Savadh - 6 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | सावध - प्रकरण 6

Featured Books
  • ऋषि की शक्ति

    ऋषि की शक्ति एक बार एक ऋषि जंगल में रहते थे। वह बहुत शक्तिशा...

  • बुजुर्गो का आशिष - 9

    पटारा खुलते ही नसीब खुल गया... जब पटारे मैं रखी गई हर कहानी...

  • इश्क दा मारा - 24

    राजीव के भागने की खबर सुन कर यूवी परेशान हो जाता है और सोचने...

  • द्वारावती - 70

    70लौटकर दोनों समुद्र तट पर आ गए। समुद्र का बर्ताव कुछ भिन्न...

  • Venom Mafiya - 7

    अब आगे दीवाली के बाद की सुबह अंश के लिए नई मुश्किलें लेकर आई...

Categories
Share

सावध - प्रकरण 6

प्रकरण ६
आपल्या गाडीतून सौम्या ला घेऊन धीरेंद्र तोंडवळकर च्या पत्त्यावर जात असतांना, पाणिनी सौम्याला म्हणाला, “ काहीही म्हण ही पोरगी आवडली मला.”
“ पैशाच्या मागे लागलेली पोरगी आहे.” –सौम्या
“ मला माहिती आहे ते.तिने सिटी होंडा चा नंबर टिपून घेतला, ब्लॅकमेल करायच्या उद्देशाने.पण नंतर तिचा विचार बदलला.का माहीत नाही.पेपरात जाहिरात पाहून तिने सनदशीर मार्गाने बक्षीस रुपात दहा हजार मिळवायचं ठरवलं. काहीही असो मला तिचा मोकळेपणा आवडला.मी कीर्तीकर च्या गाडीची तपासणी केली आहे.गाडीचे पोचे दिसताहेत.उडालेला रंग पुन्हा नव्याने दिलाय, मागचा टायर नवा कोरा टाकलेला दिसतोय.आणि.....”
“ आणि... त्याने गाडी चोरीला गेल्याची सांगितलेली गोष्ट खरी सुध्दा असू शकते.” सौम्या म्हणाली.
“ शंभरात एक शक्यता आहे.” पाणिनी म्हणाला बोलता बोलता ते धीरेंद्र तोंडवळकर च्या पत्त्यावर पोचले.
“ काय करणार आहोत आपण? घुसायचं आत?” सौम्या ने विचारलं.
“ नाही. आपण आपली गाडी लावू इथे. खाजगी पार्किंग दिसतंय इथे.कोणीतरी माणूस नेमला असेलच ते सांभाळायला.तू डाव्या बाजूच्या गाड्या बघ मी उजवी कडच्या बघतो.”
पार्किंग मधला वॉचमन तिथे आलाच, “ ए, काय करताय? कोण आहात तुम्ही?”
“ सौम्या, इथली एक गाडी विकायची आहे असं कळलंय म्हणून त्याला सांग आणि बोलण्यात गुंतव. तो पर्यंत मी गाडीवर नजर टाकतो.”

गॅरेज च्या मागच्या बाजूला उजेड थोडा मंद होता परंतु पाणिनीने पाहिलं तर लक्षात आलं की त्या गाडीच्या मागच्या भागाला अजूनही पोचा राहिलेला दिसत होता आणि डाव्या बाजूच्या टायरला एक वेगळाच फुगवटा आल्यासारखा किंवा जोड दिल्यासारखं वाटत होतं. सौम्या त्या वॉचमन शी बोलताना पाणिनी ने ऐकलं की ती गाडी विकायची आहे असं त्यांना समजलं म्हणून ते आले होते. तिचं बोलणं सुरू असेपर्यंत पाणिनीने आपली गाडीची टेहळणी संपवली. त्या वॉचमनच्या हातात एक पन्नास रुपयाची नोट सरकवली आणि त्याला म्हणाला,
“माझ्या एका मित्राला मिस्टर तोंडवळकर यांनी ही गाडी विकायची आहे म्हणून सांगितलं होतं म्हणून मी ती बघायला आलो होतो.”
आता वॉचमन पाणिनी पटवर्धनच्या एकदम प्रेमात आला.
“ हो सर काही हरकत नाही आरामात बघा तुम्ही.” तो म्हणाला
“अरे, पण आत्ता मी जरा ही गाडी लक्षपूर्वक बघितली तर असं लक्षात येतंय की गाडीला काहीतरी ठोकाठोकी झाली आहे.”
“नाही, नाही सर, तसं काही नाही. थोडंसं काहीतरी घासल्यासारखं झालंय तशी ही गाडी एकदम छान अवस्थेत आहे आत्ताच फेंडर खराब झालंय नवीन बसवायला लागेल एवढंच. याबाबतीत मिस्टर तोंडवळकर एकदम काटेकोरपणे बघणारे आहेत. ”
“अच्छा ठीक आहे. कधी झाला होता हा एक्सीडेंट?”
“फार पूर्वी नाही, आता एक दोन दिवसांपूर्वी. मागच्या बंपरला जास्त मार बसला आणि तो बाहेर निखळून आला तेवढेच पण आता ते सगळं ठीकठाक केलंय ”
“ओके हरकत नाही. धन्यवाद मला वाटतं मिस्टर तोंडवळकर घरात असावेत ” पाणिनी म्हणाला
“हो, हो. आहेत,आहेत घरात आहेत. म्हणजे ज्या अर्थी त्यांची गाडी बाहेर आहे त्या अर्थी ते नक्कीच घरात असावेत.”
“ एकटेच असतात की लग्न झालंय? ”
“ लग्न झालय ना ! त्यांच्या बायकोची पण एक छोटी गाडी आहे तिला मोठ्या गाड्या आवडत नाहीत. मिस्टर तोंडवळकर ना मात्र जड आणि मोठाल्या गाड्या आवडतात आणि वेगवान असणाऱ्या”
“ ठीक आहे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते.अरे हो, पण त्यांच्या फ्लॅटचा नंबर किती आहे?”
“22 नंबर”
“त्यांचं मला जरा वर्णन करशील का? कारण आम्ही कधी भेटलो नाहीये आणि एखाद्या माणसाबरोबर व्यवहार करण्यापूर्वी तो कसा आहे ते जाणून घ्यायला मला आवडतं ” पाणिनी म्हणाला
“हो.हो. बरोबर आहे सांगतो ना ते साधारण ५०-५५ वयाचे आहेत असे शिडशिडीत शरीरयष्टीचे. कायम अद्यावत कपडे घालतात. उंची सिगारेट ओढतात.. बरेच वेळा करड्या रंगाचे कपडे ते घालतात म्हणजे मी तरी त्यांना करड्या रंग व्यतिरिक्त अन्य कपड्यात पाहिलेले नाही.”
“खूप खूप धन्यवाद मी जाऊन भेटतो त्यांना. गाडी खरेदी करायला हरकत नाही असं माझं मत आहे ” पाणिनी म्हणाला
“ते मात्र मला काही माहित नाही. म्हणजे त्याला गाडी विकायची आहे किंवा नाही. पण त्यांनी ती दोन-चार महिन्यापूर्वीच खरेदी केल्ये. आणि त्या गाडीवर त्यांचा फार जीव आहे.”
“असू दे त्याला विकायची आहे किंवा नाही ते मी त्याना भेटल्यावरच कळेल. चल सौम्या आपण आपला प्रस्ताव तर मिस्टर तोंडवळकर यांना देऊ.”
वॉचमन ने त्यांना लिफ्टचं दार उघडून दिल. पाणिनी आणि सौम्या लिफ्टमध्ये शिरले
“काय म्हणताय सर?” सौम्यान विचारलं
“ मी गोल गोल फिरतोय, सौम्या, सगळी भानगड काय आहे नेमकी तेच कळत नाहीये ”
त्यांना हव्या त्या मजल्यावर लिफ्ट आल्यानंतर दोघेही बाहेर पडले पाणिनीने फ्लॅट नंबर २२ ची बेल वाजवली काही क्षणातच दार उघडलं गेलं दारात एक पन्नाशीचा गृहस्थ उभा होता डोक्यावरील केस करड्या रंगाचे होते वॉचमन नी सांगितल्याप्रमाणेच करडया रंगाच्या कपड्यात आणि एक उंची सिगरेट ओठात धरून एक गृहस्थ उभा होता
“आपण मिस्टर तोंडवळकर?”
“हो. कोण आपण?”
पाणिनीने आपलं व्हिजिटिंग कार्ड त्याच्या हातात दिलं “मी अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन. मला तुमच्या गाडी संबंधी जरा बोलायचं आहे”
“गाडी बद्दल काय बोलायचंय”
“या महिन्याच्या तीन तारखेला जो अपघात झाला त्याबद्दल मला तुमच्याकडून माहिती हवी आहे”
तोंडवळकर काही क्षण तसाच स्तब्ध उभा राहिला नंतर त्याचे ओठ एकदम थरथरायला लागले. त्याच्या तोंडातली सिगरेट जवळजवळ खाली पडत होती पण ती त्याने सावरली आपला घसा साफ केला आणि म्हणाला “काय म्हणायचे काय तुम्हाला?”
“मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला बरोबर समजलय”
“या महिन्याच्या तीन तारखेला तुमच्या गाडीने एका फोक्सवॅगन गाडीला धडक दिली. कदाचित तुम्ही ती गाडी चालवत असताना प्याला असाल त्यामुळे घटना घडली त्या जागी थांबण्याचे धैर्य तुम्हाला झालं नाही तुम्हाला वाटलं आपण तसंच बेधडक निघून जावं आणि ते कोणाला कळणार नाही तुम्ही तुमच्या गाडीच्या आरशातून पाहिलं आणि तुमच्या लक्षात आलं तुम्ही एका गाडीला जोरदार धडक दिली होती आणि रस्त्यावरच्या अनेक लोकांनी ते बघितलं होतं तुम्ही तिथे न थांबण्याचा निर्णय घेतला आणि तसेच बेदरकार पणाने निघून गेलात.”
“ओ माय गॉड ! तोंडवळकर एकदम उद्गारला आणि खुर्चीत कोसळला त्याचे ओठ पुन्हा थरथरायला लागले शेवटी मला.,,. माझ्यापर्यंत पोहोचलातच तुम्ही.”
“ अच्छा म्हणजे कबूल करताय तर तुम्ही ?”
“हो. मान्य करतोय मी. तुम्ही मला बरोबर पकडलं. अर्थात अपघाताच्या वेळेला मला वाटलं की फक्त दुसऱ्या गाडीला धक्का पोहोचलाय. मला सांगा मिस्टर पटवर्धन कुठल्या व्यक्तीला काही लागलं वगैरे नाहीये ना?”
“एक नाही दोन व्यक्ती ना इजा पोचली आहे. जी स्त्री गाडी चालवत होती ती तर हादरून गेलीच आहे शिवाय तिच्याबरोबर असलेला तिचा मुलगा.... त्याचं तर फारच नुकसान झाले त्याचं खुब्याचं हाड मोडलंय कारण अपघाताच्या वेळेला गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि तो बाहेर फेकला गेला नशीब की त्याचं डोकं वगैरे फुटलं नाही आणि तो मेला नाही”
“मिस्टर पटवर्धन मी खूप हादरून गेलोय. मला एक मिनिट द्या मला माझं औषध प्रथम घेऊ दे. मी तुम्हाला शब्द देतो या क्षणापर्यंत मला कल्पना नव्हती की अपघातात कोणी माणूस जखमी झाला असेल. मला असं वाटत होतं की फक्त गाडीचं नुकसान झालं असेल आणि मी ती नुकसान भरपाई कशी करून द्यायची याच्याच प्रयत्न होतो. फार पळकुटेपणा दाखवला मी. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्यावेळेला मी प्यालो होतो. एका मित्राबरोबर आम्ही बसलो होतो. जरा उशीरच झाला होता. माझी बायको माझी वाट बघत होती आणि मी घरी लवकर पोहोचायच्या प्रयत्नात फार वेगाने गाडी चालवत होतो. ती दुसरी गाडी एकदमच अचानक पुढे आली. मला असं वाटलं होतं की माझ्या गाडीला मी आणखीन गती देईन आणि एखाद्या रिव्हॉल्व्हरच्या गोळी सारखी पुढे काढीन त्यानुसार मी पुढे काढली माझी गाडी. पण माझा अंदाज चुकला आणि मी ओव्हरटेक केल्यावर मागची गाडी माझ्या गाडीला मागून धडकली त्यात माझ्या गाडीचा मागचा बंपर निखळून पडला. सुरुवातीला मला वाटलं की थांबावं म्हणून मी आरशातून मागे पाहिलं मला तुम्ही म्हणतात तसंच दृश्य आरशातून दिसलं म्हणजे सगळेजण त्या दुसऱ्या गाडीकडेच बघत होते माझ्यासमोरचा रस्ता मात्र मोकळा होता अचानक मी ठरवलं की थांबून लोकांकडून मार खाण्यापेक्षा पळून जावं कारण माझ्या गाडीकडे कोणाचेच लक्ष नव्हतं ही दुसरी गाडी अपघातात सापडल्यामुळे सगळ्या जमावाचे लक्ष त्याच गाडीकडे होतं त्याचा फायदा घेऊन मी न थांबता पळून गेलो.”
“अच्छा तुम्ही आता सगळेच सविस्तर कबूल केलंय तर कधी घडलं हे सगळं? म्हणजे किती वाजता?”
“मला वाटतं संध्याकाळी पाच वाजून गेलेले असावेत”- तोंडवळकर म्हणाला.
“आणि कुठे घडला हे नेमकं?”
द्वीप कुंड चौक आणि भीष्म चौक या चौकात
पाणिनी ने सौम्याकडे पाहिलं तिला कोणतीही सूचना पाणिनीने दिलेली नसताना सुद्धा ती आपल्या वहीत त्या दोघांचे सारे संवाद टिपून घेत होती
“मिस्टर तोंडवळकर किती तारखेला घडला हा प्रसंग?”
“तीन तारखेला मिस्टर पटवर्धन. माझी चूक झालीये कबूल करतो मी. पण हे सगळं सावरून घ्यायला, दुरुस्त करायला काय करावे लागेल ते मला सांगा. मी करीन. माझ्या गाडीचा विमा आहे मी विमा कंपनीशी संपर्क करतो आणि मला खात्री आहे की ते मला त्याच व्यवस्थित पेमेंट करतील या व्यतिरिक्त मी तुमच्या अशीलाला नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार द्यायला तयार आहे. माझी विनंती आहे की माझ्या बायकोला यातलं काहीही कळता कामा नये अशा प्रकारेही तुम्ही हे प्रकरण हाताळावे.”
“तुमची बायको आता घरी आहे?”
“आत्ता नाहीये घरी पण अर्ध्या तासात इथे येणं अपेक्षित आहे”
पाणिनीने एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला मनातल्या मनात आणि मिस्टर तोंडवळकर ला म्हणाला, “तुम्ही आत्ता जे मला सांगितलं त्याचा एक लेखी जबाब सही करून मला द्या माझी सेक्रेटरी सौम्यान आपल्या झालेलं बोलणं लिहून घेतलय. आणि पेंढारकर याच्या नावाने ५००० चा चेक लिहून माझ्याकडे द्या अपघात झाल्याचा जो विषय आहे तो तुम्ही पोलिसांशी बोलून सोडवून घ्या तुम्ही चेक लिहीपर्यंत आणि तुमच्या लेखी जबाबा वर सही करेपर्यंत मला एक फोन करायचा आहे तो मी करतो”
पाणिनी ने तिथून थोड बाहेर जाऊन कनक ओजस ला फोन लावला “कनक,तू कीर्तीकर वर लावलेली सगळी माणसं मागे घे तो चुकीचा माणूस होता. अपघातात अडकलेला खरा माणूस मला आत्ता मिळालाय”
“ कसला डोंबलाचा खरा माणूस तुला मिळालाय पाणिनी!” कनक उद्गारला
“माझ्या माणसाने बृहन क्लब मधील वॉचमन शी बोलून त्यांच्याकडून लेखी जबाब घेतला आहे. त्या नुसार कीर्तीकर सात वाजण्याच्या सुमारास टॅक्सीने तिथे आला तो खूप निराश आणि त्रस्त झालेला दिसत होता त्यानं वॉचमन ला सांगितलं की त्याची गाडी चोरीला गेली होती आणि तशी तक्रार तो नोंदवणार होता. या वॉचमनला कीर्तीकर ने शंभर रुपयाची नोट दिली आणि सांगितलं की कोणी विचारलं तर कीर्तीकर तिथे दुपारपासून असल्याचं त्याने सांगावं”
कनकच हे बोलणं ऐकून पाणिनी पटवर्धन उडालाच. एकदम गप्प बसला. तो काही बोलत नाही म्हणून पलीकडून कनक न विचारलं “पाणिनी,अरे ऐकतोयस ना मी काय बोलतोय ते?”
“हो आहे मी इथे. ऐकतोय.” पाणिनी म्हणाला
“कीर्तीकर ची बायको त्याला सहा महिन्यापूर्वी सोडून गेली आहे. त्याचा स्टोन क्रशिंग चा व्यवसाय आहे पण तो खाणीतले दगड आणि वाळू प्रत्यक्ष विकायचा व्यवसाय करत नाही तर खाणीच विकत घेतो आणि दुसऱ्याला विकतो मधला नफा कमवतो. पण जुगारी वृत्ती आहे त्याच्या व्यवसायात त्याला दोन भागीदार आहेत दुष्यंत दुग्गल आणि परितोष हिराळकर त्यापैकी हिराळकर हा चैत्रपूर इथे राहतो. कीर्तीकर ची बायको त्याला सोडून गेल्यापासून तो त्याच्या मोठ्या घरात एकटाच राहतोय त्याचा तो स्वयंपाकी कम् ड्रायव्हर,परब नावाचा, त्याच्याबरोबर राहतो बाकी घरकाम करायला एक मोलकरीण येते. त्या क्लब मध्ये त्याचं बऱ्यापैकी नाव आहे. त्यानं त्या वॉचमनला जेव्हा शंभर रुपये दिले तेव्हा तो बऱ्यापैकी प्याला होता. तर मग एकंदरीत असे दिसते पाणिनी, की तुला हवा असलेला माणूस हाच आहे ” कनक म्हणाला.
“नाही, नाही हा असूच शकत नाही” पाणिनी म्हणाला
पाणिनी, तुला तो दुसरा माणूस आहे, असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. तो तुला गंडवत नाही ना याची खात्री कर. तुला हवा असलेला माणूस कीर्तीकर हाच आहे याची मला खात्री वाटते” कनक म्हणाला
“अरे कनक, मला जो माणूस वाटतोय म्हणजे मिस्टर तोंडवळकर, तो तर मला लेखी जबाब देतोय थोड्याच वेळात आणि माझ्या आशिलाला नुकसान भरपाई पोटी पन्नास हजार चा चेकही देतोय”.पाणिनी म्हणाला आणि पलीकडून त्यानं कनक ओजसने नैराश्याने सोडलेला निश्वास ऐकला तेव्हा आपला फोन बंद केला.
(प्रकरण ६ समाप्त)