'खूप दिवसांनी आज दोघानांही मनसोक्त गप्पा मारल्या. एकमेकांच्या आयुष्यातील आठवणी आणि प्रसंग शेअर केले होते.
जेवण आटोपून जुई पुस्तक वाचत बसली. तिच्या नेहेमीच्या सवाई प्रमाणे. अर्जुन फोनवर बोलत होता. त्याच्या केसच्या संदर्भात काहीतरी क्लूज सापडले होते. त्याविषयी तो बोलत होता. फोन ठेवून तो तिथेच बेडवर झोपून गेला. पुस्तक ड्रॉवरमध्ये ठेवून जुई आत आली. तिने पाहिले तर हातात फोन तसाच ठेवून अर्जुन गाढ झोपला होता. तिने त्याचा मोबाइल बाजूला ठेवून दिला. आणि चादर अंगावर घातली. निरागस मुलाप्रमाणे दिसत होता तो. काही वेळ जुई त्याला बघत राहिली होती.
''जु झोपायचं नाही का? अशीच बघत राहणार आहेस?'' अर्जुन जागा झाला होता.
''तुला कस समजलं , कि मी तुला बघतेय?'' जुई त्याच्या केसावरुन हात फिरवत होती.
''सगळं समजत मला. उगाच का लोक स्पेशालिस्ट म्हणतात.'' अर्जुन डोळे मिटून तसाच बोलत होता.
''येस मिस्टर स्पेशालिस्ट. झोप तू. मी पण जाऊन झोपते.'' म्हणत जुईने बाजूची उशी काढून घेतली.
''तू कुठे जाऊन झोपतेस? झोप ना इथेच. मी एकदा बेडवर पडलो कि गाढ झोपतो. तुला अजिबात त्रास नाही देणार.''
''मी सोफ्यावर झोपते. तसही मला सवय आहे. तू झोप इथेच.'' जुई खिडकीचा पडदा ओढून घेत म्हणाली.
''तुझा सोफा तुझ्यासारखाच छोटुसा आहे ग. त्यामुळे मला त्यावर कम्फर्टेबली झोपता नाही येणार. नाहीतर मी तिथे झोपलो असतो. झोप ना इथेच. बेड मोठा आहे.'' अर्जुनने तिच्या हाताला धरून ठेवले.
''नको अर्जुन, तू झोप आरामात. काही प्रॉब्लेम नाही. एकत्र झोपायला आता आपण लहान राहिलो नाही.''
''बघ जु. लहान मुलासारखं निर्मळ आणि स्वच्छ मन ठेवायचं. असं समज कि आपण अजून लहानच आहोत. हा आता लहानपणा पासून तुझ्या मनात माझ्याविषयी काही चावटपणा असेल तर माहित नाही बुवा. मी तर साफ मनाचा आहे.'' अर्जुन तिला उगाच चिडवत होता.
''झालं तुझं. झोपेत पण मला चिडवायच सोडू नकोस. झोप आता. गुड नाईट.'' म्हणत जुई बाहेर हॉलमध्ये येऊन सोफ्यावर झोपली.
******
'सकाळी सकाळी कमिशनर ऑफिसला भेट देऊन अर्जुनने एका अर्जावर सही केली. बाजूच्या पोलीस स्टेशनमधून एका संशयित अपराधी माणसाला उचलले आणि गाडीत भरले. माहिती नुसार काल दुपारी त्याला व्ही टी ला पकडण्यात आले होते. संशयित असला तरीही केलेल्या तपासणीत पाहिजे ती माहिती मिळालेली नव्हती. एका पोलीस इन्स्पेक्टर कडून अर्जुनने त्याला आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला पोलिसांच्या गाडीत घेऊन दोन कॉन्स्टेबल आणि पोलीस इन्स्पेक्टर राठोड पुण्याला जायला निघाले होते. त्या पाठोपाठ अर्जुनची एक गाडी आणि त्याच्या सिक्युरिटीच्या दोन गाड्या होत्या.'
हा नवीन ऑफिसर स्वतः जातीने या केसमध्ये लक्ष का देत आहे, हे पोलीस इन्स्पेक्टर राठोड याना समजेना. हाताखाली अक्खी फौज असताना एका हेड ला या केसमध्ये कशासाठी इन्व्हॉल्व्हड केलं गेलं आहे. कि ते स्वतःहून यामंध्ये जातीने लक्ष देत आहेत, याचा विचार पोलीस इन्स्पेक्टर राठोड करत होते. पण ते नव्याने इथे बदली होऊन आले होते, त्यामुळे या केसाची पार्श्वभूमी त्यांना माहित नसल्याने त्यांच्यासाठी हे न सुटणारे कोडे होते. कॉन्स्टेबल वाजे आणि कॉन्स्टेबल मुंडे या दोघांनाही समजून चुकले कि आता काही खरे नाही. पत्रकार योजना पंडित मर्डर केसला वेगळे वळण लागणार होते, एवढे तर त्यांना निश्चित समजले. केस होतीस तशी.
पत्रकार योजना पंडित यांच्यावर गोळ्या झाडून दिवस भर रस्त्यावर तिचा खून केला गेला होता. आणि या केसमध्ये बरेच राजकारणी समाविष्ट होते. याचे धागेदोरे थेट मातंबर लोकांशी जुळत होते. जे स्वतःला प्रतिभाशाली उदयॊगपती म्हणून घेत होते, असे काही लोक, आपल्या लावाजम्या सहित या केसमध्ये येणार होते. त्यामुळे अर्जुनने केस आपल्या हातात घेतली.
******
सकाळी फ्रेश होवून हॉस्पिटलला पोहोचल्या पोहोचल्या तिने आधी अर्जुनला फोन केला. काल रात्री अचानक तो निघून गेला होता. ते हि न सांगता. रात्री गेला कि सकाळी ते सुद्धा तिला माहित नव्हते. दाराच लॅश ओढून तो तिच्या फ्लॅटची एक चावी सुद्धा सोबत घेऊन गेला. ते विचारण्यासाठी तिने त्याला फोन लावला.
''गुड मॉर्निंग जु.'' मस्त प्रसन्न आवाजात त्याने तिचा फोन उचलला होता.
''अर्जुन सकाळ पासून फोन करतेय, माझा फोन का घेतला नाहीस?''
''अरे जु, माहित नव्हतं हा तुझा नंबर आहे. काल नंबर घायचा राहून गेला. तुझ्याकडे माझा नंबर होता ते बरं झालं.''
''कॅल अटेंड करून बघायचं तरी, कोणाचा महत्वाचा फोन असू शकतो ना.'' जुई
''म्हणूनच अटेंड केला ग. बोल ना. काय म्हणते?'' अर्जुन
''रात्री अचानक का निघून गेलास? सांगायचं ना मला.'' जुई
''रात्री नाही सकाळी, पहाटे ५ ला निघालो.'' अर्जुन गाडी चालवत बोलत होता.
''एवढ्या पहाटे अस गपचूप निघून गेलास का?'' जुई
''आता सवय कर, माझ्या घरी सध्या मी असाच केव्हाही येतो आणि रात्री अपरात्री निघून जातो.'' अर्जुन.
''सांगायचं ना मला.'' जुई
''काल मला भेटून तुझी झोप उडाली असेल. म्हणून म्हंटल शांत झोपले ती झोपूदे. उठ्वल नाही.'' अर्जुन
''आणि सकाळी तू मला बेडवर उचलून ठेवलं होतस?'' जुई
''सकाळी नाही रात्रीच ठेवलं. तुला माहित हि झालं नाही.'' तो हसत म्हणाला.
''तू ना खरचं. काय बोलू. आता कुठे आहेस?'' जुई
''तुझ्या हृदयात.'' अर्जुन
''अर्जुन सरळ बोलत जा ना. माझी एक सर्जरी आहे. पेशन्ट वाट बघतायत. जायला पाहिजे.'' जुई
''ओह, मी ड्राइविंग करतोय. थोडं शहराच्या बाहेर जातोय.'' अर्जुन
''नाष्टा केलास का काही?'' जुई
''एस, घरी जाऊन फ्रेश झालो. नाष्टा अँड ऑल करून निघालोय. ओके?'' अर्जुन
''ओके, चल बाय.'' जुई
''बाय क्युटी.'' म्हणत म्हणत अर्जुनने फोन कट केलं होता.
बाजूला बसून मंगेश त्याच सगळं बोलणं ऐकत होता. एव्हाना मंगेशच्या लक्षात आलं होत कि आपले साहेब आणि त्या डॉक्टर मॅडम एकमेकांना आधीपासून ओळखत असावेत. अर्जुनच्या बोलण्यावरून काय समजायचं ते तो समजला होता.
''साहेब मी चालवू का गाडी?'' त्याने अर्जुनला विचारले.
''नको मंगेश, आज मला चालवू दे. रोज रोज नुसतं बाजूला बसून कंटाळा येतो. आज तू बाजूला बसून आराम कर.'' अर्जुनचा मूड अगदी फ्रेश होता.
''साहेब कोणी पाहिलं तर काय म्हणतील? गाडी चालवणे हे तुमचं काम नाही. आम्ही आहोत ना त्यासाठी.''
''मंगेश आज मला चालवू दे. खूप दिवसांनी मजा येते चालवायला. येताना तू चालवं.'' म्हणत अर्जुन त्याच्याकडे बघून हसला.
आणि ''जशी तुमची मर्जी." म्हणत.'' मंगेश बाजूला बसून राहिला. गाडी पुण्याच्या दिशेने रवाना झाली होती. मागे असणाऱ्या सोक्युरिटीच्या दोन गाड्या अर्जुनच्या गाडीला फोलो करत होत्या. आणि पुढे असणारी पोलिसांची जीप भरधाव वेगाने निघाली होती.
*****
'लोणावळा सोडून पोलिसांची गाडी काही अंतरावर पुढे जाऊन थांबली. इथे अचानक गाडी थांबवण्याचे काहीही कारण नव्हते. त्याच्या मागे अर्जुन आणि मंगेश यांची गाडी पाच-दहा मिनिटाच्या अंतरावर होती. ते गप्पा मारत होते, तेव्हाच त्यांना ओव्हरटेक करून एक काळ्या रंगाची फॉर्च्युनर पुढे निघून गेली. ती अचानक त्या पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाडीच्या अगदी बाजूला चिकटून निघाली होती. थांबलेल्या पोलिसांच्या जीप मधून गोळीचा आवाज ऐकू आला. काहीतरी झटापटी सुरु झाली होती. अर्जुनला लक्षात आले आणि त्याने गाडीचा स्वीड वाढवला. गाडी चालवताना त्याने मोबाइल हातात घेऊन पुढे असलेल्या पोलीस गाडीचा फोटो काढून ठेवला होता. बाजूलाच असणाऱ्या काळ्या फॉर्चुनरचा फोटो सुद्धा त्या सोबत आला होता. पाहिजे असलेले दोन-तीन फोटो मिळाले होते. पोलीस इन्स्पेक्टर राठोड यांच्या हाताला गोळी लागली होती. दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल त्यांना उचलून गाडीत भरू लागले. आतमध्ये असणाऱ्या त्या संशयीत आरोपीला बाहेर काढून ती फॉर्च्युनर पुढे भरधाव वेगात त्याला आपल्या सोबत घेऊन निघाली होती.
KRAMASH