Mall Premyuddh - 1 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 1

Featured Books
Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 1

मल्ल - प्रेमयुद्ध


डांगेमैदानात नुसता धिंगाणा सुरु होता. चारही बाजूला पब्लिक आरोळ्या देत होते. क्रांतीने मॅटवर रत्नाला चितपट केले होते. नेहमीप्रमाणं या हि वर्षी क्रांतीने तिच्यापेक्षा जास्त वजनाच्या रत्ना देवरे या मुलीला खेळात शक्ती आणि युक्तीने नामोहरण केले होते. क्रांतीचा श्वास फुलाला होता. शिट्टी वाजल्यानंतर तीने रत्नाला सोडले होते. इतके दमूनसुद्धा विजयाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर सर्वानाच दिसत होता. गोऱ्या चेहऱ्यावर लाली आली होती. रत्नाने क्रांतीला मिठी मारली होती. रत्ना क्रांतीची जिवलग मैत्री होती. हा... पण खेळात प्रतिस्पर्धी होत्या नक्की. रत्नाने तिच्या युक्तीचे कौतुक केले. 'बाजी मारलीस म्हंटल. नाहीतर तुझ्याशिवाय मला हरवणारी अजून कोण असणार.' पंचांनी तिचा हात पकडला आणि उंचावून तिला विजयी घोषित केले. मैदानात तिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दादा, क्रांतीचे वडील लेकीच्या जिकंण्याने खुश होते. क्रांतीने महाराष्ट्रात नाव कमवलेच होते पण इथेच न थांबता भारतात आणि भारताबाहेर ओळखलं जावं अशी दादांची इच्छा होती. क्रांतीने बऱ्याच कुस्त्या जिंकल्या होत्या तिला नॅशनल लेव्हलला खेळायचे होते. क्रांतीचे कौतुक करायला तिथल्या जमावाने तिला घेरले होते. त्याच मैदानामध्ये पुरुषांच्या कुस्त्या होत्या. आज क्रांतीला या कुस्त्या पहायच्या होत्या. दादांना ती म्हणाली.


' दादा आज मला या कुस्त्या बघ्याच्यात थांबायचं का ?'

' पोरी गावाकडं लोकांनी मिरवणुकीचा घाट घातलाय सगळी वाट बघत्यात दहा फोन येऊन गेलत. अन ते बी सरपंचांनी केल्यात. त्यांना थांबया सांगायचं व्हय.' दादांचा फोन परत वाजता.


'दादा मिरवणूक संध्याकाळी करू म्हणावं अशी गावातल्या बायका मला म्हणत्यात की तू जिंकलीस की रात्री मिरवणूक काढक्त ज लेकीचा सोहळा बघायचा असतो त्यांना दुपारी सगळं बायका रानात जात्यात दादा... नंतर मला ऐकावं लागत.' खरतर तिच्यावर गावातल्या सगळ्याच थोऱ्या मोठ्यांचे प्रेम होतं. तिच्यामुळे एका छोट्याश्या खेडेगावला ओळख मिळाली होती.


' बर बर संतोषला सांगतो मी गाडी नग काढू अन सरपंचांनाबी सांगतो. मिरवणूक रात्री काढू.' क्रांती खुश होऊन चेंज करायला गेली. थोडा वेळ रूम मध्ये शांत बसली आणि माधवीला कसं पकडून, खाली पाडून, पट काढून हरवलं याचा विचार करत होती तेवढ्यात उस्ताद हरितात्या आले.


'लै भारी खेळलीस क्रांते... माझ्या गावाचा वाघ हायस तू... वाटलच व्हत तू माघार घेणार न्हाईस...तू धोबीपछाड करणार.' क्रांतीने वाकून हरितात्यांना नमस्कार केला.


' तात्या आव म्या फक्त मैदानात खेळले बाकी सगळं तुम्ही सांगितलं तस..' क्रांती म्हणाली.


' मला म्हाइत हाय पोरी तू कधीच स्वतः एकटीच विजय म्हणणार न्हाईस.' तात्यांच डोळे पाण्यानं भरून आलं.


' तात्या आव दादा, तुम्ही, आई किती कष्ट घेता माझ्या मागं. म्हणून मी करू शकते.' क्रांतीला राजवीर... राजवीर... अश्या नावाच्या घोषणा ऐकू येत होत्या.


' तात्या राजवीर...?' क्रांतीने विचारले.


अग पोरी राजवीर म्हाइत न्हाय व्हय तुला... दांडेवाडीच्या पाटलाचा पोरगा आग नॅशनल पर्यंत खेळला हाय. तू थांबत न्हाय ना कुस्ती बघायला या गद्यांची कुस्ती बघ.' जसाजसा राजवीर मैदानात पोहचत होता तसतसं आवाज वाढत होता.


तात्या तुम्ही जा पुढं मी आलेच...' तात्या बाहेर गेले. तेवढ्यात रत्ना आली.


;मग खुश का? रत्नाने बॅग टेबलवर ठेवली.


जिंकले म्हणून खुश... पण तुला हरवले म्हणून वाईट वाटतंय.
क्रांतीने केसांचा अंबाडा सोडला.


हरवले म्हणून वाईट काय वाटायचे त्यात... माझा पट्ट्या तयार झालाय. रत्ना ने तिच्या दंडावर थोपटले आणि हसली.
हे बघ तू माझ्या समोर आहे हे कळल्यानंतर लगेच मी नाही म्हणाले व्हते पण तू ऐकशील तेव्हा ना...' क्रांती थोडी चिडली होती.


' अरे यार नेक्स्ट टाइम माझा मी हरवेन तुला. चल जरा राजवीरची मॅच बघू... मॅच सुरू झाली सुद्धा...' रत्नाने पटकन बॅग उचलली आणि बाहेर पडली.


तू चल पुढे मी येते. क्रांतीने केसांचा अंबाडा घट्ट बांधला. तेवढ्यात तिच्या बॅग मधला फोन वाजला.


हॅलो... हा आई आग...' रत्ना आईला मॅच कशी जिंकली याविषयी सांगत बसली.


राजवीर... राजवीर... पहिल्याच डावात राजवीरचा प्रतिस्पर्धी सचिन; दमून गेला होता. दोघे एक डाव खेळून खुर्चीत बसून पाणी पीत होते. सचिन त्याच्या कोचच्या इस्ट्रक्शन ऐकत होता.



डोक्यात एकच विचार होता. पकडच एवढी मजबूत आहे राजवीरची झेपायला अवघड जातंय. तेवढ्यात शिट्टी वाजली. राजवीरने सचिनला काही कळायच्या आत पकडले. पकड एवढी मजबूत होती की सचिनला काही करता उलट नव्हते. शेवटी काय....? राजवीरने बाजी मारली आणि जिंकला. पुन्हा तोच जल्लोष..... घामाने डबडबलेले राजवीरचे शरीर चमकत होते. चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद होता आणि गर्व... पंचांनी त्याला विजयी घोषित केले. मित्रांनी मैदानावर येऊन त्याला उचलुन घेतले. त्याच्या नावाच्या जयघोषाने सारे मैदान दुमदुमत होते.


क्रांतीच्या लक्षात आल्यानंतर ती लोकांच्या गर्दीमधून पळत आली. राजवीर हात दाखवून सर्व प्रेक्षकांना अभिवादन करत होता. राजवीचे नाव अजूनही लोकं मोठ्यामोठ्याने घेऊन ओरडत होते. लोकांच्या गर्दीमधून आवाज येत होते.


राजवीर खेळणार म्हटल्यावर काय गरज नव्हती याच घ्यायची....१ जण


व्हय की पैलवान हया महाराष्ट्राच्या मातीतला... जिकणार ठरलेले व्हत. २रा


हातानं नाव घालवतात लोक राजवीर बर कुस्ती खेळून.. ३ला
क्रांतीची नजर त्याच्यावर पडली. त्याच्या चेहरा पाहून ती त्याच्याकडे बघत बसली. रत्ना मागून आली आणि म्हणाली.
काय पिळदार पैलवानाच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाही वाटत. क्रांतीने रत्नाकडे पाहिले.



"तो लय भारी दिसतोय म्हणून न्हाय बघत त्याच्याकडं..." त्याच्या चेहऱ्यावर जे घमंड आणि मग्रुरी हाय ती बघती. घमंड हाय त्याला त्याच्या खेळावर...क्रांतीने तोंड वाकडे केले.



ओळ्खतीस का त्याला? रत्ना



न्हाय मी पहिल्यांदाच बघती ह्याला पण माणसाच्या चेहऱ्यावरून थोडाफार स्वभावाचा अंदाज येतोच की...



तेवढ्यात राजवीर ने माईकवरून सगळ्या पैलवानांना आश्वासन केले. कोणाच्यात असल दम तर या मैदानात... राजवीर असुर आनंदात सगळ्या पैलवानांना बोलावत होता पण कोणी तयार होत नव्हते. राजवीर हसत होता आणि इकडे क्रांतीला राग येत होता. मनाची तयारी केली आणि हात उंचावून म्हणाली
;मी खेळणं तुझ्यासंग...सगळ्या लोकांच्या नजरा क्रांतीवर पडल्या. क्रांती भरभर मैदानावर येत होती. सगळीकडे शांतता पसरली होती. दादा, उस्ताद तिला थांबवायला निघाले पण त्यांना कोणी खाली येऊच देत नव्हते. राजवीरने तिला एकदा बघितले आणि पंचांना सांगितले. "ह्यांना म्हणावं आम्ही बाईमाणसाबरोबर कुस्ती खेळत न्हाई." पंच तिच्याकडं येऊपर्यंत क्रांती म्हणाली.



"बाई हाय म्हणून पळवाट काढताय अस समजायचं का आम्ही? की घाबरला?" क्रांती उद्धटपणे हसायला लागली. मैदान तुडुंब भरलेले असताना टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरली होती. माधवी तिच्याजवळ आली. क्रांती वेड लागलंय व्हय तुला ? चल हितन... रत्नान तिचा हात पकडला आणि तिला ओढले पण क्रांती इंचभरसुद्धा जागची हलली नाही. "मला फरक न्हाय पडत हे पुरुष हायत... पण ह्यांना कशाचा फरक पडतोय?" राजवीर रागाने लाल झाला होता. त्याने पंचांना मॅच सुरू करायला सांगितली. सगळ्यांचे डोळे या दोघांवर खिळले होते. दादा, तात्या संतोष आणि रत्ना यांच्या काळजाची धडधड वाढली होती.




" दादा क्रांतीला थांबायला हवं... आव कसलं खूळ हे राजवीरबरोबर खेळायचं... थांबा जातो मी." संतोष डोक्यावरचा घाम पुसत होता. तेवढ्यात मागून त्याच्या खांद्यावर को


णीतरी हात ठेवला.
"खेळायची इच्छा हाय खेळुद्यात परत न्हाय नादी लागायची वीरच्या..." सगळ्यांनीचमकून मागे पाहिले. राजवीरचा मोठा भाऊ संग्राम होता.



"माफी असावी ... पण क्रांतीला माहीत न्हाय राजवीर कोण हाय...?" दादा संग्रामला म्हणाले.
"मग कळल की आता... एकच सांगणं फकस्त... गाडी काढून ठिवा म्हंजी हास्पिटलात जायला मोकळं...काय...?" संग्राम




मिशीच आकड पिळत व्हता.
आता मात्र दादांना धडकी भरली. 😲😲😲 काय पोरीला बुद्धी सुचली आणि राजवीरला उसकवल...




क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.


धन्यवाद🙏🙏🙏