Haiwan a Killer - 14 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | हैवान अ किलर - भाग 14

The Author
Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 110

    ભાગવત રહસ્ય-૧૧૦   મહાભારતના શાંતિ-પર્વમાં એક કથા આવે છે.વૃંદ...

  • ખજાનો - 77

    " શું થયું મિત્ર...! તમારા ચહેરા પર આ ડર અને ચિંતા કેમ વર્તા...

  • પ્રિય સખી નો મિલાપ

    આખા ઘર માં આજે કઈક અલગ જ વાતાવરણ ઉભુ થયુ છે સામન્ય રીતે ઘરની...

  • ધ્યાન અને જ્ઞાન

        भज गोविन्दम् ॥  प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्य विवेक...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 11

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

Categories
Share

हैवान अ किलर - भाग 14

भाग 14

" ओके ! समजल सर्वाना प्लैन?" मार्शलने एक कटाक्ष पुढे उभ्या त्या चौघांवर टाकला.तसा निल-शायना सोज्व्ल-प्रणया सर्वांनी होकारार्थी मान हळवली. प्रत्येकाने आप-आपल्या सोबत एक एक काठी घेतली होती. तसही शरीर रक्षणासाठी काहीतरी हवच होत ना !

पन त्या साध्याश्या काठ्या त्या सैतानाला रोखु शकणार होत्या का?

मार्शलने सांगितलेल्या प्लैनिंग नुसार सर्वप्रथम त्याने त्या झोपडीच्या दाराचा कडीकोयंडा मुक्त केला. मग हळकेच दार उघडून एक कटाक्ष बाहेर टाकल. निळसर प्रकाश, सुमसाम अशी शांतता बाहेर पडलेली होती.निल-शायना, सोज्वल -प्रणया हातात काठ्या घेऊन पुढे दारातुन बाहेर पाहणा-या पाठमो-या मार्शलच्या आकृतीकडे पाहत होते.

बाहेर कसलीही हालचाल किंवा धोकादायक अस काहीही न आढळून न आल्याने मार्शलने हळूच मागे वळुन पाहिल..व हाताचा एक पंजा वर करुन त्या सर्वांना अंगठा दाखवत सर्वकाही ठिक आहे असा इशारा केला..म तो हळकेच दारातुन बाहेर आला. मार्शल बाहेर येताच निल, -शायना सोज्वल-प्रणया चौघेही बाहेर आले. 

" हे पाहा ! प्लैनिंग नुसार मी सर्वप्रथम त्या हॉटेलच्या वर चढणार!

आणी मग. सर्वप्रथम मी माझ्या गेजेट वॉचमध्ये रेंज चेक करणार! जर रेंज आली तरच पुढच प्लैनिंग पार पाडायच आहे ! ओके ?"

मार्शलने सर्वांकडे पाहील. सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या.

रातकीड्यांच्या आवाजासहित, थंड हवेच्या झोतांसहिंत, रात्रिचा पारा उलटत मंद गतीने वेळ पुढे सरकत होती. गल्लीबोळातुन अंधाराचा फायदा घेऊन चोरासारख्या मांजरी पावलांनी हे पाचहीजण आजुबाजुच्या आवाजाचा कानोसा घेऊन पुढे पुढे सरकत होते.

आजुबाजुला असलेली घर अगदी निर्जीव सांगाड्याप्रमाणे ऊभी होती.

 त्या घरांच्याआतुन कुजकट वास येत होता. कारण काही घरांमध्ये माणस जिवंत होती. तर काही मृत.नी भयानक बाब अशी की जिवंत असलेली लोक आपल पोट भरण्यासाठी स्व्त-च्याच मांणसांच मांस भक्षण करुन जगत होते.

शेवटी दहा वीस मीनिटांच्या अथक प्रयत्नांसरशी हे सर्वजन त्याच जागेवर आले..जिथे काहीवेळा अगोदर बसचा अपघात घडला होता. बसच्या आतुन अद्याप काळसर धूर बाहेर पड़त होत. त्या धुरातुन मांस अर्धवट जळाल्याचा, किळसवाण वांतीमय वास येत होता. बसच्या फुटलेल्या विंडो ग्लासमधुन सीटवए काळे आर्धवट जळुन पडलेली मृतदेह, नी त्यांच्या देहातुन निघणारी सफेद वाफ नजरेस पडत होती. बसच्या बाजुलाच

रस्त्यावर दोन छिन्न विछिन्न, रक्त, हाड, पोटाच्या आतड्या, कवटी फुटून मेंदु बाहेर आलेल्या अवस्थेतली दोन प्रेत जशीच्या तशी पडली होती.

" व्या, ऽऽऽऽऽव्याऽऽऽऽऽ व्याऽऽऽऽऽ !" शायनाने हे दृष्य पाहताच बाजुलाच वांती केली. सर्वानी एकदा तिच्याकडे पाहिलं.

" शायना यु ओके! " निलने तिच्या पाठिवर वर हात ठेवला.

" अरे वा निल भाऊ कोंन्ग्रेज्युलेशन्स ! " सोज्व्लने हलकेच निलचा दुसरा हात पकडला. निल मात्र त्याच्याकडे न समजुन पाहत होता.

" ते कशा बदल?" 

" अरे निल भाऊ ! तुमची गर्लफ्रेंड प्रेग्नंट झालीये!" सोज्व्ल दात विचकत म्हंणाला. त्यावर निलचे डोळे मोठे झाले. तोंड़ाचा आवासला. दात बाहेर आले.

" काय सांगतोस काय! खरच ! मी, बाप झालो !" निल मोठ खुशीतच म्हंणाला.

" शट अप! " एक मोठा आवाज आला.

" ती काही प्रेग्नंट नाही! तिला फक्त हे वास आणि भयानक दृश्यांमुळे उलटी झालीये. " मार्शल काळा चष्मा चढवुन त्या दोघांकडे पाहत म्हंणाला. तसे ते दोघे गप्प झाले. 

" जस्ट फोकस प्लैन.ओके ! " रास्कल्स " मार्शल गंभीर होत म्हंणाला. शेवटच वाक्य मात्र तो हळुच पुटपुटला.

×××××××××××××××××××

जिवाच्या आकांताने शरीरात जेवढी ताकद आस्तित्वात होती..ती पणाला लावुन आर्यंश धावत होता. पायांत घातलेल्या बुटांचा हायवेवर वेगाने पडणा-या पावलांचा .पावसाच्या टपो-या थेंबा प्रमाणे आवाज होत होता. डोक्यावरचे लांबसडक केस घामाने भिजले होते. अंगावर असलेले कपडे टी-शर्ट जीन्सही त्याच घामाने ओली झाली होती.

मनात फक्त एकच विचार सुरु होता. सुटका आणि फक्त सुटका बस्स.

आत्म्याला वाचवण्यासाठी सदैव जागरूकता निर्माण करुन आर्यंश बेभान होऊन दौडत होता. की तेवढ्यात पोंमऽऽऽऽऽऽऽऽऽ एक अभद्र हॉर्नचा आवाज उभा आसम्ंत दणाणून आला. रेगिस्तानातल्या एका सुकलेल्या झाडाच्या फांदीवर एक सरडा बसला होता. त्याला आपल्या समोरुन चाळीस मीटर अंतरावर एक वळन घेतलेला हायवे दिसत होता.आणि त्या वळणावरुन एक आकृती पुढे धावत होती..तर त्या आकृतीच्या मागुन दोन पिवळे हेडलाईटस पेटलेली ट्रक वळण घेत पुढे येत होती. त्या ट्रकच्या ड्राईव्हरुममध्ये लालभडक प्रकाश दिसला जात ड्राईव्हसीटवर एक धिप्पाड आठफुट आकृती बसलेली दिसत होती. नी ती आकृती म्हंणजेच रामचंद होय.

" हे, हे, हेहिही, " आपल्या ट्रकमध्ये ड्राईव्हसीटवर बसुन रामचंद मसेरीवाले काळसर दात बाहेर काढुन, आपल्या हिरवट जहरी नजरेने, आर्यंशच्या पाठमो-या आकृतीकडे पाहून कुत्सिक हसत होता. ड्राईव्हरुम मध्ये रामचंदच्या डाव्याबाजुला थोडवर एक लाल भडक दिवा पेटलेला..त्या दिव्यात लालसर रक्त ओतलेल ज्याने तो प्रकाश लाल दिसत होता.

" हा हा हा हा, पळ, पळ, पळ!" रामचंद दोन्ही बलाढ्य हातांनी समोरची

चौकलेटी रंगाची गोल स्टेरिंग फिरवत होता. तर कधी स्टेरिंग मधोमध प्रीस करुन अभद्र हॉर्न वाजवत होता.(पोंऽऽऽऽऽमऽऽऽऽऽ)(पौंम्म्ममम) त्या ट्रकला पाहून आर्यंशच्या घश्यात श्वास अडकला. पुर्णत देह हादरल. पायांतल त्राण नाहीस झाल.वेग कमी पडू लागला. कधी मागे तर कधी पुढे तो पाहत होता. त्याची भेदरलेली, विस्फारलेली नजर ते डोळे..! रामचंद जिभळ्या चाटत ओठांवरुन जीभ फिरवत पाहत होता. रामचंदला आर्यंशचे डोळे खुप आवडलेले दिसत होते. आणि लवकरच त्याला ते चवीने चाखायला मिळणार होते. मागे पुढे पाहत पळणारा आर्यंश दोन्ही पाय एकमेकांना गुंतुन खाली पडला. भितिपोटी शरीर हायवेवर धाडदिशी कोसळल. हात, पाय आणि गुढघ्यांसहित कपाळ फुटल गेल.

" स्स्स्स्स ! आह्ह्ह !" आर्यंशच्या मुखातून एक सुस्कार बाहेर पडला.

इकडे ट्रक त्याच्यापासुन वीस मीटरवर थांबली.तिचा पिवळाधम्मक हेडलाईटचा प्रकाश आर्यंशच्या जमिनीवर पालथा पडलेल्या आकृतीवर पडला होता. आर्यंशच सर्व लक्ष पुढे होत..आणि मागुन येणारा तो हेडलाईटचा प्रकाश त्याच्या पाठणावरुन थेट पुढे जात होता.

घाबरागुबरा आर्यंश गपचुप पुढे पाहत होता. इंजीनच्या घर्रघर्रचा आवाज कानांवर पडला जात मनात भिती वाढवत होता. कोणत्याही क्षणी जिव जाणार हे विधिलिखित होत. हायववेवर थांबलेल ट्रकच पुढच एक लाल टायर दिसत होत.की तेवढ्यात त्या ट्रकबाजुला हवेतुन दोन चकचकीत बुट खाली आले.त्यांचा टप, असा मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकुन आर्यंशच्या काळजात धस्स झाल. मागुन पेटत्या हेडलाईटचा प्रकाश आर्यंशला दुर दुर पर्यंत जाताना दिसत होता.नी त्याच प्रकाशात मागुन एक कालसर आकृती हातात एक कुदळ सारख काहीतरी घेऊन पुढे पुढे अगदी हळुवारपणे अनैसर्गिक चालेने येताना दिसत होती. त्या आकृतीच्या पायांतले बुट टक, टक, अस अभद्र आवाज निर्माण करत होते. त्या काळ्या आकृतीचा कुदल असलेला हात आता वरवर जाऊ लागला. आर्यंशने ते पाहिल त्याला आपला मृत्यु उभा दिसला.बचावासाठी एक प्रयत्न म्हंणुन त्याची नजर अवतीभवती फिरु लागली. थोड़क्यात पुढे त्याला हातभराच्या अंतरावर एक गोल जाडजुड दगड़ दिसला..हेडलाईटसच्या प्रकाशात दिसणा-या त्या काळ्या आकृतीचा हात आता कुदलसहीत वर आला होता. की तेवढ्यात आर्यंशने शरीराची वेगाने चलाखनीय हालचाल केली समोर असलेला तो गोल दगड उज्व्या हाताने गच्च पकडला नी गर्रकन पाठवळवली. तसा त्याला त्या हेडलाईटसच्या प्रकाशामुळे मधोमध उभ्या रामचंदच्या फक्त काळ्या आकृतीच दर्शन घडल.परंतु ही वेळ काही चेहरा वगेरे पाहण्याची थोडीना होती. आर्यंशने वळुन पाहताच रामचंदने वर घेऊन नेलेली कुदळ हातांची अमानविय हालचाल करत तीप्पट वेगाने खाली आणली, इकडे आर्यंशनेही मरणाच्या भीतीने तो हातात असलेला दगड रामचंदच्या चेह-याच्या दिशेने भिरकावला. वरुन येणारी कुदळ पुढुन येणारा तो काळसर दगड दोघांचही एकमेकांना स्पर्श झाल. एक मोठा(ठन) अस गोळी झाडल्या सारखा आवाज होऊन जात जो दगड आर्यंशने रामचंदच्या चे-याच्या दिशेने भिरकावला होता..त्याची दिशा बदल्ली..नी तो दगड थेट तिप्पट वेगाने खालच्या दिशेने जात रामचंदला (मेन पार्टवर) लो ब्लॉ हिट बसल.

" आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" रामचंदच्या मुखातुन एक तीव्र वेदनादायी अघोरी आर्तकींकाळी बाहेर पडली. हातातली कुदळ खाली सोडुन देत दोन्ही गुढघ्यांमधोमध हात ठेवुन रामचंद खाली बसला. आर्यंशने बाजुला पडलेल्या कुदळकडे पाहिल हीच एक संधी होती, हाच एक शेवटचा वार त्याला जणु आयती संधी म्हंणुन चालुन आला होता. घाई करुन त्याने जमिनीवर पडलेली..कुदल हाती घेतली.

" हरामखोर ! " सिक्स मारण्यासाठी जशी वेगाने बैट फिरवावी तशी

आर्यंशने ती कुदल वेगाने उज्व्या दिशेने घेऊन जात डबल वेगाणे डाव्या दिशेला आणत रामचंदच्या एका ख्प्पड चे-याच्या मोठाल्या गाळावर झपदीशी अशी काही बसवली की तीचा व्रण कायम जन्मांतर राहणार होता. लो ब्लॉ हिट बसल्याने रामचंदची शक्ति काहीकाळ का असेना खालावली होती. त्यातच कुदळचा मार बसताच तो जमिनदोस्त झाला.आर्यंशने लागलीच बाजुलाच ती वाकलेली कुदल फ़ेकली ज्यावर रामचंदचा चेहरा साकार झालेला. आर्यंश रामचंदला मागे सोडत थेट ट्रकजवळ आला. ट्रकच्या पाय-या चढुन लाल रंगाने माखलेल्या ड्राईव्हरुमवर एक नजर फिरवली. समोरच मखमखली गादीचे दोन ड्राईव्हसीट, पुढे स्टेरिंग व्हील, बाजुला कवटी असलेल गियर स्टीक होत.

आर्यंशने पटकन घाईकरत तो त्या ड्राईव्हसीटवर बसला. अती घाई संकटात नेई ! आपण कोणाच्या गाडीला चालवणार आहोत! ह्याच भान तरी असायला होत त्याला.जरासा सावधपना असायला हवा होता पन नाहीच. जिव वाचवण्याच्या घाईमुळे एक मोठी गडबड त्याच्याकडून होउन बसलीच. ड्राईव्हसीटवर बसुन आर्यंशने लागलीच स्टेरिंग खाली असलेली चावी उजव्या बाजूला फिरवली..आणि जशी चावी उजव्या बाजूला फिरली...त्याचक्षणी स्टेरिंग मधोमध असलेल्या हॉर्नमधुन एक तोफेचा बार उडावा तसा स्फोट झाला. एकक्षण आर्यंशला समजल ही नाही की झाल काय ते. तो गोल भारदस्त लोख्ंडी चेंडू 

अगदी वेगाने धुर उडवत बाहेर आला नी त्या लोख्ंडी चेंडूने कलिंगडासारख आर्यंशच धड धाडदिशी फोडल. मेंदू, नसा, रक्त, डोळे, दाताची बत्तीशी सर्वकाही आजुबाजुला उडाल.हायवेच्या काळ्या रस्त्यावर ट्रकचा लाल टायर उभा दिसत होता. आर्यंशच्या बिन धडाच्या देहातुन जेवढ रक्त बाहेर पडत होत..ते सर्व विशिष्ट प्रकारे खेचुन त्या चारही टायर्सला अभिषेक घालताना दिसत होत. पुढच्या डाव्याबाजुच्या चाकासमोर आर्यंशच्या चेंदामेंदा झालेल्या धडामधल्या काही हिरव्या, काळ्या, नसा नी त्यांना चिकटलेले दोन डोळे पडलेले दिसत होते. एक पांढरट कुजकट दर्प बाहेर येणारा बलदंड बाहूचा हात हळुच त्या डोळ्यांच्या दिशेने आला. त्या हाताच्या जाडजुड धारधार नखांची चिमटी बनवून त्या हाताने ते डोळे उचल्ले.मग तो हात मागे मागे जात...

रामचंदचा खप्पड चेहरा दिसला, ज्याची हनुवटी थोडीशी पुढे आलेली..आणि तो त्या डोळ्यांकडे पाहून भयाण कुत्सिक हास्य करत होता.हिरवट जहरी नजर अंधारात विषासारखी लकाकत होती. आर्यंशचे दोन बुभळ आणि त्यांना एक नाळ जुडलेली दिसत होती.

रामच्ंदने हलकेच थोडासा जबडा वासला, त्यातुन एक सरड्यासारखी वळवळती दहा से:मी ची काळपट जिभ बाहेर आली. इकडून रामचंदने डोळे असलेला हात सुद्धा जवळ आणायला सुरुवात केली. हात तोंडाजवळ येताच त्याने बोटांची चिमटी सोडली..बिन आधाराने ते डोळे हलकेच रामचंदच्या वलवलत्या जीभेने हवेतच पकडले ! नी सप्पकन ती जीभ आत तोंडात पळाला.

" यम्म, म्म्म, म्म्मा!:" तोंड वाकड तिकड हलवत रामचंद मोठ्या चवीने ते डोळे खाऊ लागला.

" किती छान आहेत चवीष्ट ! स्स्स हा !" अस म्हंणतच तो ड्राईव्हसीटजवळ गेला. सर्वप्रथम त्याने आर्यंशच निर्जीव मढ एका हाताने थरमाकोल प्रमाने अलगद उचल्ल. नी हळुच गाडीच्या इंजीनच्या टाकीला दोरी मार्फत बांधुन टाकल. हे सर्व करताना त्याला काहीवेळ लागला. हे काम होताच रामचंद ड्राईव्हसीटवर जाऊन बसला.

आपला एक बलदंड हात हलकेच वाढवुन त्याने आर्यंशने उज्व्या बाजूने फिरवलेली चावी डाव्या बाजुला फिरवली. इंजीनच्या आतमध्ये चर्रचर्र करत ठिंणग्या उडाल्या, घर्रघर्रता खसखसता भसाडा आवाज घेऊन येत इंजीन सुरु झाल..

" घर्ररघर्ररघर्रर...ऽऽऽऽऽऽऽऽ"

क्रमश :

 

 पुढील भाग उद्या