चंपा
रामला चंपा एका ऑटो रिक्षा सोबत बोलताना दिसली. तो तिच्याजवळ गेला.
"कुठे चाललीस?" रामने तिचा हात घट्ट पकडला.
"सर मला जाऊद्यात." चंपा हात सोडवत होती पण रामची पकड एवढी मजबूत होती की तिला हात सोडवता येत नव्हता.
"तुम्ही जा भैया." रिक्षावाला बडबड करत निघून गेला.
"प्लिज मला जाऊदेत, तुम्हाला माहिती नाही हे लोक खूप भयानक आहेत. हे मलाही सोडणार नाहीत आणि माझी मदत करणाऱ्याला ही नाही सोडणार." चंपाच्या डोळ्यात पाणी आले होते. डोळ्यातले पाणी हाताने निर्धाराने पुसत पुन्हा म्हणाली.
"सर मला काय करायचं आहे हे माझं मी ठरवलंय. मला कोणाची मदत नको."
"मला तुला कमजोर करायचे नाही चंपा, हे बघ चाचाची लोक इथपर्यंत आली आहेत तुला शोधायला. आपल्याला इथून लवकर निघायला पाहिजे." राम तिला समजावत होता.
"काय? आता मला राघवनला भेटलेच पाहिजे".
"कोण राघवन?"
"ज्याची ही कोठी आहे, जो धंद्याला मुली आणतो, दलाल आहे खूप मोठा."
"त्याला तू एकटी भेटणार? नाही मी तुला त्याच्याकडे एकटीला नाही पाठवणार." राम ने तिला गाडीजवळ आणले.
"तो मला काहीही करणार नाही, काळजी नका करू."
"गाडीमध्ये बस."
"नाही मी माझ्या रस्त्याने जाणार आणि तुम्ही तुमच्या." चंपाने जणू मनाशी निश्चय केला होता.
"प्लिज चंपा बस." चंपा गाडीमध्ये बसली. रामचा फोन घेतला आणि राघवन चा नंबर डायल केला.
"राघवन, चंपा बात कर रही हूं। मे एक घंटे मे आ रही हूं । " चंपाने फोन स्विच ऑफ करत होती.
"मला एक फोन करायचा आहे. प्लिज मला फोन दे." रामला चंपाला फोन दिला. रामने विष्णू काकांना फोन केला.
हॅलो, मी राम पटवर्धन बोलतोय मला विष्णू काकांसोबत बोलायचे आहे.
"सर खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये आहेत, आत्ता नाही बोलू शकणार." सरांचे पीएनी फोन उचलला होता.
“उमेश दादा मी राम बोलतोय.”
"एक मिनीट मी विचारतो. एसस्कुज मी सर … राम पटवर्धन" विष्णुकाकांनी पीएच्या हातातून फोन घेतला.
"बोल बेटा" रामने विष्णुकाकाना सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या.
"डोन्ट वरी राम, आय विल मॅनेज" रामने विष्णुकाकांना सगळ्या गोष्टी सांगुन त्यांना पुढे काय करायचे हे सुद्धा सांगितले. विष्णुकाकांना राम वकील आहे हे माहीत होते पण आत्ता त्याची मदत करणे आवश्यक होते. विष्णुकांकानी कमिशनर सुब्रमण्यम यांना फोन केला रामने जे सांगितले ते त्यांचे वजन वापरून त्यांना सांगितले.
इकडे चंपाचे डोळे आग ओतत होते. रामने तिला एवढे कधीच चिडलेले पाहिले नव्हते. नाक रागाने लालबुंद झाले होते. गाडीत बराच वेळ शांतता होती. दोघेही एकमेकांसोबत बोलत नव्हते. राम मात्र तिच्याकडे गाडी चालवता चालवता एक नजर बघत होता. ती खूप रागवलेली आहे हे त्याला समजत होते. त्याने गाडीमध्ये गाणी लावली. "तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता हे दिवाना सनम." चंपावर या गाण्याचा काहीही फरक पडत नव्हता.
"माझ्यावर चिडली आहेस का?" चंपा एक शब्दही बोलत नव्हती.
"प्लिज चंपा मी तुला अश्या परिस्थिती मध्ये एकटीला नाही सोडू शकणार." रामने तिला समजवायचा प्रयत्न केला आणि गाडी रस्त्याच्या एक बाजूला पार्क केली. थंड हवा सुटली होती राम गाडीच्या बाजूला टेकून उभा राहिला. त्याचे केस वाऱ्याने उडत होते. हवा बोचरी होती थंडीने अंगावर शिरशिरी येत होती. चंपाला त्याच हे असं वागणं समजत नव्हते.
चंपा गाडीमधून खाली उतरली. राम जवळ जाऊन उभी राहिली.
"सर, गाडी का थांबवली? राघवनकडे एक तासांमध्ये पोहोचायचं आहे मला." राम काहीच बोलत नव्हता.
"सर, मला आजच्या आज राघवनला भेटायच आहे. चाचाने त्याला सगळं काही सांगितलं असणार आहे आणि तुम्ही हे असे शांत उभे आहात मी आज त्याला भेटले नाही तर तो मला…"
चंपा बोलत असतानाच रामने तिच्या तोंडावर हात ठेवला.
"शुशुशु…. किती बोलतीयेस?" राम चंपाच्या अगदीच जवळ गेला. आणि तिच्या डोळ्यात पाहिले.
"चंपा माझ्या डोळ्यामध्ये बघ, प्रेम दिसतंय न तुला, माझ्या छातीवर हात ठेव, तुझ्या शिवाय मला काहीच सुचत नाही ग! रामने स्वतः तिचा हात त्याच्या छातीवर ठेवला.
"बघ किती धडधडतय! का माहीत आहे? तुझ्यासाठी, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर प्रत्येक वेळी मी तुला विचारलं पण सतत टाळत आलीस तू मला, मी आवडत नसेल तर तसही सांग. तेही आत्ता. मला तुझं उत्तर हवं आहे चंपा, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय." चंपा त्याच्या खूप जवळ होती. प्रेमासाठी माणूस इतका हतबल झालेला तिने पहिल्यांदा पहिला होता. रामपासून ती लांबची जात नव्हती आणि उत्तरही देत नव्हती पण तिला त्याचा हा स्पर्श आवडत होता. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तो इतक्या जवळ होता की तिला उत्तर काय द्यावे हे समजत नव्हते. तिच्या अश्या शांत राहण्याने रामला खूप राग येत होता राम पटकन तिच्या पासून बाजूला झाला.
"चल निघुयात." राम गाडीचा दरवाजा उघडायला मागे फिरला.
"सर, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे." रामला त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. रामने मागे वळून पाहिले. चंपाच्या चेहऱ्यावर हसू होत. वाऱ्याने उडणारे केस तिच्या चेहऱ्यावर भुरभुरत होते. ती रामच्या जवळ आली आणि त्याला घट्ट मिठी मारली. राम दोन मिनीट स्तब्ध उभा राहिला. त्याने तिच्या कमरेत हळुवार हात घातला आणि ओठ तिच्या खांद्यावर ठेवून हलकेसे चुंबन घेतले. चंपा शहारली. तशीच त्याला आणखी घट्ट बिलगली.
"थँक्स." चंपाला त्याने हळुवार बाजूला केले. चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. तिच्या डोळ्यात पाहिले.
"लवकरच तू माझी होशील." चंपा रामपासून लांब झाली.
"सर मी पुन्हा सांगते राघवन खूप भयानक आहे. आपल्याला तो नाही एकत्र येऊ देणार." रामने चंपाला पुन्हा जवळ घेतले.
"आत्ता तू प्रेम करणारा राम पहिला आहेस, त्याचा राग पहा आता. निघुयात ?"
रामने गाडी स्टार्ट केली आणि राघवनला भेटायला निघाले.
राघवन स्वतःवर फार खुश होता. स्वतःच एकटाच हसत होता. चंपाचेही आपल्यावर प्रेम आहे असं त्याला वाटत होतं.
"चाचा, चाचा देख चार दिन से तू चंपा को ढुंड रहा हें, कल मुझे बताया आज चंपा खुद चलके मेरे पास आ रही ये।" राघवन खूप खुश झाला होता, चंपाला मिळवायला त्याला जास्त कष्ट करावे लागणार नव्हते असे त्याला वाटत होते. परिस्थिती नवीन वळण घेणार होती हे मात्र चाचाच्या लक्षात येत होते.
"राघवन तू पागल हो गया हे उस लडकी के प्यार में, साले धंदेपे ध्यान दे तुझे रोज नई लडकी देनेकीं जिमैदारी मेरी। साला प्यार करता हैं| "
"अय चाचा, मेरा भेजा मत सरका अभि तू, तू कौन देनेवला मेरेको नई लडकी, साले में इधरका सबसे बडा दलाल हूं। रस्ते पे खडे होके लंडकिया उठा के लाता तू और मुझे हर रोज नई लड़की दिलाने की बात करता हैं|" राघवन मोठ्याने हसत होता. चाचा खूप चिडला होता.
"लेकीन तुझे समझता नही हें अरे चंपा धंदेपे बैठेगी तो क्या होगा। गजब होगा, गली मे घुसने के लिये भी जगा नही होगी। हम लाखों मैं खेलेंगे तुझे समझ कैसी नाही रे...?“ चाचा बोलत होता तसे राघवन चे हात शिवशिवत होते.
अबोल होतो मी जेव्हा,
फक्त तू बोलत राहते
पाहत राहतो मी तेंव्हा
नकळत कशी चांद रात होते…
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत