जगामध्ये श्रमाची सुरुवात भारतातून झाली.
श्रम म्हणजे एकजूट असा त्याचा अर्थ आहे.
जीवन आणि शरीराची दुरुस्ती म्हणजेच श्रम आहे.
जीवनात जो श्रमला नाही. तो जीवन जगला नाही.
सजीवांच्या जीवनातील ऊर्जा केंद्र म्हणजेच श्रम आहे.
या जगात श्रम आधी की सजीव आधी हा प्रश्न गौण आहे.
ज्या प्रकारे सोन्याचे अनेकांना आकर्षण असते.
त्या प्रकारे श्रमाचे अनेकांना आकर्षण असते.
श्री हनुमान हे श्रमाचे आद्य श्रमसेवक आहेत. त्यांनी श्रीरामाच्या सेनेमध्ये श्रम सेवक म्हणून प्रामाणिकपणे काम केले.
ज्या अर्थी श्रमाने जीवनाचा प्रारंभ करता येतो. त्याअर्थी श्रमाने जीवन अपडेट सुध्दा करता येते.
जिथे जिथे श्रम आहे तिथे तिथे जीवन आहे .अथवा जिथे जिथे जीवन आहे तिथे तिथे श्रम आहे.
श्रम अजिबात काल्पनिक नाहीत.ते पूर्णपणे सत्य असतात.
श्रमशिवाय मनुष्य नाही अथवा जीवनाशिवाय श्रम नाही असाच याचा श्रमार्थ आहे.
स्वच्छता हे श्रमाचे प्रथम नाव आहे. सत्य हे श्रमाचे महानाम आहे.
श्रम कोणत्याही अंधश्रद्धेचे समर्थन करीत नाही.
श्रम नेहमी जीवनाला प्रोत्साहन देत असते.
हेच जीवनाचे श्रमार्थक आहे असे म्हणता येईल.
श्रमाचा प्रत्येक लिंगाशी संबंध आहे मग ती व्यक्ती पुरुष असो, स्त्री असो किंवा ट्रान्सजेंडर असो. लहान असो किंवा मोठी असो तरुण असो किंवा वृद्ध असो. श्रीमंत असो अथवा गरीब असो.
श्रम ही एक अति प्राचीन संस्कृती आहे.श्रमाला सर्व आव्हान देऊ शकतात किंवा आवाहन करू शकतात. श्रमाचेही तसेच आहे .श्रम सर्वांना आव्हान देतो आणि आवाहन सुद्धा करतो.
श्रम हे भयंकर परिवर्तन क्षेत्र आहे. प्रत्येक दशकानंतर
श्रमाच्या कलेमध्ये मोठं परिवर्तन होत राहतं आणि नवीन नवीन तंत्रज्ञान मनुष्यासाठी तयार होत राहते. त्या तंत्रज्ञानाच्या जोरावर मनुष्य स्वतःचे जीवन घडवत राहतो आणि श्रमाला विनाशर्त मंजुरी देतो. श्रमाच्या मंदिरात शरीर हे दैवत आहे. याचा सहज अर्थ असा आहे की शरीराच्या हृदयामध्ये श्रम हे महादैवत आहे.
दोघांचीही शक्ती वेगवान आहे. बलवान आहे.
श्रम हे संपत्तीचे द्योतक आहे. अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या मनुष्याला श्रमाने एका ठराविक उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. ती अनेकांच्या बाबतीत फायद्याचे ठरलेले आहे.
मग तो विद्यार्थी असेल अथवा जीवनमजूरी मिळवणारा श्रमि असेल. प्रत्येकाच्या ओंजळीमध्ये श्रमाने भरपूर दान टाकलेलं तुम्हाला आढळून येईल. त्यामुळे ज्याला जसं जमलं तसं त्याने त्याने श्रमाची भरपूर लयलूट करून जीवनाची शक्ती वाढवली आहे.
वरकरणी पहायला गेलो तर श्रमाची सुरक्षा ही खूपच साधी दिसते .मात्र त्या सुरक्षेमध्ये बदल करून मनुष्याने स्वतःला जीवनधारी बनवलेले आहे.
श्रम शाश्वत जीवनदायी शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. सर्व जे आहे ते लक्षवेधी आहे. आळशी माणसं किंवा कामचोर जे आहेत त्यांना जरी श्रमदर्शन घडलं तरी ते श्रमाला नाके मुरडतात किंवा श्रमस्थ होत नाहीत. त्यांच्या जनुकीय संरचनेत तसा बदल घडत नाही. असे ते उगीचच गैरसमज करून घेतात आणि स्वतः सोबत श्रमाची फसवणूक करतात. समाजाचं ओझं बनतात.
प्रश्न इथे असा आहे की श्रमाला पर्याय काय. ?
याचे उत्तर असं आहे की श्रमाला अजिबात पर्याय नाही.
कुणाला जर जीवन सरळ रेषेत जगता येत नसेल तर उगीचच वळण घेऊन श्रमाला निरर्थक ठरवण्यात काहीच अर्थ नाही.
जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे याचा अर्थ असा आहे की 1600 कोटी हात श्रमासाठी आसुसलेले आहेत. मात्र त्यांना नियम व अटी असल्याने अनेक श्रमाचे हात हे आखडते होतात.
नियम व अटी याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे कौशल्य नाही अथवा ज्यांना श्रमज्ञान नाही त्यांची खूपच गोची होते आणि जगताना त्यांना खूपच हाल अपेष्टा घ्याव्या लागतात. गरिबीचा रोगराईचा सामना करावा लागतो .एक गोष्ट मात्र नक्की आहे की श्रम हा भरवशाचा सोबती आहे .ज्यांना त्याची साथ मिळाली त्यांची गती वेगवान ठरते आणि कमालीच्या प्रयत्नाने ते जीवन गाडी हाकतात.
मात्र अनेकांचे म्हणणं असं आहे की श्रमाला नशिबाची साथ हवी. परंतु ते तसं नाही .श्रमाला कुणाच्याही नशिबाची गरज नाही. प्रत्येकाचे हात हे जगन्नाथ आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे सुर श्रमाशी जुळतात .त्यामुळेच तर शरीर श्रमाचे गीत गात असते. मात्र ते अनेकांना ऐकू येत नाही. असेच म्हणावे लागले .
मान्य आहे की श्रमाची स्पर्धा खूप आहे. नोकरांची स्पर्धा खूप आहे .उद्योग धंद्यामध्ये स्पर्धा आहे. पण स्पर्धा हेच श्रमाचे उगमस्थान आहे ही गोष्ट अजिबात विसरून चालणार नाही.
श्रमांत असा आहे की जे काही जगात चालले आहे. जे काही ब्रम्हांडात चाललं आहे. जी काही ब्रह्मांड शक्ती आहे त्याचं नाव श्रम आहे .हे लक्षात ठेवलं म्हणजे अनेक गोष्टी सहज सुटतात .सोप्या होतात.
श्रमदास-चंद्रकांत पवार...7400217215