Ramayan - Chapter 1 - Part 3 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 3

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 3

अध्याय 3

॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥

कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण :

कैकेयी धरोनि पोटेसीं । कौसल्या संबोखी तियेसी ।
तूं का व्यर्थ दुःखी होसी । आम्हां दोघींसी दुःख एक ॥१॥
एकोदरा सख्या बहिणी । दो दुस्सर पाटणी नांदती सख्या ॥२॥
दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।
दोघीं नाहीं नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥
दोघी नाही नित्य संबंध । दोघीं नाही नित्य संवाद ।
दोघीं नाहीं नित्य बोध । तो सख्यसंबंध अति मिथ्या ॥४॥
दोघीं नाहीं एक सुख । त्या सख्या मानिती मूर्ख ।
तूं एक करिसी व्यर्थ दुःख । आम्हां निजसुख एकत्वें ॥५॥
आम्हां तुम्हां एक आहेवपण । आम्हां तुम्हां एक निजभूषण ।
आम्हां तुम्हां एक निजमंडन सख्यपण एकत्वें आम्हां तुम्हां ॥६॥
आम्हां तुम्हां एक सांगात । आम्हां तुम्हां एक भोगार्थ ।
आम्हां तुम्हां एक कांत । सख्य सख्यार्थ आम्हां तुम्हां ॥७॥
आम्हां तुम्हां एक नाहो । आम्हां तुम्हां एक सभा् वो ।
आम्हा तुम्हा एकात्मस्नेहो आम्हां एक भोगभुवन ॥ ८ ॥
A line is missing here
आम्ही एकें सुखें संपन्न । सत्य सखेपण आम्हां तुम्हां ॥९॥
आम्हां नित्यत्वें चाळिता । आम्हां एक नित्यत्वें प्रतिपाळिता ।
आम्हां एक नित्यत्वें न्याहाळिता । हे नित्य सख्यता आम्हां तुम्हां ॥१०॥
आम्हां तुम्हां एक गोसावी । आम्हां तुम्हां एक निववी ।
आम्हां तुम्हां एक जीववी । हे सत्य पदवी सख्याची ॥११॥
आम्हां तुम्हां एक पांचभौतिक । एकचि हस्तपादादिक ।
आम्हां तुम्हां देखणें एक । हें अलोलिक निजसख्य ॥१२॥
आम्हां तुम्हां एक नाथ । सत्यत्वें जाण दशरथ ।
तूं खेद करितेसी व्यर्थ । ऐक वृत्तांत साजणी ॥१३॥
पुढिलांचे देखोनि दुःख । सुख मानिता परम मूर्ख ।
परांचे निरसोनि असुख । द्यावे सुख शुद्धत्वें ॥१४॥
परदुःखें होय सुखी । तो ब्रह्मराक्षस तिहीं लोकीं ।
सदा निंद्य शास्त्रमुखीं । शुद्ध सात्विकी तो नव्हे ॥१५॥
तूं राहसी अपुत्रपणीं । आम्ही सुख पावों पुत्रपणीं ।
तैं पूर्वज पडती पतनीं । तो दोष त्रिभुवनीं न समाये ॥१६॥
उपजला पुत्र देऊं जातां । तो पोसणा म्हणती तत्त्वता ।
साधूं दोघींच्या निजस्वार्था । अवंचकता परमार्थ ॥१७॥

उदकस्य रसः चैत्यं अन्नस्य स्वादरो रसः ।
आनुकूल्यं रसः स्त्रीणां मित्रस्य अवंचको रसः ॥१॥

उदकाची गोडी शीतळता । अन्नाची गोडी आर्द्रता ।
स्त्रियांची गोडी अनुकूलता । अवंचकता मित्रगोडी ॥१८॥
आम्ही तुम्ही सख्या बहिणी । ऐसी बोलिजे कहाणी ।
ते करून दावावी करणी । येर बोलणी अति मिथ्या ॥१९॥
जैसें बोले तैसें करी । त्यातें वंदिजे हरहरीं ।
येर ते व्यर्थ बोलाची ज्ञानफरारी । तो संसारी पढतमूर्ख ॥२०॥
जैसा बोले तैसा क्रियार्थ । या नांव मुख्य परमार्थ ।
येर बोलणें ते व्यर्थ । विषयस्वार्थ परमार्थी ॥२१॥

कौसल्या व सुमित्रा स्वतःच्या प्रसादातील अर्धा भाग कैकेयीला देतात :

माझें बोलणे सत्य सांग । माझ्या भागाचा अर्धभाग ।
साजणी गुएई वो सवेग । दोघींचे अभंग सख्यत्व येणें ॥ २२ ॥
ऐकतां कौसल्येचें वचन । कैकेयीस जालें समाधान ।
करूनि सुद्धाचमन । भागार्थ घे आपण स्वानंदें ॥ २३ ॥
मृत पावे अमृतपान । तृषिता मुखीं निज जीवन ।
अंधा उघडले लोचन । तैसें वचन कौसल्येचें ॥ २४ ॥
रंका लाधलें निधान । अकर्मी पावे ब्रह्मज्ञान ।
दुष्काळिया मिळे मिष्टान्न । तैसें वचन कौसल्येचें ॥ २५ ॥
कौसल्येची बुद्धि समान । समत्वें भागविभाग आपण ।
कैकेयीसी दे विभागून । सुखसंपन्न समत्वें ॥ २६ ॥
भाग देतां कैकेयीसी । कौसल्या अति उल्हासी ।
सवतीभाव नाहीं मानसीं । देत उल्हासीं निजभाग ॥ २७ ॥
जैसी कौसल्येची विधी । तैसीच सुमित्रेची सद्बुगद्धी ।
बाप सत्संगाची सिद्धी । दे अर्धार्ध निजभाग ॥ २८ ॥
सत्संगाचें निजमहिमान । कौसल्या देत आपणासमान ।
कौसल्येसंगें सुमित्रा जाण । दे आपण भागार्ध ॥ २९ ॥
सुष्ठु मैत्री कौसल्येसीं । म्हणोनि सुमित्रा म्हणणें तियेसी ।
तेणें सुमित्रा भावेंसी । दे कैकेयीसी भागार्ध ॥ ३० ॥
जैसा संग होय ज्यासी । तैसी बुद्धि होय त्यासी ।
कौसल्यासंगे सुमित्रा तैसी । दे कैकेयीसी भागार्ध ॥ ३१ ॥

ऋषींना आनंद :

ऐकोनि कौसल्येचा वचनार्थ । देखोनि भागदानींच नि स्वार्थ ।
वसिष्ठ आनंदें नाचत । स्वयेंडुल्लत स्वानंदें ॥ ३२ ॥
करितां भागप्राशन । उदरा आला रघुनंदन ।
धन्य अयोध्या-राजभुवन । तेथें स्वानंदघन क्रीडेल ॥ ३३ ॥
उभवोनी स्वानंदाची गुढी । नारदाची पडे उडी ।
नाचूं लागे आवडी । सूर्यवंशा गाढी दशा आली ॥ ३४ ॥
सुटेल देवांची बांधवडी । तुटेल नवग्रहांची बेडी ।
मुक्ति सुरवाडेल गाढी । सुख सुरवाडी पाल्हेजेल ॥ ३५ ॥
माझ्या वाल्मीकीचें वचन । जालें प्रत्यक्षप्रमाण ।
राम प्रगटला निजनिधान । धन्य जन अयोध्येचे ॥ ३६ ॥
लंकेपुडें युद्ध दारुण । राम करील रणकंदन ।
तें मी देखेन आपण । हरिखें उड्डाण करी नारद ॥ ३७ ॥
जेविव्याची चवी जेविता जाणे । तेवीं वसिष्ठनारदांचे नाचणें ।
तें सुख तिहींच भोगणें । येरीं पाहणें टकमकां ॥ ३८ ॥
विभांडक आनंए मनीं । कौसल्या सत्वशिरोमणी ।
इचेनि पावन जाली अवनी । धन्य त्रिभुवनीं कौसल्या ॥ ३९ ॥
जृष्यशृंग तये वेळीं । सुखावला सुखकल्लोळीं ।
उड्डाण करोनि दे आर्ळी । कौसल्या भूतळीं आणील राम ॥ ४० ॥
कौसल्येचा शुद्ध भावो । ते भावीं प्रकटला रामरावों ।
धन्य दशरथ महाबाहों । गर्भान्वयो अलोलिक ॥ ४१ ॥
विस्मय करिती ऋषीश्वर । तटस्थठेले सुरवर ।
अवघे करिती जयजयकार । भागिला रघुवीर चतुर्थ भागीं ॥ ४२ ॥
मुख्य द्वेष सवतीमत्सरासी । तो मत्सर नाहीं कौसल्येसी।
म्हणोनि श्रीराम आला कुसी । त्या गर्भासी अवधारा ॥ ४३ ॥
सवती मत्सर कैकेयीसी । म्हणोनि हारविलें निजभागासी ।
शुद्ध भाव कौसल्येसी । तिच्या गर्भासी श्रीराम ॥ ४४ ॥
एक ताट आलें जञशेषीं । तेथेचि गर्भ निश्चयेसीं ।
तो विभागला चतुर्थ भागेंसी । चतुर्विध त्यासी बोलिजे ॥ ४५ ॥
मुख्यार्थ कौसल्येपासी । तद्भंजनार्ध जाणा सुमित्रेसी ।
दोनी अर्धार्ध कैकेयीसी । स्वतंत्र भाग तिसी असेचिना ॥ ४६ ॥
पुढां पोटीं होती पुत्र । ते तिचे नव्हती स्वतंत्र ।
यालागीं बोलिजे परतंत्र । कैकेयीचरित्र नावडे त्यांसीं ॥ ४७ ॥
असो पुढील कथेसी । वसिष्ठें पाचारोनि तिघींसी ।
देवोनि भाग विभागासी । म्हणे विलंबासी करूं नये ॥ ४८ ॥

कैकेयीचा उद्वेग व याचे परिणाम :

दोघीं निजभागप्राशन । केलें न लगतां दर्शन ।
कैकेयी भागप्राशन । करितां उद्विग्न ते जाली ॥ ४९ ॥
दोनी अर्ध जंव घोंटी । तंव ते बैसले कंठीं ।
गिळूं जातां अति संकष्टीं । गोंटितां घोटी गोंटेना ॥ ५० ॥
भाग तिचे नव्हते स्वतंत्र । परभाग गिळूं न शके वक्त्र ।
पांढरे जाले तिचे नेत्र । वमनोद्‌गार ते जाली ॥ ५१ ॥
पराचें ओझें वाहणें । तें आपणासी होय उबगवाणें ।
तेवीं परभाग घोंटिता तिणें । जीवे प्राणें घोंटेना ॥ ५२ ॥
विभागें रोधली तिची घांटी । ऐसें वसिष्ठें देखिली दृष्टी ।
मंत्रोदक देऊन उठाउठी । तेणें घोटी विभाग ॥ ५३ ॥
सेवितां ते मंत्रोदक । फिटली शंका पावली सुख ।
पुत्रगर्भाचा संतोष । आत्यंतिक ते पावे ॥ ५४ ॥
साधु सतां निजनिकट । भलतें निवारे संकट ।
गर्भमंडित जालें पोट । सुख उद्भ ट कैकेयीसी ॥ ५५ ॥
हरपले सांपडे रत्न । मरत्या घडे अमृतपान ।
तेवीं वसिष्ठोदकें जाण । सुख परम कैएयीसी ॥ ५६ ॥

सत्संगमहिमा :

यालागी सत्संगती । दुःख नव्हे ना अधोगती ।
सत्संगाची परम ख्याती । नेणों किती उद्धरले ॥ ५७ ॥

सत्संगेन हि दैतेया यातुधानाः खगा मृगाः ।
गंधर्वा राक्षसा नागां सिद्धचारणगुह्यकाः ॥ २ ॥

दैत्यदानव राक्षसृष्टी । गण गंधर्व मृग पक्षी पुष्टी ।
सिद्ध चारण गुह्यक कोटी । उद्धरले सृष्टी सत्संगें ॥ ५८ ॥
मनुष्यलोकींची गोष्टी । सत्संग लाधल्यापाठीं ।
उद्धरले कोट्यनुकोटी । सभाग्य सृष्टी सत्संगें ॥ ५९ ॥
धन्य धन्य तो दशरथ । ज्यासी सत्संग पुरोहित ।
त्याची काठी मानी आदित्य । तो घरांत निजसखा ॥ ६० ॥
तेणें विसिष्ठें आपण । तिघींस करविलें पिंडप्राशन ।
एका विनवी जनार्दन । गर्भावधारण अवधारा ॥ ६१ ॥
स्वस्ति श्री भावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
पिंडप्राशनं नाम तृतीयो‍धायः ॥
॥ श्लोक २ ॥ ओंव्या ६२ ॥ एवं ६४ ॥