absence in Marathi Short Stories by Pradeep Dhayalkar books and stories PDF | विरह

Featured Books
Categories
Share

विरह

समीरचं आणि स्मिता चं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्याचं जरा जास्तच होतं. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याला व्यवस्थित नोकरी नसल्याने त्याचा खिसा कायम रिकामा. कडकाच होता बिचारा. पण समीरचा स्वभाव मात्र खुप प्रेमळ .. तिच्या शिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. स्मिता ला काहीतरी भेटवस्तु द्याव्या.. असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायचं कुठून.? आर्थिक परिस्थिती कमजोर.. शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची गुलाबाची फ़ुलंच भेटवस्तु दिली..ती खुष होती.. तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेक्षा नव्हतीच. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी..भविष्यात काही करुन दाखवेल अशी धमकही त्याच्यात दिसत नव्हतं... असं स्मिता अधुन- मधुन विचार करी.. तरी पण एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले ते दोन जीव सुखात होते... एकंदरीत दिवस एकमेकांच्या सहवासात प्रेमात सुखाने चालले होते.. पण हे नियतीला जरा जास्तच खटकले होते.. आणि अचानक एक दिवस नियतिने आपले रंग बदलले.. आणि त्यांचा सगळा खेळच पालटला..!
स्मिता म्हणाली.. " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडत- रडत..मन मारतच जगावं लागेल..!
काय सुखात ठेवणार तू मला..? काय आहे तुझ्याकडे..? तर काहीच नाही..! मी परदेशी चालली आहे.. मला कामाचा विसा आला आहे.. मी पुन्हा कधीच परत येणार नाही....तू मला विसरण्याचा प्रयत्न करून विसरुन जा.. आजपासून आपले मार्ग वेगळे.. माझा-तुझा संबंध संपला..! आणि "ती कायमची निघून गेली...!
समिर मात्र मॊडुन पडला....संपलाच जणु काही..सर्व काही.. संपलेच त्याच्यासाठी..! हळू- हळू दिवस सरु लागले.. तो स्वतःला सावरुन लागला तरीही मधुनच त्याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या होत्या..त्याने ­ संतापाने ठरवलं, ’स्मिताने पैशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता तिला आपण पैसाच कमवुन दाखवायचा...! इतका की आपल्यापुढे सारं जग तिला तिटं दिसलं पाहिजे..!’
पुढे.. या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..!
कष्ट केले..राब राब राबला.. त्याला त्याच्या मित्रांनीही
मदत केली... पुढे त्याला चांगले लॊक भेटले..
त्याचे दिवस पालटले.. आता त्याची आर्थिक परिस्थिती मजबूत झाली होती तो खुप श्रींमत झाला.. त्यानं स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं...!
स्मिताच्या..विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद
दुःखातुन तो बाहेर पडला.. उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..
पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..
ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आप ल्या गरीबीचा अपमान केल्याची..!
तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने
घेतली होती..!
एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर एक म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या ­त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.. त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे’ तिचेच’.. स्मिताचे आई-वडील. होते !! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली.. त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत
होत.. त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती..
त्यांनी आपली श्रीमंती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत.. तिला धडा शिकवण्याच्या.. अपमानाच्या घावांची परत फ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्याला जाणवतं होतं. पण ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात.. हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ."..पाहतो आणि कोसळतोच.."तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि थडग्या जवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची गुलाबाची फ़ुलं...­हे बघुन समीर सुन्न च झाला...धावतच गेला तिच्या थडग्याकडे.. समीरनं शोकांतीक होऊन तिच्या आई-बाबांना विचारलं...
काय झालं ते सांगा मला..? ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही...तिला ' कर्करोग’झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा खुप उशीर झाला होता.. थोडेच दिवस होते तिच्या हातात... असं तिला डॉक्टरांनी सांगितलं.. आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन तुला प्रेम भंगाचा चटका देवुन तिने तुझ्याशी नातं तोडलं.. आणि मग तिनं घराबाहेर पडणे ही कायमचं बंद केलं.. आणि काही महिन्यातच ती देवाघरी गेली..!
तू संतापुन उभा राहशील..जगशील.. यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले.. ती गेली...आणि तू जगलासं..!

-प्रदीप धयाळकर.✍️✍️✍️