'शेवटी डोळे मिटून ती निपचित पडून राहिली. आणि काही क्षणात झोपलीही. झोपेत तिच डोकं अर्जुनच्या खांद्यावर आलं होत. तिची सैल पडलेली मान व्यवस्थित करून त्याने हाताचा आधार देऊन तिला सरळ केले. त्यावेळी तिने घातलेला डीप नेक टॉप किंचितसा खाली सरकला होता. आणि तिच्या मानेवरून थोडं खाली असे काहीतरी लागल्याचे किंवा एखाद्याचा नखांचे निशाण त्याला दिसले. तिला कळू न देता त्याने हळुवार तिच्या खांद्यावरून जॅकेट खाली केले आणि पहिले. मानेवर , खांद्यावर आणि मानेपासून थोडस खालच्या बाजूला असे थोडे फार ओरखडे, आणि लागल्याचे लालसर निशाण होते. जॅकेट पूर्ववत करून त्याने तिचे हात वेगैरे चेक केले. हाताच्या मनगटावर आणि उजव्या पायाच्या करंगळीला सुद्धा जखम झालेली होती. बाकी शरीरावर देखील जखम असण्याची शक्यता होती. हा काय प्रकार त्याला लक्षात येईना. त्याला आठवले, कदाचित म्हणूनच ती घेरदार चुडीदार कॉटन ड्रेस घालायची आणि लांब ओढणी आपल्या अंगावर घेऊन रूममध्ये वावरायची. हे निशाण कोणाला दिसू नये म्हणून. ट्रेन हल्ल्याच्या वेळी तिला एवढे लागणे शक्य नव्हते. नखांचे निशाण मानेवर वेगैरे असणे शक्य नाही, हे कृत्य त्या किडण्यापर चे असणार हे त्याला समजले. आणि दोन-तीन दिवस एकत्र असूनही हि मुलगी एकदाही आपल्याला याबद्दल काहीही बोलली नाही. याबद्दल त्याला वाईट वाटले. तिची अशी अवस्था बघून त्याच्या तळपायाची आग होत होती. आपण अजून काही दिवस इकडेच थांबून त्या लोकांना शोधायला हवे होते, आणि त्यांच्या कृत्याची शिक्षा त्याना द्यायला पाहिजे होती, असे त्याला वाटत होते. राहून राहून तो त्याचा विचार करत होता.'
'फ्लाईट लॅंड झाली होती. बाहेर आल्यावर मंगेश जुईची बॅग देऊन बाहेर जाऊन उभा राहिला. टॅक्सी आली होती. फारुख आणि तो एका टॅक्सिमध्ये बसले आणि अर्जुनने दुसरी टॅक्सी पकडली. जुईची बॅग घेऊन त्याने तिला टॅक्सिमध्ये बसायला सांगितले, पण तिने नकार दिला. ते तिचे सगळे बनावट कागदपत्र आणि अर्जुनाचा मोबाइल परत करून तिने आपली बॅग उचलली.
''इथपर्यंत सोड्याबद्दल थँक्यू, इथून पुढे मी एकटीने जाऊ शकते. डोन्ट वरी.'' जुई एका मागच्या टॅक्सिला हात करत म्हणाली.
''आर यु शुअर? नाहीतर मी सोडतो तुम्हाला.'' अर्जुन अजूनही उभा होता.
''नको, मी जाऊ शकते.'' म्हणत ती टॅक्सित बसली.
''जुई तुमचा कॉटॅक्ट नंबर? प्लिज.''
''नाहीये, म्हणजे माझं सगळं सामान हरवलं होतं, तुम्हाला माहित आहे. आणि तो नंबर त्या लोकांकडे आहे, म्हणून मी तोच नंबर कनटीन्यू न करता, आता दुसरा नवीन नंबर घेईन असं म्हणतेय.''
''ओके, मग माझा नंबर आहे ना तुमच्याकडे, तुमचा नवीन नंबर आल्यावर मला शेअर करा.'' म्हणत अर्जुनाने टॅक्सिचा दरवाजा लावला. जुई नको म्हणत होती. तरीही टॅक्सी वाल्याला दोन पाचशेच्या नोट्स देऊन तो बाजूला उभा राहिला. कारण त्याला माहित होत, सध्या जुईकडे काहीच पैसे नाहीत.
टॅक्सी सुरु झाली. आणि जुईने आपली मान वरती करून एकदा त्याला डोळे भरून पाहिलं. सरळ उतरून त्याला एक घट्ट मिठी मारावी अशी तिची इच्छा झाली होती. पण तिने स्वतःच्या भावनाना आवर घातला. आणि बाय करण्यासाठी हात वरती करून ती निघाली.
अर्जुन मात्र अजून त्याच जागी उभा होता. जुईचा विचार करत. कारण जुईची ओळख तर केव्हाच पटली होती. जुई त्याची जु होती ती. पण त्याच्या सारख्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांला कोणाच्याही प्रेमात पडण्याची शिक्षा काय हे माहित होत. त्याच्यावर कितीतरी शत्रू पाळत ठेवून असायचे, जुईच्या सानिध्यात येऊन ती इतरांच्या नजरेत येन हे तिच्यासाठी खूप धोकादायक होत. तिच्या सुरक्षिततेसाठी त्याने जाणून बुजून तिला आपली ओळख दाखवली नाही. किंबहुना हॉटेल रूममध्ये त्याच्या बाजूला बसून रडताना ती जे काही बोलली होती, ते सगळं त्याने ऐकलेले होत. पण स्वतःहून त्याने दोन पाऊल माघार घेतली. आपला वावर गुन्हेगारांच्या जगात, रोज टांगती तलवार मानेवरती घेऊन आपण जगतो. कधी काय होईल याचा नेम नाही. मागे पुढे दोन सुरक्षारक्षकांच्या गाड्या असूनही उद्याचा भरवसा नसतो. एवढ्या असुरक्षित आयुष्यात जुईला आपण काय देणार? वेळ सुद्धा देऊ शकत नाही. प्रेमाचा विचार तर डोक्यात आणणेही चुकीचे. तिला तिच्या मार्गाने जाऊ दे आणि आयुष्यात सुखी आणि सुरक्षित राहू देत. असा विचार करून अर्जुन टॅक्सित बसून घरी निघाला. मागे मंगेश आणि फारुख दोघे दुसऱ्या टॅक्सिमध्ये होते.
****
आठवडा उलटून गेला होता. परत येऊन जुईने हॉस्पिटल पुन्हा जॉईन केले होते. पेशन्स्ट, सर्जरी. मेडिसिन्स, आणि ऑपरेशन्स सगळ्या गोष्टी अवतीभोवती सुरु असायच्या. पण एवढ्या गर्दीतही जुई स्वतःला एकटी समजायची. इतरांच्या बरोबर असूनही ती कोणाशी काही बोलायची नाही. आपल्यामध्ये गुंतून राहायची. मोबाइलमध्ये पहिलाच सेव्ह केलेला अर्जुनचा नंबर बघून जुईला खूप इच्छा झाली कि, त्याला फोन लावावा. पण ती नंबर बघून पुन्हा मोबाइल टेबलवर ठेवून दयायची. तिच्या समोरून त्याचा चेहेरा जात नव्हता.
*****
मुंबईला आल्यापासून अर्जुन अस्वस्थ होता. जुईचा विचार काही केल्या त्याची पाठ सोडेना. अर्जुनच असं विचित्र वागणं मंगेश त्याच्या सोबत असायचा त्याच्या लक्षात आलं होत. कितीही चांगल बॉण्डिंग असलं तरीही अर्जुन त्याचा बॉस होता. म्हणून डायरेक्ट विचारायला त्याचा धीर होईना. पण अर्जुनला शांत आणि एकाकी पाहून आज मंगेशने स्वतःहून विषय काढला.
''साहेब, मुंबईला आल्यापासून बघतोय, तुमचं कशातही लक्ष नाहीये. खान्यापीण्यात सुद्धा लक्ष नाही. सारखे कसला तरी विचार करत असता. काय प्रॉब्लेम झाला आहे का?''
''नाही रे, थोडं अस्वस्थ वाटतंय. कशातही मन लागत नाही आजकाल.'' अर्जुन आणि मंगेश त्याच्या समोर बसून कॉफी घेत होते. अचानक मोबाईल चा आवाज आला आणि अर्जून उठला, त्याने पर्पल शर्ट आणि ब्लॅक जीन्स घालून, मोबाइल आणि वोलेट खिशात टाकले. अर्जुन तयार झाला. तो कुठेतरी निघण्याच्या तयारीत होता.
''साहेब कुठे निघायचं आहे का?'' मंगेश म्हणाला.
''नाही, मी एकटाच जातोय. कोणाचा कॉल आता तर सांग बाहेर आहे.'' अर्जुनने गाडीची चावी हातात घेतली. कोणाची तरी वाट बघत बसावं तसे तो फोनवर बघत होता. कदाचित एखादा महत्वाचा फोन येणार असेल हे मंगेशने ओळखले.
''मी येऊ का? गाडी तुम्ही स्वतः चालवणार आहेत?'' मंगेश म्हणाला.
''मंगेश आज मी एकटाच जातोय, तू आणि फारुख दोघेही मागावर येऊ नका. आणि काळजी करू नका. शहराच्या बाहेर नाही जात.'' अर्जुन बोलत असतानाच त्याच्या मोबाइलर फोन आला आणि 'ओके.' म्हणून तो बाहेर निघाला.
मोबाइलवर त्याला एक ऍड्रेस मेसेज मिळाला होता. ऍड्रेस गुगल मॅपवर टाकून त्याने गाडी स्टार्ट केली.
*****
'कसला उचं आणि धिप्पाड झालाय तो, आधीपेक्षा सुंदर दिसतो. त्याचे ते काळेभोर डोळे. चेहेऱ्याला शोभणाऱ्या दाट जाडसर भिवया. आणि नाकाचा शेंडा... अगदी तेच लहानपणीच रूप. तेव्हा वाटलं नव्हतं, एकमेकांपासून आम्ही दोघे एवढ्या दूर जाऊ. आत्या आणि डॅडच्या भांडणात आमची फरपट झाली. त्यांचे मतभेद, त्यांची भांडण म्हणून त्यांनी एकमेकांचं तोंड पाहायचं नाही असं ठरवलं. आणि आम्ही दोघे एकमेकांच्या पासून खूप लांब निघून गेलो. नाहीतर कदाचित आयुष्य वेगळ्या वळणावर असत. खूप सुंदर असत. माझ्या स्वप्नातल्या कथेप्रमाणे.' जुई स्वतःशीच बडबड करत होती.
''मॅडम आजची सर्जरी उद्या होणार आहे, काही इमर्जन्सीमुळे ते पेशन्ट आलेले नाही.'' एक नर्स जुईला सांगत होती.
''ओके. मी निघतेय मग. काही इमर्जन्सी आलीच तर कळवं.'' जुई बॅग घेऊन उठली.
''मॅडम तुम्ही घरी जाऊन आराम करा. गेले चार दिवस हॉस्पिटलमध्येच आहेत. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अजूनही बरेच डॉक्टर आहेत. ते बघतील पेशन्ट्स. तुम्हाला आरामाची गरज आहे.'' ती नर्स पुन्हा म्हणाली.
''होय ग, निघतेय. खरच मला आरामाची गरज आहे. नाहीतर उद्या मला इथे ऍडमिट करावं लागेल.'' म्हणत हसत जुई बाहेर पडली.
*****
क्रमश