Ramayan - Chapter 2 - Part 12 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 12

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 12

अध्याय 12

भरताचे वनप्रयाण व गुहकाशी संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

कैकेयी भरताला उपदेश करते :

जालिया जननिवृत्ती । पुन्हां प्राप्ती मध्यरात्री ।
कैकेयी येवोनि भरतप्रती । बोले उपपत्ती ते ऐका ॥१॥

उत्थापयित्वा कैकेयी पुत्रं वचनब्रवीत ।
उत्तिष्ठ पुत्र भद्रं ते राजपुत्र निबोध मे ॥१॥
त्वद्विधा नैव शोचंति सतां सदसि संमताः ।
गृहाणेदं स्वकं राज्यं सफलं कुरु में श्रमं ॥२॥
मनो नंदय मित्राणां मम चाभीष्तदर्शन ।
त्वकृते हि मया सर्वमिदमेवंविधं कृतं ॥३॥
तत्पुत्र शीघ्रं विधिना विधिज्ञैः
वसिष्ठमुख्यैः सहितो द्विजेंदैः ।
संकाल्य राजानमदीनसत्व
मात्मानमुर्व्यामभिषेचयस्व ॥४॥

उठवोनियां पुत्रासी । कैकेयी बुद्धि सांगे त्यासी ।
राम गेला वनवासासी । तूं कां करिसी शोक त्याचा ॥२॥
रांडवे बायलेव्हे परी । रडतां न लाजसी सभेमाझारीं ।
ऊठ वेगीं धीर धेरीं । अयोध्येचें करीं निजराज्य ॥३॥
मुख्य ज्येष्ठाचें निजराज्य । तें म्यां संकटॆं साधिलें तुज ।
शेखीं न मानिसी तूं मज । नाचसी भोजें वना जावया ॥४॥
आयुष्य सरल्या निमाला पती । पितृआज्ञेने वनवास रघुपती ।
तो दोष ठेविसी मजप्रती । निजस्वार्थ नेणसी ॥५॥

सापत्‍नभावाचा वेदकालीन इतिहास :

मुळीं लागोनि संसारी । सापत्‍न ते तव मुख्य वैरी ।
तें तुज सांगेन निर्धारीं । वेदशास्त्रसंमत ॥६॥
दिती अदिति दोघी सवती । एक पित्याची संतती ।
देवां देत्या वैरप्राप्ती । निजघाती येरयेरां ॥७॥
येचि अर्थी वेदोक्ती । बृहदारण्यप्रथमश्रुती ।
देव दैत्य वैरी होती । श्रुतिसंमती अवधारा ॥८॥
सापत्‍नांमाजि अति प्रीती । कांहीच नाहीं वेदशास्त्रार्थी ।
गरुडसर्पां वैरप्राप्ती । ते काय नव्हेती निजबंधु ॥९॥

माझे ऐकून राजा हो, शत्रुघ्नाने युवराज व्हावे :

ऐक माझी निजयुक्ती । तुवां न जावें वनाप्रती ।
आणोनि वसिष्ठादि ऋषिपंक्ती । घेई राज्यप्राप्ती अभिषेकें ॥१०॥
भरता तूं तंव सभाग्य पूर्ण । अभाग्य वनवासा गेला लक्ष्मण ।
तो जरी येथें असता जाण । करिता कंदन राज्यलोभें ॥११॥
मी सांगतें हित देखोन । तूं होई राजा संपूर्ण ।
युवराजा करीं शत्रुघ्न । माझें वचन प्रतिपाळीं ॥१२॥

त्यामुळे भरताचा संताप व उद्वेग, त्याने आईची निर्भत्सना करुन तिला घराबाहेर घालविले :

ऐकोनि मातेंचे वचन । भरत कोपला संपूर्ण ।
कोपामाजी आले रुदन । अतिउद्विग्न अनुतापी ॥१३॥
घायावरी हाणिजे लाता । तैसा पाड जाला भरता ।
म्हणे तूं तंव नव्हेसी माझी माता । पापरूपता संपूर्ण ॥१४॥
निजपती निमाल्याचें तुज । अणुमात्र दुःख ना लाज ।
राज्याभोगाचें सुखभोज । अति निर्लज्ज नाचसी ॥१५॥
तुझ्या ऐकोनि वचनार्था । म्यां द्वेषावें श्रीरघुनाथा ।
स्वजना देवोनि दुःखवार्ता । नरकपाता स्वयें जावें ॥१६॥
निजमातेचें हितोपदेशवाक्य । रौरवा जावें आवश्यक ।
पूर्वजां न्यावें नरका देख । द्यावें दुःख जनासी ॥१७॥
निजपतीची घातकिणी । श्रीरामद्वेषाची संवदणी ।
सुहृदांसी दुःखकारिणी । जाय पापिणी अति निंद्य ॥१८॥
जळो तुझें काळे मुख । श्रीरामासी दिधलें दुःख ।
तुझें मजला नाहीं सिख । जगा असुन तुझेनि ॥१९॥
वधूं नये निजमाता । यालागी चुकलों तुझ्या घाता ।
तुझेनि मज दुःखावस्था । श्रीरामदशरथा विघडिलें ॥२०॥
तुज पाहतां सन्मुख । मज वाटे परम दःख ।
नको दाखवूं काळें मुख । निंद्य निःशेष अति नष्टे ॥२१॥
भरत कोपोनियां भारी । निर्भत्सूनी नानापरी ।
कैकेयी घातली बाहेरी । तिचेनि करीं अतिदुःखी ॥२२॥
जिचेनि अंतरलाराघव । ते माता नव्हे महालाव ।
जगीं इचें निद्य नांव । दुःख ओतींव कैकेयी ॥२३॥

श्रीरामभरतादि चारी बंधूंचे पिंडैक्य :

श्रीराम भरतांचा पिंड एक । एका पिंडाचे दोघे देख ।
येरायेरांचें मानिती दुःख । परम सुख येरयेरां ॥२४॥
येरयेरांचा जीवप्राण । येरयेरांचे जीवन ।
येरयेरां समाधान । सुखसंपन्न रामभरत ॥२५॥
भ्रतासी श्रीरामाचें सुख । श्रीरामीं भरताचा हरिख ।
एकमेकां दोघे एक । कैकेयी मूर्ख तें नेणें ॥२६॥
आठवितां श्रीरघुनाथ । परम सुखें सुखावे भरत ।
नाहीं राज्यलोभाचा स्वर्थ । परमामृत श्रीरामीं ॥२७॥
श्रीरामाच्या पायांपरतें । परम सुख नाहीं भरतातें ।
यालागीं त्यजोनि निजराज्यतें । श्रीरामातें भेतों निघे ॥२८॥
देवदैत्यां वैर वितंड । त्यांचा नव्हे एक पिंड ।
राज्यलोभें दुःख उदंड । वैर अखंड येरयेरां ॥२९॥
भिन्नभिन्न पिंडोत्पती । गरुडसर्पां वैरप्राप्ती ।
तैसे नाहीं श्रीरामभरतीं । चवघेही होती एकपिंड ॥३०॥
सौमित्र भरत आणि शत्रुघ्न । चवथा जाण रघुनंदन ।
चारी मूर्ती श्रीराम पूर्ण । व्योह संपूर्ण या नाव ॥३१॥
चवघेही बंधु भिन्नभिन्न व्यक्ती । चारी मिळोनि श्रीराममूर्ती ।
व्यूह्तचतुष्ट्य यातें म्हणती । आगमार्थीं वेदोक्त ॥३२॥
ऐसिया एकात्मता अति प्रीतीं । भेटों पाहे श्रीराममूर्ती ।
उदया येतांचि गभस्ती । निजगमनार्थी उद्यत ॥३३॥

भरताचा श्रीरामांची भेट घेण्याचा निर्धार , वसिष्ठ भरताच्या मानाची कसोटी पाहातात :

पाचारोनियां प्रधाना । म्हणे सिद्ध वेगीं करा सेना ।
भेटावया रघुनंदना । जाणें वना निश्चित ॥३४॥
वसिष्ठ येवोनि आपण । पहावया भरताचें मन ।
म्हणे पुत्रधर्माचें लक्षण । निजवचन बोलत ॥३५॥
तुम्ही तरी चवघेही पितृभक्त । आज्ञा नेमून गेला दशरथ ।
राज्या अभिषेकावा भरत । श्रीरघुनाथ वनवासी ॥३६॥
तुझें मातेचें वरदान । तिचेंही मागणें हेचि जाण ।
भरतासी राज्यभिषिंचन । रघुनंदन वनवासी ॥३७॥
श्रीराम पितृवचन्विश्वासी । वेगीं गेला वनवासासी ।
तूंही पाळीं पितृवाक्यासी । अभिषेकासी अंगीकारीं ॥३८॥
श्रीरामा अभिषेकावया निर्धारी । पूर्वी केली होती सामग्री ।
ते सिद्ध आहे माझ्या घरीं । तूं अंगीकारीं अभिषेक ॥३९॥
पितृवचन उल्लंघितां । अवश्या पाविजे नरकपाता ।
आग्रह न करवा भरता । तुज मी आतां अभिषेकीं ॥४०॥

वसिष्ठांची सूचना ऐकून भ्रताला मूर्छा, त्याचा विलाप, मातेची निंदा :

ऐकोनि वसिष्ठांचें वचन । भरत पडिला मूर्छापन्न ।
दीर्घ मांडिलें रुदन । आक्रंदें पूर्ण बोलत ॥४१॥
कैकेयी हरिखे जालि रांड । जळो तिचें काळें तोंड ।
वनवासाचें पाखांड । तिणेंचि वितंड वाढविलें ॥४२॥
कैकेयी केवळ परम नष्ट । भाके गोंविला पति वरिष्ट ।
तिचें मागणें पाप स्पष्ट । तो राज्यपट मी नेघें ॥४३॥

राज्याभिषेकाला भरताचा नकार, त्यामुळे वसिष्ठांना आनंद :

वसिष्ठा तुज करीतों नमन । किती पाहसी माझें मन ।
वाचोनियां रघुनंदन । अभिषिंचन मी नेघें ॥४४॥
श्रीरामासी सांडोनियां वनीं । जरी मी बैसलों अभिषिंचनी ।
तरी मी जालों मद्यपानी । मातृगमनी अति नष्ट ॥४५॥
तुझे शिवोनियां चरण । पूर्वी वाहिली श्रीरामाची आण ।
तेंचि माझे अति प्रमाण । पुढतीं आपण न पुसावें ॥४६॥
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । येथोनि मागुती गुरुनाथा ।
राज्याभिषेकाची कथा । मजही आतां न पुसावी ॥४७॥
ऐकोनि भरताचे वचन । वसिष्ठ जाला सुखसंपन्न ।
हृदयीं धरिला आलिंगून । म्हणे अति सज्ञान तूं होसी ॥४८॥

वसिष्ठांसह सर्वांचे रामदर्शनासाठी प्रयाण :

तुझ्या सवें घेवोनी माता । भेटी येईन मी रघुनाथा ।
भरतें चरणीं ठेविला माथा । सभाग्यता आजी माझी ॥४९॥
सदगुरू जाला सुप्रसन्न । भरतें त्राहाटिलें निशाण ।
सेना सन्नद्ध करा संपूर्ण । शीघ्र गमन वनवासा ॥५०॥

वसिष्ठांची सूचना ऐकून भरताला मूर्छा, त्याचा विलाप, मातेची निंदा :

ऐकोनि वसिष्ठांचें वचन । भरत पडिला मूर्छापन्न ।
दीर्घ मांडिलें रुदन । आक्रंदें पूर्ण बोलत ॥४१॥
कैकेयी हरिखे जालि रांड । जळो तिचें काळें तोंड ।
वनवासाचें पाखांड । तिणेंचि वितंड वाढविलें ॥४२॥
कैकेयी केवळ परम नष्ट । भाके गोंविला पति वरिष्ट ।
तिचें मागणें पाप स्पष्ट । तो राज्यपट मी नेघें ॥४३॥

राज्याभिषेकाला भरताचा नकार, त्यामुळे वसिष्ठांना आनंद :

वसिष्ठा तुज करीतों नमन । किती पाहसी माझें मन ।
वाचोनियां रघुनंदन । अभिषिंचन मी नेघें ॥४४॥
श्रीरामासी सांडोनियां वनीं । जरी मी बैसलों अभिषिंचनी ।
तरी मी जालों मद्यपानी । मातृगमनी अति नष्ट ॥४५॥
तुझे शिवोनियां चरण । पूर्वी वाहिली श्रीरामाची आण ।
तेंचि माझे अति प्रमाण । पुढतीं आपण न पुसावें ॥४६॥
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । येथोनि मागुती गुरुनाथा ।
राज्याभिषेकाची कथा । मजही आतां न पुसावी ॥४७॥
ऐकोनि भरताचे वचन । वसिष्ठ जाला सुखसंपन्न ।
हृदयीं धरिला आलिंगून । म्हणे अति सज्ञान तूं होसी ॥४८॥

वसिष्ठांसह सर्वांचे रामदर्शनासाठी प्रयाण :

तुझ्या सवें घेवोनी माता । भेटी येईन मी रघुनाथा ।
भरतें चरणीं ठेविला माथा । सभाग्यता आजी माझी ॥४९॥
सदगुरू जाला सुप्रसन्न । भरतें त्राहाटिलें निशाण ।
सेना सन्नद्ध करा संपूर्ण । शीघ्र गमन वनवासा ॥५०॥
हरिखें नाचत भरत । आजी देखेन श्रीरघुनाथ ।
माझे पुरतील मनोरथ । कृतकायार्थ मी होईन ॥५१॥
श्रीराम भेटवया तक्ताळीं । भरत निघालासे सदळीं ।
नगरीं हर्षें पिटिली टाळी । वना सकळीं निघावया ॥५२॥
होईल श्रीरामदर्शन । उद्यमी चालती संपूर्ण ।
उभय लाभीं ठेवोनि मन । निघाले जन अयोध्येचे ॥५३॥

पौराश्च निर्य्युः सर्वे समवायेन नैगमाः ।
रामदर्शनसंदृष्टाः सर्वाः प्रकृतयस्तदा ॥५॥

श्रीरामप्रेमी नागरीकांची दर्श्नत्सुकतेमुळे तारांबळ, धावपळ :

वाणियें सिद्ध केले पसारे । सोवनी सोनार जोशी वेव्हारे ।
दुसी दिंडें घेतलीं थोरें । गौळीं खिल्लारें थापटिलीं ॥५४॥
चालिल्या पक्कान्नपरवडी । दुधा दह्यांच्या कावडी ।
तेलियें घेतल्या तेलाच्या जोडी । कापडघोडीं चाट्यांचीं ॥५५॥
तांबोळी बांधिलीं आटकीं । ब्राम्हणीं बांधिली धोटकी ।
मायबापां न पुसतां एकी । चोरोनि मार्गी लागली एक ॥५६॥
पुत्रालागीं धावें माता । स्त्री-पुत्रालागीं निघे पिता ।
पुतण्यालागीं धावें चुलता । श्रीरघुनाथा पहावया ॥५७॥
भाडाईत भारवाहक । । वोडे शिंपी नटनाटक ।
म्णिकर रजक नापिक । जळतारक निघाले ॥५८॥
सुतार शस्त्रकार रज्जुकार । मार्गीं विकरा होय अपार ।
घेवोनि चालिले पायतणांचे भार । मोची चांभार चालिले ॥५९॥
सकुटुंब निघाले समस्त । भाडें न मिळे देतां अर्थ ।
एक म्हण्ती निघा त्व्रित । दुरी भरत अंतरला ॥६०॥
घरीं राखण न राहे कोणी । निघती येरयेरांवरी रुसोनी ।
श्रीराम पहवया नयनीं । उल्हास मनीं सर्वांच्या ॥६१॥
खरावरीं वळघोनी । हर्षे निघाल्या कुलालपत्‍नी ।
श्रीराम देखावया नयनीं । अपमान मनीं सुखें साहिती ॥६२॥
अवघियांही पुढें । भडेकरीं नेलें गाडे ।
राजस ठ्ण्कती बापडे । त्याचाशीं भाडें जोडावया ॥६३॥
निघाले द्विजांचे संभार । संन्यासी चालिले अपार ।
नागवे चालिले दिगंबर । श्रीरामचंद्र पहावया ॥६४॥

ततः श्वेतैर्हयैर्यक्तमास्थाय स्यंदनोत्तमम् ।
प्रययौ भरतः श्रीरामान् रामदर्शनकांक्ष्यया ॥६॥
शतं सहस्त्राण्यश्वानां समारुढनि राघवं ॥
षष्टी रथसहस्त्राणि धन्विनो विविधायुधाः ॥७॥
अग्रतः प्रययुस्तस्य सर्वे मंत्रिपुरोहिताः ।
अधिरुह्य हयैयुक्तान्रथान्सूर्यरथोपमान ॥८॥
नवनागसहस्राणि कल्पितानि यथाविधि ।
अन्वयुर्भरतं यांतं राजपुत्रं यशस्विनं ॥९॥

भरताच्या सैन्याचे वर्णन :

श्वेतवारुयुक्त रथ । त्यावरी हर्षे बैसे भरत ।
शत्रुघ्नेंही प्रेरिला रथ । श्रीरघुनाथ भेटावया ॥६५॥
पालखीमाजी कौसल्या वाहूनी । आणि सुमित्रा दुसरी जननी ।
निघाल्या येरही राजपत्‍नी । श्रीरामदर्शनीं उद्यत ॥६६॥
कैकेयी माता न ये निःशेष । तीस झालें परम दुःख ।
ना रामराव ना भरत देख । काळें मुख केंवी दावूं ॥६७॥
वसिष्ठादि ऋषि समस्त । महंत प्रधानादि सुमंत ।
यांसी देवोनि उत्तम रथ । त्याम्समवेत निघाले ॥६८॥
षष्टिहायन भद्रजातीं । दहा सहस्र मत्त हस्ती ।
घंटा घागर्या पताका बहुती । दोहीं भागीशोभती भरताच्या ॥६९॥
अतिरथी महारथी । साठी सहस्र भद्रजाती ।
भरतापाठीसीं धांवती । रथ धडधडती सायुधीं ॥७०॥
रथांचिया गति विगती । एकापरीस एक दाविती ।
त्यांमाजि ध्नुष्याची वित्पती । शस्त्रगती साटोपा ॥७१॥
शतसहस्र सुजाती वारु । निघाला वीरांचा संभारू ।
नाना अलंकारी मनोहरू । करिती दुर्धरू सिंहनाद ॥७२॥
वारुवां बाधली मोहाळी । अंगटोप रागावळी ।
पाखरा झळकती तेजाळी । वीर महाबळी आरुढले ॥७३॥
वारू तीन पायांवरी नाचती । हो हो माम मा जी जी करिती ।
दवोनियां अंतराळी गती । वारू थापटिती महावीर ॥७४॥
कांतिया त्रिशूळ तोमर । भिंडीमाळ चेंडू चक्र ।
गदा मुद्गल लहुदी थोर थोर । आलें मोगर पायांचे ॥७५॥
खेटक भालेजी अपार । पिलंगती पायाचें मोगर ।
गर्जत आले परशुधर । मल्ल दुर्धर तळपती ॥७६॥
सेळी सावळी शक्तियुक्त । अलगाईत बाणाईत ।
कोइतेकार अद्‌भुत । कटारहस्त लघुवेगी ॥७७॥
आडाऊ वोडणें थडकती । तळवे त्यांमाजी तळपती ।
हैकार थैकार पैं देती । वीर गर्जती पायांचे ॥७८॥
चतुरंगसेनासंभार । राघवसेना अति दुर्धर ।
भरत चालिला सत्वर । लागला गजर वाद्यांचा ॥७९॥
कुऱ्हाडे कात्या कोइते हस्तीं । भारापुढें वनें छेदिती ।
मातीकामें नेणों किती । भूमि सज्जिती चालावया ॥८०॥

भरतसैन्य पाहू गैरसमजाने गुहक गंगाकिनारी युद्ध करण्यास सज्ज :

भार चालिला अति दुर्धर । ठाकले भागीरथीतीर ।
देखोनि भरताचा भार । गुहक थोर क्षोभला ॥८१॥
कैसा राज्यलोभ अति दुर्धर । सख्या बंधूस पाडिलें वैर ।
भरतें सज्जोनियां भार । श्रीरामचंद्रा मारूं जातो ॥८२॥
माझा स्वामी श्रीरघुनाथ । तयाचा हा करूं पाहे घात ।
मी रणीं विभांडीन भरत । सेना समस्त छेदीन ॥८३॥

अनु दशरथिं रामं पित्रा राज्याद्विवासितं ।
सामात्यो राज्य्लोभेन हंतुं भरत उद्यतः ॥१०॥
अद्य मे शरसंधातो मत्कार्मुकविनिःसृतः ।
निष्पतिष्यति गात्रेषु नरेषु गजयोधिषु ॥११॥
निविष्टा यत्र सेना सा सवाजिरथकुंजरा ।
तां च भूमिं करिष्यामि शरैः शोणितकर्दमां ॥१२॥
मम दाशरथी रामो भर्ता बंधु सुहृदगुरुः ।
अहं तस्य हितार्थाय करिष्यामि सुदुष्करं ॥१३॥

श्रीराम माझी माता पिता । श्रीराम माझा सुहृद भ्राता ।
श्रीराम “सदगुरू” निजात्मता । श्रीराम तत्वतां आत्मा माझा ॥८४॥
त्याचा करावया घात । सैन्येंसीं जातो भरत ।
त्याचा करीन मी निःपात । श्रीरामभक्त तैं सत्य ॥८५॥
श्रीरामाचा मी मेटकरी । ठेविला आहे गंगातीरीं ।
भरत येवोनि कैसेपरी । परतीरीं उतरेल ॥८६॥
निषादांसी सांगे गुहक । जरी भरत येईल सकटक ।
दृढ राखावें गंगातटाक । गंगोदक शिवों नेदीं ॥८७॥
हे जरी आले युद्धासी । तरी मी ख्याती लावीन त्यांसीं ।
धडमुंडांकित पृथ्वीसी । क्षणार्धैसीं मी करीन ॥८८॥
मारीन रथ वाजी कुंजर । रणीं मारीन नरवीर ।
वाहतील अशुद्धाचे पूर । तैसें क्षात्र करीन ॥८९॥
श्रीरामाच्या निजकार्यार्था । निःशेष वेंचीन जीविता ।
येथोनियां पुढे भरता । त्या सर्वथा जाऊं नेदीं ॥९०॥
निधडॆ निषाद निःशंक । मेळवोनियां निजकटक ।
सन्नद्ध स्वयें गुहक । सेनासन्मुख पैं आला ॥९१॥

भरताचे व गुहकांचे ऐक्य :

भरतासी सांगती सैनिक । युद्धासी आलासे गुहक ।
धरोनियां गंगेचें तटाक । गंगोदक शिवो नेदी ॥९२॥
एक म्हणती राजा निमाला निःशंक । म्हणोनि आम्हांसी पारखा जाला गुहक ।
ताहना फुटताती लोक । गंगोदक स्पर्शौ नेदी ॥९३॥
गुहक बापुडें तें किती । त्यासी क्षणार्धै लावीन ख्याती ।
आज्ञा द्यावी आम्हांप्रती । कोपे दळपती पूसत ॥९४॥
विचारें बोलिला भरत । गुहक रामचा अति आप्त ।
त्याचा न घेतां वृत्तांत । युद्धकदनार्थ करू नये ॥९५॥
भरत पुसे गुहकासी । तूं का युद्ध करूं पाहसी ।
येरू म्हणे तू अति बळेंसीं । मारू कां जाशी श्रीरामा ॥९६॥
माझा स्वामी वनवासी । सगळ बळें मारूं पाहसी ।
हेंच वैर आम्हां तुम्हांसी । अति युद्धासी कारण ॥९७॥
तो म्हणे “सदगुरूचा” द्वेष करी । तोचि आमुचा मुख्य वैरी ।
त्यासी निवटीन शस्त्रधारीं । प्रतिज्ञा खरी हे माझी ॥९८॥
ऐकोनि गुहकाचा वचनार्थ । रथावरोनि पडिला भरत ।
दुःखे गडबडां लोळत । अवस्था प्राणांत ओढवली ॥९९॥
भरत म्हणे गुहकासी । वेगीं मज वधी पापियसी ।
कैकेयीयें जोडिल्या पापराशी । केलों जगासी अति निंद्य ॥१००॥
कैकेयी राज्यलोभाची थोरी । तेणें मी केलों रामाचा वैरी ।
तिचेनि मी निंद्य चराचरीं । दुःखसागरी निमग्न ॥१॥
जो श्रीरामासी स्वयें द्वेषी । त्यासी उतरती तिन्ही मसी ।
ते कैकेयी आर्जवाची मसी । माझ्या मुखासी लागली ॥२॥
तेणें मी झालों काळमुखा । मुख दाखवूं न शकें लोकां ।
कैकयीये दिधले परम दुःखा । तें कोणासी गुहका मी सांगू ॥३॥
गुहका तुझें मी धरितों चरण । वेगीं सोडोनि निर्वाणबाण ।
छेदीं माझें देहबंधन । पापा पुरश्चरण होईल ॥४॥
तूं श्रीरामाचा परम आप्त । तरी माझाही सखा निश्चित ।
माझा करावा वचनार्थ । प्रायश्चित्तार्थ देह छेदीं ॥५॥
ऐकोनि भरताचें वचन । गुहकें घातलें लोटांगण ।
मस्तकीं धरिले सुदृढ चरण । पडिलें आलिंगन आप्तत्वें ॥६॥
दिघांसही प्रेम पूर्ण । नयनीं स्वानंदजीवन । गिहकें घातलें ।
गुहकें घातलें लोटांगण । काय आपण बोलत ॥७॥
श्रीरामीं ज्यासी पूर्ण भक्ती । तो मज आप्त त्रिजगतीं ।
तोचि माझा निजसांगाती । मी चरणार्थीं तयाचा ॥८॥

सुमंत गुहकाला भरताची खरी भूमिका समजावतो :

तंव गुहकासी सांगे सुमंत । राज्य देतां न घे भरत ।
राज्यी अभिषेकावा रघुनाथ । वना असे जात आणावया ॥९॥
ऐकोनि सुमंताची गोष्टी । भरताचें प्रेम देखोनि दृष्टीं ।
गुहकें चरणीं घातली मिठी । म्हणे धन्य सृष्टीं भरता तूं ॥११०॥
गुहका सांगातें घेवोन । भरतें केले संध्यास्नान ।
करोनियां पितृतर्पण । गुहकासी आपण पूसत ॥११॥
गंगातीरी एक राती । श्रीरामें केली होती वस्ती ।
शयन केलें कोणे स्थिती । तें मजप्रती दाखवी ॥१२॥

गुहक भरताला श्रीरामांची निवासाची जागा दाखवितो, त्या दोघांचा संवाद :

गुहक जो निषादपती । तेणें भरता धरोनि हाती ।
जेथें श्रीरामें केली वस्ती । त्या स्थळाप्रती आणिला ॥१३॥
गुहक सांगे भरताजवळी । याचि इंगुदीवृक्षातळीं ।
श्रीराम राहिला महाबळीं । ये गंगाजळीं स्नान केलें ॥१४॥
याचि तृण्सेजे रघुनंदन । सीतेसहित केलें शयन ।
निद्रा न करिच लक्ष्मण । बहु प्रार्थना म्यां केली ॥१५॥
तो म्हणे श्रीरामसेवा समाधान । न करीं जडमूढशयन ।
ऐकता भरतासी आलें रुदन । मूर्छापन्न तो पडिला ॥१६॥
भरत पडिला मूर्छापन्न । शत्रुघ्न जाला अति उद्विग्न ।
कौसल्या सुमित्रा हडबडोन । आल्या धांवोन राज्यपत्‍न्या ॥१७॥
वनवासींची ऐकिली वार्ता । तेणें अति दुःख श्त्रुघ्नभरतां ।
वनीं क्षेम रघुनाथा । लक्ष्मण सीता सुखें असती ॥१८॥
काय वनवासाची कथा । वेगीं साम्गावी गुहका तत्त्वता ।
दुःखें रुदन करिती माता । श्रीरघुनाथाचेनि विरहें ॥१९॥
गुहक सांगता करी रुदन । ये वृक्षीं राहिला रघुनंदन ।
श्रीरामें सीतेसहित केले शयन । हे पावन तृणशय्या ॥१२०॥
वृक्ष वंदितो मी ओजा । नित्य पूजितों तृणशेजा ।
पंथींच्या वंदितों पैं रजा । श्रीरघुराजपदनिष्ठा ॥२१॥

श्रीरामांना अरण्यजीवन कंठावे लागते म्हणून सर्वजण उद्विग्न :

ऐकोनि गुहकाची वाणी । भरत लागे त्याचे चरणीं ।
म्हणे गुहका तूं धन्य त्रिभुवनीं । श्रीरामभजनीं शुद्ध प्रेम ॥२२॥
श्रीरामभावें गा संपूर्ण । तूं वंदिसी वृक्ष तॄण ।
याहीपरता लाभ कोण । सूक्ष्मभजननिष्ठा ॥२३॥
धन्य धन्य गुहका तुझा भाव । तुज तुष्टला श्रीरामराव ।
फिटला देहबुद्धिसंदेह । निःसंदेह रामभजनीं ॥२४॥
गुहक निषाद अति अपवित्र । श्रीरामभजनें जाला पवित्र ।
दीनदयाळ श्रीरामचंद्र । नामें पवित्र महादोषी ॥२५॥
गुहकाची अनन्य भक्ती । देखोनि भरता अति प्रीती ।
विषाद सांडॊनिया चित्ती । जालें सांगाती जिवलग ॥२६॥
श्रीरामसीतातृणशेजार । कौसल्या देखोनि साचार ।
दुःख दाटलें दुर्धर । काय उत्तर बोलली ॥२७॥
सीता सती सुकुमार । राम सुकुमारां अति सुकुमार ।
सुमनशेज खुपे साचार । तृणशेजार त्यांसी देखा ॥२८॥
राजान्नें सेविती पवित्र । त्यांसी लेंघनें त्रिरात्र ।
कैकेयीयें केलें हें विचित्र । सखे सावत्र दुःखी केले ॥२९॥

गुहक सर्वांना नौकेतून गंगेच्या परतीराला नेतो :

ऐसी चालतां उपपत्ती । निमेषामाजी गेली राती ।
उदया आला पैं गभस्ती । निषादांप्रती गुहक बोले ॥१३०॥
भरत उतरेल पैलपार नावा आणा रे अति सत्वर ।
घंटा पताका सालंकार । मृदु अरुवार बैसणिया ॥३१॥
रथवाजिहस्तियुक्त । स्तोम स्तोम जेथींचा तेथ ।
कटक उतरेल समस्त । अति विस्मित तेणें भरत ॥३२॥
गुहक जो कां निषादपती । नावा घेवोनियां हातीं ।
स्वयें आला भरताप्रती । करी विनंती आरुढा जी ॥३३॥
वसिष्ठांचे चणांवरी । गुहक लोटांगण करी ।
तुम्ही तारक भवसागरीं । स्वामी नावेवरी बैसावें ॥३४॥
वसिष्ठे देखोनि गुहकासी । निजात्मप्रीतां अलिंगी त्यासी ।
आजिंचा तारक तूं आम्हां होसी । परपारासी न्यावया ॥३५॥
गुहक म्हणें श्रीरघुनाथा । तारक तुझी कृपा तत्वतां ।
कृपेनें हात ठेविजे माथां । मग मी समस्तां तारीन ॥३६॥
ऐसी गुहक बोलता बोली । वसिष्ठासी निजखूण पावली ।
हरिखें पिटोनियां टाळी । नावेजवळी तो आला ॥३७॥
वसिष्ठदि महंत थोर । त्यासी नाव दिघली स्वतंत्र ।
ते नव्हेती पैं परतंत्र । भवसमुद्रतारक ॥३८॥
राजपत्‍न्या अति सुकुमार । त्यांसी नाव दिधली थोर ।
मृदु आस्तरण परिकर । तेथें समग्र बैसविल्या ॥३९॥
भरत शत्रुघ्न नावेवरी । निषाणें त्राहाटिल्या भेरी ।
नाना वाद्येंसी जयजयकारीं । वेगी परपारीं उतरले ॥१४०॥
भरत पुसे गुहकातें । सैन्य लावावें कोणें पंथें ।
तो म्हणे मी येतों सांगातें । भुयाळातें घेवोनी ॥४१॥
गुहक अति हर्षयुक्तें । चालिला भरताचे सांगातें ।
दृष्टीं पहावया श्रीरामातें । बाह्य स्वार्थतें सांडूनी ॥४२॥
मुमुक्षुवा साधनीं अति प्रीती । तैसी गुहका श्रीरामभक्ती ।
भुयाळ घेवोनि सांगातीं मार्ग शोधिती अतिनिष्ठा ॥४३॥
भरतगुहकांचा विवाद । दोघां अनुतापसंवाद ।
एकाजनार्दनीं निजबोध । परमानंद रामकथा ॥४४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
भरतवनाभिगमनगुहकसंवादो नाम द्वदशोऽध्यायः ॥ १२ ॥
॥ ओंव्या १४४ ॥ श्लोक १३ ॥ एवं १५७ ॥