Devayani Development and Key - Part 23 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग २३

Featured Books
Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग २३

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   २३

भाग  २२   वरून  पुढे  वाचा ................

 

“हो. आणि उद्या सुरेश पण सकाळी पोचतोय.”- विकास.

“हे मात्र चांगलं झालं. घरचाच डॉक्टर असला की काळजी नसते. आता तर देवयानी आणि तिची आई दोघंही तिथेच असतील ना?” – बाबा.

“हो.” – विकास. 

“एक कर. रात्री त्यांना घरी पाठवून दे. जरा आराम करू दे त्यांना.” – बाबा.

“हो बाबा  तसंच करतो.” – विकास.

“ठीक. अपडेट दे उद्या. ऑपरेशन झाल्यावर काय परिस्थिती आहे ते कळव.”- बाबा.

“हो.” – विकास.

देवयानीच्या आईला काय बोलणं झालं ते विकासने सांगितलं. आणि म्हणाला की

“चला आता इथे थांबून काय करणार आहोत आपण त्यापेक्षा इथल्या कॅंटीन मधे जाऊन जेवून घेऊ. जरा एनर्जी असायला पाहिजे शरीरात. उपास करून काही साध्य होणार नाही.” देवयानीच्या आईने जरा आढेवेढे घेतले पण नंतर तयार झाली.

रात्री बाराच्या सुमारास डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे. आज तर त्यांना ICU मध्येच ठेवू. उद्या सकाळी रूम मधे शिफ्ट करू. तुम्ही admin office  मधे जाऊन रूम वगैरे ठरवून घ्या. म्हणजे ऐन वेळेवर तुमची धाव पळ होणार नाही. काळजी करू नका. सगळं ठीक आहे.

विकास लगेच admin  ऑफिस मधे गेला, त्यांनी विचार केला की देवयानी आणि तिच्या आईने घरी जायला नकार दिला तर त्यांना रूम मधे जरा आराम करता येईल.  आणि सगळी चौकशी करून रूम फिक्स करून  टाकली. त्यांनी सांगितलं की आम्ही आताच रूम चा ताबा घेतो. म्हणजे उद्या काही अडचण होणार नाही.

आल्यावर तो दोघींना रूम मधे घेऊन गेला आणि सांगितलं की “थोडा वेळ तुम्ही

आराम करा. मग मी इथे थांबतो तुम्ही घरी जा. आणि सकाळी या. तसंही बाबा ICU मधे आहेत आणि कोणालाही जाण्याची परवानगी नसते. तुम्ही थांबून काय करणार त्यापेक्षा घरी जाऊन थोडी विश्रांती घ्या.”

“छे छे, हे रूम मधे येऊन आमच्याशी बोलल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाहीये, इथेच थांबू. तुम्हीच  वाटल्यास घरी जाऊन थोडा आराम करा उद्या तुमची जास्त जरूर असणार आहे.” कावेरीबाई म्हणाल्या.

विकासला यावर  न बोलणंच श्रेयस्कर वाटलं. तो म्हणाला की “मी बाहेर ICU च्या बाहेर थांबतो.” आणि तो बाहेर पडला.

रात्र शांततेत पार पडली. विकास काचेतून पहाण्याचा प्रयत्न करत होता, पण बाबांचा बेड पलीकडच्या बाजूला असल्यामुळे त्याला काही दिसलं नाही. शेवटी तो खुर्चीवर जाऊन बसला.

पहाटे खुर्चीवर बसल्या बसल्याच त्याचा जरा डोळा लागला होता. तेंव्हाच देवयानी आली आणि त्याला उठवलं.

“सुरेश आला आहे. तो घरी पोचला आहे. कोणाला तरी  जावं लागणार आहे. तू असं करतोस का आईला घेऊन जातोस का ? मी थांबते इथे. मीच गेले असते  पण आत्ता चार वाजले आहेत आणि बाहेर अजून अंधार आहे म्हणून म्हणतेय.”

विकास देवयानीच्या आईला घेऊन घरी पोचला. सुरेश गेट वरच उभा होता. त्याला पाहिल्यावर आईला पुन्हा उमाळा आला. विकास दोघांनाही घेऊन फ्लॅटवर गेला. त्या दोघांना एकटं सोडून तो चहा आणि नाश्ता बनवायच्या तयारीला लागला.

त्यांना चहा, नाश्ता देऊन त्यानी आंघोळ आटोपली. आणि दवाखान्यात जायला निघाला.

“तुम्ही आटपून घ्या, मी आता जाऊन देवयांनीला पाठवून देतो. तुम्ही थोडा आराम करून फ्रेश होऊन सावकाश या. मी आहे तिथे.” असं म्हणून निघाला. हॉस्पिटल मधे जाऊन त्याने देवयांनीला घरी पाठवलं. आणि स्वत: ICU च्या बाहेर बसला.

डॉक्टर चा राऊंड अकरा वाजता झाला. डॉक्टर शी बोलल्यावर त्याला कळलं की बाबांना शुद्ध आली आहे आणि दुपार पर्यन्त त्यांना रूम मधे शिफ्ट करतील.

बारा वाजता देवयानी आणि सुरेश आले. त्यांना सगळं अपडेट देऊन तो आणि देवयानी घरी आले.

दुपारी दीड वाजता विकासचे आई आणि बाबा आले. मग संध्याकाळी सहा वाजता विकास त्यांना घेऊन दवाखान्यात घेऊन गेला. थोडा वेळ ते लोक तिथे बसले देवयानीच्या बाबांशी  बोलले आणि घरी परत आले. रात्री देवयानीची आई झोपायला जाणार होती. गोविंदराव घरी येई पर्यन्त विकास चे आई, बाबा  पुण्यालाच राहणार होते.

आठवड्या भरात बाबांची प्रकृती बरीच सुधारली आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला.

एक महिन्यांनी दाखवायला या सगळं ठीक असेल तर Plaster दोन महिन्यांनी काढू, असं डॉक्टरांनी सांगितलं. बाबांना घरी म्हणजे विकासच्याच फ्लॅट वर आणलं.

आता एक वेगळीच अडचण उभी राहिली होती. बाबांचं plaster लग्नाच्या तारखे नंतर तीन दिवसांनी निघणार होतं. त्यानंतर फिजिओ थेरपी ती जवळ जवळ एक ते दीड महिना चालणार होती.

अशा परिस्थितीत लग्न कसं करायचं हा एक मोठाच प्रश्न होता. परत सुरेशची परीक्षा पण त्याच सुमारास होती. तो ही मुद्दा होताच. बरं या सगळ्यांची चर्चा देवयानीच्या बाबांच्या देखत चालली होती. ते काहीच बोलत नव्हते. शेवटी भगवानरावांनी सूचना केली की आपण लग्न पुढे ढकलू. पण हॉल चा अडवांस देऊन झाला होता. Caterer फायनल झाला होता. त्याला पण अडवांस देऊन झाला होता. फक्त पत्रिका छपायच्या शिल्लक होत्या. मग आता काय करायचं हा मोठाच प्रश्न होता. गोविंद राव बिचारे, काहीच बोलत नव्हते. आधीच ऑपरेशन चा बेसुमार खर्च झाला होता आणि आता जर हॉल आणि caterer  चे पैसे त्यांनी दुसऱ्या तारखेत अॅडजस्ट केले तर ठीक नाही तर काय करायचं याच विचारात ते गढून गेले होते.

“गोविंद राव काय झालं ?” भगवानराव गोविंद रावांकडे बघून म्हणाले, “तुम्ही असे गप्प का ? काय चाललं आहे तुमच्या मनात ?”

“भगवानराव अहो, आम्ही मध्यम वर्गीय माणसं. विचार तर  येणारच ना मनात. आधीच ऑपरेशन चा बेसुमार खर्च झाला आहे. आणि आता जर हॉल आणि caterer  चे पैसे त्यांनी दुसऱ्या तारखेत अॅडजस्ट केले तर ठीक, नाही तर काय करायचं याच विचारात होतो. अजून काही नाही. बरं मी हा असा बेड वर पडून आहे. काय करणार आहे मी ? सुरेश ची परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. त्यांनी या मामल्या मधे लक्ष्य घालून आपला अमूल्य वेळ खर्ची घालावा असंही मला वाटत नाहीये. आधीच माझ्या मुळे त्याचा बराच वेळ वाया गेला आहे.”

भगवानरावांनी गोविंदरावांचे हात आपल्या हातात घेतले. हलकेच दाबले, थोडं थोपटलं हातावर आणि म्हणाले –

“गोविंद राव, या गोष्टीची काळजी तुम्ही का करता आहात ? आम्ही आहोत ना. तुम्ही आम्हाला सर्व डिटेल्स द्या, आम्ही बेळगाव ला जातो आणि सर्व ठीक करून येतो. मग तर झालं ? सुरेश ला involve करूच नका. आम्हीच करू सगळं. त्याचा एक मिनिटही वाया जाऊ देणार नाही. अहो सोय जाणेल तो सोयरा, अशी म्हणच आहे ना ! मग आता फार विचार नका करू. लवकर बरे व्हा.”

हे ऐकल्यावर गोविंदरावांचे डोळे पाणावले.

कावेरीबाईंना पण भावना आवरता आल्या नाहीत. त्यांनी पण डोळे पुसले. देवयानी पण भारावून गेली होती. विकास आणि सुरेश बघत होते. त्यांना या सिचुएशन मधे काय बोलावं तेच कळत नव्हतं. ते नुसतेच एकमेकांकडे बघत राहिले. गोविंदराव गदगदलेल्या स्वरात म्हणाले –

“भगवानराव, लाख मोलाची  गोष्ट बोललात तुम्ही ! फार मोठ्या मनाची माणसं आहात तुम्ही सर्व. आमचा खूप मोठा गैरसमज झाला होता सुरवातीला. आम्हाला माफ करा. आमच्या देवयानीचं भाग्य थोर म्हणून तुमच्या सारखं सासर  मिळतंय 

तिला.” पुढे त्यांना बोलवेना. म्हणून ते गप्प झाले. विकास पुढे झाला.

“बाबा, अहो असं का बोलता ? मला तुम्ही मुला सारखाच मानता न ! मग मुळीच काळजी करू नका. लवकर बरे व्हा. आमच्या साठी आत्ता या घडीला तेच सर्वात महत्वाचं आहे. काय सुरेश मी बरोबर बोलतोय ना ?”

सुरेशने मान हलवली. त्याला पण आता बोलणं कठीण झालं होतं. या लोकांचा जिव्हाळा पाहून त्याचेही मन भरून आलं होतं. देवयानी या घरात सुखात राहील याची त्याला आता पूर्णच खात्री पटली होती.

“मी काय म्हणतो गोविंदराव, एक सुचवावसं वाटतंय, सुचवू का ?” – भगवानराव

“भगवानराव अहो हे काय विचारणं झालं ? बोला नं.” – गोविंदराव 

“मी काय म्हणतो, आपण लग्नाची तारीख पुढे ढकलू आणि लग्न नागपूरलाच करू म्हणजे तुमच्या वर कामाचा बोजा पडणार नाही. नागपूरला आमचा कारभार सगळा  सेट झालेला आहे. भरपूर माणुसबळ आहे. तुम्ही फक्त यायचं आणि वधू वरांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या. बस.” – भगवानराव  म्हणाले.

“अहो पण आमची बेळगावची किती तरी लोक बोलवायची राहून जातील ना !”

“अहो त्यात काय ? नंतर तुमच्या सोयीने एक रिसेप्शन देऊन टाका. झालं.” भगवानरावांनी गोविंदरावांना  पडलेला प्रश्न सोडवून टाकला.

“हो बाबा असच करू. पण मला वाटतं की लग्न थोडं पुढे करू, पण बेळगावलाच करू.” – सुरेश.

“अरे बेळगाव ला करायचं म्हणजे तुमची खूप दमछाक होईल. नागपूरला केलं तर आम्हाला तिथे खूप सपोर्ट आहे. काही प्रॉब्लेम नाही”. भगवानराव म्हणाले.

“अहो आमच्या कडे  लग्न मुलीच्याच मांडवात होतं. म्हणून.” – सुरेश.

“अरे सगळी कडेच ही रीत आहे. नवीन काही नाही त्यात. पण परिस्थितीनुरूप आपली सोय पाहून आपण निर्णय करायचा असतो.” – भगवानराव

“हो, पण बाबा, आता पुढची तारीख म्हणजे जवळ जवळ मे उजाडणार तो पर्यन्त बाबा ठीक होतील आणि माझी परीक्षा होऊन रिजल्ट पण लागलेला असेल. तेंव्हा टेंशन घेण्याचे काहीच कारण उरणार नाही. आता फक्त हॉल आणि caterer ला विचारून बघू, काय म्हणतोय ते. मी आणि विकास दोघंही जातो बेळगाव ला आणि बघतो काय करायचं ते.” सुरेशनी त्याची भूमिका मांडली.

 

 क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.