Kaay Nate Aaple? - 14 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | काय नाते आपले? - 14

Featured Books
Categories
Share

काय नाते आपले? - 14

अरे अभि मी किती शोधली तुला... आणि तू इथे , चल बर बाहेर मी फोटोग्राफर ला घेऊन आली आहे तू बोलून घे त्याच्याशी.... " तनुजा अभि ला बाहेर खेचून घेऊन गेली........

तस मिताली च्या जीवात जीव आला नाहीतर आता उगाच काही तमाषा झाला असता.....!!



....
........
..............

दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी मृणाल अभि आणि मिताली प्रीवेडिंग फोटोशूट करण्यासाठी निघाले....


3 घ पण कार मध्ये होते , अभि आणि तनुजा पुढे बसले होते आणि मिताली एकटीच पाठी बसली होती..!!

थोड्यावेळाने ते त्यांच्या जागी पोहोचले... हे अभि च फार्म हाऊस होते शहराच्या बाहेर थोडं गावात होते...

मोठा बंगला होता... आणि गार्डन होते वेग वेगळे फुलांची झाड लावली होती त्यामुळे ते खूपच सुंदर वाटत होत...

मेकअप आर्टिस्ट पण आले होते , मिताली ला खूपच बोर होत होते....

" काय फालतू गिरी आहे यार...आता यांना तयार होण्यात किती टाईम जाईल , मग यांचे फोटोशूट बघा.... 🙂 आणि मला ते बघवणार पन नाही... " मिताली....


थोड्यावेळाने तनुजा आणि अभि बाहेर आले.. तनुजा ने रेड साडी घातली होती..
अभि सुद्धा तयार झाला होता , मिताली ला आता खूपच जेलस फील होत होते....

दोघांचे फोटोशूट चालू झालं , या टाईम फोटोग्राफर जशी पोज सांगत होता दोघ पन तसेच फोटो काढत होते.... तनुजा आज खूपच हॅपी होती....
















दोघांनी बरेच फोटो काढले , फोटोग्राफर ने तनुजा ला अभि च्या गालावर किस करायला सांगितलं.... तसा एक फोटो काढायचा होता....अभि फक्त मिताली ची reaction पाहत होता......

मिताली ला आता रडूच येत होत ती तशीच तिथून तिथून निघाली...

नंतर त्यांच फोटोशूट होई पर्यंत ती अभिच्या नजरेसमोर आली नाही...

आज ती लोक इथेच राहणार होते आणि उद्या सकाळी जाणार होते.....

...
....

रात्र होत आली तशी अभि आणि तनुजा.परत आले....अभि ला मिताली कुठेच दिसली नाही,
अभि मिताली ला पूर्ण घरात शोधात होता पण ती त्याला कुठेच दिसली नाही...

आता उरला टेरेस जिकडे बराच अंधार होता..... तो तिकडेच तिला पाहायला गेला आणि फायनली ती भेटली , ती टेरेस वरच होती..

अभि हळू हळू तिच्या पाशी गेला , तर मिताली रडत होती..
ती हुंदके देत हळू हळू रडत होती...

" मितु तू रडतेय.... " अभि तिला विचारत होता, तिने पटकन घाबरून डोळे पुसते आणि जायला निघते तस अभि तिचा हात पकडतो...

"
मितु अग रिजन तरी सांगून जा तू का रडतेय.....

काही प्रॉब्लेम आहे का..?? तू मला सांगूच शकतेस जर तुझ्या मनात असेल तर...... अभि तिला म्हणाला...

" काय सांगू मी..???? जे मनात आहे ते मला बोलताच येत नाही आहे.. आणि आणि प्रॉब्लेम ते तर माझ्या लाईफ मध्ये असतातच.. कधीच माझ्या मनासारखं मला हवं तस काहीच होत नाही..
ना कि मला कोणी समजून घेणार आहे... सगळं संपलय आता 😭 काही सांगण्यासारखं राहिलच नाही आहे.. इथे आली माहित नाही का पन छान वाटत होत , बस ते थोडं रडायला आल म्हणून बाकी काही नाही.... मितु आपला हात सोडवत म्हणाली ...

" oh तुझं बिहेवीअर मी सकाळ पासून बघतोय तू सॅड आहेस आणि आता शोधात आलो इथे तर तू रडत होतीस... मला वाटलं मी विचारलं तुला... असो तुझी मर्जी.... " अभि एवढं बोलून खालती निघून गेला.....

मितु ला आता कसतरीच होत होते..... कोणी फ्रेंड्स ही नाहीत ज्याच्यासमोर जोरजोरात रडून आपल दुःख व्यक्त करावं... कंटाळा आलाय मला आता या सगळ्याचा....!! नाही बघवत आहे यार लग्न होताना हे... मी नाही राहू शकत अभि शिवाय..... आणि हे त्यांना सांगू ही नाही शकत.....मितू....

मितु हे म्हणत तर होती पन तिला माहीत न्हवत कि कोणीतरी तीच बोलण ऐकत होत.......!!

....
......

दुसऱ्या दिवशी सकाळी 3 घ निघाले....
घरी जायला 2 तास होते सकाळी लवकर निघाल्या मुळे तनुजा पाठच्या सीट वर जाऊन झोपली आणि तिने मितु ला पुढे बसायला लावल...

ती मजबुरीने अभि सोबत पुढे बसली.... अभि ने आवाज कमी ठेवून सॉंग्स लावले....

नै जीना, तेरे बाजू
नै जीना, नै जीना

नै जीना, तेरे बाजू
नै जीना, नै जीना

नै जीना, तेरे बाजू
नै जीना, नै जीना

अभि गाणं चेंज करतच होता कि मितु म्हणाली... " राहू दे ना प्लिझ... " मग अभि ने ते गाणं तसंच ठेवलं

मैं तेनु समझा..वां की
ना तेरे बिना लगदा जी

मेरे दिल ने चुनलईयाने,
तेरे दिल दिया राहाँ
तू जो मेरे नाल तू रहंता,
तुरपे मेरीया साहां

जीना मेरा, हाए, हुण है तेरा, की मैं करां
तू कर ऐतबार मेरा, मैं करूँइन्तज़ार तेरा
तूदिल तुयू जान मेरी

मैं तेनु समझा..वां की

ना तेरे बिना लगदा जी

वे चंगा नईयों कीता बीवा
वे चंगा नईयों कीता बीवा
दिल मेरा तोड़ के

वे बड़ा पछताईयां अखाँ
वे बड़ा पछताईयां अखाँ
नाल तेरे जोड़ के

तेनुछड्ड के कित्थे जावां, तू मेरा परछावां
तेरे मुखड़े विच ही मैं ताँ रब नुअपने पावां

मेरी दुआ.. हाय, सजदा तेरा, करदी सदा
तू सुन इक़रार मेरा, मैं करूँ इंतज़ार तेरा
तू दिल तुयूँजान मेरी..

मैं तेनु समझा..वां की
ना तेरे बिना लगदा जी..... 💞💞

मितु ते गाणं फिलच करत होती तिने अभि कडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर काही भाव च न्हवते... तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आल.. ती ने आपला चेहरा बाहेरच्या दिशेकडे वळवला आणि हळूच आपले डोळे पुसले.......

...
......
...........

आज अभि आणि तनुजा च लग्न होत... एक हॉटेल बुक केलेले होत...खूप मोठं हॉटेल होत आणि खूप सुंदर सजवलं होत...सगळ्यांची धावपळ चालू होती..... प्रत्येक गोष्टीत...

अभि आणि तनुजा आपापल्या रूम मध्ये तयार होत होते....
मिताली तनुजा च्या रूम मध्ये आली तर तनुजा तयार होत होती...

" अग मितु तू करवली असून अजून तयार नाही झालीस..... जा तुझा ड्रेस घालून तयार हो , जीन्स वर नको फिरू.... " तनु.....

" उम्म्म हो.... " मिताली कसनुस हसाली आणि बाहेर पडली.....

मिताली अभि च रूम शोधत होती...आणि तिला ते भेटलं....तिने हळूच तो दरवाजा नॉक करून पाहिला... थोड्यावेळाने दरवाजा उघडला तर समोर अभिच होता ..त्याने मस्त शेरवानी घातली होती....
ती त्याला खालून वरून न्याहाळत होती.... तिने आत पाहिलं तर कोणीच न्हवत मिताली पटकन आत शिरली.... अभि ला काही कळायला सुद्धा टाईम नाही भेटला.. तो तसंच आत मध्ये गेला.....

मितु तू इथे.. आणि......

अभि बोलता बोलता बोलता शांत झाला.... कारण समोर मिताली रडत होती........

मितु अग.... तू परत रडत आहेस , काय झालं..??

मितु पुन्हा रडायला लागली... आणि तिने पटकन अभि ला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली......
अभि ला काही समजतच न्हवत ती अशी का वागतेय... अभि तिला सारखं विचारत होता पन ती काही बोलतच न्हवती.....!!

" अभि प्लिज हे लग्न नका करू मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय... प्लिज अभि नका करू लग्न.... माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अभि... मान्य आहे माझी चूक झाली खूप उशिरा रिअलाईज झालं मला.... पन आता तुम्हाला कोना दुसऱ्याच होताना नाही बघवत आहे......

त्यादिवशी तनुजा दीदी ने मला तुम्हाला नकार द्यायला लावला म्हणून मी नकार दिला...मला तुम्हाला अजिबात दुखवायचं न्हवत.... अभि...........

मिताली भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत होती.... तिला पाहूनच वाटत होत कि ती खूप त्रासात आहे.. आणि ती खरं बोलतेय...


पण आता तो सुद्धा काहीही करू शकत न्हवता.......

त्याने मिताली ला त्याच्यापासून दूर केले आणि म्हणाला...

" पण आता खूप उशीर झालंय मितु हे शक्य नाही...... " अभि....



क्रमश...