रूद्र आर्या
"दी... नको ना जाऊस... मला अजिबात करमणार नाही तुझ्याशिवाय... तू रोज माझा स्टडी घेत होतीस ना... आता कोण घेणार?? .. तू किती छान शिकवते.. बरोबर पॉईंट्स मार्क करुन देतेस नोट्स काढताना... आता कोण करुन देणार??", सिद्धार्थ तोंड पाडून म्हणाला..
" माझी आठवण येणार की मी अभ्यासात मदत करायची त्याची आठवण येणार??", आर्या त्याची खेचत म्हणाली.. कारण तिला समजलं होतं जी सबजेक्ट ती त्याला शिकवते .. त्या सबजेक्ट मध्ये त्याला फारसा काही रस नाही....
" दी.. यार खरंच तुझी आठवण येईल.. ", सिद्धार्थ आर्जवाने म्हणाला..
" राजा... आपण रोज कॉलेज ला तर भेटणारच ना.. आणि तसंही तुला मी नोट्स काढून देईनच.. तू टेंशन नको घेऊ... ", आर्या सिद्धार्थ च्या केसांतुन प्रेमाने हात फिरवत म्हणाली...
आर्या तिच्या आईवडीलांची एकुलती एक लेक होती... आपल्यालाही लहान भावंड असावं असं तिला नेहमी वाटायचं.. म्हणून सिद्धार्थवर ती मोठ्या बहिणी प्रमाणे प्रेम करायची...
दोघेही सिद्धार्थ च्या रुम मध्ये होते... थोड्या वेळ त्याचा अभ्यास घेउन दोघेही बोलत बसले होते...
" माझं नवीन घर इथुन फक्त 15 मिनिटांवर आहे... मी तुला ऐड्रेस देऊन ठेवेल.. तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये... ", आर्या म्हणाली..
" एवढ्या जवळ आहे तर तिथे कशाला जाते?? इथेच राह ना.. आपण रोज सोबतच जाऊ कॉलेज ला...", सिद्धार्थ तिला थांबवण्यासाठी समजावणीच्या सुरात म्हणाला.. अगदी क्यूट फ़ेस करुन तो तिला तिचा निर्णय बदलवण्याचा प्रयत्न करत होता...
" हा.. हा.. हा.. अरे बच्चा... माझ्या सोबत माझ्या तीन बेस्ट फ्रेंडस् आहेत... आम्ही चौघीजणी सोबत राहणार आहोत.. दोघी नर्स आहेत आणि एक डॉक्टर आहे... आम्ही अगोदरच ठरवले होते सोबत राहायचं... आता मी त्यांना दगा नाही देऊ शकत बाळ... ", आर्या ला हसू आलं होतं त्याच्या या नाटकी प्रयत्नाचा..
त्यांची चाललेली मस्ती रूद्र दरवाजात उभा राहून बघत होता.... आर्या च्या चेहर्यावरिल निखळ हसू पाहून रूद्र्च्या ओठांवर हलकं हसू तरळते..
आज पहिल्यांदा तो तिला मोकळेपणाने हसताना पाहत होता...
सिद्धार्थ आणि आर्या बराच वेळ बोलत असतात... रूद्र थोड्या वेळाने तिथून निघून जातो..
●○●○●○●○●○●○●
" आरु... येत जा इकडे ... आणि स्वत:ची काळजी घेत जा... आणि काही वाटलंच तर लगेच कॉल कर आम्हाला... ओके??", रूद्र ची मॉम आर्या ला instruction देत म्हणाली कारण आरु तिच्या घरी जाण्यास सज्ज झाली होती...
" आर्या काही वाटलंच तर बोलायला काचकूच करु नकोस... तू आमचीच मुलगी आहेस... ओके", रूद्र चे dad आर्या ला प्रेमाने म्हणाले...
आर्या चेहर्यावर गोड हसू ठेवून त्या दोघांना ऐकत होती....
ती दोघांच्या पाया पडून त्यांच्या मिठित जाते... तेही हसुन तिला मिठी मारतात..
आर्याला सोडायला सिद्धार्थ जाणार असतो... रूद्र त्याच्या ऑफिस ला गेलेला असतो..
सगळ्यांना निरोप दिल्यावर आर्या सिद्धार्थ सोबत तिच्या नवीन घरी जाते..
□●□●□●□●□●□●□
" दी... घर मस्त आहे गं... जागा पण भरपूर आहे... ", सिद्धार्थ घर आणि आजुबाजुचा परिसर बघत म्हणाला...
" हो ना.. मला पण खूप आवडलं... माझ्या मैत्रीणिला पण आवडेल..
दोघेही घरात जातात...रूद्र च्या मॉम ने अगोदरच सगळं घर साफ करवून घेतले... सगळं काही अगोदरच सेट केलं होतं...
आर्या तिचं सामान तिच्या रुम मध्ये नेऊन ठेवते आणि किचन मध्ये जाऊन सिद्धार्थ साठी कॉफ़ी बनवून घेउन येते..
दोघेही कॉफ़ी पीत गप्पा मारत असतात...
" दी... तू अजुनही नाराज आहेस का रूद्र दादासोबत??", सिद्धार्थ तिला विचारतो...
त्याने बघीतले होते ते दोघं या एका महिन्यात कधीच एकमेकांशी बोलले नाही... पण त्याने रूद्र ला गाडीत तिच्याकडे आरशातून बघताना पाहिले ... त्याला कुठंतरी आशा होती की ते एकमेकांशी कधी ना कधी बोलतील... त्यांच्यात काय झाले होते हे त्याला त्याच्या मॉम कडुन कळले होते...
त्याच्या प्रश्नावर आर्या थोड्यावेळ शांत बसते.. मग हलकं स्मित हास्य देत ती सिद्धार्थ शी बोलू लागते...
" बाळा... मी का नाराज असेन तुझ्या दादा सोबत?? 10 वर्षापूर्वी चूक माझ्या अल्लडपणा मुळे झाली होती... त्यात तुझ्या दादाची चूक नव्हती... ती चूक माझ्या मुळे झाली होती... माझ्यामुळे तुझ्या दादा ला आर्मी जॉईन करता आली नव्हती... याचं गिल्ट माझ्या मनात नेहमी राहिल... आणि मला परत तुझ्या दादा ला त्रास द्यायचा नाही... ", आर्या शांतपणे म्हणाली..
●♡●♡●♡●♡●
रुद्र संध्याकाळी घरी येतो... त्याला सगळं खाली खाली वाटून गेलं... तो त्याच्या रुम मध्ये जातो.. पण जाताना नजर आर्या राहणार्या रुम वर जाते.. त्याला माहित होतं ती तिथे नाहिये... पण तरिही त्याच्या नकळत त्याची पावले तिच्या रुम मध्ये जाऊ लागतात..
तो तिच्या रुम मध्ये पाऊल टाकतो.. तसा आर्याचा तिथे असलेला सुगंध दरवळत होता... त्याने मोठा श्वास घेत स्वत:ला शांत करु लागला.. का माहित नाही पण त्याचा दिवसभराचा थकवा उतरल्यासारखे त्याला वाटले...
त्या रुम मध्ये आर्या च्या सुगंधा शिवाय तिथे तिचे असे काहिच नव्हते.... तो तसाच तिथून बाहेर निघून त्याच्या रूमचा दरवाजा उघडतो... तसा दरवाज्याच्या कडित असलेली एक चिठ्ठी खाली पडते.. रूद्र confuse होऊन ती चिठ्ठी हातात घेतो... तो तसाच ती चिठ्ठी घेउन त्याच्या बेड वर बसतो..
तो ती चिठ्ठी वाचायला घेतो...
रूद्र
I m sorry.... 10 वर्षापूर्वी जी चूक मी केली होती... त्यासाठी मला कधीच तुमची माफी मागता आली नाही.. त्या वेळेस फक्त माझ्या अल्लडपणामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नापुढे हात टेकवावे लागले... तुम्हाला खूप दुखावले .. त्याचा पश्चात्ताप मला आजन्म राहिल.. तुम्ही मला माफ करावं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल.. मी त्यात काही हस्तक्षेप करणार नाही... पण तुमची माफी मागण्यासाठी जर प्रयत्नही केला नाही तर या गोष्टीचा रिग्रेट जास्त राहिल मला.. म्हणून थोडीशी हिम्मत करून तुम्हाला हे पत्र लिहित आहे... मला माहित आहे मी तुम्हाला तुमच्या नजरेसमोर ही नको आहे.. आणि मी नक्कीच प्रयत्न करेन की फ्यूचर मध्ये तुम्हाला माझा काही त्रास होणार नाही.... पुन्हा एकदा सॉरी....
- आर्या
रूद्र शांतपणे ती चिठ्ठी वाचत होता.. वाचताना 10 वर्षांपूर्वीची घटना त्याच्या डोळ्यासमोर झरझर वाहुन गेली... आर्मी जॉईन करण्यासाठी त्याने दिवसरात्र केलेली मेहनत... परीक्षेसाठी डोळ्यात तेल टाकून केलेला अभ्यास त्याला आठवला... एवढी घेतलेली मेहनत जेव्हा फक्त नी फक्त आर्या च्या अल्लडपणामुळे धुळीत मिळाली तेव्हा तो भयंकर तापला होता... त्या दिवशी जर रूद्रचे मॉम dad वेळेवर आले नसते तर त्यालाच माहित नाही त्याने काय केले असते..
जुन्या गोष्टी आठवुन तो एक मोठा सुस्कारा सोडतो... त्याचं एक मन त्याला सांगत होतं की आर्या ला माफ करावं... पण परत तिच्या बद्दल मनात असलेली अढी त्याला तिला माफ करु नये म्हणून बजावत होतं..
काय करावं हे त्यालाच समजत नव्हतं... आर्या ची चिठ्ठी वाचुन त्याला कळत होतं की ती genuinely त्याची माफी मागते आहे... पण तरी त्याच्या मनात किंतु परंतू होते..
आता पर्यंत तो जेव्हा जेव्हा रणांगणात उतरला तेव्हा तेव्हा त्याने घवघवीत यश मिळवले होते... त्याची चाणक्य बुद्धिमत्ता नेहमी अचानक उद्भवलवलेल्या परिस्थीतीत योग्य निर्णय घेत होती..
त्याच्या मनात द्वंद्व युद्ध सुरु झाले होते...
●●●●●
रूद्र आणि त्याची फैमिली जेवण करत होती... आज त्याची नजर सारखी सिद्धार्थ च्या बाजूला असलेल्या रिकामी खुर्चीवर जात होती... नको ते खालीपण त्याला जाणवत होतं... त्याच्या मनात वादळ उठले होते... पण त्याने त्याच्या मनातील अस्वस्थता चेहर्यावर जाणवू दिली नाही...
जेवताना त्याचे मॉम dad आणि सिद्धार्थ फक्त आर्या विषयी बोलत होते... तो दाखवत नसला तरी त्याचे पुर्ण लक्ष आर्या च्या गोष्टी ऐकण्यात होतं...
जेवण झाल्यावर तो तसाच सगळ्यांना गुड नाइट बोलुन त्याच्या रूममध्ये जातो...
ह्रदयात माजलेलं काहुर थांबवणे सध्या खूप गरजेचं होतं...
□●□●□●□
" आरु... यार कसलं घर आहे नाही का???", आर्या ची bff नेहा म्हणाली... जी नर्स होती... आताच संध्याकाळी घरी आली होती.. ती घर निरखून पाहत होती..
" आपलं घर आहे.. भारी तर असेलच ना.. ", स्नेहा म्हणाली... नेहा ची twin सिस्टर .. ती सुद्धा एक नर्स होती.. त्या दोघीही एकाच हॉस्पिटल मध्ये जॉबला होत्या...
" तेही आहेच म्हणा...", नेहा बत्तीशी दाखवत म्हणाली...
" आता फक्त बोलत बसणार की मला किचन मध्ये मदत पण कराल??", आर्या किचन मधून ओरडली..
" आलो बच्ची...आलो...", दोघीही सोबतच ओरडत धावतच किचन मध्ये गेल्या..
" यार आरु... तू कसली भाजी बनवतेस गं??", नेहा गैस वर झाकुन ठेवलेल्या पातेल्यात बघत म्हणाली...
" कार्ल्याची भाजी...", आर्या हसत म्हणाली... आणि इकडे नेहाचा चेहराच पडला..
स्नेहा तर ओठ दाबून हसत होती..
" यार आरु... नोट फ़ेयर हा... यू क्नो दैट आई डोंट लाइक कडू थिंग्स... ", नेहा तोंड फुगवून म्हणाली..
तश्या त्या दोघी जोरजोरात हसायला लागतात..
नेहा दोघींनाही तोंड पाडून बघत असते...
" तू अजिबात तुझी काळजी घेत नाही.. मैडम ला फक्त फास्ट फूड आवडतं.. नुसतं ऑईली जेवण करत असतेस... तुझं अंग बघ कसं गुबू गुबू झालं आहे.. म्हणून आता तुला ते सगळं खाव लागेल जे मी बनवेल.. ऐण्ड नो ऐक्यूज़ेज़..", आर्या तिला दटावत म्हणते...
स्नेहा फक्त त्यांची मज्जा पाहत असते... तिला माहिती.. नेहा फक्त आर्या चं ऐकते..
नेहा तोंड फुगवून तिथून निघुन जाते...
आर्या सुस्कारा सोडत स्नेहाकडे बघते...
"तू आणि स्नेहा जुळ्या बहिणी आहात तरिही दोघी मध्ये काहिच साम्य नाही.. ना तुमचे फ़ेस सेम आहेत नाही स्वभाव.. ती पूर्व तर तू पश्चिम.. ", आर्या स्नेहाला म्हणते ... तशी स्नेहा हसुन देत आर्याला स्वयंपाकात मदत करते...
□●□●□●□
" नेहा ... स्नेहा.. तुम्ही दोघी एका रुम मध्ये झोपता की वेगवगळ्या रुम मध्ये झोपणार आहात?? " आर्या दोघींना विचारते...
ईतर गोष्टी कॉमन नसल्या तरी एक गोष्ट मात्र त्यांच्यात सेम होती की दोघीही एकट्या झोपायला घाबरायच्या... ही गोष्ट आर्याला माहित होती... त्यांचं काय उत्तर असेल हेही तिला माहित होतं...
" आम्ही सोबतच झोपू...", नेहा स्नेहा सोबतच बोलतात..
" ठीक आहे... झोपा.. काही लागलंच तर मी आहेच.. जा आता जाऊन झोपा... उद्या डॉक्टर मैडम घरी येणार आहेत... लग्न ठरलंय मैडम चं... आणि एका शब्दाने पण तीने नाही सांगितल आपल्याला... ", आर्या तिच्या डॉक्टर फ्रेंड ला आठवुन जरा चिडून म्हणते..
कुठेतरी
"Achooo....Achooo... देवा रे कोण माझी एवढी आठवण काढत आहे?? नक्कीच आर्या असणार... उद्या तर माझं मरण आहे... लग्न ठरलं पण तिला सांगितलं नाही म्हणून रागावली असेल... पण तिला कसं समजवू की माझ्या आई बाबांनी मला न सांगता माझं लग्न ठरवलं आहे...", एक मुलगी हताश होऊन मनातच म्हणाली.
आर्यच्या घरी...
आर्या ला असं चिडलेले बघून नेहा स्नेहा हसुन देतात..
थोड्यावेळानी त्या तिघिही झोपायला निघून जातात...
□●□●□●□
" त्यांना ते लेटर मिळालं असेल ना??? त्यांनी वाचलं असेल का?? माफ करतील का?? ", हे आणि असे कितितरी प्रश्न आर्या ला सतावत होते..
समोर बोलायची हिम्मत नव्हती म्हणून चिठ्ठी
लिहुन तिने माफी मागण्याचा प्रयत्न केला होता..
आता पुढे काय होईल हे तिलाही माहित नव्हतं...
ती तशीच विचार करत झोपी जाते...
क्रमशः
सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून दैनंदिन जीवनात काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा... काही चुकीचं आढळल्यास माफी असावी...
कमेंट आणि स्टिकर्स नक्की दया..
Thank you ❤