Devayani Development and Key - Part 16 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग १६

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग १६

    देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण. 

 

भाग १६  

भाग  १५     वरून  पुढे  वाचा ................

 

साधारण एक वाजता विकास आला. सगळ्यांचे चेहरे नॉर्मल होते. त्याला इतकी जनता पाहून वाटलं की पार्टी आहे. आता एवढ्या क्षुल्लक कारणांसाठी बॉस ला गळ  घालून सुट्टी घ्यावी लागली म्हणून त्याला जरा रागच आला. म्हणाला सुद्धा

“अरे काय चाललं आहे? पार्टी साठी मला सुट्टी घ्यायला भाग पाडलं देवयानी? अग महत्त्वाच्या प्लॅनिंग वर चर्चा चालली होती ती सोडून यावं लागलं बॉस किती नाराज झाला माहीत आहे? किती विनंत्या कराव्या लागल्या.”

सुप्रियाच बोलली.

“अरे थांब. थांब. तू समजतोस तसं काहीही नाहीये. प्रॉब्लेम खरंच सिरियस आहे आणि तुझ्या शिवाय कोणीच निर्णय घेऊ शकणार नाहीये, म्हणून तुला बोलावलं. खरंच  सांगतेय मी”

“सिरियस प्रॉब्लेम चेहऱ्यावर दिसतो. तुम्ही तर पिकनिक ला आल्या सारखे दिसता आहात’” विकास अजूनही चिडलेलाच होता.

पुन्हा सुप्रियाच बोलली. “मी सांगते सर्व, तू आधी बसून घे.”

मग सुप्रियाने कालचा सगळं प्रसंग सविस्तर सांगितला. त्यानंतरची देवयानीची

अवस्था काय झाली होती ते पण सांगितलं, सकाळपर्यंत देवयानी कशी सावरली होती ते पण सांगितलं. अर्थात विकासला ते देवयानीच्या चेहर्‍यांवरून कळत होतं. सर्व सांगून झाल्यावर मग म्हणाली-

आता काय अॅक्शन घ्यायची ते तू ठरवायचं आहे. म्हणून तुला बोलावून घेतलं. आमच्या दृष्टीने हा प्रॉब्लेम सिरियस आहे. तुझं काय म्हणण आहे ?

तुला काय वाटत देवयानी? पोलीसांकडे जायचं?

“मला अस वाटतं की” देवयानी म्हणाली “तू एकदा राजूशी  बोलून बघावस, सामोपचाराने तिढा सुटत असेल तर try करायला हरकत नाही. पोलीसांत तक्रार  केल्यावर त्याचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. किती झालं तरी तो आमचा मित्र आहे. तेंव्हा तू एकदा तुझ्या भाषेत त्याला समजावून बघ. कदाचित त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल.”

 

“करेक्ट. देवयानी करेक्ट. इतक सगळं होऊनही तू आपल्या मनाच संतुलन राखलं आहेस, मला तुझा अभिमान वाटतो. ओके. बोलावून घ्या त्याला, लाव फोन” विकास म्हणाला 

देवयानीनी फोन लावला बहुधा राजू सुद्धा आज सुट्टीवरच होता. त्यांनी उचलला.

“हॅलो राजू, मी देवयानी बोलते आहे.”

“देवयानी? कशाला फोन केलास, मला चार गोष्टी सूनवायला?” – राजू.

“नाही नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ता येतोस का? फ्लॅटवर?” – देवयानी

“नक्की बोलायचेच आहे ना? की मारायचं आहे?” – राजू.

“नाही, नाही बोलायचेच आहे. तू येतो आहेस ना?” – देवयानी

राजू येतो म्हणाला आणि त्यांनी फोन ठेवला. देवयानीने फोन केला आणि राजू येतो असं म्हणाला. त्या बरोबर ज्या सहज स्वरात बोलणं चाललं होतं, त्याला वेगळं वळण लागलं. मामला जरा गंभीर व्हायला लागला होता. सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा गंभीर भाव आला होता. आता काय होईल याचा सर्वच विचार करत होते. विकास एकदम आडदांड, मजबूत आणि राजू त्या मानाने अगदीच किरकोळ, जर विकास संतापला तर काय करायचं हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. त्याला त्यावेळी  थांबवणं अवघड होऊन बसणार होतं. पण हा भाव देवयानी बरोबर ताडू शकली. आणि म्हणाली –

“हॅलो, कोणीही चिंता करू नका, तुम्हाला वाटतंय तसं विकास काहीही करणार नाहीये. तो मार्केटिंग चा  माणूस आहे. माझी खात्री आहे की, तो गोडीगुलाबीनेच सर्व ठीक करेल. त्याला मी चांगलं ओळखते, त्यांच्यावर विश्वास ठेवा.“ देवयानीने असं म्हंटल्यांवर सर्व थोडे रीलॅक्स झालेत.

राजू येई पर्यन्त सर्वांची जेवणं आटोपली. आणि ते राजूची वाट पहाट बसले. थोड्या वेळाने राजू आला. त्यानी सर्वांना एकत्र बघितलं आणि घाबरला. वळून वापस जायला निघाला. देवयानीने त्याला थांबवलं. म्हणाली-

“अरे राजू तुझीच वाट पहात होतो. ये बस.”

राजूने तिच्या कडे एकदा आणि मग सगळ्यांच्या कडे वळून पाहीलं. चेहऱ्यावर संशय दिसत होता. पण  मग विकासच अगदी शांत पणे  friendly आवाजात बोलला –

“ये राजू ये, मी विकास. बस. आपण बोलून प्रॉब्लेम सोडवून टाकू. बिनधास्त ये. घाबरू नकोस”

राजू मग येऊन बसला पण संशयाचे भाव चेहऱ्यावर कायम होते.

देवयानीने ओळख करून दिली. “राजू, हा विकास. याच्याशीच माझं लग्न ठरलं आहे. आणि विकास हा राजू, सुप्रियाचा मित्र. याला मी खूप आवडते. असं यानीच सांगितलं आहे आणि याला माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. आणि आपलं लग्न ठरलंय हे त्याला मान्य नाहीये. आता विकास तूच बघ.”

हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. देवयानी इतक्या स्पष्ट पणे बोलेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आश्चर्याचा भाव राजूच्या चेहऱ्यावर पण दिसत होता. पण त्याला बरंच वाटलं. त्याचं काम सोपं झालं होतं.

“गुड.” विकास म्हणाला. “अग तुझ्या सारख्या एवढ्या सुंदर मुलीशी लग्न करायला कोणीही तयार होईल. तेंव्हा अशी इच्छा बाळगण्यात राजूचं काही चुकलं आहे, असं मला वाटत नाही. खरंच वाटत नाही. पण काल  जे काही घडलं ते  चुकच होतं. नाही का? तुला काय वाटत राजू? अशा जुलूमाच्या राम रामाने काहीही साध्य होत नाही. तेंव्हा सर्वांच्या हिता साठी देवयानीचा नाद तू सोडावा, असं मला वाटतं.”

“नाही. काल माझं चुकलंच आणि त्याच्या बद्दल मी देवयानीची माफी मागायला पण तयार आहे. पण मला देवयानी आवडते हे ही तितकंच खरं आहे.” – राजू 

“ते ठीक आहे, पण आता आमचं लग्न ठरलं आहे आणि ते महिन्या दोन महिन्यात होणार आहे. प्लस आमचं लव्ह मॅरेज आहे. मग आता तू तिचा नाद सोडायला पाहिजे. Now she is engaged with me, so you must forget her. What do you say?”  विकासनी शांतपणे म्हंटलं.

“मी कसा विसरू शकतो तिला. अशक्य आहे ते.”- राजू.

“पण मग यावर तोडगा काय?” – विकास.

“तू बाजूला हो. मग सगळंच ठीक होईल.” – राजू.

सगळे जण भयचकित नजरेने राजू कडे आणि विकास कडे आलटून पालटून बघत होते. आता राजू मार खाणार असच सर्वांना वाटलं. पण विकास शांत होता. तो म्हणाला

“अरे राजू समजनेकी कोशिश करो यार. सवाल मेरे बाजू हटनेका नहीं हैं, सवाल ये हैं की देवयानी तुम्हें पसंद करती हैं क्या? तो एक बार उसीसे पूछ लो. दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा.”

“देवयानी, सांग, जर विकास बाजूला झाला तर तू माझ्याशी लग्न करशील ना? विकासला घाबरु नको. तो तुझ्या भोळे पणाचा फायदा घेतो आहे. मी अश्या  लोकांना चांगलाच ओळखून आहे” राजूने  आता विकास वर  आरोप करायला सुरवात केली.

बाकीच्यांना  पुन्हा वाटलं की आता नक्कीच राजू मार खाणार. पण तसं काही झालं नाही.

“बोल देवयानी बोल या पिंजऱ्यातून सुटण्याची शेवटची संधि आहे तुला.” राजू पुन्हा म्हणाला.

देवयानी हसली. म्हणाली “राजू तुला आमचं लग्न कसं जमलं त्या बद्दल काहीच माहीत नाही म्हणून तू असं बोलतो आहेस.”

राजू सर्व शक्ति निशी लढत होता, त्यांनी पुन्हा आपलाच राग आळवायला सुरवात केली.

“माहीत काय असायचं त्यात. कुठे ते माहीत नाही पण नक्कीच त्यानी तुला हेरलं असेल, आणि तुझ्या भोळेपणाचा फायदा घेऊन, बऱ्याच भूल थापा देऊन तुला जाळ्यात ओढलं, अजून काय असणार आहे. या टाइप च्या लोकांची ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस आहे. पक्का मार्केटिंग वाला आहे तो, कसही करून वस्तु गळ्यात मारण्यात वस्ताद असतात हे लोक. तू भोळी आहेस म्हणून त्याच्या जाळ्यात अडकलीस. पण नंतर तुला कळेल की खरं प्रेम म्हणजे काय असत ते. आणि ते राजूच करू शकतो. तेंव्हा आत्ताच सावध हो आणि माझ्या बरोबर चल.”

देवयानी पुन्हा हसली आणि म्हणाली

“राजू, तू जे गृहीत धरतो आहेस, तेच मुळात चुकीचं  आहे. विकासने मला हेरलं नाहीये. आणि त्यानी मला जाळ्यात पण ओढलं नाहीये.”

“हेच, अगदी हेच म्हणायचं होतं मला. तू असं बोलते आहेस हा तुझा भोळे पणा म्हणू की मूर्ख पणा म्हणू, हे समजत नाहीये. डोळे उघड देवयानी. तुला सगळं स्वच्छ दिसून येईल.” राजू आता चिरडीला आला होता.

“ऐक राजू,” देवयानी पुन्हा नेटाने म्हणाली-

“हे बघ, खरी गोष्ट ही आहे की, मीच विकासला हेरलं. मीच त्याला जाळ्यात ओढलं आणि मीच त्याच्या गळ्यात पडले. मलाच विकास आवडला होता, त्यानी तर मला  झिडकारूनच टाकलं होतं. पण मी हार मानली नाही आणि प्रयत्न करत राहिले आणि मला यश मिळालं. मलाच तो प्रथम आवडला होता. त्याला नाही. त्यानी तर माझ्याकडे साधं  वळून सुद्धा पाहीलं नव्हतं. म्हणून मी मघाशी म्हंटलं की तू जे समजतो आहेस ते चूक आहे. आता तूच सांग अश्या परिस्थितीत, म्हणजे जे मिळवण्यासाठी एवढे कष्ट घेतले आहेत मी, ते निव्वळ तू म्हणतोस म्हणून कस सोडून देऊ? शक्य नाही ते. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मनात  तुझ्या बद्दल कसल्याही भावना नाहीत.”

 

 

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.