चंपा
चाचाने दहा बारा फोन केले होते. चंपा सापडत नव्हती त्याच आता डोकं फिरलं होत.
“मादरचोत…. एक लडकी नही ढुंड पाते. चुत्या बनाके भगाके ले गया साला…” त्याचा आजूबाजूला उभी असलेली मूल फक्त त्याचा राग बघत उभे होते.
”साल्या… राघवन को फोन लगा अब वही देखेगा आगे क्या करना हे|”
“चाचा… राघवन…?”
“हा वही राघवन जो ऐसें चुटकी मे लोगो को चिर देता हे । वही राघवन जो हर नई लडकी पहिले उसकी होती है। वही राघवन जिसके जेब मे सब पुलीसवाले हे । वही राघवन जिसके आनेसे पुरा मुहल्ला थरथरता हे।“ चाचा पुन्हा आपले लाल दात दाखवत हसला.
राघवन फोन करताच तासाभरात चाचा समोर हजर झाला. राघवन अश्या पाच ते सहा पेठा चालवत होता. चांगला मुरलेला होता ह्या धंद्यात राघवन… मानेपर्यंत केस वाढलेले होते. गळ्यामध्ये मोठी चैन होती. हातामध्ये ब्रेसलेट, सगळ्या बोटांमध्ये सोन्याच्या मोठ्या मोठ्या अंगठ्या होत्या. राघवन भारदस्त सहा फूट उंचीचा होता. सावळा असला तरी नाकेडोळे तरतरीत होते. त्यामुळे तो आला की पेठेतल्या सगळ्या पोरी घाबरायच्या. चालता चालता कोणालाही कुठेही हात लावुन तो निघायचा. त्याच्या बापाचा माल असल्यासारखे… कितीतरी स्पेशल होत्या त्याच्या… पण चंपावर त्याचे मनापासून प्रेम होते म्हणूनच त्याने ना कधी तिला अडवले ना कधी काही बोलला.
चाचाने तो आला तसा व्हिस्कीच्या बॉटल काढल्या आणि दोघांचे ग्लास भरले.
“आज कोई नया माल…?” राघवन ने एक ग्लास झटक्यात संपवला.
“देख नया माल तो तुझे दिखाये बिना तो कोईभी कष्टमर के पास नही जाता.”
“तो कायको बुलया मुझे… दारू पीनेके लिये…? मेरा तो ठेला हे चाचा दारू तो मे वहा भी पी सकता था।“
“नही आज अलग काम हे”
“जलदी बोल चाचा... भेंडी मुझे टाइम नही हे।“
“चंपा भाग गयी...?”
तसा ताडकन राघवन उठला आणि हातातला ग्लास त्याने जोरात फोडला.
“क्या चाचा…? चंपा भाग गयी…? कब…?”
“परसो रात… “ चाचाला राघवनचा राग माहिती होता.
“और चमडी 'तेरी तू मुझे अब बता रहा हे। साले…” राघवन चाचवर धावून गेला.
“रुक मेरी बात तो सून… तोपर्यंत चाचाला त्याने दोन तीन लाथा पोटात मारल्या होत्या. “अरे रुक… राघवन वो कोई लडके के साथ भागी हे|” हे ऐकून तर राघवन आणखी चिडला होता.
“चंपा सिर्फ मेरी हे| मेने ऊस बुढीया को एसेही आंटी नही बनाया था| उसके मरने के बाद चंपा सिर्फ मेरी थी|”
“”क्या…? चाचा आता उडालाच होता.
“हरामखोर… साले ध्यान किधर हे तेरा…? लेकीन जहाँ कही भी हो उसे तो में… “
“राघवन देख उस भाडखाऊ बंड्याने उसे मदत की भागने में… मार दिया गांडू को…”
“चाचा तुने बंड्या को मारा साले…”
“वो मरता था मादरचोत उसके उपर…”
“झुठ… राघवन रागाने थरथरत होता.”
“मे कायको झुठ बोलू… पुछ मेरे लडकों को … मुझसे गद्दारी करनेवाले एसेही मरते हें। साले को बोला था कभी भी गद्दारी मत कर. सूना नही, गया भगवान के पास… देख राघवन तुझे भी चंपा चाहीये और मुझेभी.”
“तुझे कायको???”
“अरे वो धंदे पे बैठेगी तो तो धंदा चौपट होगा, मेरी भी कमाई बठेगी और तेरी भी….“ चाचाने व्हिस्की घशात ओतली.
“साले...चाचा बहोत हरामी हे रे तू…” राघवन पुन्हा पेटला.
“फिर से बोल क्या बोला...भाडखाऊ… चंपा मेरी हे सिर्फ मेरी है। उसे धंदेपे बिठाने का सोचा तुने, इसिलीये भाग गयी वो...राघवनने चाचाची गचुंडी धरली...चाचा उसे कुछ हुआ ना तो साले मरने तक मारुंगा साले मेरे हात से।” त्याला जोरात खुर्चीवर ढकलले आणि राघवन बाहेर पडला.
रात्रभर धो-धो कोसळणारा पाऊस थांबला होता. रामला चांगलीच झोप लागली होती. चंपाला आता तरतरी आली होती. ती उठून फ्रेश झाली. आरशासमोर उभी राहून ती एकटक स्वतःकडे पाहत होती.
हे सौंदर्य घात करतंय चंपा तुझा, देहविक्री करून जगणं याचा विचारच कधी केला नव्हतास, या पूर्वीही नाही केला आणि आत्ताही नाही करणार. बंड्या आला नसता तर काय झाले असते. रामला मारून मारून कुठेतरी गटारात टाकले असते आणि मला ? आताही कुठं सुटका आहे माझी ? मला वाटते की मी या देव माणसाला नको अडकवायला या सगळ्यामध्ये जे माझं होईल ते होईल पण माझ्यामुळे याच काही बरेवाईट झालं तर ते मला नाही सहन होणार. हे झोपलेत तोच मला निघायला हवे. तिथे गेल्यावर ठरवेन काय करायचं ते.
चंपाच्या डोळ्यामधून हा निर्णय घेताना पाणी ओघळत होते. जे करतीये ते चुक का बरोबर हे समजत नव्हते. पण आत्ता रामला तिला यांच्यात ओढायचे नव्हते. तिला माहीत होते राघवन इथपर्यंत पोहचला तर तो रामला नाही सोडणार...आणि हे ही माहीत होते की या धंद्यात काहीही होऊ शकते.चंपाने डोळे पुसले आणि मागे पाहिले तर राम तिच्या अगदी जवळ उभा होता. चंपा शहारली.
“हे काय उठला तुम्ही???” चंपा त्याच्यापासून लांब होत बोलली. त्याने तिचा हात पटकन पकडला.
“काय करताय? सोडा…”
“डोळ्यातून पाणी का आले? तेही मी सोबत असताना.”
“कुठे… ? बिलकुल नाही.”
“चंपा…? त्याने तिला आणखी जवळ ओढले.” आणि पुन्हा विचारले” काय झाले?”
“आंटी ची आठवण आली.” चंपाने गालावरची पाणी पुसले.
“आज ती असती तर…? तिच्या नसण्याचे दुःख मला आत्ता होतंय.”
“चंपा जाणारा माणूस जातो. तुझ्यासाठी मी आहे खंबीर तुला काहीही होणार नाही.”
रामने तिला जवळ घेतले, तिचे डोळे पुसले.
“माझ्यावर विश्वास आहे ना…?”
“खूप…”
“मग काळजी करू नको…” त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.
“मी फ्रेश होऊन येतो.” तो बाथरूम मध्ये गेला तोच चंपाने तिथून पळ काढला.
राम फ्रेश होऊन आला . त्याला चंपा कुठेच दिसत नव्हती. त्याने एकदोनदा तिला आवाज दिला काहीही रिप्लाय आला नाही तो बाहेर आला. मॅनेजर कोणासोबत हुज्जत घालतोय म्हणून रामने डोकावले तर चार पाच गुंड त्याला दिसले. नक्कीच ही चाचाची लोक आहेत याची कल्पना आली पण चंपा कुठे गेली या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याने चंपाला घेतल्याशिवाय निघायचे नाही मनाशी ठरवले. तो चंपाला त्या लोकांची नजर चुकवत इकडे तिकडे शोधत बाहेर पडला.
मॅनेजरने चंपा आणि रामच्या रूम कडे नेले.
'देखो भैया यहा थे वो दोनो।' मॅनेजर चिडून बोलला.
'लेकीन अब नही है न साले, बोल किधर गये जलदी बता।' त्यातल्या एकाने मॅनेजरची टाय खेचली.
'देखीये भाईसाहब मुझे नहीं पता और मुझे कुछ भी पता लगा तो मे आपको बताउंगा, मुझे छोडिये।'
'चल बे, इस चुत्या को कुछ पता नही हे।' असे म्हणत सगळे बाहेर पडले.
आयुष्याच्या प्रत्येक कठीण वळणावर,
समजावून सांगणारे खूप जण भेटतात,
समजून घेणारे क्वचितच असतात
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत