भाग 15
एक सरळमार्गी सुनसान हायवे दिसत होता. हायवेच्या बाजुलाच एक निल्या रंगाचा फ़ळा, व त्यावर तीन अंक नी पुढे एक इंग्रजीत नाव लिहील होत. हायवे नंबर 405 विलेज. त्या फळ्याच्या थोडस बाजुला होऊन मागे पाहिल की पुढे जाणारा हायवे दिसुन येत होता. हायवेच्या रसत्याबाजुला एक बस अपघातग्रस्त अवस्थेत पडलेली दिसत होती. बसचा वरचा पत्रा गायब झालेला त्यातुन धुर बाहेर येत होता.त्या धुरामधुन मांस अर्धवट जळाल्याचा, करपट वास वातावरण घुमत होता. बाजुलाच खाली रस्त्यावर काचेच्या खिडक्या फुटून रस्त्यावर लहान तुकडे होऊन विखरुन पडल्या होत्या. बसच्या थोड पुढे एक मोठ हॉटेल दिसत होत. त्या हॉटेल च्या छप्परवर कोणीतरी काळ सुट घातलेला माणुस उभा दिसत होता. आणी तो होता मार्शल. मार्शल एक घोस्टबस्टर स्पाई असल्याने त्याच्या पर्सनल जिवनाबदल जाणून घेण्यास तुम्हा सर्वाना सुरुवातीपासुनच कुतूहल असण साहजिकच आहे. म्हंणुच थोडक्यात का असेना मार्शल बद्दल जाणुन घेऊयात. मार्शल एक गुप्तहेर
घोस्टबस्टर्स कंपनीत स्पाई होता. त्या घोस्टबस्टर्स कंपनीच नाव पुढे कळेलच. मार्शलने आजतागायत शेकडोने हार्ड मिशनज सक्सेसफुल करुन दाखवले होते. म्हंणुनच घोस्टबस्टर्स कंपनीत रेंक टॉप 10 मध्ये सामाविष्ट असुन नाव कोरणा-या घोस्टबस्टर्स पैकी मार्शल सुद्धा होता. कंपनीने स्पेशलिस्ट घोस्टबस्टर्स रेंक टॉप 10 मध्ये असलेल्या स्पाईसाठी नायनॉ टेक्नोलॉजीने साकारलेले गेजेटस वापरण्यास दिले होते. जस की ती वॉच! जी मार्शल वापरत होता.ती वॉच काही साधारण वॉच नव्हती. ट्वेंटी सेंच्युरीचा एक नायनॉ टेक्नोलॉजीने साकारलेला अमानविय शक्तिंचा खात्मा करण्यासाठी बनवलेला एक गेजेट होता.एक फॉर्म्युला होता. त्या गेजेटमध्ये अतर्कनीय अशे चमत्कार घडवून आणण्याची क्षमता होती.पण त्यासाठी सेटेलाईट नेटवर्कची गरज लागायची.हा वॉच कंपनीमार्फत वेळोवेळी अपडेट केला जायचा, नव्या नव्या शक्तिंची त्यात भर घातली जायची. त्यासोबतच हा गेजेट सेटेलाईट नेटवर्क ने कनेक्ट करण्या मागे कंपनीच एक मुळ हेतु होत.की कोणीही हा गेजेट हेक करु शकत नव्हता. म्हंणुनच की काय आजतागायत ह्या शक्तिंच्या आस्तित्वाची सामान्य मानवाला प्रचिती आली नव्हती.
" फक! "मार्शल ने एका वेड्यासारखे आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले व केस ओढु लागला.
ईकडे खाली मार्शल उभा असलेल्या डाव्या बाजुला ! एक बंद स्टोर होत..त्याच स्टोरमधुन निल सोज्व्ल-प्रणया मार्शलला पाहत होते.
त्या तिघांसमोर जेमतेम पाच फुट आकाराचा कठडा होता. त्या कठड्याखाली लपून, डोक वर ठेऊन हे तिघे मार्शलला पाहत होते.
" ह्याला काय झालं? हा असा का वागतोय !" सोज्व्ल वर पाहत म्हंणाला.
"अरे हा येडा तर नाही ना झाला " निल म्हंणाला.
" नो नो ! मला वाटत की त्याच्या वॉचला रेंज येत नाहीये." प्रणयाने बरोबर ओळखल.
:" माय गॉड! आणि जर रेंज आलीच नाही तर!" निलने अस म्हंणतच त्या कठड्यापासुन पुढे पाहील.समोर तीस मीटर अंतरावर हायवेमधोमध शायना ऊभी होती. घाब-या गुब-या चेह-याने आजुबाजुला पाहत होती.प्लैन नुसार सर्वकाही रेडी झाल होत..फक्त वॉचला रेंज मिळायला हवी होती बस्स. मार्शल हॉटेलच्या चौकोनी छप्परवर उभा होता. त्याच्या पुढेच एक सहा फुटाचा जाडजुड कठडा होता. ज्या कठड्यावर मोठमोठ्या रंगीबेरंगी बल्बस्ने हॉटेलच नाव कोरल होत.
ते नाव होत => पोरांनो माझ जेवन घ्या. थोड गमतीदारच नाव ! नाही का? असो. मार्शल त्या सहाफुट कठड्यावर दोन्ही हात ठेवुन निराशजनक चेह-याने खाली पाहत होता. त्याला हायवेवर घाब-या चेह-याची शायना ऊभी दिसत होती..तर तिच्या उज्व्या बाजुला स्टोरमध्ये लपून बसलेले सोज्व्ल-प्रणया निल त्याच्याकडेच पाहताना दिसत होते. डोक्यात विचारांची गर्दी जमा झाली होती. तुडूंब भरलेल्या बसमध्ये खिडक्यांना लटकुन प्रवास करणा-या प्रवाश्यांसारखे एक एक विचार डोक्यात शिरुन चिटकत होते. की अचानकच मार्शलला न जाणे काय सूचल! त्याने त्या कठड्यावर प्रथम आपला उजवा पाय ठेवला मग हात आणी दुसरा पाय ठेवत त्यावर उभा राहीला, व उजवा हात ज्या हातात वॉच होती..तो हात शेवटच प्रयत्न म्हंणुन हलकेच वाकड करत छातीपाशी आणला.निराशजनक चेह-यानेच मार्शलने वॉचमध्ये पाहिल. हिरव्या स्क्रीनवर एक डिश सारखा एंटीना गोल गोल भिंगताना दिसत होता. नी बाजुलाच इंग्रजीत नाव, संख्या दिसत होती.
" फॉर्म्युला V10 मॉडल 1 एक्टिवेट " क्षणात मार्शलच्या निराशजनक चेह-यावर आनंदाचा चपराक बसला. त्याच्या चेह-यावर क्षणात एक हास्य झळकल. मग खाली निल सोज्व्ल-प्रणया तिघांकडे पाहून त्याने हसतच एक हात उंचावून अंगठा त्या तिघांना दाखवला. तसा त्या तिघांनाही आनंद झाला, तिघांनीही एकमेकांकडे पाहत हास्य केल. त्यांना अस हसताना पाहून शायनाची आणि निलची नजरा नजर झाली.
तिने डोळे वर करुनच इशा-याने काय झालं अस विचारल. तर त्याने रेंज मिळाली आहे असं हलकेच तिला सांगितल.जे ऐकून तिच्याही चेह-यावर एक मंद स्मित हास्य उभ राहील. मार्शलने आपल्या हिरवट रंगाच्या V10 वॉचमध्ये पाहत हलकेच स्क्रीनवर टच केल. टच करताच तो डिशसारखा जागेवर हळणारा एंटीना, ती नाव इंग्रजीतली नाव सुद्धा गायब झाली. आता ह्या क्षणी स्क्रीनवर एका रांगेत तीन काळ्या रंगाने इंग्रजीत पुढीलप्रमाणे नाव लिहिलेली दिसत होती. आणि चौथा एक ऑप्शन होता तो पिवळ्या रंगाने टिमटीमत होता.
1] search all information : ह्या ऑप्शनवर क्लिक करताच पुढे सर्च अस नाव येत होत. सर्चवर टच करतात एक कीबोर्ड तिथे उघडायची, मग त्या कीबोर्डवर आपण जे काही सर्च करु, दुनियातल सर्वकाही जस की, इतिहासातल्या किंवा अन्य विविध घटना ज्या सामान्य लोकांपासुन लपवुन ठेवल्या आहेत.विविध खाजगी यंत्रणेची माहीती, सामान्य लोकांचा सर्व डेटा सगळच्या सगळ आपन ह्या सर्च ऑप्शनवर पाहू शकत होतो. इतकच नाही तर दुस-याच्या घरातली केमेरा फुटेज सुद्धा ह्यावर दिसत होती.मार्शलने ह्याच ऑप्शनच वापर करुन निलची माहीती पाहीली होती! नाही का ? पुढे ऑप्शन नंबर 2
2 ] mission information: ह्या ऑप्शनवर क्लिक करताच ह्या स्पाइला मिशनची सर्व माहीती दिसु लागायची, आताही दिसत होती. त्यासहीतच ह्या ऑप्शनवर स्पाइला किती पैसे मिळणार आहेत. हे सुद्धा दिसायचे.पुढे ऑप्शन नंबर 3
3] all weapons: ह्या ऑप्शनवर क्लिक करताच पुढे एकुन सहा बंदुकी दिसायच्या. आता तुम्ही म्हंणाल फक्त सहाच? तर मी म्हंणेल अहो वाचक मित्रहो त्या सहा बंदुकीची रचना फायरिंग रेंज, स्पीड, रिलोड, एम्मो काही साधारण वैपन प्रमाणे नव्हती. एक बंदुकीची गोळी एका दहा मजली बिल्डींगला बेचीराख करेल अशी क्षमता ठेवत होती. आणि तिला हाताळणारा काही चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळणारा नसायचा! लक्षात असूद्या ! तर मित्रांनो सद्या येवढीच माहीती बस्स.पुढे पाहूच आपण. पुढे ऑप्शन नंबर 4
4] urgently box: ह्या ऑप्शनवर क्लिक करताच.ह्या फॉर्म्युलाच अपडेट, त्यासहितच मिशनमध्ये काही बदलाव झाले, काही माहीती अपूरी राहीली तर ते इथे अर्जंट बॉक्समध्ये मेसेज यायच. मेसेज आल की तो ऑप्शन पिवळ्या रंगाने टिम टिम करत चमकायचा. आता ही तो ऑप्शन चमकत होता.
" काय झाल असेल ! अपडेट? की मिशन बद्दल काही माहीती ? " मार्शल स्व्त:शीच विचार करत होता. कारण तो ऑप्शन उघडल आणि पुढुन रामचंद आला तर? अचानक हल्ला झाला तर.? शेवटी न राहवुन मार्शलने अर्जंट बॉक्सवर क्लिक केलच. शेवटी महत्वाचंच बॉक्स होत.
ऑप्शनवर क्लिक करताच समोर मिशनची माहीती दिसु लागली.
तसा मार्शल मनातच ती वाचु लागला.
" मिशनची माहीती:
अर्जंट मिशन मेसेज
तिमीर द घोस्टहंटर्स मिस्ट्रीयोज स्पाई कंपनी..( तर मित्रांनो हे आहे त्या गुप्तहेर कंपनीच नाव बर का)
डीयर मार्शल तुम्ही तुमच्या मिशनवर लाइव असाल..आणी हा मिशन लवकरच जिंकुन परत याल अशी आम्ही आशा बाळगतो. काल तुम्हाला तुमच्या मिशनबदल जी काही माहीती दिली होती ! ती तुम्ही नक्कीच
वाचली असेलच! डीयर मार्शल आम्हाला तुमच्या मिशनबद्दल जी काही माहीती मिळाली ती तुम्हाला काळ मेसेज द्वारे पोहचवली गेली होती. पन आमच्या मिशन टिमने जो मिशन तुम्हाला दिला आहे तो खुप अवघड असुन, त्यावर घोस्ट, मॉन्सटर्स, वेम्पायर्स अशा भुताखेतांवर सर्च करुन मिशनमध्ये माहीती देणा-या आमच्या टीमने अजुनक्ष खोलात जाऊन तपास केला आहे. त्यात आमच्या टिमला काही नवीन माहीती मिळाली आहे. की तुमच्या घोस्ट एनेमीच नाव रामचंद असुन क्रामचंद आहे.
ह्या क्रामचंदला मारायच असेल तर त्याच्या ट्रकचा स्फोट घडायल हव ही एक चुकीची माहीती होती ! चुकीच्या माहीतीसाठी क्षमा असावी.
क्रामचंदला मारता येण असंभव आहे! पन त्याला पुन्हा पाताळात धाडल जाऊ शकत हाच एक मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला एक अपडेट दिल आहे. तुम्ही तुमच V10 फॉर्म्युला अपडेट करा. तुमच्या मॉडल 1 मध्ये हा ह्त्यार कार्यरत होईल की नाही हे सांगण जरा असंभव जात आहे. असो पुढे => अपडेट पुर्ण झाल की वैपन ऑप्शनवर क्लिक करा. त्यात तुम्हाला आता सेवेन वैपन दिसतील..त्यातली सर्वात शेवटची वैपन निवडा. जिच नाव आहे अंतस्त्र :
एक लक्षात असूद्या! अंतस्त्रमध्ये फक्त एकच गोळी शिल्लक असेल. जी तुम्हाला क्रामचंदच्या कपाळावर भुवयांच्या मधोमध, किंवा त्याच्या छातीच्या भागावर मारायची आहे. गोळी जर ह्या दोन जागेंवर बसली..
तर क्रामचंदच्या मागे एक पोर्टल तैयार होईल ज्या पोर्टलआत तो खेचला जाईल. पन लक्षात असुद्या त्या पोर्टलआत फक्त क्रामचंदच नाही तर अन्य मानव सुद्धा खेचला जाऊ शकतो.म्हंणुनच क्रामचंद जवळ गोळी लागल्यानंतर कोणालाही जाऊ देऊ नये.
अस म्हंणतच मार्शलने मेसेज वाचायच बंद केल.
मेसेज संपताच खाली अपडेट अस इंग्रजीत नाव दिसत होत. अपडेट होत 12 जी:बी.
आता तुम्ही सर्व म्हंणाल 12 जी:बी अपडेट म्हंटल्यावर एक तास तरी लागणारच नाही का? पन मी म्हंणेल अहो नाही हो ! फक्त एक मिनीटातच होणार होत अपडेट. कारण V10 साठी स्पेशल हाईस्पीड सेटेलाईट नेटवर्किंग सिस्टीम अद्यावत होती. जिथे भारतात अद्याप 5g आल नव्हत.तिथे V10साठी 6gb रेंज दिली गेली होती. आणि ह्या सुविधेपासुन फक्त प्राईम मिनीस्टर(गॉडफादर) सोडून पुर्ण दुनिया अजाण होती.
" अपडेट सक्सेसफुल! " v10 मधुन हलकासा स्त्रीचा आवाज आला.
मार्शलने लागलीच वैपन ऑप्शनवर क्लिक केल. सांगितल्याप्रमाणे सात
वैपन दिसुन येत होत्या. मार्शलने सातव्या ऑप्शनवर क्लिक केल.. एक विशिष्ट प्रकारचा (टण) आवाज होत फाईल उघडली.आता त्या फाईलमध्ये एक स्निपर ए.डब्ल्यू. एम टाईप बंदुक दिसत होती.
जिची पुढची नळी जरा जास्तच लांब होती. बंदुकीच्या वर अंतस्त्र अस इंग्रजीत चंदेरी रंगात नाव चमकत होत.बंदुकीच्या बाजुलाच ऑनलय एकच पाण्यासारखी शुद्ध दिसणारी गोळी जागेभवती गोल गोल भिंगताना दिसत होती. त्या गोळीची रचना पाण्यासारखी, जणु पाण्यानेच बनवली असावी अशी दिसत होती.
बंदुक व गोळीच्या खाली ! बंदुकीची काही माहीती दिली होती.
तीच पुढिलप्रमाणे.
सहस्त्र हजारों वर्षांपुर्वी जेव्हा देव-दानवांच युध्द व्हायचं. ज्या युद्धात दानवांची शक्ति, सेना, अफाट असल्याने देवांना नेहमीचं माघार परतावी लागायची. देव सतत माघार परतत असल्याने, दानवांना चेव चढत होता. ज्याने पृथ्वीलोक, स्वर्गलोक, परीलोक, ब्रम्हलोक, आदी लोकांवर दानवांनी हैदोस घालायला सुरुवात केली होती. ह्याच जाचामुळे करोडो देवतांनी
आपली शक्तिएकरुप करुन एक शस्त्र बनवल, आणी ते होत आंतिम अस्त्र.म्हंणजेच हा अंतस्त्र होय. देवतांनी शस्त्र बनवल खर पन शस्त्र एकच असल्याने त्याच वापर करणार कोण? हा एक मोठा डावपेच समोर उभा राहिला. शेवटी करोडो देवतांच एक मत ठरल आणी साक्षात विघ्नहर्ता दुखहर्ता ! श्रीगणेशांना ह्या शस्त्रास वापरण्यासाठी सर्वांनी विनंती केली.
शेवटी श्रीगणेश होतेच विघ्नहर्ता..कसलेही ओढेवेढे न घेता शेवटी बाप्प शस्त्र वापरण्यास तैयार झाले. एका युद्धाची वेळ होती. दशलक्ष दानवी सेनेसमोर लाखोंची दैवी सेना किड्या मुंग्यांन सारखी दिसुन येत होती. दानवी सेनेत ज्यांची देवांसमोर उभ राहण्याची लायकी नव्हती..ते त्या देवांना हसत होते, त्यांची थेर उडवत होते. शेवटी युध्दाळा सुरुवात झाली. घमासान, ज्वालामुखीचा उद्रेक चौहीदिशेंनी उफाळून उठावा..तस युध्द सुरु झाल.तलवारींचा स्वर उभा आसमंत दणाणून सोडु लागला.काळ्या रक्ताचा पाट जमीन ओली करु लागला. बाप्पांनी शेवटला आंतिम अस्त्र उर्फ अंतस्त्र बाहेर काढल नी तीचा वापर सुरु केला.. पाहता पाहता दानवांची संख्या कमी होऊ लागली. एक एक दानव कोळश्यासारखा निखारे ऊडवत जागेवर भस्म होऊ लागला. आंतिम अस्त्र उर्फ अंतस्त्रची शक्ति पाहून वाचलेले दानव पळून गेले.परंतु त्यांच्या मनात अंतस्त्रविषयी असलेली भीती मात्र तशीच राहीली.
ही थोडक्यात माहीती आम्हाला एका पुराणात मिळाली. ती किती सत्य आणि असत्य ह्याची जबाबदारी कंपनी घेत नाही. आता शेवटच.जी बंदुक तुम्हाला दिली आहे, ती अंतस्ट्राची एक शेवटची मॉडल असुन तिचा योग्यवेळी वापर करुन क्रामचंदवर वार करा. धन्यवाद : (थँक्यू) मेसेज संपल होत
मार्शलने पुढे V10 वॉचमध्ये दिसणा-या अंतस्त्र उर्फ आंतिम अस्त्रवर हलकेच टच केल. टच करताच V10 वॉच सक्रिय झाली. त्या मधुन काही विशिष्ट आवाज बाहेर येऊ लागल, त्या छोठ्याश्या चौकोनी V10 फॉर्म्युला मधुन निळसर शुभ्र प्रकाश बाहेर पडू लागला.त्या निळसर शुभ्र प्रकाशांत काहीवेळांनी लहान-लहान धूलीकण पापण्यांची उघडझाप होत असल्याप्रमाणे टिमटीमताना दिसुन येत, तो प्रकाश रात्रीच्या अंधारात शेकडो रातकाजव्यांच झुंड जस एका ठीकाणी थांबल आहे अस वाटून देत होता. खाली उभ्या निल -शायना सोज्व्ल- प्रणया
ह्या चारही सामान्य मानवांच्या बुद्धीपल्याडच दृष्य होत हे. जे पाहून त्या सर्वांच्या तोंडाचा आ वासला तो वासलाच गेलेला.डोळे आश्चर्यकारकरित्या विस्फारले होते. ह्या कलियुगात सुद्धा अस काही चमत्कार घडु शकत, ह्यावर त्या चौघांचा विश्वासच बसत नव्हता.
मार्शलच्या हातात असलेला V10 फॉर्म्युला निळसर गडद प्रकाश बाहेर फेकत होता. काहीतरी विलक्षण घड़ल जात एक अनोखी शक्ति जन्मास येत होती. मार्शलच्या हातात असलेला V10 फॉर्म्युलाच्या आतून निळसर गडद प्रकाश बाहेर येत होता, झाडाची खोड जशी खाली जमिनीत रुतली जातात, त्याच प्रकारे V10 वॉचमधुन शुभ्र निळसर धूलीकणहिंत स्फटिकप्रकाशासहित, लहान-लहान पिवळसर विजा सळसळ करत बाहेर येऊ लागल्या, पिसाळलेल्या मुंगल्यांसारख्या मार्शलच्या हातावर चढु लागल्या. काहीवेळा अगोदरच जो निळसर, पिवळ्या प्रकाशाचा झगमगाट चांगला वाटत होता तोच आता भेसुर दिसु लागला होता.
" सिस्टीम ओवरलोड! सिस्टीम ओवरलोड ! " एकापाठोपाठ V10 वॉचमधुन फिमेल रोबॉटीक आवाज येऊ लागपा.. सळ-सळत त्या पिवल्याजर्द विजा V10 वॉचमधुन मार्शलच्या उज्व्या हातावरुन वाकड्या तिकड्या फिरत वर जात होत्या.
" आ, आ, आ, " मार्शलच्या मुखातुन वेदनादायी अवाज बाहेर येऊ लागला. नक्कीच काहीतरी गडबड झालेली दिसत होती.
" ओह माय गॉड! मार्शल ला काय होतय? " मार्शलच ओरडण्याच आवाज ऐकून निल चिंतेच्या स्वरात म्हणाला. सोज्व्ल प्रणया, शायना तर फक्त एकटक मार्शलच्या हातावरुन सलसलत वर जाणारा तो पिवळाधमक प्रकाश पाहत होत्या. मार्शलच्या डोळ्यांत तो पिवळा प्रकाश दिसला जात एक दोन अश्रु टपकन बाहेर आले. V10 वॉचच्या चौकोनी स्क्रीनवर आता हलकेच सेकंद सेकंदाला लाल रंग चमकू लागला आणि एक सूचना येऊ लागली.
" माफ करा v10 वापरकर्ता.आपल शस्त्र मॉडल 1 मध्ये कार्यरत होऊ शकत नाही ! ह्या शस्त्राकरीता V11 मॉडल 2 ची गरज भासत आहे!
जर तुम्ही दहा सेकंदा आत V10 मॉडल ऑफ़ केली नाहीत, तर V10 मॉडल 1वापरकर्त्यास हानिकारक इजा पोहचवत स्फोट होऊन जाईल! " सूचना सांगुन होताच त्या चौकोनी लाल
स्क्रीनवर इंग्रजीत आकडे दिसु लागले. काउंटडाउन सुरु झाल गेल.
वन, टू, थ्री, फोर प्रत्येक पुढे जाणा-या आकड्यासहित स्क्रीनवर दिसणारा लाल रंग आधीक आधीकच गडद होत चालला होता.
कोणत्याही क्षणी V10 चा स्फोट घडणार होता. हो पण जर का मार्शलने
V10 ऑफ़ केला तर हे अघटित नाट्य थांबणार होत.
" ओह शट काहीतरी होतय ! मार्शलच्या त्या वॉचमध्ये काहीतरी बिघाड झालंय वाटत !" निल मार्शलच्या हातात असलेला तो वॉच लाल रंगाने चमकतांना आणि ते इंग्रजीत आकडे काउंटडाऊन नुसार पुढे पुढे जाताना पाहत होता. बाकीच्यांना सुद्धा ते दिसत होत.
" माय गोड! मला तर वाटतय ! ती वॉचआता फुटणार आहे!"
" व्होटऽऽऽऽऽ" सोज्व्लच्या वाक्यावर निल प्रणया दोघेही एकदाच ओरडले.
" हो बोंब फुटायच्या अगोदर सुद्धा असंच काउंटडाऊन सुरु होत ना !" सोज्व्ल प्रणया निल दोघांकडे पाहत म्हंणाला. तिघांच्याही चेह-यावर विलक्षण भाव उमटले होते. मार्शलच्या उज्व्या हातात असलेल्या चौकोनी V10 फॉर्म्युला वॉचपासुन ते हाताच्या कोप-यावरुन खांद्यापर्यंत पिवळसर लहान-लहान विजा सळसळत वर-वर जाताना दिसत होत्या. त्या पिवळसर लहान-लहान विजांनी मार्शलच्या हाताची त्वचा पुर्णत भाजून निघाली होती. त्या प्रखरवेदनेने मार्शल एका गूरा सारखा ओरडत होता. त्याची ती दयनीय अवस्था शायना उभ्या डोळ्यांनी पाहत होती. मनात काहीतरी कराव अस विचार येत तर होत, पन करणार काय? काय करणार होती ती? मनात विचार येत होते पन बुद्धी साथ देत नव्हती!
" मार्शल काढा ती वॉच!" सोज्व्ल मार्शलकडे पाहून मोठ्याने ओरडलाच.त्याची ती हाक मार्शलने ऐकली. ओठ दातांवर दाबत तीव्र वेदनेला सहन करत मार्शनले डावा हात उजव्या हातात असलेल्या V 10 फॉर्म्युला वॉच जवळ घेऊन जायला सुरुवात केली. स्क्रीन्च्या आजुबाजुला निळसर गडद प्रकाशात एक लाल भडक चौकोनी प्रकाश दिसुन येत होता..आणि त्यावर फाइव्ह, सिक्स आकडे हलकेच पडताना दिसत होते.
" कम ऑन मार्शलऽऽऽ.. ऑफ़ द वॉच !" शायना सुद्धा ओरडूनच म्हंणाली. सोज्व्ल-प्रणया दोघांनी एकमेकांकडे मग शायना कडे पाहत पुन्हा मार्शलकडे पाहायला सुरुवात केली. निल सुद्धा मार्शलकडे पाहत होता..की तशी मार्शल निल दोघांचीही नजरा-नजर झाली. हातावरुन सळसलत येणा-या त्या शक्तिप्रवाहाच्या विजा अखंड वेदना देत होत्या.
घड्याळात आठचा आकडा पडला होता, लाल रंग सेन्सरप्रमाणे गडदहिंत होत चमकला. मार्शलने एकक्षण सर्ववेदना सहन करत चेह-यावर आपसुकच मंद हास्य आणल, आणि तो वॉच असलेला हात वर उंचावुन तर्जनी अंगठा चिमटी सारखा केला. ती खुण, तो संदेश निल ला लागलीच कळाला. डोळ्यांसमोर क्षणार्धात बसमधली संभाषणाची चित्रफीत दिसली.
" माझ्या पाठीत एक छोठीशी चिप आहे ! जी मी मरताच आमच्या कंपनीला एक हैल्प मेसेज पाठवेल.आणि मग कंपनीकडून तातडीने मदत पाठवली जाईल. पन डोंट वरी मी एकटाच काफि आहे त्या रामचंद साठी!" मार्शलच हे वाक्य आणि त्याच खांद्यावर ठेवलेला हात, सर्वकाही निल ला आठवल, निलच्या डोळ्यांतुन टचकन एक अश्रु बाहेर आला. मार्शलचे हे चौघे ना रक्ताच्या नात्यातले होते ना कोणी लागत होते. पन देशापरी प्रेम करणा-या मानवास परका हा शब्द अकलनीय असतो हेच खर, कटू सत्य ! चौकोनी लाल रंग असलेल्या स्क्रीनच्या वॉचवर नऊ चा अंक पडला..तसा मार्शलने निलकडे पाहत एक डोळा मिचकावला..नी पुढच्याच क्षणाला दहा असा आकडा स्क्रीनवर दिसला जात..त्या स्क्रीनमधुन एक दोन ठिंणग्या त्यासहितच लाल रंगाचा पाच फुटवर जाणारा प्रकाश झोत बाहेर पडला जात, एक मोठा कानठळ्या बसवणारा आवाज होत स्फोट झाला. (धडाम्म्म) सोज्व्ल -प्रणया दोघांनीही डोळ्यांवर हात ठेवले, निल ने सुद्धा दुखी भावनेने भरून आल्यासारखे चेहरा खाली झुकवला. मग काहीवेळाने सर्व प्रथम त्यानर
शायनाकडे पाहिल, ती अद्याप वर पाहत होती..की तेवढ्यात नकळत त्याची नजर कसली तरी चाहूल लागल्याप्रमाणे उज्व्या बाजुला वळली, तसे पुढे पाहताच त्याचे डोळेच विस्फारले. कारण पुढुन हायवेवरुन काळ्या रंगाचा राकीट रुपी तो ट्रक, क्रामचंदला घेऊन अफाट वेगाने शायनाच्या दिशेनेच येत होता. व एक भयाण बाब अशी की ट्रकच्या बोनेटवर एक बिन धडाच प्रेत, हातांनी दोरी बांधुन अडकवल होत. विंडशील्ड मधुन लाल रंगाचा प्रकाश दिसत होता..नी ड्राईव्हसीटवर बसलेला क्रामचंद वखवखणा-या नजरेने, शायनाकडे पाहत होता. क्षणात निलची धांदल उडाली, एकवेळ त्याने शायना मग, त्या ट्रककडे पाहील. मार्शल जो की ह्या सर्वांना वाचवणार होता. तो ही आता मरण पावला होता. परंतु त्याच बलिदान व्यर्त जाणार नव्हते. हैल्प घोस्टबस्टर्स एमर्जंसी कमांड फोर्स लवकरच येणार होती. पन तो पर्यंत जे काही करायचं होत ते निल ला एकट्यालाच कराव लागणार होत.शायनाच सर्व लक्ष वर असल्याने पुढुन येणारा तो मृत्युरुपी ट्रकची तिला चाहूल लागली नव्हती. पण शायनाच्या काळजीने निल च्या अंगात जणु जोश संचारला, सहाफुट आकाराच्या कठड्यावर दोन्ही हात ठेवत, शरीराच तोल सांभाळत खालचे दोन्ही पाय वर हवेत झोकून घेत..निल ने एक जंप घेतली. तसाच त्या स्टोरमधुन बाहेर आला.
" शाऽऽऽ... यऽऽऽ..नाऽऽऽ!" निल चा गडगडाटी आवाज कंपने निर्माण करत हवेला कापत तिथे उपस्थीत सर्वांच्या कानांत घुमला.शायनाने गर्रकन वळून मागे पाहिल. अगदी स्लोमोशनने सर्वकाही सुरु होत. शायनाने गर्रकन मागे वळून पाहताच तिचे केस अगदी 25x च्या गतीने हलुवारपणे एका रेषेत गोल भिंगत पुढे आले, त्या केसांच्या गर्दीतुन शायनाच्या टपो-या डोळ्यांच्या पापण्या हळक्या गतीने हळवत तिने पुढे पाहिल. डोळ्यांत काळजी, गंभीर चेहरा, असा निल रस्त्यावरुन धावत वेगाने तिच्याच दिशेने तिला हाका मारत पळत येत होता. पळताना तो कधी उजवीकडे तर कधी समोर तिच्याकडे पाहत होता. शायनाने सुद्धा
एकवेळ समोर पाहिल. क्रामचंदची हिरवट जहरी नजर तिच्या सामान्य डोळ्यांशी भिडताच तिच्या छातीत चर्रचर्र झाल. दोन्ही पाय भीतीपोटी जमिनित रोवले गेले. ट्रकच्या चाकांन मधोमध लावलेल्या लाल व्हीलज
हेलिकॉप्टरच्या पंखांप्रमाणे भिंगत होत्या. खालचा काला चाक चक्रीसारखा भिंगत रस्ता कापत होता. पुढ़च्या दोन हेडलाईटसवर बोनेट वर बांधलेल्या आर्यंशच्या बिनधडाच्या प्रेतांमधुन निघालेल्या कारंज्यांरुपी रक्ताने लाल रंग रेखाटल होत. तो पिवळा प्रकाश आता प्रतिशोधा सारखा, हैवानासारखा लाल रंगाने चमकत होता. शायनाच्या पुर्णत शरीरावर पडला होता. ट्रकच्या बोनेटवर अडकवलेल्या आर्यंशच्या प्रेतावचरच्या कपड्यांवरुन सोज्व्ल-प्रणया दोघांनाही कळून चुकल होतं..की सागर आर्यंश दोघेही त्यांना कायमचे सोडून गेले आहेत.पन वेळच अशी ओढावली होती.की रडताही येणार नव्हत. ना आक्रोश करता येणार होत. शायनापासुन अंशी मीटर अंतरावर ती ट्रक पोहचली होती. इंजीनचा खर्जातला आवाज त्या शांततेत अभद्रपणे वाजत होता.
" शायना !" म्हंणत निल तिच्यापाशी पोहचला. तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांना वाचा बसलेल्या चेह-याला पाहून त्याने तिला मीठीत घेतल, नी पाठमोरा उभा राहीला. जे होईल ते होईल मरायचय तर एकत्रच मरु असा जणु चंग बांधला त्याने, ! निलच्या पाठीमागुन अगदी हिंस्त्र श्वापदा सारखा क्रामचंदचा ट्रक मागच्या नळीतुन काळसर धुर सोडत येत होता. विंडशील्ड मधून क्रामचंदची हिरवट जहरी नजर दिसत होती..त्या नजरेत आसुरी आनंद मिसळून ती हिरवट जहरी नजर दुप्पटने लकाकत होती. समोरच्याने त्या डोळ्यांत पाहताच त्याच्या मेंदूला टोचत होती.
सोज्व्ल प्रणया दोघांनीही डोळे बंद करुन एकमेकांना मीठीत घेतल होत.जणु पुढच दृष्य ते पाहू शकणार नव्हते. निल-शायना त्या दोघांच अंत त्याच्या काळजांना झेपणार नव्हत. निल शायना दोघांच्याही बंद डोळ्यांतुन अश्रु ओघळत होते.कानांत ट्रकच्या इंजीनचा आवाज जवळ
जवळ येताना भासत होता. निल-शायना दोघांच्याही बंद डोळ्यांआड अंधार दिसत होता आणि त्या अंधारात पटलांवर कोरलेल रामच्ंदच हिरवट डोळ्यांच आसुरी हास्य करणार चित्र. निल शायना दोघांच्याही उजव्या बाजूला एक हॉटेल दिसत होत. हॉटेलच्या भिंती जाड काचेच्या दिसत होत्या. की तेवढ्यात भुकंप आल्यासारख्या त्या काचा थरथरु लागल्या, नी पुढच्याक्षणाला आतुन दोन पिवळ्या हेडलाईटसचा प्रकाश
त्या काचेच्या भिंतीवर पडला जात, त्या हेडलाईटस पुढे पुढे येताना दिसल्या नी एक वेगवान धडक त्या काचेच्या भिंतीला बसली जात..लहान लहान तुकडे खाली रस्त्यावर पडले. नी एक आर्मी जीप खालचे व्हिल्स फिरवत बाहेर आली. पुढचे काळे चाक निल शायना दोघांनाच्या जवळून हायवेवर घासत एका स्माईल पोजप्रमाणे धुर उडवत फिरले. नी गाडी जागेवर थांबली..आणि ड्राईव्हसीटवर दुसरा तिसरा कोणीही नसुन होती मायरा उर्फ माया. निल -शायना दोघांनीही तो काचांचा आवाज ऐकून डोळे उघडले होते.. त्यांना ती जीप व ड्राईव्हसीटवर बसलेली अनोळखी मुलगी त्या दोघांनीही दिसली होती..एका मिनीटाच्या आत अचानकच ही घटना घडली होती अनपेक्षित अस वळण मिळाल होत सुटकेच.
" लवकर गाडीत बसा लवकर!" मायरा निल-शायना सोज्व्ल-प्रणया चौघांकडे पाहत मोठ्याने ओरडतच म्हंणाली. मागुन क्रामचंदने रागातच त्या जीपकडे पाहिल. आपला चकचकीत बुटांचा पाय एक्सीलेटरवर रागातच हानला. निल शायना दोघेही जीपच्या मागच दार उघडून आत बसले. मायराने उजवा हात स्टेरिंगवर ठेवला, दुसरा हात गियरवर ठेवला, खालच्या उजव्या पायाने हळकेच एक्सीलेटरवरच दाब वाढऊ लागली. तर दुसरा पाय ब्रेकवर ठेवल्याने, तो टायर जागेवरच धुर मागे सोडत फिरु लागला. जीपच्या मागुन लाल लाईट पेटली जात इंजीनचा घर्रघर्रता आवाज अक्षरक्ष सिंहासारखा डरकाळी फोडत होता. विलेज 405 मधल्या घराघरांत लपून बसलेल्या माणसांच्या कानांत घुमत होता. जो तो डोळे विस्फारुन तो आवाज ऐकत होता. कोणीतरी होत जे ह्या सैतानाशी दोन हात करत होते..हे गाव सोडुन जाण्याच प्रयत्न करत होत.सोज्व्ल प्रथम कठड्यावरुन बाहेर आला, मग त्याने प्रणयाला कठड्यावरुन बाहेर काढल..मग दोघेही जीपच्या दिशेने धावत आले. कोण कुठली मुलगी? आपल्याला मदत करत आहे? हे सर्व विचार डोक्यात येणार नव्हते.कारण जीव वाचवायचा होता. बस्स. सोज्व्ल प्रणया दोघेही जीप पाशी पोहचले. मागचा दार उघडून प्रणया आत बसली..तर सोज्वळ मायराच्या बाजुला बसला. तसा मायराने गाडीची चावी उजव्या बाजुला फिरवून इंजीन बंद केल.
" इंजीन, इंजीन का बंद केल ताई चल..चल ! निल मागुन हलक्या स्वरात म्हंणाला. परंतु मायरा एकटक पुढच्या मिरर मध्ये पाहत होती.गाडीकाही हल्ली नाही.
" अंग ए चल ना बाई...चल.!" निल पुन्ह हलक्या स्वरात म्हंणाला. परंतु गाडीकाही हल्ली नाही.
" अरे चल ना आई माझे ! चल ना पाया पडतो तुझ्या... !" निल चा ओरडण्याचा आवाज, नी त्या आवाजानंतर आला क्रामचंदच्या ट्रकच्या (पोंऽऽऽऽऽमऽऽऽऽ) अभद्र हॉर्नचा आवाज, तसा सोज्व्ल-प्रणया निल शायना तिघांनीही एकाचवेळेस मागे वळून पाहिल. तिघांचेही डोळेच विस्फारले कारण मागुन क्रामचंदचा ट्रक जीपला धडक देणार की तोच एवढवेळ ह्याच संधीची वाट पाहत बसलेल्या मायराने डाव्या बाजूची चावी उजव्या बाजुला फिरवली..धड, धड करत पहिल्याच खेपेला गाडी सुरु झाली..गाडी सुरु होताच..मायराने हातातली गोल स्टेरिंग एकदाच डाव्या बाजूला फिरवली, दुस-या हाताने गियर शिफ्ट केल, आणि खाली ब्रेकवर ठेवलेला पायवर उचलून, उजवा पाय कल्चवरुन
उचलत थेट एक्सीलेटरवर एकाच वेळेस दाबला. उधळलेला घोडा जसा खालची माती हवेत उडवतो. तस त्या जीपच्या मागच्या टायर्समधुन धुर मागे उडाला...नी एका विशिष्ट प्रकारचा ब्रेक मारल्यासारखा आवाज होत गाडी जागेवरच 360 च्या अंशात गोल फिरली..नी त्याचक्षणी मागुन येणारा क्रामचंदचा ट्रक वेगाने पुढे निघुन गेला. तसा इकडे मायराने पुन्हा एकदा गियर शिफ्ट केल. एक्सीलीटरवर पायाचादाब वाढवला..तसे गाडीव्हील फिरवत, मागच्या नळीतुन धुर उडवत, मागुन दोन हेडलाईटचा लाल प्रकाश दाखवत पुढे पुढे निघुन जाताना दिसु लागली.
×××××××××××××××××××
क्रमश :