Mall Premyuddh - 10 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 10

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 10

मल्ल प्रेमयुद्ध





रत्ना चिंचेच्या झाडाखाली बराच वेळ बसून शब्दांची जुळवाजुळव करत होती. संतुला अस बाहेर भेटणं आवडत नाही हे माहीत असूनसुद्धा तिने त्याला आज आग्रह करून बाहेर भेटायला बोलावल होते. संतू तिच्यासमोर येऊन उभा राहिला होता हे सुद्धा स्वतःच्या तंद्रीत असल्यामुळं लक्षात आलं नव्हतं.

"रत्ना भायर का बोलावलं भेटायला?" संतू थोडा रागात बोलला.
" घाई बोलता आलं नसत म्हणून.... बस" संतू तिच्या शेजारी बसला.
" एवढं काय महत्वाचं हाय अग घरी लगीनघाई चालू हाय उद्या क्रांतीच लग्न ठरवायला येणार हयात... घरात सगळ्यांची धावपळ सुरू झाली अन तू घाई घाई न इथं बोलावलंस?"
संतू एका श्वासात सगळं बोलून मोकळा झाला.
"उद्या... एवढी घाई...?" रत्नाला धक्काच बसला."
" आप्पाना सांगितलं की सकाळी फोन करून तुला काय बोलले न्हाईत का? अन एवढं कसलं टेन्शन घेतीस?" संतू
" संतू क्रांती मूळ मी तुझ्या आयुष्यात आली..." रत्ना पुढे बोलणार तोच संतू बोलला.
"हे सांगायला बोलवल का?" संतू पुन्हा चिडला.
"आर ऐकून घे.... क्रांतीला लय चांगलं ओळखती मी... आज पहिल्यांदा तिच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा निर्णय ती तिच्या मनाच्या विरूध्द घेती. संतू बहीण तुझी हाय तुला तिची काळजी असणारच पण एकदा तिच्याशी बोला तिची मनापासून इच्छा न्हाय हे लग्न करायची. तिला वीर न्हाय आवडत तरी ती फक्त घरच्यांसाठी तयार झाली लग्नाला... मला वाटलं एकदा तुझ्याशी बोलावं.... हम तिने मला बिलकुल सांगितलं न्हाय बर तुझ्याशी बोलायला पण मला तिच्या मनातली घालमेल समजली म्हणून बोलले." रत्नाच्या डोळ्यात पाणी जमा झालं.


" तुला काय वाटलं मला म्हाइत न्हाय व्हय... क्रांतीच्या डोळ्यात म्या पाहिलंय ती फकस्त आई दादांसाठी लग्नाला हो म्हणाली रत्ना" संतू
" तुला म्हाइत असून तू काय कस केलं न्हाईस." रत्ना थोडी रागावली.
"कारण मला म्हाइत हाय तो पोरगा माझ्या क्रांतीला भरभरून प्रेम देईल. मी त्याच्याबरोबर बराच वेळ घालवलाय अन मग मी तयार झालो त्यांच्या लग्नाला... अन तुला म्हाइत न्हाय त्या दिवशी माझी गाडी बंद नव्हती पडली तो आम्ही केलेला प्लॅन व्हता." संतू
"काय???? कसला प्लॅन???" रत्ना जवळपास ओरडली.


" वीरला क्रांतीबर थोडा वेळ घालवायचा व्हता. त्या दिवशी त्यानं मला फोन केला अन तुम्हाला मी सांगितलं गाडी बंद पडली. अस काहीच झालं नव्हतं. हे ठरवून केलं आम्ही तिघांनी मिळून... त्याचा काय उपयोग झाला न्हाय म्हणा... पण रत्ना एक सांगतो वीर चांगला मुलगा हाय क्रांतीच्या मनात उगाच त्याच्याविषयी राग भरलाय.क्रांतीला तो फुलासारखी जपलं आपला शब्द हाय अन न्हाय सांभाळलं तर मी ब्रह्मचारी ऱ्हाईन.." संतोष
"ये...शब्द मागे घे पहिला... मला का शिक्षा? " संतू हसायला लागला.
" नको काळजी करुस क्रांतीची बघ तूच म्हणशील की तुम्ही सगळ्यांनी घेतलेला निर्णयच बरोबर व्हता." संतू
" व्हय पण मला तिची अवस्था बघवना." रत्ना
"तू तिचा मुड बदल बघू जमत का माझ्या व्हणार्या बायकोला एवढं...?" संतू सावळा जरी असला तर शेतकऱ्याचं लेकरू अंगाखांद्यान थट्टा कट्टा व्हता. त्याला दाढी आवडते म्हणून तो दाढी ठेवायचा अन रत्नाला नेमकं तेच खटकायचं. ती नेहमी म्हणायची.
"लग्नात तरी दाढी कर संतू... चिकना चोपडा दिसशील..." रत्ना
" दाढी...शान हाय पुरुषाची... आग शहरातली पोर बघ फॅशन म्हणून ठेवत्यात आपण न्हाय करणार हा दाढी त्या वरन वाद नको... येतो मी... न्हायतर चाल माझ्यासंग घरात आईला मदत कर." संतू
"एक आत्ता नको मी संध्याकाळी येते." रत्ना
"संध्याकाळी परत कशी येणार?" संतू
" आप्पा येणारेत तवा त्यांच्यासंग येते म्हंजी आज तिथंच राहीन आईला मदत व्हईल तेवढीच..." रत्ना



सुलोचना गाडीतून उतरल्या तेजश्री त्यांच्या सोबत होत्या.
" आई आबांना काय सांगायचं?"
" जे खरं हाय ते..बायच्या जातीनं का सहन करायच सगळं...मला म्हाईती हाय पण आपण सांगू त्याना समजवून तू नको काय बोलू म्या बोलते." दोघी वाड्यात गेल्या. आबा दोघींची वाट बघत बसल्या व्हते.
" आत्या मी वर जाऊन पडते." तेजश्री वर गेली.
" आव किती वेळा त्या पोरीचं रक्त घेतलं अन किती वेळा चेकिंग केलं... डॉक्टर चांगल्या व्हत्या बराच समजून सांगितलं. मला न्हाय समजल्या काय गोष्टी त्या तेजश्रीन सांगितल्या. तेजश्रीकडन आई व्हायला काहीच अडचण न्हाय. पण...?"
" पण काय?" आबा
" त्यांनी संग्रामला चेकिंगला बोलावलं हाय." सुलोचना
"कधी???" आबा
"2 दिवसात..." सुलोचना
"हम्मम आम्ही बघतो ते तुम्ही उद्याची तयारी करा...नवीन सुनेला भारी साडी घ्या.. एखादा दागिना आत्ता द्या साखरपुड्याला आपण नंतर अजून सोन घालू..." आबा

"साडी आज तेजश्रीच्या पसंतीची घेतली आज आमी तालुक्याला... माफ करा न ईचारता घेतली." सुलोचना जर घाबरत बोलल्या.
"हरकत न्हाय एवढे निर्णय तुमास्नी घ्यावेच लागणार. आव दोन सुनांची सासू व्हानारे तुम्ही." आबा हसत बोलले सुलोचनाबाईचे अर्धे टेन्शन कमी झाले. त्यांनी आनंदात साडी दाखवली. आबा साडी बघून खुश झाले. लई भारी पारख हाय सूनबाईना... चांगली साडी घेतली. उद्याची तयारी जोरात झाली पाहिजे. पाहुण्यांना कमीपणा न्हाई पण आपल्याबाजून आपण नीटनेटकं करायला पाहिजे." आबा
"तुम्ही नका काळजी करू... करू नीट..." सुलोचना
" मोठ्या साहेबांना सांगा... उद्या चला न्हायतर तिथं बी..."
"येईल तो..." सुलोचना दबकत म्हणाल्या.

खेळात मोठी केसांची वेणी चालायची नाही म्हणून क्रांती नेहमी लांब केसांचा घट्ट अंबाडा वरती बांधायची. आज त्याच लांबसडक केसांची वेणी घातली होती. रत्नाने तिच्या केसांमध्ये मोगऱ्याचा गाजर माळला. पिवळ्या रंगाची काठाची साडीमधी क्रांती उठून दिसत होती.
"क्रांती केवढी गोड दिसतीस बाई...आज वीर ने तुला ह्या साडीत पाहिलं तर दातखिळी बसलं त्याची..." रत्ना जोर जोरात हसायला लागली. क्रांतीने तिला डोळे दाखवले.
"अग बघ जर आरश्यात किती भारी दिस्तीस स्वतःला कधी बघितलं पण नसशील... बघ एकदा...." क्रांतीने गोदरेजच्या कपाटाच्या आरश्यात स्वतःला पाहिलं.
"खरच मी छान दिसती ग रत्ना..." तेवढ्यात चिनू आली.
"आयो तायडे कसली भारी दिसतीस... आप्पा म्हणत व्हत तू नाराज हायस म्हंजी मी ऐकलं आई दादांच बोलणं... चुकून... " चिनू जीभ चावत म्हणाली.
"काय??? काय म्हणत होत दादा..." क्रांती हातात बांगड्या चढवत म्हणाली.
"हेच की तुला दाजी पसंत न्हाईत पण तू त्यांच्यासाठी या लग्नाला व्हय म्हणालीस..." क्रांतीच्या डोळ्यात पाणी आलं.
" क्रांती डोळ्यातन पाणी नको काढुस ग..." रत्ना
"व्हय तायडे अग खरच तू बघ एकदा दाजींच्याकड गेलीस तर आम्हाला इसरशील..." क्रांतीला हसवायच म्हणून चिनू बोलली. तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला. चिनू पळत बाहेर गेली. क्रांती दाखवत नसली तरी तिची घालमेल रत्नाला कळत होती.

"क्रांती नको काळजी करू होईल सगळं नीट..." रत्ना तिला धीर देऊन बाहेर गेली.
" काळजात एवढं का धडधडतय? कसली भीती वाटती मला? ज्या पोराला मैदानात हरवला त्याच्या नजरेला मी आज नजर देऊ... कशी? आणि त्याच्याबरोबर मी आयुष्य कस काढणार? आमचे विचार जुळत्याल? माझ्या स्वप्न... ? त्याला घेणं देणं राहील? मला पळून जावसं वाटतय आत्ता... नको नको वाटतंय... कसं होईल सगळं की.... संपेल माझं अस्तित्व?" क्रांती आरश्यात बघून स्वतःशी बोलत होती.

"या या या... नमस्कार आबासाहेब... सगळ्या मंडळींच स्वागत..." क्रांती सोडून घरातले सगळे बाहेर आले. सर्वांनी प्रधान कुटुंबाचं स्वागत केले.
वीरने सुती मेहेंदी कलरचा कुर्ता आणि पांढऱ्या कलरचा पायजमा घातला होता. त्यातून त्याच पिळदार शरीर उठून दिसत होते.
"आई काय भारी दिसतायेत दाजी... आज आक्की न ह्यांना बघितलं ना तर तिचा सगळा राग पळून जाईल. मागून संतुन येऊन तिच्या डोक्यात टपली मारली.
" गप बडबड नुसती. आग ऐकलं कुणी तर काय म्हणतील संस्कार हायत का पोरीवर..." संतू
" गप हा तू... खरं तेच बोलती...व्हय ना आई.." चिनू.
" व्हय ह्या पोराला डावलला असतं ना तर ..." आशा
"तर तर तू डावलून दिल असतास व्हय..." चिनू अन संतू हसायला लागले. संतू बाहेर येऊन वीर शेजारी बसला. त्याच्याशेजारी भूषण आणि संग्राम बसले होते. तेजश्री आणि सुलोचना खुर्चीवर बसल्या.
" आबासाहेब माफ करा अमास्नी निरोप सांगायला उशीर झाला." दादा
" आव माफी कसली एवढा मोठा आयुष्याचा निर्णय घ्यायचा मंजी वेळ घ्यावाच लागणार... अस काय बी न्हाय... सरपंच आले न्हाईत अजून...?" आबा
" हे काय आलो... वेळ चुकणार न्हाय.. शब्द मंजी शब्द... " सरपंच आत येऊन बसले.
चिनूने सगळ्यांना पाणी दिले. आशाने चहा आणून दिला.


"क्रांते... हे घे पोहे सगळ्यांना दे आणि नमस्कार कर ... हो एकेठिकाणी नको करू प्रत्येकाला कर..." क्रांतीला काहीच समजत नव्हते.
" थांब...रत्ने हिला सांग जर हसतमुख चेहरा ठेव." आशा
" क्रांती..." रत्नाने हास म्हणून खुणावले. तोडक मोडक हसू चेहऱ्यावर ठेवत ती बाहेर पोह्यांचा तर घेऊन गेली. सर्वांना पोहे दिले. आबाच्या पाया पडली.
" पोरी सगळ्यांच्या नको पाया पडू इजे घिकांनी पड आणि बस खुर्चीवर..." सुलोचना म्हणाली. आशा, चिनू बाहेर येऊन थांबल्या. रत्ना दाराडून बघत होती. तेवढ्यात आप्पा आले.
"नमस्कार मंडळी. थोडा उशीर झाला गाड्या मिळेपर्यंत होतो उशीर..." सगळ्यांचे लक्ष आप्पांकडे गेले.
" आबासाहेब हे आमचे परममित्र आणि आता होणारे व्हायी ... त्यांची मुलगी आमच्या संतुसाठी द्यायचं लय आधी ठरवलं व्हत." संतू बसल्याजागी लाजला आणि रत्ना आतमध्ये. आप्पांने चिनूने पाणी आणि पोहे आणून दिले. वीर क्रांतीची हालचाल न्याहाळत होता. त्याला तिची तगमग जाणवली होती. भूषण वीरकडे बघत होता.
" आज वहिनी भारीच...विकेट डाऊन ना... पटठ्या.." वीर हसला.
" आत्ता कळलं आमच्या भाऊजीना तुमचं वेड का लागलं व्हत." तेजश्री डोक्यावरचं पदर नीट करत बोलल्या. संग्रामने तेजश्रीकड रागात बघितले. तेजश्री शांत झाल्या.
" व्हय तर लाखात एक हायत म्हणूनच..." सुलोचनाबाई
"बर हळदी कुंकू लावाल की न्हाई..." आबा म्हणाले सुलोचनाबाईनी आतून ताटली आणायला सांगितली. साडी, नारळ, पेढ्यांचा बॉक्स, गजरा, बांगड्या, टाकल्याचे पाकीट, नेलपेंट आणि एक ज्वेलरीचा बॉक्स अस ब्ररच समान एक मोटग्या पिशवीमधून काढले आणि तेजश्री आणि सुलोचना यांनी तिची ओटी भरली.
"आबासाहेब काही विचारलं न्हाय, बोलणी न्हाय अन पोरीची ओटी भरली." दादा
" बोलणी करायची काय आम्ही आधीच सांगितलं होतं पोरगी नि नारळ बस ह्या पलीकडे काय नको." आबा
" अस कस आबासाहेब बोलणी व्हायला पाहिजे." आशा
" हे बघा बोलणी तुमच्या इच्छेसाठी करू पण आता क्रांती आमची सून झाली.
वीरकडे एक नजर करून बघावेसे वाटले नाही तिला. वीर मात्र तिच्या एक नजरेसाठी तरसत व्हता. ओटी घेऊन क्रांतीने पुन्हा नमस्कार केला आणि आत जायला निघणार...
"आम्ही आणलेली साडी नेसाल आत्ता...?" सुलोचनाबाई प्रेमाने म्हणाल्या... क्रांतिने होकारार्थी मान हलवली आणि आत। गेली.

"हे पहा दादा आमची एकच इच्छा हाय लग्न आणि साखरपुडा यात थोडं अंतर असावं म्हणजे एक दोन महिन्यांचं बाकी तुम्ही म्हणलं तस आपण करू. घरातल्या घरात साखरपुडा करून घेऊ. फक्त साखरपुडा मुहूर्त लवकर काढू.
"व्हय चाललं अमास्नी काय अडचण न्हाय." दादा.
" हित अंगणात मांडव घालू आबासाहेब अन मोठा साखरपुडा करू." प्रकाश(सरपंच) म्हणाला.
" न्हाय प्रकाश दादांना तरास व्हाईल अस न्हाय करायच साधं करू सगळं." आबा
" का अस आबा साखरपुडा आमच्या मर्जिन व्हईल अन लग्न तुमच्या मर्जिन..." दादा.
" बर साखरपुडा तुम्ही बघा कसा करायचा आम्ही लवकरची तारीख काढून कळवतो तुमास्नी... लग्न मात्र कुरुंगुटवाडीतच व्हईल. तुम्ही फकस्त उर्गी आणि तुमच्याकडची सगळी लोक घेऊन यायचं बस ठरलं लग्न." आबा
" बर... पण आबासाहेब आम्ही आमच्या मार्जिन पोरीच्या अंगावर सोन नाण घालू..." दादा
"गरज न्हाय त्याची... माझा शब्द तो शब्द पोरगी आणि नारळ..." सगळे हसायला लागले. आनंदात होते. क्रांती लालबुंद मोठ्या सोनेरी काठाची साडी नेसून बाहेर आली. गळ्यात सुलोचनाबाईनि दिलेला राणीहार घातला होता.बांगड्या घातल्या .सगळेजण तिच्याकडे बघत होते.
" आबासाहेब..." तेजश्री म्हणाल्या.
"व्हय आलं लक्षात... दादा आताच्या पिढीत पोरांना एकमेकांची मत कळायला पाहिजेत तवा बाकी आपलं बोलणं व्हईपर्यंत वीर आणि क्रांतीला बोलुद्यात?" आबा
" अहो विचारता काय...क्रांती... ज मागच्या अंगणात घेऊन वीरला... अन तुला जे बोलावयाच असलं ते आत्ताच बोलून घे. " दादा
क्रांतीला दादांच्या बोलण्याचा हेतू समजला. वीर उठला आणि क्रांतीच्या मागे मागे गेला.




क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत







( संग्राम टेस्ट करुन घ्यायला तयार होईल? क्रांती सांगेल का वीरला की तिला हे लग्न मान्य नाही? दादांनी नेमकं काय सांगितले असले बोलायला क्रांतीला? बघूया पुढच्या भागात... तुमचीच भाग्या 😊)