Haiwan a Killer - 6 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | हैवान अ किलर - भाग 6

The Author
Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 110

    ભાગવત રહસ્ય-૧૧૦   મહાભારતના શાંતિ-પર્વમાં એક કથા આવે છે.વૃંદ...

  • ખજાનો - 77

    " શું થયું મિત્ર...! તમારા ચહેરા પર આ ડર અને ચિંતા કેમ વર્તા...

  • પ્રિય સખી નો મિલાપ

    આખા ઘર માં આજે કઈક અલગ જ વાતાવરણ ઉભુ થયુ છે સામન્ય રીતે ઘરની...

  • ધ્યાન અને જ્ઞાન

        भज गोविन्दम् ॥  प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्य विवेक...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 11

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

Categories
Share

हैवान अ किलर - भाग 6

भाग ६

लब्दी ट्रैवल बसमध्ये मार्शलने आपण स्पाई असल्याची सर्व इत्यंभूत

माहीती निलला कळवली होती.

" अच्छा ! म्हंणजे तुम्ही घोस्टबस्टर्स स्पाई आहात..! आणि भुता-खेतांच

अंत करता ! " निलचा चेहरा उत्सुकतेने खुलुनी उठला.

" हो! " मार्शल शुन्य भाव ठेवुन पुढे पाहत इतकेच म्हंणाला.

" पन मला एक नाही समजत ! मी तर फक्त माझ्या गर्लफ्रेंडला शोधण्यासाठी चाललो आहे! मग तुमच आणि माझ टारगेट एक कस होईल.?" निल ने विचारल..

" ते अस. की हाईवे नंबर 405 वर दर पंचवीस वर्षांनी, एक सैतान

नरकातुन बाहेर येतो. ज्याच नाव रामचंद आहे. हा रामचंद मानवाच्या मांस आणि रक्ता साठी हवरटलेला आहे. हा रामचंद दर पंचवीस वर्षांनी

नरकातुन ह्या हायवेवर आला, की ह्या हायवेवरुन जाणारी मांणस गायब होऊ लागतात. रामचंद त्या मांणसांना आपल शिकार बनवतो..

 त्याच्याकडे स्व्त:च एक राक्षसी वाहन सुद्धा आहे. ज्या वाहनात मागे काळ्या प्लास्टीक मध्ये मोठ्या संख्येने प्रेत गुंडाळून ठेवलेली असतात.

दर पंचवीस वर्षांनी बाहेर येणा-या रामचंदच पृथ्वीवर राहण्याचा अवधी फक्त आठवडा आणि आठड्याचा अर्धा दिवस इतकाच असतो.

तो पर्यंत रामचंद एका गुहेत राहतो, मारलेल्या प्रेतांच मांस कापुन त्यांना भाजून तो ह्या गुहेत खात असतो..अस म्हंटल जात!" मार्शल मोठ्या धीरगंभीर आवाजात हे सर्व सांगत होते. आणि निल तितकाच गंभीर मुद्रेने ते ऐकत होता.

" अस म्हंणतात! की रामचंद अमर आहे. कारण तो भुत, पिशाच्च नसुन खुद एक सैतानी देव आहे.रामचंद हा आतीकृर असुन, बलाढ्य शक्तिवान आहे! हा रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेस बाहेर फिरुन शिकार करु शकतो. उन्हाळा हिवाळा, रात्र दिवस काहीही असो. पण प्रत्येकाला कसल ना कसल भय असतच! रामचंदला ही ते लागु आहे..हा हैवान काळ्या कुत्र्यांना घाबरतो.त्यांच ओरडण, भुंकन, दात काढून गुरगुरण त्याला सहन होत नाही..दुसरे त्याला पावसाला आवडत नाही..

पावसाचे थेंब त्याला अनिवार्य आहेत. हा सैतान कोण्या देवाला घाबरत नाही..! असा वरदानच त्याला तिमीराच्या कालोखी देवाकडून लाभला आहे. ह्याला हरवायच असेल तर एकच पर्याय आहे. तो म्हंणजे रामचंद जेव्हा त्याच्या राक्षसी ट्रक मध्ये बसला असेल. तेव्हा त्या ट्रकचा विस्फ़ोट घड़ायला हवा! ज्याने..तो सैतान अंत तर पावणार नाही..! पन लागलीच पुन्हा नरकात त्याच्या मुख्य घरात खेचला जाईल. हाइवे नंबर 405 मध्ये एक गाव आहे. त्या गावाच नाव 405 आहे. अस म्हंणताच की ह्या गावाला ह्या सैतानाने एक श्राप दिलाय..! तो श्राप असा ! की पंचवीस वर्ष विलेज 405 गायब असते. तिथली घर दार, माणस सर्व काही पंचवीस वर्ष गायब असतात..आणि मग जस हा सैतान नरकातुन आठवडाभरासाठी पृथ्विवर येतो..तेव्हाच ती घरदार, ती मांणस त्या श्रापातुन मुक्त होतात. रस्त्यावरुन जाणा-या गाड्या वाटसरु मोठ्या आश्चर्यकारक नजरेने तो गाव पाहतात. कारण पाहणा-या मोठ आश्चर्य वाटत.की हा गाव इथे कधी वसला? पन तो गाव पाहणारा वाटसरु पुन्हा कधीच, आजतागायत हायवे नंबर 405 ची सीमा ओलांडू शकला नाही.कारण रामचंद तस होऊ दत नाही. "

" व्हॉट !" निल ताडकन आपल्या सीटवरुन उठत म्हंणाला.त्याचा आवाज पुर्णत बसमध्ये घुमला. पुढे बसलेले कॉलेज तरुन-तरुनी त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. जणु कोणि एलियन, किंवा ड्रामेबाज येडा पाहीला असावा.

" सॉरी..! सॉरी..!" निल माफी मागत हळुच पुन्हा सीटवर बसला.

" व्हॉट! म्हंणजे माझी शायना ही आतापर्यंत त्या सैतानाने !" निलच्या डोळ्यांत पाणि जमा होऊ लागला..! थोबाड रडकुंडी सारख झाल..!

शायनाच्या आठवणीने तो आता आपला रडण्याच कार्यक्रम मोठ्या जोरात सुरु करणार की तोच.. मार्शल ने त्याची कॉलर पकडली..व आपल्या दिशेने खेचत म्हंणाला.

 " शांत रहा ! ती ठीके ! तिला काही झालं नाहीये ! "

××××××××××××××××××××

हाइवेच्या रस्त्याबाजुला खाली असलेल्या मक्याच्या शेतात एक फोर्च्युनर बंद पडलेली दिसत होती. मागची नंबर प्लेट असलेल्या जागेचा भाग जरासा चेंबलेला दिसत होता. तिथून पुढे गाडीच्या पुढे गेल्यावर एक तरुनी स्टेरिंगवर डोक ठेवलेल्या अवस्थेत दिसत होती. तिच्या डोक्यावरचे केस पुर्णत चेह-यावर आलेले...म्हंणुनच चेहरा दिसणे अशक्य होत. पन हळूच त्या डोक्याची हालचाल झाली..केस जरासे

हलळे..

"स्स्स्स आ..आई ग...!" शायनाच्या मुखातुन एक वेदनामय सुस्कार बाहेर पड़ला. तिने कपाळाला हात लावुन पाहिल.थोडस खरचटल जात

थोड रक्त आलेल बाहेर. अचानक गाडीमागुन एक काळी सावली पुढे येताना दिसली..! मग ती सावली शायनाच्या ड्राइव्ह सीटबाजूला जाऊन

त्या सावलीने आपला एक हात वर घेऊन थेट काचेच्या दरवाज्यावरऽऽऽऽऽऽ  ठोठावल. अचानक झालेल्या आवाजाने शायना दचकली. तिने गर्रकन वळून काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिल. एक ख्रिश्चन म्हातारी दिसत होती. अंगात एक सफेद काळी मिश्रित

मेक्सि घातलेली. डोक्यावरचे पांढरट केस दोन्ही खांद्यापर्यंत लोंबत होते.आणि तिच्या हातात पाळीव प्राण्याचा पट्टा होता.

त्या म्हातारीला पाहून शायनाला जरासा धीर आला.ती म्हातारी शायनाला गाडीतुन बाहेर ये अस खुणावत होती...घाईघाईत आजुबाजुला पाहत होती...जणु कोणाच्या येण्याची भीती असावी तिला? शायनाने हळकेच दार उघडल..तस त्या म्हातारीने तिचा हात पकडला.

" काहीछ बोलु नको डिकरा! माझे बरोबर माझे घरी छल ! तो हैवान खुळेआम भटकतोय! कोठून कशे येइळ सांगु न्हाई शकत!"

शायनाने न समजून त्या म्हातारीकडे मग तिच्या हाती असलेल्या काळ्या कुत्र्याकडे पाहील..जो की शायनाकडे पाहुन शेपूट हलवत होता..दोन्ही काळे कान एंटीना सारखे फिरवत होता. जणु काही ऐकू येत असाव! कसली तरी चाहूल लागली असावी त्याला. की तोच (भौ, भौ भौ) तो काळा कुत्रा हायवेच्या दिशेने पाहुन भुंकु लागला. जे पाहून ती म्हातारी घाबरली.

" चल, चल डिकरा..चल! तो आला चल !" त्या म्हातारीने शायनाचा हात हाती घेत मक्याच्या शेतातुन घरांकडे एक वाट जात होती..त्या दिशेने पळायला सुरुवात केली. शाय्नाने हळुच मागे वळुन पाहिल..नी तिला तीच काळी ट्रक रस्त्यावरुन मक्याच्या शेतात टर्न घेत ऊतरताना दिसली..मग वेगाने तीच्या दिशेने येताना ही दिसली. तिची ती दोन पिवळेजर्द उजेडाची हेडलाईट, तोच तो भेसूर हॉर्न (पोंऽऽऽऽऽऽऽऽमऽऽऽऽऽऽऽऽ) 

मक्याच्या शेतातुन कणसांना आजुबाजुला फेकत, गोल-गोल लालसर चाक फिरवत, नळीतुन कालसर धुर सोडत ती ट्रक अगदीवेगाने आली..आणि शायनाच्या फोर्च्युनरला एक वेगवान धडक बसली..

मागची डिकी थेट ड्राईव्हसीटशी जुडली गेली..खळ, खळ करत काचा फुटल्या, गाडीचा चेंदामेंदा झाला. दरवाजे तुटुन लुले पांगले झाले.

पन त्या ट्रकला साधीशी खरुजही फुटली नाही. शायनाच्या फोर्च्युनरला धडक देऊन ती ट्रक रिव्हर्स घेत थोडी मागे आली. आणी ड्राइव्हसीटबाजूचा काळ्या रंगाचा सहा फुट आकाराचा उभा दरवाजा हलकेच करकरत उघडला.नी त्या उघड्या दरवाज्यातून जस काळ्या अंधारी बिलातुन एक मोठा फणादारी साप बाहेर यावा त्याप्रकारे

सर्वप्रथम दोन बलदंड फुगीर पांढरट हात दरवाज्यात आले, मग हळुच दोन चौकलेटी रंगाची पेंट पायात चकचकीत बुट हवेतुन पुढे येत..

रामचंदने दरवाज्यातुन थेट खाली जमिनीवर उडी घेतली. त्याच्या चकचकीत काळ्या बुटांच्या स्पर्शाने खालची माती वर हवेत उडाली.

" पळून, पळून कूठ पळणार म्हातारे ! आज तुला बी मारणार मी सोडणार नाही कुणालाच! मयत पसरवील पुर्णत गावात ! एकेकाच्या घरात मडक फोडिल...! सुतक लावील आठवडाभरात संमद्या गावाला..हिहिही." रामचंद आपले काळे मसेरीचे धारधार दात दाखवत हसु लागला.

क्रमश :