Kaay Nate Aaple? - 17 - Last Part in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | काय नाते आपले? - 17 - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

काय नाते आपले? - 17 - अंतिम भाग

अभि आणि मितु च्या लाईफ मध्ये खूप अडथळे पार करून आनंदाचे क्षण आलेले... आणि ते दोघे सुद्धा ते अनुभवत होते.... लग्न होऊन दोन दिवस झालेले , धावपळीत झालेलं लग्न त्यामुळे सगळेच थकलेले होते...!!

अभि आता हनिमून ला जाण्याची तयारी करत होता.. कारण त्याला मितु सोबत जरा निवांट वेळ हवा होता.. खूप रुसवे फुगवे झाले.. आता फक्त प्रेम हवं होत , एकमेकांना समजून घ्यायचं होत त्यांच्या नात्याला त्याला अजून जास्त क्लोज आणायचं होत...!! मिताली वयाने त्याच्याहून लहान जरी असली तरी तो तिच्यावर कसल्याच प्रकारचं लोड येऊन देणार न्हवता.... ना कि तिच्यावर काही जबरदस्ती करणार होता....!!

....
.........

अभि ची सकाळ मितु च्या मिठीत झाली होती...

( नेहमी हिरोईन ची सकाळ हिरो च्या मिठीत होते.. 🤭 इथे उलटंच... 🥲 )

तो तिच्या छातीवर डोकं ठेवून झोपला होता , ति अजूनही झोपली होती, त्याने हळूच तिच्या ओठांवर किस केल आनी तिला घट्ट मिठी मारत पुन्हा झोपून गेला....!!

...
.....

सकाळचे 10 वाजून गेलेले आणि हे नवरा बायको अजूनही उठले न्हवते...!! आईनी दरवाजा ठोकून मिताली आणि अभि ला आवाज देत होत्या....

मिताली.... अभि......

पण दोघांचा पण काहीच रिस्पॉन्स येत न्हवता , आई शेवटी कंटाळून निघून गेल्या.. त्या पन समजलेल्या आताच लग्न झालय दोघांचं.. त्यामुळे त्या पण समजून गेल्या...

( पण त्यांना काय माहित... 🥲 त्यांचा हनिमून झालंच नाही... 🥲 )

थोड्यावेळाने मिताली ला जाग आली..... तिने समोर घड्याळात पहिलं तस ती ताडकन उठली.... पण पोटावर अभि चा हात होतंच......


" ईईईई... अभि उठा..... 10:30 वाजत आलेत आणि आपन दोघ अजून सुद्धा झोपुन आहोत... शीट यार असं कस मी सुद्धा इतक्या वेळ झोपू शकते... " मिताली चिडचिड करतच बोलत होती.....

" यार मितु.... झोप तू आणि मला पण झोपूदे.... " एकतर या दोन दिवसात जामच थकलोय मी... मला आरामाची गरज आहे...

अभि झोपेतच बोलत होता.... मितु डोळे गोल फिरवत उठून पटकन बाथरूम मध्ये पळून गेली...

...
.....

अभि उठा कि..... माझं आवरून सुद्धा झालय आणि तुम्ही अजून झोपला आहात, आई बाबा काय बोलत नाही म्हणून इतका आळशी पणा बरा नाही.....

मितु अभि ला उठवतचं बडबड करत होती...!! शेवटी कंटाळून ती खाली गेली....

तिला थोडं विचित्रच वाटत होत... ती इतक्या वेळ झोपा काढत होती...

" आई... काय जेवण बनवायचं आहे... " मितु

" अग.... आलीस तू , अग मी जेवण बनवलं आहे.. " आई हसतच तिला म्हणाल्या...

" अहो आई मी बनवलं असत कि.... उठवायचं होत तुम्ही मला.... " मितु....

" अग राहूदे.... बनवलंय मी , तू जा रूम मध्ये आणि अभि ला उठव.... आळशी झालाय कि नुसता तो......." आई..

कधी न्हवे ते मितु ला आनंद झाला होता... 🤭 जेवण नाही बनवायचंय..... ती खुशीतच रूम मध्ये आली....

अभि आधीच उठून बसलेला.....

" तू तुझी बॅग पॅक करून ठेव आपण आज रात्रीच जाणार आहोत..... " अभि....

" कुठे......... " ती सुरु लावत त्याला विचारत होती....

" honeymoon " अभि तिला डोळा मारत म्हणाला...

" खरंच.... पण जाणार कुठे आहोत आपण?? 🌝 " मिताली एक्सायटेड होत म्हणाली....


" गोवा.... " या टाईम आपण इथेच जाऊ next टाईम आपण out ऑफ इंडिया जाऊ... अभि....

" पण आता का नाही..?? " 😒

" तुझं कॉलेज माझं ऑफिस... खूप सुट्ट्या झाल्यात आणि आपण 2 दिवसात रिटर्न येतोय...... Monday पासून तू तुझ्या वाटेने मी माझ्या.... " अभि...

" ठीक आहे... 😏 "

चलो... 🤭 दोघांना जाऊ देत हनिमून ला..