(मित्रांनो, मी लहान असताना हा प्रसंग माझ्या एका शेजारचा काका सोबत घडलेला होता. त्या प्रसंगाला मी कथेचा स्वरुपात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. यात मुख्य नायक शेजारचे काका आणि काकू हे आहेत. मी त्यांचा नावासोबतच हि कथा रचत आहे. या कथेचा किंवा प्रसंगाचा संबंध कुणाशी जुडत असेल तर हा केवळ एक संयोग समझून घ्यावा.)
गजाननराव मुंजे है या कथेतील मुख्य नायक आहेत. तर गजानन मागील काही काळापासून फारच आनंदित दिसत होता आणि रहात होता. त्याला कारण हि तसेच होते. गजानन हा शासकीय कारखान्यात चांगल्या पदावर रुजू होता. त्याने एक
दोनचाकी गाडी हल्लीच घेतली होती. म्हणून त्या गाडीचा त्याला फारच अभिमान आलेला होता. तसाच स्वभावाने हि तो तसाच उद्दंड आणि अभिमानी असा होता. आपल्यापेक्षा कमी असणारा किंवा आपल्यापेक्षा कनिष्ट अशा कर्मचारी असोत किंवा शेजारी असोत त्या व्यक्तीला तो तुच्छ आणि स्वतःला श्रेष्ठ असा समजायचा. तर त्याचा हा नित्यकर्म निरंतर सुरूच होता. तो ज्या कॉलोनीत रहात होता तेथे त्याचा शेजारी क्वार्टर मध्ये सगळे कनिष्ठ कर्मचारी रहात होते. तर त्यांचा पुढे आपल्या गाडीचा अभिमान दाखवण्याचा एकही चान्स तो सोडत नव्हता. गजानन कारखान्यात चांगल्या पदावर असल्यामुळे त्या वेळेस गाडी विकत घेण्याची बाब हि कनिष्ट दर्जाचां कर्मचारी यांचासाठी फारच दुर्मिळ अशी बाब होती. तेथील रहिवासी रहिवाश्यांमध्ये एकमेव गजानन ने गाडी विकत घेतली होती, त्याच क्रमात रोज कामावरून संध्याकाळी घरी परतल्यावर मुद्दाम गाडी रस्त्यावर उभी करून 'शारदा' म्हणून पत्नीला हाक मारायची आणि तेथूनच तिला सांगायचे कि आज आपण बाहेर जेवण आणि रात्रीचा नऊ ते बाराचा चित्रपट बघण्यास जायचे आहे. असे मुद्दाम सगळ्या शेजात्यांना ऐकायला गेले पाहिजे म्हणून तो असे वर्तन करायचा.
असाच एके दिवशी गजानन कामावरून घरी परतला. सायंकाळची वेळ होती म्हणून शेजारचा स्त्रिया एकमेकांशी गप्पागोष्टी करीत उभ्या होत्या, त्याच क्षणी गजानन तेथे येऊन पत्नीला सांगतो, 'शारदा' चल आज रात्रीचे जेवण आपण बाहेर करू आणि रात्री ९ ते १२ चा चित्रपट बघून येऊ आणि आपण आपल्या गाडीनेच जाऊ. शारदा हि तेथेच त्या स्त्रियांसोबत उभी असल्यामुळे ती म्हणाली, बरे आहे मी तयार होते आणि आपण जाऊ. काही वेळेने दोघेही तयार झाले आणि बाहेर जाण्यास निघाले. शेज़ारी त्यांना बघत होते म्हणून गजानन आणखीनच अभिमानाने शरीर ताठ करून गाडीला किक मारू लागला. गाडी सुरु झाली आणि ते दोघे हि तेथून गेले. रस्याने जाता जाता ते दोघेही सोबत गप्पागोष्टी करत शहरात पोहोचले. तेथे पोहोचल्यावर दोघांनी ठरल्याप्रमाणे हॉटेलमध्ये जेवण केले आणि त्यानंतर नजीकचा चित्रपटगृहात चित्रपट बघण्यास गेले. चित्रपट सुरु झाला आणि बघता बघता घड्याळात साढ़े अकरा वाजले आणि चित्रपट संपला. त्यानंतर ते दोघे हि घरी परत जाण्यास चित्रपटगृहातून निघाले त्यावेळेस रात्रीचे पाउणे १२ वाजले होते. ते दोघेही आजचा घालवलेल्या वेळेबद्दल गप्पागोष्टी करत करत घराकडे येत होते, त्यांचा घराकडे जातांना एक खासगी औद्योगिक कारखान्यांचा क्षेत्र पडतो. ते दोघे हि त्या क्षेत्रात पोहोचले होते. तो खासगी औद्योगिक कारखान्यांचा क्षेत्र असल्यामुळे तेथे दिवसभर कर्मचात्यांची वरदळ हि लागलेली असते. परंतू ती वेळ होती मध्यरात्रीची आणि खासगी कारखान्याची शेवटची पाळी नुकतीच सुटली होती आणि पुष्कळ कर्मचारी त्यांचा घरी निघून गेले होते. काही कर्मचारी टपरी वर मावा खाण्यास थांबले होते.
त्याक्षणी गजानन त्याचा पत्नीला घेऊन तेथून घराकड़े परतत होता. एवढ्या रात्री एक पुरुष एका स्त्रीला सुनसान अशा रस्त्यावर जातो आहे, म्हणून ते मजदूर कर्मचारी त्यांचाकडे बघत होते. गजाननला वाटले कि ते त्याचा गाडीकडे बघत आहेत. तर गजाननला आणखीच अभिमान चढला आणि त्याला ताव आला. त्याने शेखी बघारण्यासाठी गाडीची गती वाढवली, त्याचा त्या अभिमानाचा नादात त्याला रस्त्यावरील तो स्पीड ब्रेकर दिसला नाही आणि तो स्पीड ब्रेकर त्याने वेगात उडवला. त्याची गाडी ब्रेकर वरून उडाली तेच शारदा गाडीवरून खाली रस्त्यावर पड़ली. गजानन तसाच आपल्या गाडीला वेगाने पड़वीत पुढे निघून गेला. गाडी स्पीड ब्रेकर वरून उडाल्यामुळे शारदा अलगद झाडाचा पानाप्रमाणे हवेत उडाली आणिे भर रस्त्यात कंबरेचा भारावर जोरात अदडली. खाली पडतच शारदा जोरात ओरडली तिचा आवाज ऐकून तेथे उपस्थित असणारे मजदूर कर्मचारी आणि त्या कारखान्याचे रक्षाकर्मी शारदा जेथे पडली होती त्या दिशेने धावले. तेथे जाऊन त्यांनी शारदाला उचलले आणि कारखान्याचा गेटजवळचा रक्षाकर्मी यांचा ऑफिस मध्ये नेले. त्यांनी तिला पानी पिण्यास दिले आणि तिचा दुखण्याबद्दल विचारले. ती संपूर्ण वेळ शुद्धीवर होती म्हणून ती त्यांचाशी चांगली बोलत होती आणि त्यांचा प्रश्नाचे उत्तर देत होती.
त्यांनी तिला विचारले तो मनुष्य कोण आहे जो तिला असा सोडून गेला. शारदाने सांगितले कि तो माझा पती आहे आणि तिने गजानन कामावरून आल्यावर काय घडले ते त्यांना सविस्तर सांगितले. ते ऐकून त्या लोकांनी तिला म्हटले ताई तुम्हाला आणि तुमचा पतीला एवढी हि समज नाही आहे काय? रात्रीचे सव्वा १२ वाजले आहे पुढ़े रस्त्यात एकदम काळोख आहे. तुम्ही दोघेही एकटेच आहात. तुम्ही आमचा समोर पडल्यात म्हणून आम्ही तुम्हाला मदतीस आलो, तेच जर पुढ़े घड़ले असते तर.
त्यातल्या त्यात तुमचा पती काय शुद्धीवर नव्हता काय, जो तुम्हाला असा रस्त्यावर सोडून गेला. पुन्हा मागे फिरूनही पाहिले नाही तुम्हाला, शारदाचा राग हि अनावर झाला होता त्या क्षणी, ती सुद्धा गजानन वर ओरड् लागली होती, काय मेल यांचा डोक्यात चालते तर माहित नाही. दिवसाची वेळ सोडून देतात आणि रात्रीचे असे बाहेर फिरण्याचे बेत आखतात. या माणसाने तर हद्दच केली आहे, मी इकडे रस्त्यावर जखमी होऊन पडली आहे आणि हा निर्लज मनुष्य मला असा रस्त्यावर बेवारस सोडून निघुन गेला, आता तर त्याची खैर नाही. ती त्या लोकांना बोलली दादा, कृपाकरून मला माझ्या घरी सोडून द्याल काय. ते लोक बोलले ताई तुमचे घर कुठे आहे. शारदाने सांगितले कि आम्ही शासकीय कारखानदारांचा आवारातील क्वार्टर मध्ये राहतो. माझे पती शासकीय कर्मचारी आहेत, त्या कारखान्यात साहेब आहेत. त्या मजदूर कर्मचार्यांनी तिला तिचा घरी पोहोचविण्यास असमर्थता दर्शवली कारण कि तिकडे आमचा पैकी कुणीच जाणारा नाही आहे. तुम्ही काळजी करू नका तुम्ही रात्रभर इथेच या आफिसमध्ये थांबा सकाळी आम्ही तुम्हाला काहीही करून पोहचवण्याचा प्रबंध करून देतो. शारदा कडे आणखी काहीच उपाय नव्हता, तरीही तिला एक आस होती गजाननचा परतण्याची.
इकडे गजानन आपल्या अभिमानाचा नादात घराकडे वाढत होता, तो निरंतर बोलत होता आणि त्याने प्रश्न केला. शारदा त्या हॉटेल मधील जेवण फार छान होते ना आणि चित्रपट सुद्धा फारच चांगला होता. तुला ती नायिका कशी वाटली काय अभिनय केला आहे तिने त्या चित्रपटात. तू काही बोलत का नाही ग. अग मी मुद्दाम तुला त्रास देण्यासाठी त्या नायिकेची गोष्ट करतो आहे आणि तु आहे कि काहीच प्रतिक्रिया करत नाहीस. गजाननला प्रतिउत्तर म्हणून फक्त हूुं म्हणून आवाज आला. गजानन पुढे म्हणाला, काय हुं म्हणतेस काहीतरी बोल आतापर्यंत किती बोलत होतीस आणि आता एकदम शांत झालीस. तुला झोप तर येत नाही ना? किवा तुला भीती तर नाही वाटत आहे? गजाननला प्रतिउत्तर काहीच मिळत नव्हते तो निरंतर एकटाच बोलत जात होता. ते बघ आपण पोहोचलो आहे आपल्या घराजवळ दोन मिनिटात आपले क्वार्टर येईल . असे बोलता बोलता गजानन त्याचा क्वार्टर जवळ येऊन त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला चला घर आले आता उतरा. ज्या स्थळावर शारदा पडली होती तेव्हापासून गजानन ने एकदाही मागे वळून पहिले नव्हते. गाडी थांबवल्यावर तो गाडीवरून उतरला आणि मग त्याने मागे वळून पाहीले तर काय, शारदा कुठे गेली काही कळत नाही. कधी उतरली आणि कधी वर गेली काहीच समजले नाही मला. संपूर्ण रस्त्याभर मीच एकटा बडबड करत आलो आणि ती फक्त हं हं करत राहिली. असे बोलता बोलता गजानन ने गाडी
पार्क केली आणि तो पायर्या चढ्न आपल्या घरी गेला.
तेथे जाऊन बघतो तर काय अरे शारदा कुठे आहे? घराची किल्ली तीचाजवळ आहे! मला वाटले कि ती वर आली आहे, अखेर ती गेली कुठे? असे म्हणता म्हणता गजाननला काहीतरी शंका आली. त्याने पुन्हा गाडी काढली आणि सुरु करून तो परत रस्त्याने जाऊ लागला. सगळीकडे अंधार होता काहीच दिसत नव्हते. गजानन असेच चालता चालता अर्ध्या तासांनी त्या कारखान्याजवळ पोहोचला. तेथे रस्त्यावर कोणीच नव्हता फक्त कारखान्याचा घुमटीत रक्षाकर्मी आपले कर्तव्य आपले काम करत होता. रक्षाकर्मी दिसताच गजानन ने त्याला विचारले, दादा! तुम्ही एका महिलेला पहिले आहे काय? आता काही वेळेपूर्वी दोन पती पत्नी येथून गेले होते. तो रक्षा कर्मी गजाननकडे एक सारखा बघत होता. गजाननचे बोलने संपल्यावर त्या रक्षाकर्मीने आपल्या सहकर्मी यांना आवाज दिला. ते चार ते पाच व्यक्ती होते. त्याने त्याचा सहकर्मी यांना गजाननचे कथन सांगितले. त्यानंतर त्या संगळयांनी गजाननला आत नेले आणि शारदाची भेट करून दिली. शारदाला बघून गजाननचा प्राणात प्राण आले. मात्र गजाननला बघून शरदाचा रागाचा परा आणखी चढ़ला होता. तिने गजाननची चांगलीच खबर घेतली आणि बोलता बोलता त्याचा कानाखाली दोनचार लावून हि दिल्या.
हे सगळ घडतांना गजानन एकदम अनभिग्य असा होऊन तिचाकडे बघत होता. त्याला शारदा काय बोलत आहे हे कळत नव्हते, त्याने त्या रक्षाकर्मीं यांना विचारले कि हि काय बोलते आहे? हि सर्व वेळ इथेच होती. ते बोलले, हो! या ताई रस्त्यावर पडल्या तर आम्ही यांना उचलून येथे आणले आणी तेव्हापासून या इथेच आहेत. तेव्हा मग अन्यास गजाननचा मुखातून उद्गार निघाले, मग 'ती कोण होती? ". गजाननचा तोंडून ते वाक्य ऐकून सगळे शांत आणि स्तब्ध झाले, शारदाची हि स्थिती तशीच होती. गजानन पुन्हा म्हणाला "ती कोण होती " जी माझ्या बरोबर संपूर्ण रस्त्याभर घरापर्यंत आली. मग सगळ्या स्थितीचा आढावा घेऊन एक सहकर्मी बोलला. साहेब आम्ही समजलो, परंतु तुमचा लक्षात येत नाही आहे. साहेब तुमचाकड़े घडी आहे, ती बरोबर चालती आहे. गजानन म्हणाला, हो! माझ्याकडे घडी आहे आणि चालती सुद्धा आहे. गेलेला संपूर्ण काळ मी ती घालूनच आहे. तर मग साहेब जरा वेळ काय झाली आहे सांगाल. त्यावेळेस रात्रीचे १ वाजले होते. गजानन ने सांगितले रात्रीचे १ वाजले आहे. तर मग साहेब तुम्ही येथून किती वेळेपूर्वी गेले होते. गजानन म्हणाला तेव्हा सव्वा १२ झाले असतील.साहेब आमचा कारखाना ओलांडला कि एकदम निर्जन आणी विरान असा परिसर लागतो तेथे तुम्ही लक्ष केले नाही वाटत. नाही! असे
काय आहे त्या परिसरात, गजानन उत्तरला. अहो साहेब स्मशान आहे तेथे आणि रात्री १२ वाजले कि भूतांची स्वारी निघते. गाजानन अनभिग्य पणे बोलला माझ्या गाडीवर चेटकीण बसली होती. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. संपूर्ण प्रवासात ती फक्त हूं म्हणून बोलली आणि घराजवळ पोहोचताच गायब झाली. सहकर्मीं उच्चारला, हो साहेब तुम्ही फारच भाग्यवंत आहात कि तुमचा सोबत चेटकीण असून सुद्धा तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात आणि आता परत इथे जिवंत आलात.
त्या रक्षाकर्मीचे बोलने ऐकून गजानन ने एका क्षणात घातलेल्या कापडात सु केली आणि बेशुद्ध झाला. त्या रक्षाकर्मीने गजाननचा चेहरयावर पानी टाकून त्याला शुद्धीवर आणले त्यानंतर गजानन ने शपथ घेतली कि रात्रीचे घराचा बाहेर निघणार नाही.
स्वलिखित
गजेंद्र गोविंदराव कूडमाते