Unexpected Love - 2 in Marathi Love Stories by saavi books and stories PDF | Unexpected Love - 2

The Author
Featured Books
Categories
Share

Unexpected Love - 2

रूद्र आर्या

धप्प!!! धप्प!!! धप्प!!!

रूद्र त्याच्या रूममध्ये असलेल्या पंचिंग बैग वर एकात एक वार करत स्वत:चा राग कमी करण्याचा प्रयत्न करत होता....

" काय गरज आहे त्या मुलीला इथं घेउन येण्याची... मॉम ला माहित आहे... नाही आवडत ती मला मग का ??", तो मोठ मोठे श्वास घेत स्वत:ला च रागाने म्हणाला...

" काही वर्षा पूर्वी... तिच्या मुळेच मला आर्मी मध्ये जाता आलं नव्हतं .... पुन्हा प्रयत्न केल्यावर मी माझी जागा निर्माण केली आर्मी मध्ये... पं तरिही शेवटी सोडून आलो.. किती खोडकर स्वभाव आहे तिचा... कधी कोणा मुलीवर मी हात उचलला नव्हता... पण त्या दिवशी तिने मला भाग पाडले तिच्यावर हात उचलायला... तेव्हा पासून मी कधी तिच्याशी बोललो नाही.... 10 वीला असताना ठरवलं होतं की आर्मी जॉईन करेन... graduation नंतर परीक्षेची तयारी करत होतो... नेमकं मला तिच्यामुळे परीक्षेला जाता आलं नाही... तेव्हा पासून तिच्याबद्दल राग आहे मनात.. कोणाच्या मेहनतीची त्या मुलीला कदरच नाही... अशी मुलगी नकोच मला माझ्या घरात...",
असं म्हणत तो पुन्हा रागाने punching bag वर वार करतो....

●●●●●●●●●●●●

दुसर्या दिवशी सकाळी रूद्र ला जाग येते ती 5 वाजता.... रात्री उशिरा झोपला होता तरी जाग मात्र त्याला वेळेवर आली... एवढी वर्षे आर्मी मध्ये काढल्यानंतर त्याला सकाळी लवकर जाग यायची... त्याला कधी अलार्म लावून उठायची गरज भासत नव्हती..

जाग येताच तो त्यांच्या घरात असलेल्या जिम मध्ये जातो... त्याचा मूड अजुनही तसाच असतो... gloomy !!! आर्या चा विषय त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता..

तो तसाच धुसफुसत एक्सरसाइज करतो... एखाद तासाने.. तो त्याच्या रुम मध्ये फ्रेश व्हायला जातो... फ्रेश होऊन तो लिविंग हॉल मध्ये जातो... त्याचे मॉम dad आणि भाऊ डाइनिंग टेबल वर बसले होते.... तोही येऊन तिथे सिध्दार्थ च्या बाजूला बसतो... तो त्याच्या मॉम डैड शी बोलतच नसतो... कारण त्याला त्यांचा आर्या ला घरी आणण्याचा निर्णय त्याला पटला नव्हता... त्याच्या मॉम ने त्याला ब्रेकफास्ट serve केला.. तो ही गपचुप खाऊ लागला... त्याच्या मॉम ने नाही मध्ये मान हलवली....

सिध्दार्थ शांतच होता... त्याला रूद्रचा रुद्रवतार चांगलाच माहित होता... त्यामुळे त्याने शांतच राहणे पसंत केले...

" रूद्र... आर्या इथे कायमची राहणार नाही आहे... फक्त एकच महिना ती इथे असेल... तिने घर घेतले आहे इकडे पण त्या घराचे काम चालू आहे... ते संपायला एक महिना लागणार आहे... आर्या कॉलेज मध्ये प्रोफेसर आहे... तिला ईकडेच जॉब लागला आहे.. आणि पुढे 2 दिवसात तिला तिच्या कॉलेज ला रिपोर्टिंग द्यायची आहे... तिच्याकडे पर्याय नव्हता... तरी तिने ईथे न राहता... हॉटेल मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता... मागच्या वेळी आम्ही सुरेश आणि चित्रा वहिनीला ( आर्या चे आई वडील) भेटायला गेले होते तेव्हा ते म्हणाले म्हणून मग आम्हीच त्यांना हट्ट केला की आर्या ला आमच्याकडे राहायला पाठवा.. ती नव्हती तयार होत पं आम्हीच तिला जबरदस्ती मानवल... तिचा तुला काही प्रॉब्लेम होणार नाही याची खबरदारी आम्ही बाळगू... तिचा तू एवढा तिरस्कार का करतो... हे आम्हा सगळ्यांनाच माहित आहे... पण आता त्या गोष्टीला बरीच वर्षे झाली आहेत तर ती गोष्ट विसरुन तिला माफ करावस असं मला वाटतं... ", रूद्र शांत होत नाही म्हणून त्याचे वडील जरा थंड पणे म्हणाले... त्यांच्या आवाजात जरब होती...

त्याच्या dad चा राग बघून रूद्र जरा वरमला... शेवटी वडील होते ते त्याचे.. त्याने उसासा सोडला...

" ओके dad... मी जुन्या गोष्टी विसरण्याचा पुर्ण प्रयत्न करेन.. पण लगेच मला जमणार नाही... येतो", म्हणत रूद्र तिथून उठून निघून जातो ऑफिस साठी....

" मॉम dad माझं पण झालं... मी निघतो कॉलेज ला...", म्हणत सिद्धार्थ पण धावत रूद्र्च्या पाठी जातो...

त्यांचे आई वडील नाही मध्ये मान हलवतात....

" बरं झालं तुम्ही बोललात नाहीतर हा असाच धुसफुसत राहिला असता... आता निदान तो आर्या बद्दल असलेला राग कण्ट्रोल करण्याचा प्रयत्न तरी करेल...", रूद्र ची मॉम म्हणाली.. तसे त्याचे dad हो मध्ये मान डोलावतात..

●●●●●●●●●●●●

रुद्र त्याच्या ऑफिस मध्ये पोहोचतो...
तो त्याच्या केबिन मध्ये येतो... तिथे त्याचा बेस्ट फ्रेंड म्हणजेच त्याचा बिज़नेस पार्टनर विघ्नेश त्याची वाट बघत बसलेला असतो...

तो तसाच येऊन त्याच्या चेयर वर बसतो...
त्याचा चेहराच सांगत होता की त्याचा मूड ठीक नाहिये...

" काय रे मित्रा काय झालं??", विघ्नेश विचारतो...

" काही नाही.. बस्स घरी काही unwanted guest येणार आहेत... संताप असणार आहे पुढचा एक महिना...", रूद्र उसासा टाकत म्हणाला... वडीलांना शब्द जरी दिला असला.. तरी वर्षांचा राग त्वरित जाणार नव्हताच...

फार काही समजल्यासारखे विघ्नेश ने होकारात मान डोलावली.... त्याला माहित होतं रूद्र ला काही सांगायचे असेल तर तो एकदा काय झाले विचारताच सगळं सांगेल... पण जर त्याची इच्छा नसेल सांगायची... तर कितिही प्रयत्न केले तरी ते पाण्यात जातील... म्हणून त्याने पुढे प्रश्न केला नाही...

दोघेही कामांबाबत बोलत बसले...

2 वर्षापुर्वीच रूद्र ने काही कारणास्तव आर्मी मधून रिटायरमेंट घेतली होती... रूद्र चे वडील एक रीटायर पोलिस अधिकारी होते... त्यांना बघूनच रूद्र ने आर्मी जॉईन करण्याचा निर्णय घेतला होता... आर्मी मधून रीटायरमेंट घेतल्यावर त्याने आणि विघ्नेश ने एकत्र कंपनी ओपन केली होती... दोघांच्या मेहनतीने , कष्टाने लवकरच यशाची पायरी गाठली होती...

●●●●●●●●●●●●●●●●●●●

संध्याकाळी रूद्र 7 वाजताच्या सुमारास घरी
येतो... तो घरात एंट्री करतो तसा तो जागच्या जागी थबकतो... त्याला काहितरी फील होतं पण काय... ते त्यालाही कळत नव्हतं.... तो तसाच वरती त्याच्या रूममध्ये जातो.... त्याला घरी कोणीच दिसत नाही... फक्त काही काम करणारा स्टाफ असतो...

●●●●●●●●●□□□□□□□□□

अर्ध्यातासातच रूद्र फ्रेश होऊन खाली येतो... लिविंग हॉल मध्ये येऊन टीवी चालू करून काही न्यूज़ बघत बसलेला असतो... इतक्यात त्याला हसण्याचा आवाज येतो... तसा तो आवाजाच्या दिशेने बघतो तर त्याचे मॉम dad येत असतात... त्यांचे चेहरे पाहून ते किती खुश आहेत हे दिसत होतं... त्यांच्या आनंदाचे कारण कळायला त्याला क्षणभर ही लागला नाही.... त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या...

तो त्याच्या मॉम dad शी बोलणारच असतो की त्याच्या कानावर एक आवाज आला... तो त्याच्या मॉम dad च्या मागे एक नजर टाकतो... तर त्याची नजर त्या व्यक्तीवर खिळून राहते... तो एकटक त्या व्यक्तीला पाहत असतो...

तो पाहतो त्या दिशेने सिद्धार्थ आणि त्याच्या सोबत एक मुलगी होती जी त्याच्या सोबत घरात येत होती... ब्लैक जीन्स , वाइट शर्ट त्यावर ब्लैक जैकेट , केस आर्धे क्लिप मध्ये बांधून आर्धे मोकळे सोडले होते.... हाईट साजेशी होती.. कानात डायमंड चे झोटे टॉप्स, एका हातात वॉच आणि एका हातात एक चांदीचा कडा... चेहर्यावर एक प्रकारचा रुबाब झळकत होता.... कपाळावर एक छोटी ब्लैक कलरची टिकली... सुंदर दिसत होती... सिद्धार्थ सोबत बोलत असताना तिचं मध्येच हसणं तिच्या चेहर्यावर तेज आणत होतं...

एक क्षण रूद्र तिच्याकडे बघतच राहिला.. त्याची मॉम त्याला हाक मारते तसा तो गडबडला आणि लगेच चेहरा गंभीर केला...

" रूद्र... ही आर्या... बरीच वर्षे झाली तुम्ही भेटला नाहीत एकमेकांना...", रूद्र ची मॉम त्याला म्हणत आर्या कडे बघते...

रूद्र पुन्हा तिला बघतो...

" गुटगुटीत दिसणारी आर्या एवढी बारीक कशी झाली??? !!! मला काय करायचं आहे... शरीराचा आकार बदलल्याने माणसाचा मुळ स्वभाव बदलत नाही....", तो मनातच म्हणतो.. आणि आर्या ला सरळ सरळ इग्नोर करुन परत टीवी समोर असलेल्या सोफ्यावर जाऊन बसतो...

रूद्रच्या मॉम आणि dad ला हे अजिबात आवडलेलं नसते.. ते नाही म्हणून मान हलवतात... सिद्धार्थ पं सुस्कारा सोडतो... आणि आर्या... ती तर एकदाही त्याच्याकडे पाहत नाही.... तिची नजर अजुनही जमिनिवर असते...

"आरु... चल बाळा मी तुला तुझी रुम दाखवते... ", म्हणत रूद्र ची मॉम आर्या ला तिच्या सोबत घेउन जाते...

सिध्दार्थ पण त्यांच्या मागे जातो...

रूद्र चे dad रूद्र जवळ बसतात...

" dad i will try to restrain myself but I can't promise you...",रूद्र आपली टीवी वरची नजर न हलवता म्हणाला..

" आर्या आता पहिल्या सारखी राहिली नाहीए ती चेंज झाली आहे बरीच... मला विश्वास आहे ती असं काही करणार नाही जेणेकरून तुला त्रास होईल... I hope तुही तिच्या नादी लागणार नाही...", म्हणत dad तिथून निघून जातात...

‍‍‌‍‌‌‍‍‍‌ °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

" आरु ही तुझी रुम आहे... आणि तुझ्या बाजूला असलेली रुम सिद्धार्थ ची आहे... आणि तुझ्या समोर असलेली रुम रूद्र ची आहे.. ", रूद्र ची मॉम आर्या ला म्हणाली.. जी रुम निहाळत होती...

" आर्या दि... तुला काही लागलं ना तर बिंदास मला सांग... ", सिद्धार्थ आर्या ला म्हणाला..

" किती लहान होतास जेव्हा मी तुला शेवटचं पाहीलं होतं... आणि आता किती मोठा झालास...", आर्या हल्किशी स्माइल करत प्रेमाने त्याच्या केसांवर हात फिरवते...

"दी... आता मोठा झालो आहे.. ", सिद्धार्थ म्हणाला...

" हो रे माझ्या राजा... आता मोठा झाला आहेस तू... ", आर्या हसत म्हणाली..

रूद्रची मॉम त्यांची चालू असलेली मस्ती गालात हसत पाहत होती...

" खूप बदलली आर्या.. आता खुपच समजूतदार पणे वागते.. फक्त तिच्यातला हा बदल रूद्रला दिसू दे.. आणि त्यांची जोडी बनू दे...", रूद्र ची मॉम शक्य अशक्य गोष्टींसाठी प्रार्थना करत होती...

●●●●●●●●●●●●●●●

रूद्रची मॉम , सिद्धार्थ आणि आर्या खाली हॉल मध्ये येतात...

रूद्र आणि त्याचे dad already डाइनिंग टेबल वर बसून त्यांची वाट बघत बसले होते...

आर्या कपडे बदलून आली होती.... तिने रेगुलर साधे कपडे घातले होते...

सिद्धार्थ त्याच्या चेयर वर जाऊन बसतो.. रूद्रची आई आर्या ला बसायला सांगते तशी ती सिद्धार्थ च्या बाजूला जाऊन बसते.. पण ती नेमकी रूद्र च्या समोर असलेल्या सीट वर जाऊन बसते..
ती त्याच्याकडे बघणे कटाक्षाने टाळत होती..

रूद्रची मॉम मैड्स ना जेवण घेउन बोलावते.. जेवण आणल्यावर रूद्रची मॉम सगळ्यांना जेवण सर्व करत असते.. तशी आर्या सुद्धा उठून त्यांना जेवण वाढायला मदत करते... हे बघून रूद्रचे डोळे आश्चर्याने मोठे होतात...

" जी मुलगी कधी स्वत:हून पाण्याचा ग्लास घेऊ शकत नव्हती... ती चक्क आज जेवण वाढते आहे ... नवलच आहे...", रूद्र मनातच विचार करतो...

त्याचं सहज लक्ष तिच्या चेहर्यावर जाते.. तो तिला एकटक पाहत असतो...
चेहर्यावर निरागसता ओसंडून वाहत होती... लहानपणी चेहर्यावर असणार्या खोडकर स्वभावाचा लवलेशही दिसत नव्हता... जेवण वाढताना तिच्या हातांची सराईतपणे होणारी हालचाल बघून तो थक्क झाला होता...

ती सगळ्यांना जेवण वाढते.. त्यालाही.. परंतु त्याच्याकडे नजर वर करून बघत नाही... तोही शांत असतो... उगीच खोड्या काढायची सवय त्याला नव्हती... पण चुकून जर कोणी नडलं ना तर त्याला सोडायचं की नाही हे मात्र त्याच्या हातात होतं... आणि सध्यातरी आर्या ने काही त्याला त्रास दिला नव्हता.. मग तो कसा काही करेल...

त्यांच वाढून झाल्यावर सगळे मिळून जेवण करतात... मध्ये मध्ये रूद्र चे आई वडील आणि सिद्धार्थ आर्या शी बोलत असतात... रूद्र मात्र शांतपणे त्यांना ऐकत जेवत होता...

ज्या आर्या च्या फक्त नावाने त्याला राग येत होता... तो काही प्रमाणात का होईना पण कमी होत होता... त्याला एवढी चिडचिड वाटत नव्हती तिची.....

सगळे जेवण करून आपल्या आपल्या रुम मध्ये निघून जातात...

●●●●●●●●●●●●●●●

रूद्र त्याच्या रुम मध्ये काम करत असतो.. पण त्याचं मन काही लागत नव्हतं कामात... त्याच्या डोळ्यासमोर फक्त आर्या चा चेहरा येत होता.... कारण त्यालाही माहित नव्हतं म्हणून त्याची चिडचिड झाली होती...

" या मुलीपासून दूर राहिलेलच चांगलं... ", म्हणत रूद्र त्याच्या रुम च्या लाईटस् बंद करून बेड वर झोपून घेतो...

●●●●●●●●●●●●●●●

आर्या रुम मध्ये स्टडी टेबल वर बसलेली असते...

" इतकी वर्षे झाली... पण रुद्राचा स्वभाव आताही तसाच आहे... गंभीर... किती राग येत असले त्यांना मला इथे पाहून... तरी मी सांगितलं आईला मला इथं नाही राहायचं... तरी पाठ्वले इथे इमोशनल अत्याचार करुन... काही नाही.. फक्त एकच महिना मग मी दुसरीकडे शिफ्ट होईल... ", म्हणत आर्या पण तिच्या बेड वर आडवी होते..

क्रमशः


सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून दैनंदिन जीवनात काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा हीच इच्छा... काही चुकीचे आढळल्यास माफी असावी...

कथा आवडल्यास कमेंट आणि कॉईन ही दया..

Thank you