॅवsssssss बंदूकीचा जोरात आवाज झाला..."
 
 
त्या भयानक जंगलात हा आवाज बराच वेळ येतं राहिला......💔
.
.
.
.
.
.
क्रमश :
 
 
सगळे आता कोड्यात पडले असाल......हे नक्की काय? असं कां घडलं?? इंद्रजा वेगळे झाले कां???
कुठे गेली जिजा?? माधुरीच काय झालं? गोळी कुणाला लागली?
 
याची उत्तरं लवकरच मिळतील.....पुढील भागात.....अशा करते तुम्हाला माझी कथा आवडत असावी.....नक्की कमेंट्स करा तुमच्या आलेल्या कमेंट्स वरूनच मला आनंद मिळतो.....
Keep Supporting ❤️
 
 
 
©®_Pratiksha Wagoskar