सगळं अगदी तनुजा च्या मनासारखं होतं होतं....!! दिवस असंच सरत होते , अभि आणि मिताली चा डिवोर्स ही झाला होता....
पन या क्षणी काय होतं होतं हे मितु ला च ठाऊक , त्या दिवसानंतर अभि एकदा पन मितु शी बोला नाही कि त्याने तिच्याकडे पाहिले.....
तो तनुजा ला वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता...!! अशातच त्यांची लग्नाची डेट फिक्स झाली.....
मितु ला तर आता कुठेतरी जावून जीव देऊसा वाटत होता.... तिलाही अभि आवडू लागला होता.... हे तिला आता कळून चुकले होते.....!!
..
.....
अभि च तनुजा कडे येन वाढलं होतं , मितु त्याच्याकडे पाहायची तेव्हा असच वाटायचं तो खूप खुश आहे तिच्याबरोबर... हे पाहून मितु ला अजूनच चीड यायची , तो आवडतोय पण आणि नाही पन.....
मनातलं सांगायला तिला जवळच कोणीच वाटत न्हवत....तिच्या मनात आल कि का आपन का तनुजा च ऐकलं..... का तिच्या बोलण्यात आलो??? नाहीतर अभि तिचा असता आता....!!
पण आता पस्तावा करून काय फायदा जे व्हसायचं होतं ते होऊन गेलं कि..... आता रडत बसून काहीच फायदा न्हवता ,
...
.....
मिताली हॉल मध्ये बसून तिचा अभ्यास करत होती , अभि ने घरी एक डिजायनर पाठवली होती , तनुजा साठी.... तिला कसा लेहंगा डिजाईन करून हवा यासाठी......!! त्यामुळे सगळे तेच बघण्यात बिझी होते......
थोड्यावेळाने अभि सुद्धा आला , कोणाचं लक्ष नाही हे बघत तनुजा ने पटकन त्याला मिठी मारली... ते पाहून मितु ने मान खाली घेतली.......
सगळे मस्त लग्नाच्या तयारीत बिझी होते , मितु तिथून उठून तिच्या रूम मध्ये गेली आणि दरवाजा बंद करून बसली......!!
तिने तिच्या कपाटातून एका बॉक्स मधले काळे मनी बाहेर काढले....
हे तेच मनी होते जे अभि ने रागात तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून काढले होतं.....
अजूनही तिने ते जपून ठेवले होते....!! तीला आठवत होतं तिच्या लग्नाचा दिवस... जबरदस्तीने का पण तीच लग्न अभि सोबत झालं होतं....
उशीरा का होईना तिला प्रेम झालं त्याच्यावर , पण कदाचित उशीर झालंच होता......
खूप जास्त.........
तिला अभि हवाच आहे असं झालं होतं , आणि मी लग्न ही होऊ देणार नाही हे...!! मितु मनातच ठरवत होती , ती पटकन उठली आणी बाथरूम मध्ये जावून तोंड धुवून बाहेर आली...!! आणि डोळे जास्तच लाल झालेले म्हणून डोळ्यात काजळ लावल... तरी सुद्धा कळून येतच होतं कि ती रडलीये.....
मिताली रूम च्या बाहेर आली तेच तिला समोर आई दिसली....
आई : हे बघ तुलाच बोलवायला येत होते , बाहेर अभी आलाच आहे तो पण थकला असेल... जा तनुजा ला आणि त्याला जेवायला वाढ...
मग नंतर आपण बसू जेवायला....
आई ऑर्डर सोडून गेली... मिताली चिडचिड करतच जेवण वाढायला गेली....
तिने किचन मध्येच ताट तयार केल आणी बाहेर घेऊन गेली.. दोघ पण काहीतरी मोबाईल मध्ये पाहत होते....
मितु ने टेबलावर ताट ठेवलं आणि तनुजा ला आवाज दिला...
मिताली : ताई जेवायला वाढलय तुम्हाला दोघांना.....
मितु इतकं बोलून निघालीच होती कि तनुजा पटकन धावत तिच्याजवळ गेली.....
तनुजा : मितु अग ऐक ना , आम्ही ना उद्या प्रिव्हेडींग फोटोशूट ला जाणार आहोत.. तर तुला पन यायचं आहे आमच्या सोबत.....
मिताली : अ... मी कशाला??? नाही मला नाही जमणार ते मला अभ्यास आहे....
तनुजा : आग लाव त्या अभ्यासाला तू येणार म्हणजे येणारच आहेस......
तनुजा हट्ट करत म्हणाली....
मिताली : ठीक ए मी येईल.....
मिताली उसन हसत म्हणाली , तिने अभि कडे पाहिले तर तो ही तिच्याकडे पाहत होता.....!!
अभि ने लगेच नजर चोरली , मितु ही आत निघून गेली.....
" ह्ह... आता तर प्रिव्हेडींग फोटोशूट करत आहेत , अजून काय काय बघायला भेटणार आहे मला.. 😭😭 देवा का असं करतोयस तू माझ्यासोबत....." मिताली...
मिताली पुन्हा तिच्या रूम मध्ये जावून बसली....!!
संध्याकाळ झाली होती तरी अजून अभि गेला न्हवता , आई बाबा ही काम निमित्त बाहेर गेलेले.. मिताली तर आता झोपून उठली...
तनुजा च्या रूम मध्ये अभि होता आणि सोबत तनुजा ही मिताली पटकन दरवाज्याला टेकून कानोसा घेत होती , कि आत काय चालू आहे....!! मी झोपलेली असताना यांच्यात काही झालं तर नाही ना??? हे विचार करून तिच्या छातीत एकदम धस्स्स्स झालं.....!! मी पन काय विचार करतेय असं काही नसेल......तितक्यात दरवाजा ओपन झाला आणि ती जोरात अभि च्या अंगावर आदळली...
" अ..... ते सॉरी ते मी तुम्हा दोघांना चहा हवी आहे का हे हे विचारायला आली होती......" मिताली थरथरत म्हणाली......
अभि ने तिच्याकडे पाहिलं तर ती खूपच घाबरलेली वाटत होती..त्याने एकदा त्याच्या पाठी वळून पाहिलं तर रूम मध्ये कोणीच न्हवत मग ही दोघ का बोलतेय...???
अभि : ते तनुजा ही आई बाबांसोबत गेली आहे , ते मी झोपलो होतो म्हणून मी इकडेच थांबलो... आणि त्यांना रात्री घरी यायला उशीर होईल......
मिताली : ओह.....
अभि : मला चालेल चहा..... 🙂
मिताली : ठीक आहे मी बनवते..... 🙂
मिताली किचन मध्ये निघून गेली , अभि फ्रेश व्हायला निघू गेला.....
मिताली किचन मध्ये होती विचार करत होती कि आपण उगाच वेगळा अर्थ घेत होतो..काय काय डोक्यात येत होते.....
तोच तिथे अभि आला..आणि तिच्या बाजूला येऊन उभा राहिला....
अभि : खुश अशील ना तु आता??
मिताली तशीच शांत राहिली... अचानक छातीत धडधड वाढली....
अभि : एक चान्स दिला असतास मितु मला तू तर आज आपण सोबत असतो....!! मला हे असं जबरदस्ती लग्न करायची गरज नसती पडली......
अभि रागात म्हणाला....
मिताली त्याच्याकडे पाहत राहिली , खूप राग होता त्याच्या डोळ्यात , तिच्या मनात येत होत कि आत्ताच सांगून द्याव अभि ला कि हो तीच ही प्रेम आहे त्याच्यावर पण का माहीत तिला ते जमत न्हवत....
आत्ताच सांगावं नका लग्न करू , अभि माझं ही तुमच्यावर प्रेम आहे, मला उशिराने धान्यात आल हे पण प्लिझ तुम्ही हे लग्न करू नका.........
पण नाही ती गप्पच राहिली...
" ह्ह मी सुद्धा हे कोणाला समजावतोय , तुझ्यासमोर डोकं जरी फोडलं तरी तुला काहीच फरक पडणार नाही.... अशी आहेस तू..... "
अभि रागात म्हणाला.....
" अभि.......... "
तनुजा अभि च्या नावाने जोरात ओरडली.... अभि ने पाहिलं तर समोर तनुजा
होती त्याला धडकीच भरली....
कि तिने काही ऐकलं तर नाही ना..??? तो पुढे गेला आणि काही बोलणारच कि तनुजा बोली....
" अरे अभि मी किती शोधली तुला... आणि तू इथे , चल बर बाहेर मी फोटोग्राफर ला घेऊन आली आहे तू बोलून घे त्याच्याशी.... " तनुजा अभि ला बाहेर खेचून घेऊन गेली........
तस मिताली च्या जीवात जीव आला नाहीतर आता उगाच काही तमाषा झाला असता.....!!
....
........
..............
दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी मृणाल अभि आणि मिताली प्रीवेडिंग फोटोशूट करण्यासाठी निघाले....
क्रमशः...