Bhetli tu Punha - 7 in Marathi Love Stories by Sam books and stories PDF | भेटली तू पुन्हा... - भाग 7

The Author
Featured Books
Categories
Share

भेटली तू पुन्हा... - भाग 7

अन्वीच्या हाती त्या मुलीचा फोटो लागला. आदीला त्या फोटोबद्दल विचारले असता त्याने टाळाटाळ केली त्यामुळे ती अपसेट झाली. तिच्या आवाजावरून ती हर्ट झाल्याचे जाणवले पण का ते अजून ही त्याला समजत नव्हते.

"ओके" तो तिचा हात सोडत बोलला.

तशी ती मागे वळून न पाहतच तिथून निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला.

आता पुढे...

अन्वी जाताच आदिने दरवाजा बंद केला व पुन्हा डॉक्युमेंटस् पाहू लागला. पण आता त्याचे मन त्या कामात लागत नव्हते. त्याने डोळे चोळली व अन्वीला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला.

मोबाईल अनलॉक करून त्याने कीपॅडवर एक नंबर डायल केला. सहा सात रिंग नंतर समोरून कॉल घेतला गेला.

अन्वी अजून रोडवरच होती की तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अननॉन नंबर पाहून ती थोडी विचारात पडली.

विचार करत करतच तिने मोबाईल घेतला.

"हॅलो!" ती एकदम सॉफ्ट आवाजात बोलली.

"हॅलो!,अन्वी इट्स मी आदित्य" तो पटकन बोलला.

आदि बोलत होता की अन्वी जवळून एक ट्रक कर्णकर्कश हॉर्न वाजवत गेला. त्यामुळे तिला आदिच बोलणं ऐकू आले नाही. तिने एका कानावर हात ठेवला व पुन्हा बोलू लागली.

"हॅ...हॅलो..."

ती पुढे काही बोलणार की तिचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. म्हणून ती पुन्हा मोबाईल पर्समध्ये ठेवून सायकल चालवू लागली.

इकडे आदि पुन्हा तिला कॉल करत होता. पण आता मोबाईल स्वीच ऑफ सांगत होता. पुन्हा पुन्हा तो कॉल करत होता पण तेच.

त्याने आपले पेपर्स एकत्र केले व बॅगेत होते तसे भरून ठेवले. पेपर्स एकत्र करत असताना त्याला तो फोटो दिसला. फोटो उलटा असल्याने त्याला ही त्या फोटो मागे लिहिलेलं दिसले.

"माय लव्ह" हे वाचताच त्याच्या डोक्यात क्लिक झालं की अन्वीने हे वाचले असणार म्हणून तिचा मूड ऑफ झाला.

तो फोटो हातात घेऊनच विचार करू लागला," म्हणजे तिला गैरसमज झाला असणार की मी कोणा दुसऱ्यावर... पण जेव्हा तिला हे समजेल की हा तिचाच फोटो आहे तेव्हा ती काय करेल?"

हो! तो अन्वीचाच फोटो होता. जो आदिने क्लीक केला होता. आदिने जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाचा फोटो होता तो. बिचवर तिला अस पाहून तो तिच्या प्रेमात पडला होता. पण तिला मात्र याची थोडी देखील कल्पना नव्हती. ना तेव्हा ना आता.

सगळं आवरून तो बेडवर आडवा झाला. काही केल्या त्याचे मन लागत नव्हते. एक वेगळीच बैचेनि, हुरहूर राहून राहून त्याला जाणवू लागली होती.

त्याने घड्याळ पाहिले, आता दुपारचे चार वाजत आले होते. कधी एकदा सात वाजतात व कधी एकदा आपण तिला जाऊन भेटतो असे त्याला झाले होते.

आपल्याकडे एखादे असे मशीन असते जे आपल्याला आपल्या भविष्यात घेऊन गेले असते तर किती भारी झाले असते. किंवा पास्ट मध्ये तर मी हा फोटो कदाचित तिच्या हाती लागू दिला नसता, अस त्याला वाटून गेलं.

काही केल्या त्याला झोप पण येत नव्हती. पुन्हा तो उठला व लॅपटॉप काढून आपलं काम करू लागला. एक-दोन कॉल पण केले व त्यांच्यकडुन मिळालेली माहिती ही डायरी मध्ये लिहून घेतली.

काम करत असताना त्याचे डोळे कागदपत्रा वरून घारी सारखे फिरायचे. आदि कामाच्या बाबतीत खूप चाणाक्ष, कर्तव्यदक्ष असा होता. काम करता करताच त्याने घड्याळ पाहिले पाच वाजून तीस मिनिट झाले होते. पुन्हा त्याने एक सुस्कारा सोडला व आपलं काम करू लागला.

तो आपल्या कामात व्यस्थ असतानाच त्याचा मोबाईल वाजला. अन्वीचा कॉल असेल या आशेने त्याने स्क्रीन न पाहतच कॉल घेतला.

"हॅलो! अन्वी, व्हेयर आर यु?" तो काळजीने विचारले

"ओय! मजनू की औलाद आधी स्क्रीन बघत जा कोण बोलत आहे मग बोलत जा ना"

समोरून ओळखीचा आवाज आला. पण ती अन्वी नाही हे समजताच त्याचा पुन्हा मूड ऑफ झाला. सॅड फेस करूनच त्याने स्क्रीन पहिली तर साहिलचा कॉल होता. आदिने दोन बोटांनी कपाळ चोळले.

"हॅलो! कुठे गेला रे?"

साहिल समोरून काही आवाज येत नाही हे पाहून बोलला.

"हॅलो! बोल कसा आहेस, आणि आता कसा काय फोन केला?" थोडं हसत आदि बोलला.

"कसा काय म्हणजे? तू तिथे एकटा काम करत आहे म्हणून म्हणलं चौकशी करावी, तुला तर काय आठवण येत नाही आमची" साहिल नाटकीपणे रागवत बोलला.

"तस काही नाही रे,थोडा कामात बिझी होतो"

"आता सुट्टी दिवशी पण काम करतो की काय तू?"
साहिल चकित होत बोलला.

"हो तुला सुट्टी आहे, मला नाही ना" हसत आदि बोलला.

"हा ते पण खरंच म्हणा, ते सोड वहिनी बद्दल काय म्हणत होता तू"

"साहि...ल" आदि त्याला दम देत बोलला.

"ओके! ओके! अन्वी बद्दल काय बोलत होता तू, ती कॉल करणार होती का?, मी चुकीच्या वेळी कॉल केले का?"

"नाही, तू नाही मलाच वाटतं होत की तिचा कॉल येईल अस"

"थांब काही दिवस कॉल काय ती ही येते तुझ्यापर्यंत"

"आली होती आज.." हळू आवाजात थोडं लाजत बोलला.

"क...काय म्हणालास?" साहिल अविश्वसने बोलला.

" अन्वी आली होती रूमवर आज"

"काय सांगतोस काय?"

"हो..."

"कश्यासाठी?, आय मिन काही काम होतं म्हणून की खास तुला भेटायला "

"तिच्या आजीने मला आज जेवायला बोलवलं आहे हे सांगायला आली होती पण..."

"पण काय, तू काही मूर्खपणा नाही केला ना?" साहिल उतावीळपणे बोलला.

"नाही, पण तो बिचवरचा फ़ोटो " आदि चेहरा पाडून बोलाल.

"कोणता फोटो?, कोणता बिच?"आश्चर्याने साहिल बोलला.

"ते माझ्या जुन्या डायरी मध्ये...." अस म्हणत आदिने घडला प्रकार साहिलला सांगितला.

"काय यार तू ही, आता सांग तिला सगळं खरं काय ते"

"तू वेडा आहेस का?" आदि पटकन बोलला.

"का?"

"मी तुला मागे सांगितले होते की, शी लॉस्ट हर मेमोरी, अँड डॉक्टर हॅज टोल्ड मी, डु नॉट फोर्सफुल्ली रेमाइंड हर ऑफ येनीथिंग" आदि उदासपणे बोलला.

"या आय नो, बट मला अस वाटत की तिला तुझ्या प्रेमाची थोडी का होईना जाणीव करून द्यावी"

"हो, मला ही वाटत तस, बघू काय होत"

"ओके, बघ काय होत संध्याकाळी तिचा रुसवा कसा काढणार आहेस ते आणि मला कॉल कर रात्री"

"हो आता आवरून जातो तिकडेच ती हर्ट झाली आहे त्यामुळे माझं ही कामात लक्ष लागत नाहीये यार"

"अभि तो ये शुरूवात हे मेरे यार, आगे आगे देखो होता हें क्या" अस म्हणत साहिल हसू लागला.