Sath tujhi majhi - 1 in Marathi Love Stories by Kadambari books and stories PDF | साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 1

Featured Books
Categories
Share

साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 1

निशी थोडी घाईमध्येच होती.. आधीच तिला उशीर झाला होता.. त्यामध्येच तिची आई तिच्यामागे नास्ता करून घे म्हणून मागे होती... पण निशीला ऑफिसला जायची घाई झाली होती.. एक तर आज महत्वाची मीटिंग.. त्यामध्ये त्या मीटिंगचे प्रेझेन्टेशन निशीच करणार होती.. यामुळे तिला एकच घाई लागली होती..

कशीबशी ती घरामधून बाहेर पडली.. समोर मिताची आई, जानवी उभी होती.. निशी मनामध्ये विचार करतच होती.. "आता काकी माझे चांगले पंधरा वीस मिनिटे तर निवांत घेणार.. इकडच्या तिकडच्या चार गोष्ठी सांगत बसणार.. आणि मी नेहमीसारखी मान हालवत हालवत त्यांना प्रतिसाद देणार.." असे विचार करतच होती की जानवी काकींनी निशीला हाक मारलीच...

जानवी काकी- अरे...! निशी बेटा, उशीर झाला आज... उशिरा उठली का...?? रात्री झोपयालाच उशीर झाला असेल...हो न..??

निशी- ऐका न काकी... आज थोडा उशीरच झाला आहे...आपण संध्याकाळी भेटू.. निवांत बोलू..
(असे म्हणत निशीने जानवी काकींना मस्त असे स्मित हास्य दिले..)

पण काकी ऐकेल ती जानवी काकी कशी.. मुळात उशिरामध्ये उशिरा करणे यासाठीच जानवी काकी अपार्टमेंट मध्ये प्रसिध्दच होती...तिने निशीचा हात धरला..आणि बोलू लागली...

जानवी काकी- अग...निशी इतकी काय ग घाई...? कोण वाट पाहत आहे का.. (असे बोलून जानवी काकी मनापासून हसली.. तिला वाटले आपण खूप छान विनोद केला...)

निशी- अहो काकी वाटच पाहत आहेत सर्वजण.. पण ऑफिसमध्ये.. माझी महत्वाची मीटिंग आहे.. आणि आजच मला उशीर झाला आहे.. please आपण बोलू संध्याकाळी.. चला बाय...

असे म्हणून निशी आपल्या ऑफिसच्या मार्गी लागली... त्यामध्ये तिला पुन्हा टेन्शन... बस भेटेल का वेळेमध्ये..? आधीच उशीर त्यामध्ये या जानवी काकी.. वेळेमध्ये वेळ कसा खराब करायचा हे खूप चांगले जमते काकींना..

निशी बस स्टॉप वर पोहचली..10 मिनटे झाली तरी बस भेटली नाही.. तिचा चेहरा कावरा बावरा झाला.. आता स्पेशल रिक्षाच करावी का..? आता जर आणखीन उशीर झाला तर माझे काही खरे नाही.. असा विचार करत असतानाच निशीच्या समोर दिप आला.. निशीची तंद्री भंग करत दिप तिला म्हणाला..

दिप- हे... निश तू अजून इथेच.. !

निशी- अरे आज उशीर झाला आहे.. आणि बस ही नाही आली.. निशी चेहरा पाडून बोलली.. पण तू इथे कसा..?

दिप- अग मी बहिणीला सोडण्यासाठी आलो होतो.. पण एक बरे झाले.. तू भेटली आणि मला तुझी मदत करायला ही मिळाली.. बर चल मी सोडतो तुला ऑफिसमध्ये.. चालेल न तुला..?

निशी- हा चालेल चालेल.. अगदी वेळेवर आला तू.. माझी आज एक महत्वाची मीटिंग आहे.. चल पटकन..

(निशी दिपच्या गाडीवर बसली.. आणि दोघेही ऑफिसाच्या दिशेने निघाली.. दिपही निशीच्या ऑफिसमध्येच काम करत होता..)

ऑफिसमध्ये निशी घाईनेच आली.. तिला टेन्शन आलेच होते.. रुद्र सर आता चांगलेच तापले असणार.. आणि खरेच रुद्र संतापला होता... निशीला पाहता पाहताच तो कपाळावर आट्या घालून तुक्सला म्हणाला... आधीच वेळ झाला आहे... अजून किती वेळ लागणार आहे विचारा निशी मॅडमना.. तुक्सने निशीला बोलवले आणि चल पटकन आधीच खूप वेळ झाला आहे.. सर चिडले आहेत असे सांगितले...

दोघीही कॉन्फरन्स हॉल मध्ये पटकन गेल्या.. तिथे आधीच ऑफिसमधील सर्व स्टाफ उपस्थित होता... सर्वजण कावलेल्या सुरात होते.. रुद्रने कॉन्फरन्स हॉल मध्ये एन्ट्री केली आणि सर्वांना म्हणाला... "Let's start now" मग निशीने मीटिंगमधील सर्व पॉईंटस मांडले...

तिचे प्रेझेन्टेशन इतके साधे आणि स्पष्ट होते की सर्वांना ते पटकन समजलेच वरती तिच्यावरचा रागही विसरला गेला...इकडे मनोमन रुद्रही सुखावला होता.. पण त्याने ते त्याच्या चेहऱ्यावर दाखवले नाही.. आणि थोड्याच वेळात मीटिंग संपली...

सर्वजण कॉन्फरन्स हॉलच्या बाहेर निघून गेले.. फक्त निशी आणि रुद्र तिथेच होते.. निशीला वाटले रुद्र तिची तारीफ करेल.. पण प्रत्यक्षात रुद्रने तिच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला.. आणि काहीच न बोलता तो बाहेर निघून गेला..

निशीचा चेहरा उतरला.. ती स्वतःशीच पुटपुटली.. इतके छान प्रेझेंटेशन देऊन ही याला काहीच नाहीये.. पण तिला आतून एक प्रश्न पडला.. मी इतकी उशिरा येऊन ही रूद्र काहीच का बोलला नाही..?मला रूद्रचा इतका राग येतो असे मी सर्वांना दाखवते पण प्रत्यक्षात का मी रूद्रवर रागऊ शकत नाही..?? कितीही ठरवले तरी त्याला दुखावू शकत नाही..?? का माझ्या मनामधून त्याचा विचार जात नाही..? असे का वाटते रूद्र आणि माझे आधीपासूनच काही तरी नाते आहे..?? का..? का..?

खरेच निशी आणि रुद्रचे आधीचे काही नाते आहे की हे फक्त निशीचे तर्क आहेत.. जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच "साथ तुझी माझी... कथा पुर्णजन्माची.." याचा पुढील भाग वाचायला विसरू नका.. आणि सर्वात महत्वाचे कथा आवडत असेल तर like.. comments.. share plus मला Follow करायला विसरू नका.. खुश राहा.. आणि वाचत रहा..