Bhetli tu Punha - 11 in Marathi Love Stories by Sam books and stories PDF | भेटली तू पुन्हा... - भाग 11

The Author
Featured Books
Categories
Share

भेटली तू पुन्हा... - भाग 11














अन्वी थोडी पळतच बाहेर आली व किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाताच ती भिंतीला टेकून उभी राहिली. डोळे बंद करून, छातीवर हात ठेवून ती उभी होती. तिचा श्वास फुलला होता. ती स्वतःला कंट्रोल करू पाहत होती. वाढलेल्या श्वासांवर काबू करण्याचा ती प्रयत्न करत होती.

"काय ग? काय झाले तुला?" आई तिला अस पाहून विचारू लागली.

आईचा आवाज तिच्या कानांवर पडला. तशी ती गोंधळली.

"अ....ह.... कुठे काय? काहीच तर नाही" ती आपले वाढलेल्या हार्टबिट्स वर नियंत्रण मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत बोलली.

"काही नाही कसे, मग तू इतकी धापत का आहेस? कुठे मॅरेथॉनला जाऊन आली का?" आई डोळे बारीक करून विचारत होती.

"छे ग! ते तू बोलवली ना उशीर झाला आहे आधीच म्हणून मग धावतच आले त्यामुळे माझा श्वास फुलला" ती विषय बदलत काही तरी उत्तर देत बोलली.

"असं... बर ते सोड पानं वाढायला घे" आई हात धुत बोलली.

"अ... हो" म्हणून अन्वी जेवण घेऊन बाहेर जाऊ लागली.

"या आदित्यराव, काय मग रुसवा गेला की नाही आमच्या नातीचा?" बाबा हसत आदित्य कडे बघून विचारत होतेच की अन्वी तिथे आली.

"बाबा, या हॅन्ड वॉश करून; डिनर लावतीये मी" अन्वी बाबांना पाहून बोलली.

"चला आदित्यराव जेवायचं आहे , या तुम्ही ही या हॅन्ड वॉश करू" तसे बाबा उठले व बेसिन कडे जात आदित्यला उद्देशून बोलले .

तो मात्र अन्वीकडे पाहत होता. तिची नजर आदित्य वर गेली तर तो तिथेच बसून तिला पाहत होता. तो बाबांच्या सोबत गेला नाही हे पाहून तिला राग आला.

"बाबा तुमच्या आदित्यरावांना सांग या घरात हात धुतल्या विना जेवण मिळत नाही" ती तिरका कटाक्ष आदिवर टाकून बोलली व तिथून निघून गेली.

तिच हे कोड्यात इंडायरेक्ट त्यालाच सूचना देण खूप भारी वाटलं. तो मनांतच विचार करू लागला," किती गोड आहे ही ना! तिचा राग तर त्याहूनही गोड. रागवल्यावर ही किती क्युट दिसते. अगदी बाहुलीच जणू. आयुष्यभर जर ही आपल्या सोबत असेल तर माझी लाइफ किती सूंदर असेल" तो आपल्याच विचारात गुंतला होता की बाबांनी त्याला आवाज दिला.

"आदित्यराव, आज भूक लागली नाही वाटते?" बाबा हसत बोलले.

"अ...काय म्हणाला बाबा?" आदि भानावर येत बोलला.

"अहो पान करत आहे जा" बाबा बेसिनकडे इशारा करत बोलले.

"हो, आलोच" अस म्हणून आदि वॉशबेसिनकडे गेला.

अन्वी हे सर्व पाहत होती. त्याच वागणं पाहून ती गालातच हसली पण पुन्हा तिच्या चेहऱ्यावरील स्मित जाऊन राग दिसू लागला.

"तुमचे आदित्यराव आज काय डोक्यावर पडलेत की काय?" अन्वी आदित्यकडे पाहून बाबांच्या कानात पुटपुटली.

तसे बाबा ही हसले.

"तूच बघ आता म्हणजे झालं" बाबा हसत बोलले.

अन्वी ही न समजून हसली व तिथून निघून गेली. पान वाढून होताच सगळे एकत्रच जेवायला बसले. जेवताना ही आदित्य अन्वी कडे सारखा बघत होता, तर ती ही त्याला बघायची पण त्याची नजरानजर होताच पटकन गोंधळून नजर खाली करायची.

त्या दोघांच्या नजरेचा खेळ आजोबा व आजी ही पाहत होते. थोडा वेळ जाताच बाबांनी जाणून बुजून विषय काढला.

"मग आदित्यराव लग्नाचा काय विचार केला आहे की नाही?" बाबा एक तिरकी नजर अन्वी वर टाकत बोलले.

हा विषय निघताच अन्वी ही सावधान झाली व तिने आपले कान टवकारले. तिला ही उत्सुकता होतीच की आदित्य काय उत्तर देईल.

"बाबा म्हणजे लग्नाचा विचार तर आहे, बघू नेक्स्ट इयर मध्ये" आदित्य घसा खाकरत बोलला व अन्वी कडे पाहू लागला.

"हो का, मग काय मुलगी बघून वैगेरे ठेवली आहे का?"आई उत्सुकत होत बोलली.

"हो, आहे एक मुलगी पाहण्यात ती ही तयार आहे बघू आता घरच्यांशी कधी बोलायचे होते" तो मुदान अस बोलत होता जेणेकरून इ काही तरी बोलेल.

हे ऐकून अन्वीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिच्या चेहऱ्यावर रडवेले भाव उमटले.

"अच्छा, छान छान आम्हाला ही कळू दे की मग तुमची पसंद" बाबा ही आनंदाने विचारले व अन्वी वर एक नजर टाकली.

"आता तिचा फोटो माझ्याकडे नाहीये पण आपल्या अन्वी मॅडमांच्या सारखीच दिसते सुंदर, हो ना! अन्वी मॅडम तुम्ही पहिला आहे ना सकाळी तिचा फोटो"

आदित्य मुदाम तिला डीवचत होता. तिला आधीच खूप वाईट वाटत होतं त्यात आदित्य ने ती अन्वी सारखीच दिसते असे बोलल्यामुळे ती जास्तच हर्ट झाली.

आई व बाबा आता तिच्याकडे पाहू लागले. ती मनातून चिडली होती. पण आता आई बाबा आपल्याकडे पाहत आहे हे लक्षात येताच ती त्यांच्या कडे पाहू लागली.

"काय ग अनु तू पहिला आहेस फोटो" आई तिला विचारु लागली.

"अ... हो " ती रागाने आदिकडे पाहतर व आईला बोलली.

"मग कशी आहे मुलगी? सुंदर आहे का ?" आई उत्साहित होत बोलली.

" मी चेहरा नाही पाहिला" अन्वीने रागानेच उत्तर दिले.

"आदित्यराव तर म्हणतात की ती तुझ्यासारखी दिसते" बाबा तिचा राग ओळखून बोलले.

"आता.... म्हणणे आणि असणे यात खुप फरक आहे बाबा" अन्वी बाबांशी बोलली व शेवटी तिची नजर पुन्हा आदिवर गेलीच.

तिच्या डोळ्यात मिश्र भाव उमटले होते. थोडं प्रेम थोडा राग आणि खूप सार दुःख.

"का ग तुला म्हणायचं तरी काय आहे?" आई साशंक नजरेने अनुला पाहून बोलली.

"अग आई आता सर म्हणतात ती माझ्यासारखी दिसते, पण मी तिचा चेहरा नाही पहिला ती माझ्यासारखी आहे मी नाही" ती नजर रोखून आदिकडे पाहून बोलली.

तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आदिला ते जाणवलं तस तो ही दुखी झाला पण मनातून सुखावला ही होता कारण ती ही त्याच्यावर प्रेम करत होती आता. वर्षभरपूर्वी जिला वेड्यासारखा शोधत होता. ती आज त्याच्या डोळ्यासमोर होती. ते ही इतकी जवळ की त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

आई बाबा मात्र तिच्या बोलण्याचा अर्थ शोधत बसले होते.

"अग अनु आम्हाला नाही समजले तू काय म्हणाली आता ते" आई न समजून बोलली.

"जाऊदे ते सोड त्या काटकरांचा कॉल आलेला थोड्यावेळापूर्वी उद्या त्यांच्या मुलीचा साखरपुडा आहे बोलवलेत तुम्हा दोघांना" अनु विषय बदलत बोलली.

"काटकर, आणि उद्या लगेच" बाबा थोडे चकित होत बोलले.

"हो असच बोलले काटकर काका"

"अरे पण कालच तर पाहून गेलेत पाहुणे आणि उद्या लगेच साखरपुडा पाहुण्यांची चौकशी वैगेरे काही केली का नाही यांनी म्हणायची" बाबा विचारात पडले.

"चांगलं असेल सार आणि ओळखीतलेच असतील ना कोणी तरी त्यामुळे केला असेल प्लॅन त्यांनी" आई बोलली.

"असेल असेल" बाबा ही हातावर पाणी ओतत बोलले.

जेवण झालं तसे आई बाबांना गोळ्या देण्यासाठी गेल्या तर आदि अन्वीला पान उचलण्यासाठी मदत करत होता.

अन्वी किचन मध्ये असताना आदि तिथे आला. अन्वी बेसिनजवळ भांडी नेऊन ठेवत होती. आदि तिच्याजवळ गेला.

"अनु राग आला आहे का माझा?" आदि तिच्या मागून तिच्या कानात बोलला.

तशी ती दचकली.

"घाबरले ना मी अस करत का कोणी?" ती थोडी रागवूनच बोलली.

"सॉरी, पण सांग ना काही चुकलं का माझं?"

"नाही" त्याचा प्रश्न ऐकून ती काम करतच बोलली.

"मग माझी कोणती गोष्ट तुला आवडली नाही का?"

"अस ही नाही"

"मग का रागावली आहेस इतकी?"

हे ऐकून मात्र तिचे काम करणारे हात थांबले.

"मी कुठे रागवले तुमच्यावर" ती नजर चुकवतच बोलली.

"मग हे काय आहे, आल्यापासून पाहतो आहे मी तू मला इग्नोर करते आहेस , तोडून बोलत आहेस"

"नाही तर मी कुठे इग्नोर करते तुम्हाला"

"हेच तू माझ्याकडे बघून सांग"

ती आता बुचकळ्यात पडली कारण त्याला ती नजर देऊ शकत नव्हती. ती तशीच उभी राहिलेली पाहून आदिने तिला आपल्याकडे वळवले.

तिची नजर खाली झुकली होती.

"अनु..." त्याने तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर केला.

तरी तिची नजर अजून ही खालीच होती. तिच्या पापण्या ओलावल्या होत्या. हे पाहून त्याला राहवले नाही. त्याने तिच्या पापण्यांवर अलगद आपले ओठ टेकवले.

तशी तिच्या शरीरातून एक विजेची लहर वाहून गेल्याचा भास झाला.

त्याने काय केले हे जाणवताच तिने त्याला मागे ढकलले.

"हे काय करताय तुम्ही?" तिच्या चेहऱ्यावर थोडा राग दिसला.

"काय करतोय समजलं नाही तुला?" तो तिच्यावर नजर रोखूनच उभा होता.

"हे चुकीचं आहे, तुम्ही तुमच्या प्रेमाला धोका देत आहात आणि मला हे अस काही नाही आवडत सो प्लिझ पुन्हा असे काही करण्याचा..."

ती बोलतच होती की त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवला. तिच्या डोळ्यात राग, प्रेम, दुःख सारे भाव एकत्रितपणे दिसत होते.

त्याने तिच्या डोळ्यात आर पार पाहत बोलला.

"डु यु लव्ह मी?"

"तुम्ही जा इथून आता, आई येईल" ती पुन्हा आपलं काम करण्यासाठी वळली व बोलली.

"नाही येणार, तू सांग डु यु लव्ह मी?"

"मला नाही तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचे"ती थोडी चिडून बोलली.

"पण का?" तो दुखी होत बोलला.

"कारण तुमची कोणीतरी वाट पाहतय"

"कोण?" आदि न समजून विचारू लागला.

" तुमचं पाहिलं प्रेम" ती डोळे बंद करून एक मोठा श्वास घेऊन बोलली.

" हे तुला कोणी सांगितले?" त्याने तिच्या दंडाला पकडून पुन्हा आपल्याकडे वळवले.

"कोणी कश्याला सांगायला हवं फोटो पहिला आहे ना मी"

"ओह! म्हणजे त्या फोटोमुळे तू मला सांगत नाहीयेस"

"हो"

"पण मला एकदा विचारायचं तरी ना की कोणाचा फोटो आहे म्हणून" आदि हसत बोलला.

त्याला अस हसताना पाहुन तिला आता खूपच राग आला.

"म्हणजे?" तरी ती शांत पणे बोलत होती.

त्याने खिशातून तो सकाळचा फोटो काढून तिच्या समोर पकडला.

"हाच ना तो फोटो?"

"हम" ती फोटो पाहून बोलली.

"यात या मुलीचा चेहरा दिसतो?" आदि गालात हसत तिला विचारू लागला.

"नाही" ती रागानेच बोलली.

"मग, मी कसा या मुलीच्या प्रेमात पडेन" आदि अजून ही हसत होता.

त्याला अस हसता पाहून तिचा राग वाढतच चालला होता.

"मग हा फोटो काय शो साठी ठेवला आहे का?" ती एकदम रागाने बोलली.

हे ऐकून आदि डोक्याला हात मारून घेतो.

"अनु, हा फोटो मी जेव्हा बिच वर फिरायला गेलो होतो तेव्हाचा आहे. तिथे एक मुलगी अशीच उभी होती, जिला मी पाहिलेलं सुद्धा नाही. पण माझ्याही नकळत मी तिचा फोटो काढला. आणि नंतर मला अस वाटू लागले की अशीच मुलगी मला ही हवी, अशीच म्हणजे तीच नव्हे समजलं" तो तिचाकडे थोडं झुकून बोलला.

"मग?" आता तिच्या डोळ्यात थोडी आशा जाणवली.

ती आशेने त्याला पाहत बोलली.

"मग.....आय लव्ह यु वेडाबाई" तो तिच्या दोन्ही खांद्यावर हात टाकून तिच्या चेहऱ्याजवळ जात बोलला.

हे ऐकून अनुला आपल्या कानांवर विश्वासच बसेना.

"काय म्हणालात तुम्ही?" तिच्या डोळ्यात आता चमक दिसत होती व तिने थोडं आश्चर्यानेच त्याला विचारले.

"आय लव्ह यु, विल यु मॅरी मी" आता तो गुडघ्यावर बसून तिच्यासमोर रिंग पकडून बोलला.

ती शॉक होऊन त्यालाच पाहू लागली. दोन्ही हाता आपल्या चेहरावर ठेवून ती आनंदाने हसत होती व त्याच वेळी तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू ही वाहत होते.

"हो म्हण अनु बाळा" आई व बाबांचा एका सुरात दारातूनच आवाज आला.

तशी ती दाराकडे पाहते तर आई बाबा त्यांनाच कौतुकाने पहात होते.

तिच्या मनात होतेच आणि आता आई बाबा ही तयार आहेत हे पाहून अनु मानेनेच हो म्हणाली.

आदिने तिचा हात आपल्या हातात घेतला व बोटात रिंग घातली.

तसे आई बाबांनी टाळ्या वाजवल्या. आई बाबा किचनमध्ये आले.

"हे काय बरोबर नाही हा आदित्यराव, म्हणजे तुम्ही आज काही न सांगता किचनमध्येच साखरपुडा उरकून टाकलात की" बाबा आदीच्या खांद्यावर हात टाकून बोलले.

आई ही अनुच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती. आईचे डोळे ही पाणावले होते.




*********

चला म्हणजे आज आदित्यराव आणि अन्वी तर एकत्र आले. पण अजून आपण गोव्याला गेलो नाही ना. नेक्स्ट पार्टमध्ये आपण गोव्याला जातोय सो तयारीत राहा.

धन्यवाद!