Hold Up - 25 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | होल्ड अप - प्रकरण 25

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

होल्ड अप - प्रकरण 25

होल्ड अप प्रकरण २५
“ तुम्ही हरकत घेताय?” एरंडेनी विचारलं.
“ होय.” काणेकर म्हणाला.
“ ओव्हररुल्ड.”
“ आणि मरुशिका, तुम्ही या मजकुराचा उपयोग आजच्या तुमच्या सकाळच्या सत्रातील साक्षीसाठी आणि उलट तपासणीसाठी केलात?” पाणिनी ने विचारलं.
“ मला सारखं सारखं ऑब्जेक्शन घ्यायला नको वाटतंय,युअर ऑनर पण या प्रश्नांसाठी काहीही आधार नाही. पुराव्यात नसलेल्या बाबींवर प्रश्न विचारले जात आहेत. मिस्टर कामोद यांनी काहीतरी खरडून एखादआ कागद मरुशिका यांचेकडे दिलं म्हणून त्या त्यांची साक्ष त्यातील मजकुराच्या आधारावर देत आहेत आणि स्वतःच्या स्मरण शक्तीच्या आधारावर देत नाहीयेत असं समजणे योग्य नाही. उदाहरणार्थ, त्याने समजा त्या कागदावर लिहिलं असतं की, आरोपी महाजन यानेच मला बंदूक लावली. तर केवळ ते वाक्य कागदावर लिहिलेलं मरुशिका ने वाचलं म्हणून ते घडलंच नाही असं समजायचं का? ” आरुष काणेकर ने युक्तिवाद केला.
“ ओव्हररुल्ड.” न्यायाधीशांनी कौल दिला पण त्यामुळे मरुशिका ला, पुढे काय बोलायचं याचं ज्ञान मिळालं !
“ मी तो कागद वाचला मिस्टर पटवर्धन, पण माझी साक्ष त्या चिठ्ठी वर अवलंबून नाहीये.मला जे आठवत होतं घडलेलं, त्यावरच मी साक्ष दिली आहे.”
“ आता काणेकर यांनी युक्तिवाद करून तुम्हाला बरोब्बर सुचवलंय काय उत्तर द्यायचं ते.” पाणिनी म्हणाला “ थोडक्यात कोर्टाच्या नकळत, त्यांनी तुमच्या तोंडी शब्द घातले.”
“ हा कोर्टाचा अपमान केलं जातोय युअर ऑनर.” काणेकर ओरडला.
“ तुम्ही तुमची तपासणी चालू ठेवा पटवर्धन.” एरंडे म्हणाले.
“ शुक्रवारी तुम्हाला या गोष्टी आठवत नव्हत्या, बरोबर?” पाणिनी म्हणाला
“ बरोबर.”
“ पण आज मात्र त्या तुम्हाला चांगल्या आठवताहेत?” पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ कारण तुमच्या आठवणींना कामोद यांच्या चिट्ठी मुळे उजाळा दिलं गेला?”
“ शुक्रवारी काही गोष्टी मला स्पष्ट झाल्या नव्हत्या त्या आज शनिवारी झाल्यात.”
“ त्या कागदामुळे?” पाणिनी ने विचारलं.
“ त्या कागदाला काही अर्थ नाहीये पटवर्धन. मला सर्व काही लक्षात आहे.”
“ जेवण झाल्यावर कॉफी प्यालात तुम्ही?” कागद वरील मजकूर वाचत पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ कामोद ने पण घेतली?”
“ त्याने... मला... नाही आठवत मला.” मरुशिका चाचरत म्हणाली.
“ तुम्हाला उद्या कदाचित आठवेल ते?” पाणिनी ने विचारलं.
“ कदाचित.” मरुशिका म्हणाली.
“ आणि कामोद ची ही चिट्ठी पुन्हा तुम्ही वाचलीत तर कदाचित चे रुपांतर ‘नक्की’ मधे होईल?” पाणिनी ने विचारलं.
मरुशिका ला काय बोलायचं ते सुचेना. आरुष पुन्हा उठायला लागला पण एरंडे यांनी त्याच्याकडे बघताच तो परत बसला.
“ कामोद यांनी तुमच्या कडे कसा काय दिला कागद?” पाणिनी ने विचारलं.
“ काणेकरांनी आम्हा दोघांनाही त्यांच्या ऑफिसला बोलावून घेतलं.काही गोष्टींबद्दल त्यांना अधिक जाणून घ्यायचं होतं. पण त्यांनी आम्हाला वेगवेगळे आत बोलावून चर्चा केली. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या साक्षीबद्दल आम्ही एकमेकांशी चर्चा करू नये.”
“मग पुढे काय? ”
“मग कामोद आधी पंधरा वीस मिनिटे काणेकरांच्या केबिन मधे जाऊन त्यांना भेटला तो बाहेर आला आणि मी आत जायला निघाले आम्ही एकमेकांकडे पाहून फक्त हसलो. ”—मरुशिका
“ तेवढया भेटीत त्यांनी तुमच्या कडे पटकन तो कागद दिला ! ” पाणिनी म्हणाला
“ हो.”
“ आणि तुम्ही तो कागद नेमका कधी वाचलात? काणेकरांच्या केबिन मध्ये जाण्यापूर्वी की आधी?” पाणिनी ने विचारलं.
“ नंतर ”
“ किती वेळानंतर?”
“ लगेचच. म्हणजे काणेकरांच्या समोर बसल्यावर मी मांडीवर तो कागद पसरला आणि त्यात काय लिहिलंय त्यावर नजर टाकली.”
“ त्यानंतर काणेकरांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले?” पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ तुम्ही त्यांना जेवणाबद्दल सांगितलं?”
“हो.”
“जेवणाच्या आधी तुम्ही काय घेतलं?”
“ सोलकढी.”
“ शुक्रवारी तुम्ही कोर्टात साक्ष देताना सोलकढीचा उल्लेख केला नव्हता.”
“ नव्हता केला.”
“ का?” पाणिनी ने विचारलं.
“ आठवलं नाही तेव्हा.”
“ पण शनिवारी तुम्हाला काणेकरांच्या ऑफिस मधे टे आठवलं?”
“ हो.”
“ कामोद ने दिलेल्या चिट्ठी मुळे?” पाणिनी ने विचारलं.
“ त्यामुळे मला मदत झाली असं म्हणता येईल.” –मरुशिका
“ म्हणजे या कोर्टाची तुम्हाला अशी समजूत करून द्यायची आहे का की कामोद ने दिलेल्या कागदामुळे तुम्हाला सोलकढी प्याल्याचे शनिवारी आठवले नाहीतर आठवलेच नसते तुम्हाला?” पाणिनी ने विचारलं.
“ असे काही नाही.शुक्रवारी पण मला माहिती होतं की सोलकढी मागवली होती आम्ही.फक्त त्या कागदामुळे माझ्या आठवणी ताज्या झाल्या एवढंच.” मरुशिका हट्टी पणाने म्हणाली.
पाणिनीने आपल्या हातातला कागद पुन्हा तिच्या समोर नाचवला. “ आता एवढचं सांगा की सोलकढी दोघांनी प्याली की फक्त तुम्ही? ” पाणिनी ने विचारलं.
मरुशिका ला घाम फुटला.पाणिनी हसला. “ मला आता कामोद यांना पुन्हा काही प्रश्न विचारायचे आहेत.”
“ त्यापूर्वी ,काणेकर,तुम्हाला फेर तपासणीत काही विचारायचं आहे?” एरंडे यांनी विचारलं.
“ नाही युअर ऑनर.”
मरुशिका पिंजऱ्यातून बाहेर पडली.आणि कामोद कुमठेकर ला कोर्टात हजर करण्यात आलं.
“ शुक्रवारी कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर तुम्ही मरुशिका शी संपर्क केला होता?” पाणिनी ने विचारलं.
“ मी आज सकाळीच त्यांना गुड मॉर्निंग केलं.” कामोद कुमठेकर म्हणाला.
“ या खटल्या संदर्भात संपर्क केला का?” पाणिनी ने विचारलं.
“ बिलकुल नाही.”-कामोद.
“ एक मिनिट युअर ऑनर, मला वाटतं की या साक्षीदाराच्या.....” आरुष कामेकर उभा राहून म्हणाला.
“ खाली बसा. मला या खटल्यातल्या या टप्प्यात खूप रस निर्माण झालाय.मी दोन्ही बाजूच्या वकीलांना सूचना करतोय की तुम्ही दोघेही जरा थांबा. मला स्वतःला या साक्षीदाराला प्रथम काही प्रश्न विचारायचे आहेत. ” एरंडे म्हणाले.
“ मला सांगा मिस्टर कामोद कुमठेकर,तुम्ही या खटल्यातल्या संदर्भात मरुशिका शी संपर्क केलं होतात? शुक्रवारी कोर्टाचं काम संपल्यानंतरच्या काळात?”
“ नाही युअर ऑनर, मी तसा करणे सुध्दा अपेक्षित नव्हतं, मला जाणीव आहे त्याची.” कामोद म्हणाला.
“कुठल्याही विषयाच्या संदर्भात ? ”
“ केस बद्दलच्या कुठल्याच विषया बद्दल आमचा संपर्क नाही झाला.”
“ दरोड्याच्या रात्री काय घडलं या बद्दल सुध्दा?” न्या.एरंडे यांनी विचारलं.
कामोद कुमठेकर उत्तर न देता जरा थांबला.त्याने काणेकरांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिलं.संपूर्ण कोर्टात पसरलेल्या तणावाच्या वातावरणाने तो अचानक सावध झाला.
“ तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे त्या प्रश्नात मला नाही समजलं.” –कामोद
“ दरोड्याच्या कालावधीत, त्याच्या आधी आणि नंतर काय काय घडलं या बद्दल तुम्ही मरुशिका बरोबर कोणत्याही प्रकारचा संपर्क केला की नाही? ”—न्या.एरंडे
“ म्हणजे.. मी.. काय झालं.. ओके. केला संपर्क.” कामोद चाचरत म्हणाला.
“ ओह ! केलंत तुम्ही !” न्या.एरंडे उद्गारले.
“ बारिक सारिक गोष्टींबद्दल.” –कामोद.
“ दरोड्याच्या आधी घेतलेल्या जेवणात तुम्ही काय घेतलं होतं या बद्दल?” एरंडे यांनी विचारलं.
“ युअर ऑनर, ...” काणेकर उठून म्हणाला.
“ खाली बसा, मधे बोलू नका.”—एरंडे.
“ तरीही मला हरकत घ्यायची आहे कारण मला हा प्रश्न चुकीचा आहे असं वाटतंय.”
“ काय चुकीचं आहे त्यात?” –एरंडे
“ प्रश्नात चुकीचं नाहीये युअर ऑनर पण या साक्षीदाराला हे लक्षात आणून देणे महत्वाचं आहे की साक्षीदाराने लेखी संपर्क केला असेल तर ते देखील कोर्टाला अपेक्षित आहे. ” –काणेकर ने खुलासा केला.
एरंडे यांच्या चेहेऱ्यावर तिरस्कार युक्त भाव उमटले. “ मला नेमकं हेच जाणून घ्यायचं होतं.” ते उद्गारले.
“ काणेकर तुमच्या हरकतीवर माझा आक्षेप नव्हता पण ज्या पद्धतीने तुम्ही ती शब्दात मांडली ते मला आवडले नव्हते. ठीक आहे असू दे. पटवर्धन, आता तुमचे प्रश्न सुरु करा.”
“ कुमठेकर, कोर्टाच्या प्रश्नाला उत्तर द्या.” पाणिनी म्हणाला
“ शनिवारी सकाळी काणेकर आणि माझी चर्चा झाली पण त्यात त्यांनी विचारलेल्या प्रश्नात दरोड्याच्या संदर्भातला प्रश्न नव्हता.फक्त मला त्या रात्रीचे काय आठवतंय याची चाचपणी करण्यासाठीचे प्रश्न होते.त्यामुळेच त्याबद्दलची चिट्ठी मरुशिका ला देण्यात काही गैर आहे असं मला वाटलं नाही, वाटत नाही.” कामोद उत्तरला.
“ हीच चिट्ठी आहे?” त्याला आपल्या हातातला पिवळा कागद दाखवत पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ तुमच्या हस्ताक्षरातली?”
“ हो.” कामोद म्हणाला.
“ तुम्ही सरकारी वकील कानेकाराना जी माहिती दिलीत तशीच माहिती मरुशिका ने सुध्दा दयावी, तुमच्या विधानाशी विरुध्द माहिती तिने देऊ नये हाच तुमचा हेतू होतं ना ही चिट्ठी तिला देण्यामागे? ” पाणिनी ने विचारलं.
“ ओह, तसं नाही पटवर्धन, तिला समन्स आल्यामुळे ती धास्तावली होती. ती नाईट क्लब चालवते.त्या बद्दलच आपल्याला तिथे बोलावून विचारलं जाईल याचं तिला टेन्शन आलं होतं, म्हणून मी तिला चिट्ठी लिहून कळवलं की साधारण काय स्वरुपाची चौकशी केली जाणार आहे तिची.” कामोद म्हणाला.
“ तसं असेल तर तुम्ही चिट्ठीत असं का नाही लिहिलं , की पोलिसांना नाईट क्लब बद्दल चौकशी करायची नाहीये तर गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी काय झालं त्यात रस आहे?” पाणिनी ने विचारलं.
“ अरे, खरंच की मला तेव्हा हे कसं सुचलं नाही? मी उगाचच एवढ सगळं लिहीत बसलो.”
“ तुम्ही तिला हे सगळं तपशीलात लिहीलत मिस्टर कामोद, याचं कारण असं आहे की त्या संध्याकाळी तुम्ही जिच्या बरोबर जेवण घेतलंत, ती स्त्री म्हणजे मरुशिका नव्हती ! दुसरीच कोणीतरी होती. ” पाणिनी म्हणाला
“ नाही. चुकीचं बोलताय तुम्ही.”—कामोद
“ केवळ जेवायलाच नाही तर त्या नंतर तुमच्या बरोबर गाडीत बसलेली स्त्री सुध्दा मरुशिका नव्हती ! दुसरीच कोणीतरी होती. ” पाणिनी म्हणाला
“ असं काही नाहीये.” कामोद म्हणाला.पण त्याच्या बोलण्यात जोर नव्हता.
“ हल्ला झाल्यावर तुम्ही रस्त्यावर येऊन एका औषधाच्या दुकानातून पोलिसांना फोन लावलात, तो फोन करण्यापूर्वी तुम्ही आणखी एका व्यक्तीला फोन केला होतात.बरोबर आहे की नाही?” पाणिनी ने विचारलं.
साक्षीदाराची घाबरगुंडी उडाली.
“ मी... मला.. कदाचित केला असेल.. म्हणजे.. मला आठवत नाही...”
“ आणि तुम्ही जो फोन केलात, पोलिसांना फोन करण्यापूर्वी, तो मरुशिका व्हिला नंबर दोन ला केला होतात.” पाणिनी म्हणाला
“ मला लक्षात नाही. मी पार गोंधळून गेलो होतो त्या हल्यामुळे. माझा जीव धोक्यात होता.” कामोद कुमठेकर म्हणाला.
“ गोंधळून गेला होतात?” पाणिनी ने विचारलं. “ हल्ल्यात नेमकं गोंधळून जाण्याजोगं काय होतं?”
“ सगळाच प्रसंग एकूण.”
“ त्यातल्या त्यात भीतीदायक काय होतं?” पाणिनी ने विचारलं.
“ अचानक गाडीचा दरवाजा उघडला जाणे आणि माझ्या डोक्याला बंदूक लावली जाणे.”
“ या प्रसंगाने तुम्ही एवढे गोंधळून गेला होतात ही तुम्हाला अत्ता सांगता येत नाहीये की तुम्ही मरुशिका व्हिला नंबर दोन ला फोन लावला होता किंवा नाही?” पाणिनी ने विचारलं.
“ हो खूप घाबरलो होतो आणि गोंधळून गेलो होतो त्यामुळे फोन लावला होतं की नाही लक्षात नाही.” कामोद म्हणाला.
“ मग एवढे घाबरल्यामुळे आणि गोंधळात पडल्यामुळे तुम्हाला मरुशिका व्हिला ला फोन केल्याचं आठवत नसेल तरी सुध्दा त्याच मानसिक अवस्थेत तुम्हाला केवळ एक सेकंद पाहून आरोपीला ओळखता आलं अशी तुम्हाला या कोर्टाची समजूत करून द्यायची आहे का? ” पाणिनी ने विचारलं.
“ मी तसा गोंधळलो नव्हतो, मी पाहिला तो आरोपीच होता.”
“ तुम्ही तेवढे गोंधळले नसाल तर तुम्ही व्हिला नंबर दोन ला फोन केलेला असू शकेल?” पाणिनी ने विचारलं.
“ असू शकेल.” कामोद ने नाईलाजाने कबूल केलं.
“ व्हिला ला फोन लागल्यानंतर तुम्ही मरुशिका ला फोनवर बोलावून घेतलंत?”पाणिनी ने विचारलं.
“ असू शकेल.” कामोद म्हणाला. “ थांबा थांबा. नाही. ”
“ तुमचं पाहिलं उत्तर ‘असू शकेल’ असं होतं.” पाणिनी म्हणाला
“ माझा घोळ झाला.” कामोद म्हणाला.
“ एवढा गोंधळ झला मनात की गाडीत तुमच्या शेजारी मरुशिका बसलेली असणे अपेक्षित असतांना तुम्ही फोन वर मरुशिका ला बोलावून घेतलंत?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही. मी मरुशिकाला नाही बोलावून घेतलं फोन वर.” कामोद म्हणाला.
“ तिला बोलवायचं नव्हतं फोन वर तर तुम्ही व्हिला ला फोन केलातच का?” पाणिनी ने विचारलं.
“ मला नाही वाटत मी व्हिला ला फोन केला असावा.”
“ तुम्ही व्हिला ला फोन लावला नाहीत हे तुम्हाला माहीत नाही?” पाणिनी ने विचारलं.
“ माझा खूप गोंधळ उडालाय पटवर्धन. जर त्या औषधाच्या दुकानातलं रेकोर्ड दाखवत असेल की तिथून व्हिला ला फोन लावला गेला, तर मी लावला असेल.” हताश पणे कामोद म्हणाला.
पाणिनी हसला. “ दॅट्स ऑल युअर ऑनर.”
“तुम्हाला फेर तपासणी घ्यायची आहे?” आरुष ला एरंडे यांनी विचारलं.


(प्रकरण २५ समाप्त.)