'साहेब, इमर्जन्सीमध्ये एक फ्लाईट बुकिंग मिळतं आहे, मी तुम्हाला फोन करणार होतो, पण मोबाइल ची बॅटरी डाऊन झाली. काय करू? दोन तिकीट मागवू?'' दाराबाहेर बाहेर मागेच उभा होता. तो अर्धवट भिजलेल्या अवस्थेत दिसत होता. आत येऊन त्याने अर्जुनला सांगितले
''केव्हाच फ्लाईट आहे?'' अर्जुन म्हणाला.
''आज पहाटे ४ चे, तुमच्या ओळखीवर या मॅडमला एक सीट नक्कीच मिळून जाईल. कालच त्यांचे कागदपत्र बनवून झाले आहेत. त्यानंतर केव्हा सोय होईल माहित नाही. आणि इथली पूरस्थिती पाहता तुम्ही मुंबईला परतणे योग्य आहे.'' मंगेश जुई आणि अर्जुनकडे बघत म्हणाला.
''दोन तिकिटे बुक कर, डिटेल्स मेसेज करतो. तिकिट्स एअरपोर्ट आल्यावर मला दे. आणि इथलं बिल सेटल कर.'' अर्जुनने सगळी सूचना मंगेशला दिली. आणि मंगेश तेथील अर्जुनाचे सामान वेगैरे पॅक करू लागला.
''मंगेश, माझ्याकडे माझा आयडी प्रूफ म्हणून काहीही डॉक्यूमेंट्स नाहीत. फ्लाईट बुकिंग कस काय मिळू शकत?'' जुई मंगेशला विचारत होती.
''डोन्ट वरी मॅडम, साहेबांच्या नावावर इथे एक काय अख्खी फ्लाईट बुक करता येईल. रात्र बरीच झालेय, वेळ कमी आहे. तुम्ही तुमचं पॅकिंग करून घ्या. काही मदत लागली तर सांगा.'' मंगेश जुईला सांगून सगळी आवरा आवर करून हॉटेल बिल सेटल करण्यासाठी निघून गेला. तो गेल्यावर जुई मनातून फार घाबरली होती. अर्जुनने आता परत काही प्रश्न विचारू नये असे तिला वाटत होते.
आपली बॅग भरून ती फ्रेश व्हायला बाथरुमकडे निघाली.
''जुई, आपण इथून निघतोय पण अजूनही तुमच्या जीवाचा धोका टळलेला नाहीये, आणि माझ्यावर तर सतत टांगती तलवार असते, सो थोडं सावध राहा. आणि तुमचे कपडे चेंग करून काहीतरी जीन्स वेगैरे घाला. जेणे करून तुम्हाला त्यातून आरामात पाळता येऊन शकत, कमीत कमी चालताना फास्ट चालू शकाल असे काहीतरी बघा. वेळ सांगून येत नाही, आणि आपली वेळ तर वाईटच आहे.'' अर्जुन तिला संभाव्य धोक्यापासून सावध करत होता. जुई त्याला काय म्हणायचं आहे ते समजली.
''ओके.''
दोघांचं जेवण आवरल्यावर जुईने आपल्या सगळ्या वस्तू चेक केल्या. अर्जुनने सूचना केली कि निघण्याच्या तयारीत ती होती. आत जाऊन ती चेन्ज करून आली. ब्ल्यू जीन्स आणि पर्पल फुलांचा व्हाईट टॉप तिने घातला होता. त्यावर एक काळ जॅकेट घालून ती तयार झाली.
''अजून एक, केसांचा टाय किंवा बॉनेट लावता येईल का? सॉरी टू से यू, बट माझ्याबरोबर प्रवास कारण म्हणजे फारच काळजीपूर्वक निघावं लागत. खूपवेळा माझ्यावर प्रवासात हल्ला झाला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.'' अर्जुन तिच्याकडे आणि तिच्या लांबसडक अर्ध्य सुटलेल्या केसांकडे बघत बोलत होता. ते पाहून जुईने लगेच एका रबरबँड मध्ये आपले केस बांधले आणि त्याचा एक हाय बन बनवला.
''अजून काही? म्हणजे गरजेचं काही असेल तर सांगा?''
''मोबाइल शिवाय काहीही तुमच्या जवळ ठेवू नका. मंगेश आपल्या बॅग त्याच्या सोबत घेऊन जाईल. आपल्याला आजूबाजूची सीट मिळाल्या असतील तर ओके, नाहीतर प्रवासात अजिबात झोपू नका.'' त्याने पुन्हा सूचना दिली. त्याबरोबर मान डोलावत जुईने आपल्या छोट्या पर्समध्ये तो अर्जुनने दिलेला मोबाइल आणि चार्जर ठेवला. आणि बॅग तिथेच ठेऊन दिली.
''निघायचं?'' तिने त्याच्याकडे बघत विचारले.
''होय, मोबाइल चार्ज आहे ना?'' विचारत अर्जुन एक हॅन्ड बॅग हातात घेऊन जुई सोबत त्या हॉटेल रूममधून बाहेर पडला.
''होय, आहे.'' ती त्याच्या सोबत चालत बाहेर हॉटेल रिसिप्शन एरियात आली होती. मंगेश त्यांच्या पासून थोड्या अंतरावर त्यांचे सामान घेऊन चालत असलेला जुईने पहिले. हॉटेल बाहेर पडल्यावर अर्जुनने जुईचा हात आपल्या हातात घेतला. तिला काही समजले नाही. ती प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघत होती.
''चालेल ना. कोणाला संशय वाटू नये म्हणून.'' अर्जुन म्हणाला.
''ठीक आहे.''
कोणाला संशय येऊ नये, म्हणून ठीक आहे, पण अर्जुनाने आपला हात एवढा घट्ट का पकडला आहे? हे जुईला कळेना. त्यात तो तिच्या बाजूने अगदी चिकटून चालत होता. त्याच्या थोड्याश्या स्पर्शाने देखील तिच्या मनात वादळ निर्माण झाले होते. त्यात फ्लाईट मध्ये सीटही बाजूला असणार होती. एरपोर्टला आल्यावर ही तो तिच्या शक्य तितक्या जवळ उभा होता. त्याला टाळता येणे जुईला शक्यच होIना. त्याच आपल्या जवळ येन जुईला अस्वस्थ करून जात होत. त्यात रात्री रूममध्ये घडलेला प्रसंग आठवून तिला त्याच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होत नव्हती.
तिचा खोटा पासपोर्ट आणि इतर कागदपत्र घेऊन मंगेश दादा आणि फारुख सेठ दोघेही एअरपोर्टला पोहोचले. चेकिंगच्या बाहेर तिला एक मोठे इन्व्हॉलप देऊन ते निघून गेले. जुईला वाटलं ते सुद्धा आपल्यासोबत असतील, पण तसे झाले नाही. ते सेम फ्लाईटला असूनही जुई आणि अर्जुन पासून काही अंतर ठेवून लांब उभे होते. पासपोर्ट बघितल्यावर जुई घाबरली. मिसेस जुई अर्जुन दीक्षित अशा नावाचे कागदपत्र आणि तिकीट होते. तिला काही समजेना. त्यात तिचे ओळखपत्र म्हणून असलेले पेपर्सही त्याच नावाने होते.
''बनावट कागदपत्र बनवून घेतले आहेत. काळजी करू नका, पकडले जाणार नाही, आणि तसे झाले तरीही आतमध्ये माझी ओळख आहे, मॅनेज होईल.'' अर्जुनने तिच्या चेहेर्यावरील प्रश्नचिन्ह ओळखून स्वतःच स्पष्टीकरण दिले.
''पण मिसेस का लावलाय, आणि तुमच्या नावापुढे का?'' ती पुन्हा पुन्हा चेक करू लागली.
''इथे इमर्जन्सी अडकलेल्या लोकांसाठी तातडीने परतण्यासाठी हि फ्लाईट आहे. एका टूर्स आणि ट्रॅव्हल्सची प्री डेटेड बुकिंग मिळवली आपण, नैनितालला हनिमूनसाठी आलो होतो असे दाखवण्यासाठी. नवरा बायको आहोत असे समजावे, म्हणून हा अशा नावाचे बनावट कागदपत्र बनवून घ्यावे लागले, ते सुद्धा महाराष्ट्रातून मागवलेत. नाहीतर तिकीट मिळणे अवघड होते. डोन्ट वरी, आजपुरता प्रश्न आहे.'' अर्जुन अगदी कमी आवाजात तिला सांगत होता. तिने फक्त मान डोलावली. ओरिजनल कागदपत्र नाहीच आहेत, तर दुसरं करणार तरी काय? चेकिंग वेगैरे झाले पण तिला कोणीही पकडले नाही. पण तिच्या मनात अजूनही धाकधूक होतीच. असे प्रकार तिच्या आयुष्यात तिने केव्हाच पाहिलेले नव्हते. ती घाबरली होती. फ्लाईटमध्ये बसल्यावर जुईला थोडं रिलॅक्स वाटलं, तर अर्जुन बाजूच्या सीटवर बसला होता. आणि तिच्या खाण्यापिण्यापासून सगळी काळजी तो घेत होता. त्याची प्रत्येक कृती बघून जुईला अस्वस्थ होत होते. तो काहींना काही बोलत होता. फक्त हो नाही एवढेच उत्तर देऊन जुई पुन्हा शांत झाली.
****
'शेवटी डोळे मिटून ती निपचित पडून राहिली. आणि काही क्षणात झोपलीही. झोपेत तिच डोकं अर्जुनच्या खांद्यावर आलं होत. तिची सैल पडलेली मान व्यवस्थित करून त्याने हाताचा आधार देऊन तिला सरळ केले. त्यावेळी तिने घातलेला डीप नेक टॉप किंचितसा खाली सरकला होता. आणि तिच्या मानेवरून थोडं खाली असे काहीतरी लागल्याचे किंवा एखाद्याचा नखांचे निशाण त्याला दिसले. तिला कळू न देता त्याने हळुवार तिच्या खांद्यावरून जॅकेट खाली केले आणि पहिले. मानेवर , खांद्यावर आणि मानेपासून थोडस खालच्या बाजूला असे थोडे फार ओरखडे, आणि लागल्याचे लालसर निशाण होते. जॅकेट पूर्ववत करून त्याने तिचे हात वेगैरे चेक केले. हाताच्या मनगटावर आणि उजव्या पायाच्या करंगळीला सुद्धा जखम झालेली होती. बाकी शरीरावर देखील जखम असण्याची शक्यता होती. हा काय प्रकार त्याला लक्षात येईना. त्याला आठवले, कदाचित म्हणूनच ती घेरदार चुडीदार कॉटन ड्रेस घालायची आणि लांब ओढणी आपल्या अंगावर घेऊन रूममध्ये वावरायची. हे निशाण कोणाला दिसू नये म्हणून. ट्रेन हल्ल्याच्या वेळी तिला एवढे लागणे शक्य नव्हते. नखांचे निशाण मानेवर वेगैरे असणे शक्य नाही, हे कृत्य त्या किडण्यापर चे असणार हे त्याला समजले. आणि दोन-तीन दिवस एकत्र असूनही हि मुलगी एकदाही आपल्याला याबद्दल काहीही बोलली नाही. याबद्दल त्याला वाईट वाटले. तिची अशी अवस्था बघून त्याच्या तळपायाची आग होत होती. आपण अजून काही दिवस इकडेच थांबून त्या लोकांना शोधायला हवे होते, आणि त्यांच्या कृत्याची शिक्षा त्याना द्यायला पाहिजे होती, असे त्याला वाटत होते. राहून राहून तो त्याचा विचार करत होता.'
******
क्रमश