What exactly is altruism? in Marathi Spiritual Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | परमार्थ म्हणजे नक्की काय?

Featured Books
Categories
Share

परमार्थ म्हणजे नक्की काय?





" परमार्थ म्हणजे नक्की काय? "
_______________________________
मच्छिंद्रनाथ माळी छत्रपती
संभाजीनगर.
आपल्याला संसार म्हणजे काय? प्रपंच म्हणजे काय? हे समजावून सांगायला गरज पडत नाही. कारण तो आपल्या परिचयाचा आणि अनुभवाचा आहे.
पण परमार्थ म्हणजे काय? असा प्रश्न कित्येकांना पडतो. कारण परमार्थ हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. परमार्थ या शब्दाची व्याख्याही खूप मोठी आहे. पण त्याचा नेमका अर्थ परमार्थ म्हणजे काय?
आपल्याकडे परमार्थ म्हणजे कर्मकांड या गोष्टींमध्ये मोडले जाते. पिढ्यान् पिढ्या परमार्थाचा अर्थ जेणेकरून आध्यात्मिक किंवा तीर्थ क्षेत्राला असा घेतला जातो.
जीवनाच्या अर्थाचा शोध घेणे याला परमार्थ म्हटले आहे. पुस्तकी ज्ञान मिळवणं किंवा कर्मकांडात्मक क्रियांनाच परमार्थ म्हणणे चुकीचे आहे. जीवन म्हणजे काय ? आणि माझं अस्तित्व काय ? याचा शोध म्हणजे परमार्थ होय.
परमार्थ हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो.
पहिला अर्थ असा :-
परमार्थ म्हणजे परम अर्थ.
परमार्थ म्हणजे मोठा, श्रेष्ठ अर्थ साधुसंतांनी ज्या मोठ्या अर्थाची सिद्धता किंवा प्राप्ति करून घेतली, त्याला परमार्थ म्हणतात. हा मोठा अर्थ म्हणजे आत्मा किंवा परमात्मा अथवा ब्रह्म आहे.
दुसरा अर्थ असा :-
परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे जे काही करावे लागते, ते ते सुद्धा परमार्थ शब्दाच्या अर्थात अंतर्भूत होते. परमार्थरूप परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे जे करावे लागते किंवा केले जाते, ते ते सर्व म्हणजेही परमार्थ होय.
समर्थ रामदास स्वामींनी याचे उत्तर त्यांच्या दासबोधात फार सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे. ते सांगतात की, जन्मास आलेल्या जीवाने स्वतःची नेमकी ओळख करून घेणे, आपल्याला प्राप्त झालेल्या या नरदेहाचे देहाची सार्थकता साधणे, आणि मोक्ष अन निज कल्याणाचा जो मार्ग आहे, तो कोणता हे जाणून घेणे म्हणजे परमार्थ.
ईश्वरसाधनरूप पुरूषार्थ करणे म्हणजे परमार्थ.
प्रपंचाच्या दहा दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे; तिच्याकडे आपण लक्ष लावावे. काही न करणे, अर्थात् मनाने हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही; नाही म्हणजे किती नाही, तर ‘ मी ’ सुद्धा तिथे नाही.
प्रपंच हा द्वैत आहे. द्वैतामध्ये दु:ख आहे, तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत् पुष्कळ भासले तरी ते एकच आहे.
परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात, मानसपूजेत, पहिल्याने ‘ मी ’ आणि ‘ परमात्मा ’ अशा द्वैताने सुरुवात करावी लागते.
परमार्थात कुणालाच मज्जाव नाही. कोणी चिकित्सक असो, तर्की-कुतर्की असो, वा अविश्वाशी असो, प्रत्येकाला परमार्थात प्रवेश आहे. थोडक्यात काय ते तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे झाल्यास.....
सकळांशी येथे आहे अधिकार I
कालियुगी उद्धार हरीच्या नामे II
काही लोक करमणूक म्हणून परमार्थाकडे वळतात, हे मात्र बरोबर नाही. काही लोक प्रपंचात उपयोग व्हावा, प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून परमार्थ करतात. पण हेही योग्य नाही. लोकांना चमत्कार दाखविण्यासाठी पण परमार्थ नाही.
मग परमार्थ कुणासाठी आहे? तर या जगात संताप आहे, आग आहे, दुःखाची आच आहे, ती न लागता समाधान मिळावे यासाठी परमार्थ करावयाचा आहे. प्रपंचात ताप आहे, सुख नाही हे जेंव्हा ज्याला कळेल तोच परमार्थाकडे वळेल.
प्रपंचात सुख नसून सुखाचा आभास आहे ह्याची जाणीव जेंव्हा होईल, तेंव्हा तो परमार्थाकडे आपोआपच वळेल.
संसारात जो विविध तापांनी पोळला गेला असेल, तोच परमार्थाचा अधिकारी होईल.
ज्याला आत्मसाक्षात्कार व्हावा अशी आस असेल त्याच्यासाठी परमार्थ आहे.
इंद्रियात्मक जीवनापलीकडे जीवनाचा विकास करण्यासाठी परमार्थाची गरज आहे.

🙏🙏🙏🙏🙏🙏
_______________&_____________

मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे, त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.

आपण किती ही मेलेल्या माणसांना (प्रेताना) खांदा दिला. "यापेक्षा" किती जीवंत माणसांना हात दिला यावर आपली माणूसकी ठरत असते."माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत?
खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय/पुरल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत खरतर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत, तु मोठा की मी मोठा ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्यासाठी माणुस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय.

म्हणुनच म्हणतोय जीवंतपणी, जिवंत माणसासाठी, जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या, एखाद्याला" तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. झालं गेलं विसरून,
तुझं माझं सोडून माणुस व्हा!
मरेपर्यंत त्याचा
अभिमान वाटेल.