shree Guru charitramrut in Marathi Mythological Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | गुरु चरित्रामृत

Featured Books
Categories
Share

गुरु चरित्रामृत


धार्मिक कथा

श्री गुरु चरित्रामृत. ०
-----------------------------------
एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला. तो परिस्थितीने एवढा गांजला होता की, श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला. त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला. त्या जळत्या कोलीताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले ''अरे ब्राह्मणा ! तू आत्महत्या करण्यास सिध्द झाला होतास. मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस. त्या आत्महत्येच्या सबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली. आता तुला दारिद्रयापासून मुक्तता मिळेल.'' असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले. प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेली. घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहीले तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली हाती. श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नि यज्ञाने दहन केले होते. कांही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत. त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत. अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत. यामुळे ते कर्म बंधनातून मुक्त होत. एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली. तिचा विवाह कोठे जमत नव्हता. तिला कुज दोष (मंगळ दोष) असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला. त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले. त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला. श्रीपाद प्रभू कांही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत. तर काहींना गायीच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्याचा आदेश देत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच्या विवाहा संबंधीच्या अडचणी असल्यास त्याना श्रीपाद प्रभु दर शुक्रवारी राहुकालाच्या वेळी (सकाळी 10-30 ते 12-00) अंबिकेची पूजा करण्यास सांगत. श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला. त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंडयाच्या तेलाचा दिवा लाऊन तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले. तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको असे त्यांना बजावून सांगितले. असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला. एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले. असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला. अशा किती तरी नवीन नवीन पध्दतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मा पासून मुक्तता केली. या सर्व पध्दती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहे.*
________________________
🙏 || श्री गुरुदेव दत्त || 🙏
_______________________
शब्दांकन: मच्छिंद्र माळी, छ.
संभाजीनगर.
--------------------------------------------------------------


____________________________
तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे ।
आणि एकें पुनरावृत्ती येइजे ।
परी दैवगत्या जो लाहिजे ।
देहांती जेणें ।। ८ – २४६
_____________________________
देह सोडल्यानंतर योग्याने कोठे जावयाचे या संबंधी अनादी असे दोन मार्ग आहेत, असे मागच्या ओवीत सुचविले आहे. एक ब्रह्माकडे नेणारा मार्ग व दुसरा ब्रह्मापासून दूर नेणारा मार्ग. आपल्या हितासाठी परमेश्वरप्राप्तीचा मार्ग कोणता व प्रपंचाचा मार्ग कोणता, आपले हित कशात आहे, हे आपण ओळखले पाहिजे. नाव चांगली आहे असे दिसल्यावर कोणी अथांग पाण्यात उडी टाकेल काय ? विष व अमृत यांतील अंतर ज्याला समजले आहे तो अमृत सोडून देईल का ?
म्हणून खरे काय, खोटे काय हे नीट जाणून घ्यावे. नाहीतर मरणाच्यावेळी धुम्रमार्गाचे संकट उभे राहते व जन्मभर केलेला अभ्यास व्यर्थ होतो. अर्चिरादी मार्ग एकदा चुकला आणि दैववशात धुम्रमार्ग सापडला तर मनुष्य संसारात जखडला जातो आणि त्याला जन्ममरणांचे फेरे भोगावे लागतात. म्हणून ज्ञानी पुरुषाने धुम्रमार्ग चुकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका मार्गाने जाणारा मनुष्य ब्रह्मस्वरूपाला मिळतो. तर दुसऱ्या मार्गाने जाणारा मनुष्य संसारात गुरफटतो. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणे किंवा संसारात गुरफटणे यांचा लाभ मरणकाळी दैवयोगे जो मार्ग प्राप्त होतो त्यावर अवलंबून आहे.
म्हणून श्रीकृष्ण म्हणतात – या दोन्ही मार्गांची अनिश्चितता जाणून नेहमी आत्मविचारच करावा. अर्जुना, अशा या अनिश्चित स्वरूपाच्या मार्गाचा फारसा विचार न करता आपण अर्चिरादी मार्गानेच ब्रह्मरूप होणार असा निश्चय तू करावास. दोरी ही दोरी आहे हे कळल्यावर तीवरील सर्पाचा भाव नाहीसा होतो. देह जावो वा राहो, आपण केवळ ब्रह्मरूप आहोत असे जाणावे.
_____________________________