हैवान अ किलर
लेखक -जयेश झोमटे
खाऊ का रे तुला?
भाग 1
कथा सुरु होण्या अगोदर.
तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा ! ���������
गणपत्ती बाप्पा मोरया.���������
.....
एन गरमीचे दिवस दिसून येत होते, कारण आकाशात तांबड्या रंगाचा गोल सूर्य तळपत बसलेला. आणी अगदी बेभान होऊन. एका खुळ्यासारखा.. प्रचंड प्रमाणात खाली भुतळावर उष्णतेचा मारा करत होता. अंगाची कशी लाही लाही होत होती. बाजुलाच खाली एक दुर दुर -पर्यंत पसरलेला हायवे दिसत आहे, हायवेच्या दोन्ही बाजुला अगदी भक्कास अस सोनेरी वाळूच निर्मनुष्य वाळवंट दिसत आहे. त्या वाळवंटात काही काटेरी केप्टसची, तर कुठे सुखलेली मृत लुकडी झाडे दिसत आहेत. तर कुठे काही मोठ मोठ्या दगडी घरांची भग्न अवस्थेतलली सांगाडे दिसत आहेत, जणु तिथे पुर्वी मानवी वस्ती असावी?
हायवेच्या मधोमध उभ राहून समोर पाहता दुर पन्नास -साठ मीटर अंतरावरुन एक काळ्या रंगाची फोर्च्युनर वेगाने पुढे-पुढे येताना दिसत होती. गाडीच स्पीड जेमतेम शंभरच्या रोखाने लादलेल होत. कारण पन्नास मीटरच अंतर कापुन ती गाडी, हवेचा विशिष्ट प्रकारचा आवाज
करत पुढे निघुन सुद्धा गेली होती. सुनसान हायवे ! त्यातच जास्त करुन पोलिस अशा हायवेंवर कमीच असताच ! मग ड्राईव्हर्सच्या अंगात रेसर नावाच भुत घुसत! नाही का? पन ह्या रेसरमुळे जगभरात दिवसाच्या सेकंद काट्यागणीक एक अपघात होत असतो! हे वाक्य वाचत असतांनाही कोठेतरी, कोण्या हायवेवर एक अपघात घडला असेल ! किती भयानक गोष्ट आहे ? नाही का? बर पुढे पाहुयात!
त्या फोर्च्युनर गाडीआत एक तरुणी बसली होती. गौर वर्ण चेहरा, डोळ्यांवर काळा चष्मा, डोक्यावरचे केस मोकळे सोडून दिले होते.जे की गाडीची काच खाली असल्याने उडत होते. तिच्या अंगावर एक पांढरा शर्ट, खाली ब्लैक जीन्स पेंट होती. दिसण्यावरुन ती एक बिजनेसवुमन वाटत होती. दोन्ही हातांनी धरलेल्या तिच्या गाडीच्या स्टेरिंग खाली, स्पीडमीटरवर एकशेवीसचा स्पीड दिसुन येत होता. बाजुला खाली चार गियर शिफ्ट केलेले दिसत होते.
हवेला लाजवेल अशी गती पकडून गाडी रस्ता कापत होती. की तेवढ्यात त्या महिलेचा फोन वाजु लागला. फोनचा आवाज पुर्णत गाडीत घुमला, कारण फोन गाडीत असलेल्या साउंड ब्ल्युटूथ वर कनेक्ट होता. ब्लुटूथ म्हंणजे एक हॉटस्पोटच समजा, पन जरास वेगळ असत.ब्लुटूथ मार्फत, आपन आपल्या मोबाईल वरुन इमेज, व्हिडिओ,
सोंग, इत्यादी दुस-या समवेत शेयर्स करु शकतो. आताच्या युगात ब्ल्युटूथने, इंटरनेटच्या ह्या स्मार्ट युगात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षांत अलिकडेच वायरलेस हेडफोन्स घालण्याची स्टाईलीश क्रेझ, फिल्मी जगामार्फत तरुणांमध्ये प्रचंड वेगाने पसरली-पसरत आहे. जो तो पाहाव कानांत हेडफोन्स घालून फिरताना दिसत आहे. आणी ह्याच क्रेझचा फायदा उठवून..काही हेडफोन्स कंपन्यांनी ब्ल्युटूथ कनेक्टीवीटी असलेले हेडफोन्स तैयार केले. ज्यांना बाजारात मोठ्या संख्येने विक्री होताना दिसत आहे. ह्यात ब्ल्युटुथचा फायदा असा! की वायरलेस हेडफोन्स एकमेकांत अडकतात, दरवेळेस त्यांची अडकून बसलेली गाठ सोडावी लागते.परंतु ब्ल्युटुथ कनेक्टीवीटी वर असा त्रास होत नाही. बस्स आता कथेकडे जाऊयात!
वाजत असलेल्या फोनला तीने टच करत रिसिव्ह केल.
" हेलॉ! " ती इतकेच म्हंणाली.
" हाई, बेबी ! पोहचलीस ?" तो आवाज पुर्णत गाडीत घुमला.
" नाही रे! अद्याप ( हायवेवर नंबर 405) वर आहे !" ती पुढे रसत्याबाजुला दिसणा-या निळ्या फळ्यावर दोन सेकंद पाहत बोलली. मग तो निळा फलाही समोरुन वेगाने मागे निघून गेला.फोन मधुन येणारा आवाज नक्कीच तिच्या बॉयफ्रेंड्सचा होता! तुम्हाला काय वाटतं?.
" काय?" त्या तरुणीच्या वाक्यावर समोरुन आश्चर्यकारक उद्दार बाहेर आला.
" तु अजुनही आर:एस 405 हायवेवरच आहेस ! अंग दुपारचे तीन वाजले आहेत ? आणि तुला तो हायवे पार करण्यासाठी कमीत कमी पाच तास लागणार आहेत! आणी मी ऐकलय की रात्री त्या हायवेवर काहीबाही विचित्र असमंजस घटना घडतात! " फोन मधुन येणारा अवाज काहीक्षण थांबला व म पुन्हा एकदा ऐकू आला
" हे बघ शायना ! तुला लवकरात लवकर त्या हायवेवरुन बाहेर पडायचय!कळल? " तो येणारा तरुण पुरूषाचा आवाज जरासा चिंतेच्या स्वरातला होता. आणी त्या तरुणीच नाव शायना होत.बर का?
" निल ! तु खुप काळजी करतोस रे! इतक टेंशन घेऊ नकोस! तुझ्या तब्येती साठी ठिक नाही ते!" शायना बोलली.
" शायना मला काहीही झालेल नाहीये ओके. आई एम फाईन.
तरीही मी तुला बोलत होतो ? नको जाऊस एकटी मी येतो सोबत
पन नाही न! तु माझ काहीही ऐकत नाहीस!"
" ओह माय गॉड! ह, ह, ह, ह!" शायना हसू लागली.
" काय ग, काय झाल ?" निळने समोरुन पुन्हा काळजीपूर्वक तपासणी करत विचारल.
" अरे किती काळजी करतोयेस ! आज प्रेम जरा जास्तच उतू जातय नाही का !"
तिने दोन्ही ओठ मूडपले, व गालातल्या गालात हसू लागली.
" अस काही नाहीये. ओके ! मला फक्त त्या आर.एस हायवे नंबर 405
बदल काही भीतीदायक अफवा समजल्या आहेत, म्हंणुनच जराशी काळजी वाटतीये!"
" अच्छा !" शायनाने हळुच ओठ सरळ केले. नाकावर जरासा राग उमटला.ती पुढे म्हंणाली.
" आणि ह्या भीतीदायक अफवा कोठे समजल्या रे तुला?" तिने एक भुवई हळकेच उंचावली.
" अब..अब्ब्ब..!" समोरुन काहीच उत्तर आल नाही, फक्त चलबिचल झाल्यासारखे शब्द बाहेर पडू लागले मग काहीवेळाने आवाज आला.
" हां आल लक्षात, अंग न्यूज पेपर मध्ये पाहील " निलच्या ह्य वाक्यावर
शायनाच्या रागाचा पारा चढला, तिने ओठांचा चंबू बनवला.
" कोणत पेपर झोमटे क्रीएशन का?" ती नाकावर राग घेत पटकन बोलली.
" हो ! तुला कस कळल ग ?" निळचा पटकन आवाज आला. तसा शायनाचा रागाचा पारा चढला.
" निळ, वेड्या! तु मला वेयडी समजतो का?" शायनाचा आवाज चढला." तु कधी आयुष्यात साध देवाच पुस्तक वाचल नाहीस, आणी पेपर वाचणारेस! तु ना त्या भयकथा लिहीणा-या जयेश झोमटेच्या भुतांच्या स्टोरी वाचुन वेयडा झाला आहेस ! आणि आता माझ्या मरणावर टपळा आहेस! पण एक लक्षात ठेव इतक्यात मरणार नाही मी! मरायच असेल तर तो झोमटे क्रियेशन वालाच मरु दे! मेल्या आकार माxxयाने ! वेड लावुन ठेवलय नुस्त तुझ्या डोक्यात!" शायना रुद्रावतारात म्हंणाली.तिचा एक एक वाक्य सरसर करत फोनवर आदळत होता..आणी निळच तोंड बंद करत होता. समोरुन काहीच उत्तर येत नव्हत..! जणु फोन ठेवल असाव!
" ह्या झोमटे क्रीएशनवाल्याला ना! एकदिवस पोत्यात भरुन..!"
शायना दात ओठ खात स्व्त:शीच बोलत होती..की तेवढ्यात तिची नजर पुढे थोड डोक्यावर असलेल्या आरश्याच्या काचेवर गेल. त्या काचेतुन काहीवेळा अगोदर मागचे रिकामे सीट आणि मागचा रिकामा रस्ता दिसत होता. पन आता त्या रस्त्यावरुन म्हंणजेच मागुन एक मोठा पिवळ्या रंगाचा ट्रक येताना दिसत होता..हळू-हळू वेग वाढवत तो ट्रक शायनाच्या गाडी जवळ येताना दिसत होता. ट्रकच पुढ़च भाग काळ्या रंगाच होत. इंजिन असलेल्या पिवळ्या पेटीवर एक लाल रंगाच्या घुबडाच वटारलेल्या पिवळेजर्द खूनशी डोळ्यांच, बाकदार नाकाच, आणि वाकड चोच असलेल मोठ टेटू, चित्र लावलेल होत. दोन्ही हेडलाईटस सेकंद-सेकंदाला चमकुन बंद चालू होत होत्या. दोन टायर्स मधोमध- 405 नंबर प्लेट असलेल्या खाली काही एका रांगेत साखल्या लावलेल्या ज्या हालत असुन त्यांचा एकमेकांच स्पर्श होऊन अभद्र आवाज होत-होता. शायनाने एकवेळ ट्रक ड्रायव्हरच्या जागी कोण आहे हे पाहायच ठरवल, परंतु निष्फळ प्रयत्न.कारण काच काळ्या रंगाची होती. जणु काच नसुन अघोरी, जळमट कोळ्या कोष्टीकांचा अंधार उभारला होता, चिकटला होता काचेवर. आजुबाजुचा परिसर पुर्णत स्मशान परिवर्तित होता. त्यात ही भयाण दिसणारी ट्रक! शयानाच्या डोक्यात टचकन आठवण उमटली. ती असंच निळबरोबर एकांतात असताना..निळ झोमटे क्रीएशनची सीरीयल चेटक्याच जंगल सीजन दोन टिव्हीवर पाहत होता. दोन मांणस शहरात काम करत असतात आणी दर वर्षात सहा माहिने काम करुन झाले! की काहीदिवसांसाठी आपल्या गावी घरी राहयला जात असतात.नेहमीप्रमाणे ते ओळखीच्या रिक्षाने गावी जायला निघतात, पन अचानक एन जंगलात रिक्षा बंद पडते..आणी सुरुवात होते..एका विलक्षण थराराला..! एक भुत ट्रक त्या दोघांचाही कसा जिव घेते ते आठवुन शायनाच शरीर नखशिखांत हादरु लागल की तेवढ्यात एक भयाण मनात पोकळी निर्माण करणारा हॉर्नचा आवाज आला.( पोंम्मम). तो आवाज ऐकून शायनाच काळिज काहीक्षण वेगाने धडधडल, संब्ंध शरीराला धक्काका बसला, कानसुळ्या गरम झाल्या !भीतीने पोटात गोळा आला. हात स्टेरिंगवर ठेवत तीने वळुनच मागे पाहिल तर तिला एक धक्काच बसला...कारण ती ट्रक मागच्या डीकी पासुन फक्त पाच-दहा मीटर अंतर राखून होती. जर थोडीशी पुढे आली असती तर? धडक बसलीच असती! नाही का? पण त्या ड्राईव्हरला अक्कल नाही का? एवढ्या जवळ ट्रक आणण्याचा त्याचा हेतु काय होता? की कोणी विकृत, बावळट वेडा बसला होता ड्राईव्हसीटवर?
शायनाला काहीक्षण निघुन गेल्यावर, भीती कमी आणी त्या ट्रक ड्राईव्हरचा राग जास्त येऊ लागला, पण तिने स्व्त:ला आवरल..कारण रस्ता अजाण होता, पुढे आजुबाजुला फक्त वाळु, काटेरी झुडप होती.जर वाद घातला आणि त्या ड्राइव्हरने काही अश्लील वागण करायला सुरुवात केली तर? वेडवाकड प्रसंग उद्भवणार नाही कशावरुन? नाहीतर रागाच्या भरात त्याने आपल्याला मारल तर? मारल्यावर आपली बॉडी ह्या वाळवंटातल्या सोनेरी वाळूत पुरुन ठेवली तर ? कोणाला काय समजणार आहे? इकडूनची खबर तिक्डे लागणार नाही! म्हंणूनच तिने जरा नरमीत घेत एक हात उघड्या खिडकीतुन बाहेर काढुन त्या ड्राइव्हरला पुढे जाण्यासाठी खुनावल.दोन गियर हळकेच उतरवले. तसा मागचा तो ट्रक हळुच तिच्या फोर्च्युनरला ओव्हरटेक करत पुढे निघुन जाऊ लागला. शायनाने त्या लाल रंगाने रंगवलेल्या ट्रकच्या लाकडी दरवाज्याच्या उघड्या चौकोणी खिडकीतुन आत पाहील. तेव्हा तिला फ्कत येवढच दिसल, ड्राइव्ह सीटवर एक पांढ-या वाढलेल्या केसांच डोक, आणि अंगाची त्वचा राखाडी असुन अंगावद काहीही घातल नव्हत! ती ट्रकची पुढची बाजू पुढे निघुन गेली तसा जाता जाता त्याच्या ट्रकच्या नळीतुन काळसर धुर शायनाच्या नाकातोंडात कोंबला गेला..
त्या वासाने शायनाच डोक काहीक्षण अक्षरक्ष गरगरल ती तोंडावाटे खोकली. तो पर्यंत तो ट्रक पुढे निघुन गेला होता. मग तीने हळुच त्या ट्रकच्या मागे पाहिल. मागच्या दोन लाल लाईटस पेटलेल्या आणि लाईटस खाली अडकवलेल्या हलणा-या दोन पत्र्यांवर लाल रंगात नाव लिहील होत. एकावर राम तर दुस-यावर चंद..
ज्या नावाला पाहून शायना रागातच पुटपुटली.
" फ़क यू रामचंद !" अस म्हंणतच ती उघड्या खिडकीतून बाहेर थुंकली.
तो ट्रक पुढे निघुन गेला.
क्रमश:
लेखक -जयेश झोमटे
कथा : हैवान अ किलर