Champa - 22 in Marathi Women Focused by Bhagyashali Raut books and stories PDF | चंपा - भाग 22

Featured Books
Categories
Share

चंपा - भाग 22

चंपा




"शी, राघवन…?" राघवनने चाचाच्यावर रिवोल्वर रोखली आणि धडाधड गोळया त्याच्या पोटामध्ये छातीवर मारल्या.

"चंपा इस कुत्ते की बात मत सून हरामी था साला, मैंतो तुझसे शादी बनाके मेरी घरवाली बनानेके सपने देख रहा हूं।" राघवन तिच्या अजूनच जवळ गेला
"तो तेरा ख्वाब काभि पुरा नही हो सकता." रामने हाताचे स्लीव्हस मागे घेतल्या. राघवन चंपा सिर्फ मेरी हे।"

राघवनला राम असह्य होत चालला होता पण रामही काही कमी नव्हता. राघवन धावून रामच्या अंगावर आला तशी त्याने राघवनला पोटाला पकडून त्याला मारले. चंपाला हा राम नव्याने दिसत होता. राघवनची सात- आठ पोर रामच्या अंगावर धावून आली. राम एक एकाला झोपवत होता. राघवन अजूनच पेटून उठला. त्याने चंपाला पकडले,रामने त्याच्याकडे पाहिले, त्याच्यासमोर येणाऱ्या प्रत्येकाला तो फाईट करत होता. राघवन चंपाला समजावत होता.
"चंपा कायको इस लोंडे के चक्कर मे पडती हें। देख तेरी जगा मेरे सीनेमे हे, राणी बनाके रहेगी तू राघवन के पास। चल, चल मेरे साथ।" असे म्हणत राघवन चंपाला ओढत होता. चंपाने त्याचा हात झिडकरला आणि त्याच्या एक कानाखाली मारली. राघवनला लागण्यापेक्षा एक परक्या मुलासाठी चंपाने त्याच्यावर हात उचलला याचा राग आला होता. राघवनने तिला खेचले, रागातच तिला जोरात ढकलले. चंपा जाग्यावर भोवळ येऊन पडली. राघवनने चाकु काढला रामच्या दिशेने जाऊ लागला रामने चाकु बघितला, आहे तसा त्याचा हात पकडून त्याला नको त्या जागेवर लाथा मारल्या , पाठीवर, पोटावर जिथे जागा दिसेल तिथे त्याने राघवनला मारले हे फक्त चंपा साठी नव्हते तर राघवनने अनेक कोवळ्या जीवांना या धंद्यात कामाला लावले म्हणून ही होते. प्रत्येक एक फाईटला त्याला येतानाची गल्ली बोळ आठवत होती, तिथे उभ्या असणाऱ्या लहान, मोठ्या हातवारे करून पुरुषांना आपल्याकडे बोलावणार्या मुली आठवत होत्या. पैशासाठी अर्धवट उघड शरीर आठवत होते.
सगळ शरीर एक नोटिसाठी तळमळतय! हे त्या पोरींकडे बघून रामला वाटत होते.
रामच्या हाता मधून रक्त पडत होत. राघवन आणि त्याची पोरही मागे हटत नव्हती. राम एकटा त्यांच्यावर भारी पडत होता. राघवन झटापटीत एक बाजूला जाऊन पडला त्याने शेवटचा उपाय म्हणून कमरेला लावलेली पिस्तूल पुन्हा बाहेर काढली आणि रामवर निशाणा धरला.
"साला येसाही हैं| मुझे भी बांध के मारा...सालेमें दम नाही है मैं..."सिद्धार्थ बोलला. राघवनला आता राग आला होता.

रश्मी दाराआडून घडणारा प्रकार बघत होती. राघवन ने त्याच्यावर पिस्तूल रोखले होते. चंपाला अंधारी येत होती. सगळ अंधुक दिसत होत. तरीही ती धडपड उठली आणि पळत रामच्या समोर उभी राहिली. स्वतःच्या जिवापेक्षा तिला प्रेम महत्वाचे वाटत होते राम तिच्याकडे बघत होता. एक स्त्री म्हणून तिला पुरुषप्रधान संस्कृतीचा हेवा वाटत होता. एकजन तिला समाजापुढे स्वीकारणार होता, दूसरा तीच बहिन म्हणून रक्षण करत होता.तर राघवन तिला पुन्हा त्याच गल्लीत आनु पाहत होता. मग ती बायको म्हणून असेल किंवा रखेल... जिथे वैयक्तिक आयुष्याची चामडी सोलवाटुन निघणार होती. तिथे जाण्यापेक्षा मी माझ्यावर अनंत प्रेम करणाऱ्या प्रियाकरासाठी मरण पत्करेन. या आधी एक वेगळ अनुभव विश्व पाहणारी मी, मला समाजात यायला किती संघर्ष करावा लागणार होता. राघवन समोर मी उभी होते. त्याला मला मारायचे नव्हते. तो मला पाहून गळुन गेला.

"चंपा मागे हो, मला तुझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकला मारायचय, तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार फक्त माझा आहे." चंपाने त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली.


"प्रेम या शब्दाचा अर्थ माहित आहे का राघवन? प्रत्येकाला मन असत. तू तर इथल्या सगळ्याच पोरींची मन आणि अंतर बाह्य मारून टाकलीस. इथ काम करणारी प्रत्येक पोर तुझा खाजगी माल असल्यासारखी वागावलीस. क्षणोक्षणी त्याना बघून मी मरत होते. येता जाता त्यांच्या छातीला स्पर्श करुन दाबायचा, कमरेत हात घाल, त्यांच्या ओठाना तुझ्या दातानी सहज चावून जायाचा. अशा पुरुषी वृत्तीवर थुंकते मी... बाई जोपर्यंत लज्जा आणि संकोच अन त्यागाची सहनशील वस्त्र उतरवत नाही तोवर तीच भोगन, दुर्लक्षित किंवा गृहीत धरल जात. किती जनीनें संगीतलय मला आता वेश्या म्हणून नाही जगायचय पण त्याना तू भाग पाडलस राघवन... त्याना बाहेर पडायला मी मदत करत होते त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहून, पुन्हा तुला आणि समाजाची भीती म्हणून गप्प बसायच्या का? समाज स्वीकारणार न्हाय ताई...! कधी कौतुकान बघणार नाही आमच्याकडे, सहानभूती मिळणार नाही का तर वाटोळ करेल ही बाई... राघवन अशा पुरुषाबरोबर मी राहीन वाटलच कस रे तुला?"
चंपा हळुहळू त्याच्या जवळ जात होती. राघवनच्या कानामध्ये चंपा विस्तव ओतत असल्याची जाणीव होत होती.

"नेहमी इथे हिंडताना या चाळीआड़, खिडक्यांआड़ मेलेली मन न बोलणारी असहाय्य लूळया पांगळया झालेल्या बायका बघितल्या मी. का... राघवनसारख्या राक्षसाला का कीव नसावी या कोवळया जीवना सरपटत नेत असताना. कसला शाप होता रे त्यांना?अरे लहानपनापासून यांना बघत होते माझा एवढासा देह या बायकांना उघड वाघड पुरुषांच्या खाली बघून हादरून जायचा. जग न बघण्याचा, जगापासून तुटणारया आत्म्याना मी पाहिले आहे अगदी जवळून. आयुष्याचा यांना कधी जिवंत श्वास घेताना पाहिले नाही मी... पण जिथे मी वाढली, सतत मरताना पाहिलेल्या बायकांना पहिल आहे, त्यांच्या इच्छा नसताना कन्हण्याचे आवाज मी ओळखले होते. चाचा मरायलाच हवा होता, अणि आता तू... मी सगळया दुनियेतला हा प्रकार नाही थांबवू शकणार, तू मेलास तर इथल्या पोरी आनंदाने पुढच आयुष्य जगतील."

राघवांच्या हातामधली पिस्तूल कधीच खाली पडली होती. चंपाने ती धीटाईने उचलली अणि राघवनवर रोखली.


इच्छा असूनही मी
माझं मन सुद्धा सांडलं,
पै- पै जमवून,वहीवर मांडलं,
संपलं जरी सगळं
तरी आयुष्य हिशोबासाठी भांडल.



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत