Shrram Satsang - 8 in Marathi Philosophy by Chandrakant Pawar books and stories PDF | श्रमसंत्सग - 8

Featured Books
Categories
Share

श्रमसंत्सग - 8

श्रम प्रतिष्ठा पणाला लावून अनेक जण यशस्वी व्हायला पाहतात परंतु श्रम पूजा जरी सोहळेपणाने केली तरी जीवन प्रार्थना मात्र त्यांना हवे तसे फळ पदरात पडू देत नाही. शरीराचा तपशील त्यांना तसं करू देत नाही. त्यावेळी तिथे श्रमाची चौकशी कीर्तीच्या पथकातून केली जाते. खरोखरच श्रमकीर्ती इथे आवश्यक आहे कां याचा निर्धार स्फोट आवश्यक आहे त्याची शहानिशा केली जाते.
नाहीतर मग बोगस श्रमाला श्रमकिर्ती प्राप्त होण्याची दाट शक्यता असते. मग इतरांवर अन्याय घडू शकतो... हे शल्य घेऊन श्रम अजिबात सुप्तावस्थेत जाऊ शकत नाही. त्यामुळेच की काय अशी घटना घडते...

विश्व श्रम हे नेहमीच कीर्तीच्या शिखरावर असतात. त्यांना श्रमादित्य घडवतात. त्यासाठी अथक श्रमांची साखळी निर्माण झालेली असते. ती साखळी जीवन रेषा आखते. परंतु जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात त्यावेळी ती जीवनरेषा श्रम जप्त करते आणि मग त्याला किंवा त्या व्यक्तीला उतरती कळा लागते त्या राष्ट्राला उतरती कळा लागते .ते राष्ट्र कंगाल होते. ती व्यक्ती सुद्धा कंगाल होते आणि मग श्रमाची अधिकृत समज काय असते हे त्याला कळून चुकते.

श्रमासाठी जीवन हे शरीर तारण ठेवतो. तेव्हा त्याची सोडवणूक होण्यासाठी शरीर पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करतो आणि गहाण टाकलेलं जे जीवन आहे ते सोडून घेते. म्हणजेच शरीराची श्रमातून सुटका करते. समपूर्ती झाली अशी खात्री झाली म्हणजे चांगली कृती घडते त्यासाठी शरीराला उत्तम आहार प्राशन करावा लागतो. कारण आहार हेच औषध आहे हे महान सत्य आहे.

ज्यावेळी शरीर श्रमालयात विश्रांती घेते किंवा श्रमालयात श्रम करते. त्यावेळी अनेक अडचणी येतात. भांडणे होतात. व्यसने लागतात .अनेक समस्या निर्माण होतात. त्यांच्यावर मात करून किंवा त्यांचे निवारण करून श्रम जीवनाशी संपर्क साधतो आणि मग उत्तम उत्तम घडामोडी निर्माण करून जीवनाला जागृत करतो. शरीराला जबाबदारी देतो .

मुक्तीचा झेंडा हातात घेऊन ती व्यक्ती सुखाच्या आगमनाने उस्फुर्त अशी प्रतिक्रिया देते.
जीवनाचे आभार मानते. तो श्रम इशारा जीवन मान्य करते. अर्थातच त्यावेळी शरीर मोहीम फत्ते झालेली असते.
कशाला उद्याची बात या मुक्ती प्रमाणे श्रम आजच श्रम ते उद्याची गोष्ट आजच करते आजच जीवनात सहभागी होते अर्थात उद्याची चिंता त्याला असतेच .परंतु त्याची तो काळजी घेतो आणि महत्त्वाचे प्रश्न आजच सोडवतो त्याची उत्तरे उद्यासाठी तयार असतात. परंतु आजच्या प्रश्नाला बगल न देता तो स्वतःही जबाबदारी स्वतःकडे घेतो.

अनेक श्रमाचारी अनेक गोष्टीत मग्न असतात. श्रमाचारीचे ते श्रमाचार्य कधी बनतात हे त्यांचं त्यांनाही कळत नाही त्यावेळी ते अर्थात तोंडात बोट घालतात. अरे हे असं घडलं. वा वा वा शाबास... अनेक सुविधांचा अभाव असताना अद्यावत यंत्रांचे तुटवडा असताना जीवन मान्यतासाठी लवकरात लवकर अहवाल सादर करून तशा सूचना शरीराला देऊन भवितव्य घडवलं जातं. अपेक्षित उद्दिष्ट साध्य केलं जातं आणि श्रमचाचणीमध्ये यशस्वी प्रगती पुस्तक तेव्हा अनेकांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

श्रमाचा अजेंडा ही जीवनाची बैठक आहे. त्याप्रमाणे आराखडे तयार केले जातात. हे आराखडे कोण करतो तर बुद्धी आणि मेंदू तयार करतात. मग श्रमस्थानी अनेक बैठका पार पाडून त्या बैठकीतून जे आवश्यक आहे असे उपक्रम तयार करून श्रमात छेद केला जातो. प्रचंड कोंडी असताना सुद्धा सक्षमपणे अनेक गोष्टी केल्या जातात अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष न करता कर्मचारी डोळ्यातील घालून पैशावर पहारा ठेवून उद्दिष्टेतेकडे सरकतात. त्यांना त्यावेळी एकच उद्दिष्ट दिसतं ते शिताफिने प्राप्त करतात म्हणूनच श्रमाला उपमा नाही असं म्हटलं जातं.

श्रमोन्मादावर ताबा मिळवला तरच श्रम हे महाकुटुंब म्हणून टिकून राहिल.हे खरं आहे की श्रम हे कुटुंब आहे.दलाल नाही.ना नफा ना तोटा या तत्वावर ते आधारित आहे.