Paach Porincha Baap - 1 in Marathi Moral Stories by Bhagyashree Budhiwant books and stories PDF | पाच पोरींचा बाप - 1

Featured Books
Categories
Share

पाच पोरींचा बाप - 1

मी आहे पाच पोरींचा बाप .जेव्हा मला बाळ होणार होतं .तेव्हा माझ्या मनात उत्सुकता निर्माण झालेली होती पहिले बाळ झाले तेव्हा खूप आनंद झाला . पोरगी असो की पोरगा दोघीही एक समान असतात अशी माझी कल्पना होती. अत्यंत कष्ट करून राबराब राबून सकाळी कामाला जाऊन ते रात्रीपर्यंत मी घरी यायचं अतोनात कष्ट करायचं कारण मला माझ्या कुटुंबाला जगायचं आहे याची मला अतोनात काळजी होती .

पहिलं बाळ झाले तेव्हा मला मुलगी  झाली . खूप आनंद झाला वाटलेच नाही की मी बाप झालो . दुसरा बाळ झाले तेव्हाही मला मुलगी झाली तिसऱ्या बाळाच्या वेळेस देवाला बोललो की मला वारीस दे माझ्या पिढीला वाढव आणि माझ्या संसाराला सुखी होईल अशी माझी आई बोलायची. काहीही दोष नसताना माझ्या पत्नीला नुसता टोमणे मारायची की तू  आम्हाला वारीस देऊ शकत नाही . पण देवाला प्रार्थना करून प्रयत्न केला पण तिसरी ही मुलगी झाली.चौथ्या वेळेस सुद्धा मुलगी झाली पाचव्या वेळेस सुद्धा ही मुलगी झाली . सोपं नसतं जगामध्ये पाच मुलींचा बाप राहणे.  पण मी माझ्या पाच मुलींना सुखी ठेवीन असं ठरवले होते .अतोनात कष्ट करेन पण त्यांना त्रास होऊ देणार नाही . जेव्हा मला पाचवी पोरगी झाली तेव्हाच माझी आई वारली मला बाप तर नव्हताच पण मी एकटा पडलो असं मला वाटलं . रोज सकाळी उठून सात वाजता कामाला जाणे रात्री बारा वाजेपर्यंत घरी येणे हा माझा रोजचा काम होतं  माझी पत्नी  माझ्या मुलींना संभाळायची खूप अवघड होतं .

सर्वांना सांभाळून ते पण एका छोट्याशाखोलीमध्ये माझ्यामुलींना मला फुलपाखरासारखं सांभाळायचं आहे . त्यांच्या केसाला एक धक्काही  लागला नाही पाहिजे अशी काळजी घ्यायची आहे असं मी मनामध्ये ठरवून ठेवले होते . देवाने हीच कृपा केली की माझ्या मुलींना एक आदर्श ,सुसंस्कृत आई दिली  तिने माझ्या मुलींना चांगले गुण दिले . सर्व मुलींना खूप शिकून त्यांना त्यांच्या पायावर उभा करणे हेच मी ठरवलेले होते .माझ्या पत्नीला वाटले की मुली मोठ्या झाल्या आहे तर त्यांचं लग्न करून त्यांनी संसार केला पाहिजे माझी पहिली  मुलगी नर्स झाली खूप आनंद झाला की ती तिच्या  पायावर उभा राहिले.दुसऱ्या मुलीचे ग्रॅज्युएशन झाले तर त्याचा लग्न करण्याचे ठरवले पहिलेच वेळ होती गडबड झाली .एका मुलाशी लग्न करून चांगलं घरामध्ये पाठवलं पण तिला खूप प्रॉब्लेम झाला तिने मला एकही गोष्ट सांगितली नाही अतिशय प्रेमळ स्वभावाचे गोड  ही माझी मुलगी  तिला वाटले माझ्या वडिलांना त्रास होईल एकही गोष्ट न सांगता सर्व गोष्टी सहन करत राहिले कधी ननंद तर कधी सासू सतत तिला त्रास पण हे माझ्या कानावर आलीच नाही जेव्हा मला हे कळले मनामध्ये अत्यंत वेदना होऊ लागल्या देवाला बोललो एवढे कष्ट माझ्या मुलीला का दिले ? तिला शारीरिक आणि मानसिक खूप त्रास दिला . मला वाटलं होतं तिला जर अजून शिकवले असते तर ,

ती तिच्या पायावर उभा राहिली असती पण मुलींचा बाप  होने  कठीण आहे .सर्व लोकांच्या नजरा माझ्यावर होत्या कारण मुलीला घरी आणणं हे बापावर मोठं कर्ज असतं मला असं वाटायचं स्त्रियांवर अन्याय होत आहेत जरी स्त्रियांना स्वातंत्र्य आपला भारतदेश जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हाच मिळाले असेल तरीसुद्धा स्त्रियांना  अस्वातंत्र्य आहे . तिला मी सांभाळले तिचे आश्रू बघून हदयामध्ये कळकळ होत होती चांगली समजूत काढून तिला तिच्या घरी पाठवले पहिली मुलगी शिकत होती तिसऱ्या मुलीसाठी स्थळ आले चांगले स्थळ आहे असं पत्नीने सांगितले चांगल्या प्रकारे आम्ही तिचे लग्न केले कोरोना आणि खूप प्रॉब्लेम झाले पैसे पाण्यासारखे खर्च होत होते कारण लॉकडाऊन मुळे रोजगार नव्हता. हे सर्व माझ्या डोक्यात गणित चालू होते पण तिसऱ्या मुलीची लग्न केले एक वर्ष झाला तिला सुद्धा परक्यासारखे वाटू लागले सासू सतत भांडण करणे आणि टोमणे मारणे चालू होते ती मनाने खूप कोमल होती तिला थोडाही त्रास जमत नव्हता तरीसुद्धा राहत होती नांदत होती मला हे सर्व कळत होते पण काही करू हे कळत नव्हते कारण  बाजू मुलीची होती .

अतिशय त्रास मनाला आणि हृदयाला होत होता बाजू छोटी होती कारण बाजू मुलीची होती . सतत अपमान होत होता..सतत त्रासही होत होता.. माझ्यापेक्षा जास्त त्रास आणि अपमान माझ्या मुलींना होत होता ..याचा मला अजून त्रास होत होता..कारण मी गरीब होतो आणि माझी मुलीची बाजू होती . मग तिला मी घरी आणले मग मनामध्ये ठरवले अजून त्रास सहन करणे कठीण आहे तिला बोलले तरी तुझे लग्न झाले तरीसुद्धा तू आमच्यासाठी परकी  नाही तू माझी मुलगी आहेस तू आपल्या घरी रहा मी तुला आयुष्यभर सांभाळ करेल कारण तू माझा सोन्याचा पाखरू आहेस मी तुला अजून त्रास होऊन देणार नाही मनामध्ये नक्की केले मुलीला स्वतःच्या पायावर उभा करून त्यांचं आयुष्य चांगलं करून त्यांचं लग्न करेन कारण जावई सतत लायकी काढायचे अत्यंत मनाला कष्ट होण्यासारखे बोलणे खायचं लोकांना फक्त तमाशा  बघायलाच आहे आणि फायदा घेणे त्रास  हे सर्व पासून मला लांब जायचं आहे यासाठी मी माझ्या मुलींना चांगलं शिकवेन आणि त्यांना त्यांच्या पायावर उभा करेन हेच ठरवलं आणि माझी पहिली मुलगी चौथी आणि पाचवी मुलगी या तिघींनाही सुशिक्षित आणि समजूतदार बनवणार याची खात्री मी माझ्या मनाला दिली !  (पुढील पाठ पाहण्यासाठी फॉलो करा आणि लाईक सुद्धा करा) धन्यवाद !