Haiwan a Killer - 3 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | हैवान अ किलर - भाग 3

The Author
Featured Books
Categories
Share

हैवान अ किलर - भाग 3

भाग 3

एक काळ्या रंगाचा निर्मनुष्य लांबच्या लांब पसरलेला हायवे दिसत आहे. हायवेच्या दोन्ही बाजुला दुरदर पर्यंत पसरलेली तप्त वाळु दिसत आहे. हवा सूटू लागली की ती तप्त वाळू सोनेरी चमकील्या रंगासहित हवेत उडत आहे. त्या वाळवंटा मधोमध एक दुर पर्यंत सरळ रेषेत पुढे गेलेला- दोन सरळ पट्टयां चा हायवे दिसत आहे.त्याच हायवेच्या रस्त्यावरुन एक सोनेरी रंगाचा खवळेधारी सरडा, ज्याचे डोळे जरासे सोनेरी, डोक्यावरुन खाली शेपटीच्या शेवटच्या टोकापर्यंत टोकदार काटे शरीरातुन उगवलेले दिसत होते. आणी हाच सरडा हळूच हायवेच्या एकाबाजूने दुस-या बाजुला जाण्यासाठी निघाला होता. अचानक त्या सरड्याच्या आजुबाजुला हायवेवर पसरलेले लहान-काळे दगड, वाळु भुकंप आल्याप्रमाणे कंपण पावले जात थरथरायला लागले.! तस त्या सरड्याने कसलीतरी चाहूल लागल्यागत गर्रकन मान वळवुन डाव्याबाजुला पाहिल , की तेवढ्यात त्याच्या लहानसर डोळ्यांना एक काला टायर अगदी भिंगरीसारखा पुढुन येताना दिसला.तसा तो सरडा जीव वाचवाचवण्यासाठी काही हालचाल करणार, तो पर्यंत तो काला टायर त्याच शरीर चेंदामेंदा करत त्याला गतप्राण करुन सोडून गेला होता. शायना अद्याप ड्राइव्ह सीटवर बसली होती. हो हो तिच्याच गाडीने उडवल होत सरड्याला! शायनाच्या गाडीच स्पीड प्रतितास शंभरच्या पुढे होत. एका बंदूकीच्या नळीतुन जशी गोळी निघावी तशी फोर्च्युनर सरसर हवेला चिरत रस्ता कापत होती. बाजूचा निर्मणुष्य स्मशान शांततेचा वाळवंट तिच्या गाडीला पुढे पुढे जाताना पाहत होता.

शायनाने ड्राईव्ह करता-करता स्मार्ट वॉचमध्ये पाहिल. आताची मैन-वुमन लहान-लहान मुलांच्या हाती स्मार्ट वॉच घालण्याची क्रेझ उफाळून वर आली आहे! नाही का? तसे म्हंणायला त्याचे फायदे ही खुप आहेत.

शायनाने स्मार्ट वॉचमध्ये पाहील त्या चौकोनी आकारात सफेद अंकांत

3:45 pm अशी वेळ दाखवली जात होती. तो ट्रक पुढे निघुन जाताच

तिने दोन गियर पुन्हा शिफ्ट केले होते आणी गाडीला धार लावली होती.

आतापर्यंत तरी तो ट्रक नजरेस पडला नव्हता.आणि देव करो पड़ायलाही नको, अस शायनाच्या मनाला वाटत होतं. 

शायनाच सर्व लक्ष एकटक पुढे होत. गाडीच वेग स्पीडोमीटर मध्ये 180 किमी दाखवत होत. दोन्ही हातांनी स्टेरिंगला पकडून आरती ओवळावी तशी स्टेरिंग ती फिरवत होती. तिच्या नजरेला आता समोर एक निळ्या रंगाचा फळा दिसुन येऊ लागला. ज्यावर मराठित नावे आणि किमी अंतर दाखवल गेल होत. डोक्यावर येणारे केस बाजूला सारत तीने फळ्याकडे पाहिल.टपो-या अक्षराने सफेद रंगात लिहिलेली दोन नाव स्पष्टपणे दिसून येत होती.

हायवे 405 विलेज: 10 कीमी

सीटी: 90 कीमी

" हायवे 405 विलेज ?" शायना स्व्त:शीच म्हंणाली.कारण अस काही तिने ऐकल नव्हत. हायवे नंबर 405 वर कोणतीही विलेज, रेस्टॉरंट, हॉटेल नाहीत, मग विलेज ?

" ठिके, असली एखादी विलेज, तर तिथे रेस्टॉरंटस ही असतील..मफथोडफार खायला ही घेऊयात!"

शायना स्व्त:शी मनात म्हंणाली. मग तीने एका हातात स्टेरिंग पकडून पुढे पाहतच दुस-या हाताने पाचवा गियर शिफ्ट केला. तसा वेगाने तो निळा फळा ज्यावर सफेद अक्षरांत नावे लिहीली होती..तो मागे निघुन गेला.

×××××××××××××××××××

मोबाईल फोन मध्ये डोक खुपसून निल एका चारफाट्यावर उभा होता.

त्याच्या आजुबाजुला चार रस्ते दिसत होते. एक सरळ रस्ता तोच रस्ता खालून वर, आणी त्यालाच जोडून दोन रस्ते डावी-उजवीकडे वळत होते. एक बेरीज चिन्हासारख होत चारफाटा. त्या चारफाट्याच्या अवतीभवती जंगल होत. हिरव्या गार मोठ-मोठ्या झाडांची मैफिल रंगली होती तिथे. जंगलातुन कधी कोकीळेचा तर कधी केव्हाना टिटवी ओरडण्याचाही आवाज येत होता. निल ला आठवल टिटवी ओरडणे हा अशुभ संकेत असत. एका भयकथा वाचकाला इतक तर ठावुक असतच ना? पन निल तर कट्टर समर्थक होता झोमटे क्रिएशनच्या स्टोरींचा..

त्याची रोज एक स्टोरी वाचायची नेहमी ठरलेली होती..आणी आजही, आता ह्याक्षणी तो तेच करत होता. त्याने झोमटे क्रीएशनची हॉरर ट्रिप ही कथा वाचायला घेतली होती..आणि वाचण्यात तो इतका दंग झाला होता, की आपल्या समोर एक बस येऊन ऊभी राहीली आहे हे सुद्धा तो विसरलेला.अर्थातच ती बस लब्दी ट्रेव्हल्सची होती.आणी बसच्या दारात उभ राहून एक माणुस निल ला आवाज देत होता. आवाज देत होता म्हंणण्या पेक्षा ओरडत होता हे म्हंणन मी पसंद करेल.

" ओ साहेब !" एक मोठा आवाज आणि अंगावर आलेला काला जाडजुड हात. निल घाबरुन दचकलाच..काहीक्षण काय झाल? काय नाही? आपण कुठे आहोत? हे निल ला कळायला, दहा-वीस सेकंद जाऊ द्यावे लागले, मग तो समोर उभ्या बसच्या दरवाज्यात उभ्या मांणसाकडे पाहत बोल्ला.

" लब्दी ट्रेव्हलस!"

" हो साहेब ! मैडम ने सांगितल होत, तुमच्याबदल! या आत !"

तो बसच्या दारात उभा माणुस खुप मोठ्याने बोल्ला. त्याला वाटल असाव, की हा माणूस कानाने कमी ऐकू येणारा आहे ! कारण एवढ वेळ आवाज देऊन ही हा आपल्याकडे पाहत नव्हता ! आणि हात लावताच वर पाहील. म्हंणुनक्ष त्या मांणसाचा समज झाला की हा नक्की बहिरा असावा. परंतु त्या माणसाचा समंज सपशेल अतर्कणीय होता. दिसत तस कधीच नसत. आज विज्ञान युगात जगणा-या माणवाने आपण दुस-या पेक्षा जास्तच श्रेष्ठ, बुद्धीमान, हुशार अहोत अशी कृल्पती अविचारी कल्पना अंगी जोपासुनच टाकली आहे. समोरचा माणूस फक्त दुस-याकडे पाहून जरासा हसला तरी मनात विचार येतात.

" अरे हा वेडा आहे का?" बरोबर ना ? तसंच त्या मांणसाला निल विषयी वाटल.

" ओ भौ इतक ओरडताय कशाला ? मी काही बहिरा वगेरे नाहीये ! मी हे कथा वाचत होतो." निल ने आपला काळा(स्मार्ट) फोन त्या माणसाला दाखवला "आणी त्यात जरा जास्तच बिझी झालेलो..म्हंणुन ऐकू गेल नाही!" निल अस म्हंणतच बसच्या पायरीवर चढला.

" माफ करा साहेब ! कस ये खुप वेळ झाला आवाज देत होतो." तो माणुस मोठ्या आदबीने म्हंणाला. त्या स्वभाव आणि आपुलकीच बोलण पाहून, निल ला बर वाटल.

" अहो नाही ओ दादा ! मला काही राग वगेरे आला नाही ! आणि नाही मी रागीट स्वभावाचा आहे ! बर ते जाऊद्या !" निल ने विषय बदलल.

" तुम्ही कोण? ह्या बसचे कंडक्टर का?"

" नाही ओ भौ ! मी ह्या बसचा ड्राईव्हर!"

" काय ?" निल मोठ्याने ओरडलाच.." मग बस कोण चालवतय?" निलने एक कटाक्ष बस मध्ये टाकला. तसे त्याला दिसल. बसमध्ये असलेल्या लाल रंगाच्या मऊ, लुसलुशीत सीटवर काही तरुन-आणि तरुणी बसलेल्या.प्रत्येक तरुणाच्या अंगावर टी-शर्ट, जीन्स. काळ, लाल, टोपी असलेल कोट, हातात छपरी स्टाइल कडे! डोळ्यावर रंगीबेरंगी चष्मे, कोंबड्यासारखे रंगवलेले केस! आणि मुलांच्या अंगावरही स्कर्ट, टी-शर्ट जीन्स. कुर्ते, डोक्यावरचे अर्धे केस काळे, तद अर्धे सोनेरी, गुलाबी, रंगाने रंगवलेले. 

" बापरे इथे तर कॉलेज भरलय!" निल स्व्त:शीच म्हंणाला.तस म्हंणायला त्या कॉलेज तरुणांच आणि त्याच वय पाच-सहा वर्षाच फरक होत! कारण तिथे बसलेल्या तरुणी डोळे फाडून त्याच्याकडे पाहत बसलेल्या. निल तसा दिसायला होताच हेंन्डसम, गोल बिन दाढीचा चेहरा, बारीकसे डोळे, डोक्यावरचे केस मागे चोपुन बसवलेले, अंगात एक काळी फुल बाह्यांची टीशर्ट घातलेली ज्यावर-गळ्यापासुन ते खाली कमरेपर्यंत एक शेल्ड होत. आणी खाली एक ब्लैक जीन्स घातलेली, पायांत काळे शूज होते. हातात एक महागडी वॉच होती. अंगावर मारलेल्या रियल मैन सेंटचा वास तरुणींच्या नाकात जाऊन त्यांना आकर्शीत करुन भुरळ पाडत होता.

"भौ! मागे शेवटच्या सीटवर एक दादा बसलाय त्यांच्या बाजुलाच तुमची सीट आहे! कस ये. पुढे कॉलेजची पोर आहेत ना !"

" काही हरकत नाही दादा ! चालतय." अस म्हंणतच निल मागे बसण्यासाठी जाऊ लागला. डाव्या उजव्याबाजुला तरुन-तरुणी मिक्स होऊन बसलेले. पहिल्यासारखी परंपरा आता राहीली नव्हती.गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड् रुल आस्तित्वात आल होत. काही तरुण मुलांचा आपल्या जोडीदारासमवेत चाला चालला होता. प्रेमाने गुलुगुलु चेटिंग सुरु होती. निल ते सर्व पाहत चालला होता.

" ए तो बघ ! कसला चिकणा दिसतोय."

" आई शप्पथ ! याच्या सोबत माझ लग्न झालंना लाईफ सेट होईल."

निल दोन्ही बाजुच्या सीटमधुन मागे जात असताना मुली त्याच्याकडे पाहून खुसपुसत होत्या.स्माईल देत होत्या. आपली भावना आपल्या मैत्रिणीला सांगत होत्या.आणी ते ऐकून निलला शायनाची अगदी कडेलोट, आठवण येत होती.कारण त्या दोघांच्या प्रेमाची लव्ह स्टोरी ही काही अशीच होती ना! कॉलेज पासूनच प्रेम होत त्यांच. निल ला आठवl 

अशीच एकदा त्यांच्या कॉलेजची सहल निघालेली.

आणी मग त्या सहलीच्या ठिकाणी पोहचल्यानंतर, जेवन वगेरे झाल्यानंतर सर्व तरुन-तरुणी गोल घोळका करुण, आणि मधोमध शेकोटी पेटवुन बसलेल्या, आणि त्याचवेळेस निळ एक गिटार वाजवत गाणे म्हंणत होता. शेवटी गाण्याच्या शेवटच्या ओळीस त्याने गुढघे टेकवुन अगदी फिल्मी स्टाईलने शायनाला प्रपोझ केल होत..मग तिनेही हसत होकार दर्शवलेला. शेवटी एकदा कल्पनायुक्त आठवणींच्या चित्रप्रवाहासहित निळ आंतिम सीटपर्यंत पोहचला. तसे त्याला दिसल..की समोर एक माणूस बसला आहे. ज्याच्या अंगावर एक काळा सुट, कोट आत एक सफेद शर्ट, गळ्यात टाई, डोळ्यांवर काला चौकोनी फ्रेमचा चष्मा, हातात ब्रेंन्डेड वॉच, खाली काळी पेंट, पायांत काळे चकचकीत बुट. दिसायला एकदम एका स्पाईसारखा दिसणारा हा माणुस निलच्या मनात कुतूहलाचा विषय होता.

×××××××××××××××××

 

क्रमश :