devrai in Marathi Book Reviews by Geeta Gajanan Garud books and stories PDF | देवराई

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

देवराई

देवराई कथासंग्रह

लेखिका माधवी देसाई

आज माधवी देसाईंच्या देवराई कथासंग्रहातली देवराई ही गोष्ट सांगते. तिचं नाव विसरले.🙂 आपण कुंदा ठेवुया.
गोव्यातील एका गावात डोंगराच्या पायथ्याशी देवीचं देऊळ होतं. बाकी गोव्यातले लोक देवीचे उपासक असतात हे कोकणी ग्रुपवरील त्यांचे देवीचे सजवलेले फोटो पाहून प्रत्यय येतो. देवीला झुल्यावर बसवतात. जाईजुईच्या फुलांनी श्रुंगारतात. लईराई मातेचा तर केवढा उत्सव. अस्सल मत्स्यप्रेमी असणारेही जत्रेआधी महिनाभर मासमच्छी सोडतात..तसंच अंगाऱ्यावरुन चालत जातात. विषय भरकटला.🙂

देवळातले पुजारी आज ओरडत होते,"कुंदे किती गो उशीर? चौक पुसायचा आहे. देवाची पळी,पंचपात्र..घासायची आहेत. असंच केलंस तर मी कमिटीस तक्रार करेन. कुंदा जवळपास साठी उलटलेली. आज तिला उशीर झाला कारण तिच्या दोन नाती आल्या होत्या रहायला त्या त्यांच्या मम्माकडे पणजीला जाणार होत्या. त्यांच्या ड्याडाने मोटार पाठवली होती मुलींसाठी. नातींना निरोप देऊन कुंदाने घराकडे पाहिलं. रंगीत कांड्या,कागद,त्यावरील चित्रं..सगळं तिनं तसंच राहू दिलं. आता नाती परत येणार तेंव्हा तसा पसारा मांडणार होत्या नाहीतर तीचं एकलीचं घर अगदी इस्त्री केलेल्या कपड्यासारखंच.

पुजाऱ्याची साद येताच ती संथपणे पायऱ्या उतरली. ती जाणून होती,कमिटी तिचं काही वाकडं करु शकणार नाही. कुंदाने चौक पुसला. देवाची भांडी लख्ख केली. परड्यांतली फुलं घेऊन खिडकीजवळ बसली. लख्ख उन्ह पडलं होतं. ती एकेक फुल धाग्यात गुतू लागली नि बालपणात शिरली.

आता होती तेच देवळाच्या बाजूचं घर..त्यात कुंदा व तिची आई रहायची. कुंदाची आईही देवीची सेवा करायची. रात्री कुंदा आईसोबत निजायची पण मध्यरात्री आई बाजूला नसायची. मधला दरवाजा ओढल्याचा आवाज यायचा..पहाटे पुढलं दार लोटल्याचा आवाज.

भाताच्या गोण्या,सुपाऱ्या,तेल,तूप..काही हवं नको ते अगदी फळफळावळदेखील घरात येऊन पडत होतं पण कोण देत होतं? छोट्या कुंदेला प्रश्न पडे. आपले वडील कोण? पण आईला विचारण्याचं धारिष्ट्य नव्हतं तिच्यात.

कुंदा जसजशी मोठी झाली तसतशा या गोष्टी तिला कळत गेल्या. भाविणीची लेक म्हणजे काय ते कळलं. कुंदा, रुपाने देखणी होती. वयात आली तशी अनेक जणांच्या माना तिच्याकडे वळू लागल्या. कमिटीचे मेंबर्सही कुंदाच्या आईशी गोड बोलू लागले.

कुंदाने आईला स्पष्ट स़ागितलं..आई देवळातनं जे मिळेल त्यात मी सुखात राहीन. मधला दरवाजा हा विषय बंद. आई काय ते समजली. लोकं हसू लागली पण कुंदा डगमगली नाही. यथावकाश आई कुंदाला सोडून गेली. तरी कुंदाने देवीची चाकरी चालू ठेवली. याच काळात तिला तो भेटला..पोर्तुगीज सोल्जर..गोरापान..लालुस..अंगापिंडाने भरलेला. तो गावात फेरी मारायचा. सगळ्या बालगोपाळांचा लाडका. त्यांना बासरी,फुगे,चॉकलेट्स, केक्स,बिस्कीट्स,खेळणी वाटायचा.

एका पहाटे, कुंदा मागल्या बाजूच्या डोंगराकडे गेली. ती लहान असताना लहानग्या असणाऱ्या सुरुंगीच्या झाडांचे केवढाले व्रुक्ष झाले होते. फुलांचा घमघमाट सुटला होता. कुंदाला फुलं काढता येईनात. तेवढ्यात तो सोल्जर तिथे आला. कुंदाला पाहून गोड हसला. फुलं पाहिजेत. मी देतो म्हणत झाडावर चढलासुद्धा. त्याने फांद्या हलवल्या. कुंदाच्या अंगाखांद्यावर सुरुंगीच्या फुलांचा वर्षाव झाला. तिच्या आजुबाजूला सुरुंगीचा गालिचा पसरला. मग हे नित्याचं झालं. त्या दोघांच्या भेटी वाढू लागल्या. मैत्रीचं रुपांतर सुगंधी प्रेमात झालं. सोल्जर आता कुंदाच्या घरी येऊ लागला रात्रीचा. त्यांच्या प्रेमाचा अंकुर कुंदाच्या उदरी रुजला.

त्याच काळी युद्ध सुरु झालं. गोवा स्वतंत्र झाला. सोल्जरने एका रात्री कुंदेला सोन्याच्या बिस्कीटांची थैली दिली. म्हणाला..हे आजवरच्या माझ्या मेहनतीतून खरेदी केलंय. आपल्या बाळाला खूप शिकव. मोठं कर. आपली भेट पुन्हा होईल का नाही ठाऊक नाही पण तुम्ही दोघं माझ्या अंत:करणात असाल आणि..आणि तो गेला कायमचा.

कुंदाचं आयुष्य पहिल्यासारखंच सुरु झालं. तिला मुलगी झाली..सोल्जरच्या गुलाबी रंगाची.अगदी त्याचंच रुपडं. कुंदा गोड हसली. तिने मुलीला खूप शिकवलं. गावकऱ्यांनी विरोध केला. देवीची सेवा कोण करणार? पण कुंदा बधली नाही. तिची लेक सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली. एकाशी तिचं सूत जुळलं. लग्न झालं. ती नवऱ्याच्या घरी पणजीला रहायला गेली.

इकडे एकदा सोल्जरचं पत्र आलं कुंदाला. तो सडाफटिंग जीवन जगत होता, कुंदाने लेकीला दाखवलं. वडलांचं अक्षर पाहून लेक मोहरली. तिने इंग्रजीत लांबलचक पत्र लिहिलं वडलांना. आम्ही खुशाल आहोत कळवलन. मग त्या बापलेकीचे पत्रव्यवहार, फोन सुरु झाले आणि आता लेकीने कुंदाला कळवलं होतं की सोल्जर इंडियात येणार त्यांना भेटायला. फुलं गुंतताना कुंदाच्या चेहऱ्यावर समाधानाचं उन्ह पसरलं होतं.

या आणि अशा सरस सत्यकथांच गाठोडं म्हणजे देवराई हा कथासंग्रह.

©®गीता गरुड.