RIMZIM DHUN 5 in Marathi Love Stories by siddhi chavan books and stories PDF | रिमझिम धून - ५

Featured Books
Categories
Share

रिमझिम धून - ५

''नाही, नको, त्याची काही गरज नाही.'' ती म्हणाली.

''घरी कोणी नाही का?'' हळूहळू चालत जाऊन त्याने आपली बॅग बाहेर काढली. अर्जुन आपली बॅग उघडून काहीतरी शोधत जुईला विचारत होता.

''आहेत सगळे, पण फोन नको, डायरेक्ट जाऊन भेटेन.'' म्हणत उठून तिने ग्लासमध्ये पाणी घेतले आणि ती पिऊ लागली.

''हा घ्या मोबाइल, एक्सट्रा आहे. सेफ्टीसाठी असूदेत. माझा नंबर सेव्ह आहे, गरज लागली तर केव्हाही कॉल करू शकता.'' आपल्या बॅगमधील अतिरिक्त असलेला एक सेलफोन तिच्याकडे देत तो म्हणाला.

''नको, खरचं नको.'' तिने तो घेतला नाही, त्याने तिचा हात वरती करून त्यावर तो मोबाइल आणि चार्जर त्यावर ठेवला. आणि तो पुन्हा येऊन बेडवर बसला. ती मोबाइल बघत तशीच उभी होती.

''मुंबईला पोहोचल्यावर मोबाइल मला परत द्या. पण आत्ता ठेवून घ्या. तुमच्या जीवाला धोका आहे, सेफ्टी म्हणून ठेवा.'' म्हणत तो बेडवर आडवा झाला. आणि हातात मोबाइल घेऊन जुई पुन्हा खिडकीबाहेर बघू लागली.

''साहेब, आज डॉक्टर तुमच्या चेकअप साठी येऊ शकत नाही, वाहातून बंद आहे कारण अर्ध शहर पाण्याखाली आहे. मी सुद्धा तिथे येऊ शकत नाही. हॉटेलमध्ये सांगून काहीतरी सोया करतो. आज तेवढं जमवून घ्या.'' मंगेश फोन करून त्याच्या बॉसला म्हणजेच अर्जुनला सांगत होता.''

त्याचा फोन ठेवल्यावरअर्जुन टेन्शनमध्ये आला. त्याच्या जखमेवरच बँडेज चेंज करून पुन्हा तिथे क्लिनींग करण्याची गरज होती. थोडं ऑपरेट झाला होत, त्या जागेवर दुखु लागले होते, आणि त्याला खूप त्रास होत होता. हॉटेल सर्व्हिस ला फोन करून त्याने काही मदत मिळते का पहिले. पण तिथून काही रिस्पॉन्स मिळाला नाही. स्वतःच्या हाताने त्याने बँडेज काढले आणि त्यावर बिटाडाइन लावले. पण त्याला चालत येणेही शक्य होईना. एवढा त्रास होवू लागला होता. जुई सोफ्यावर बसून त्याच्याकडे बघत होती. सकाळ पासून ते दोघेच या रूममध्ये होते. सकाळपासून तिचे त्याच्याकडे लक्ष होते, पण काय करावे तिला सुचेना. त्याला थोडी हेल्प करावी असे तिला वाटले. पण एक मन नको म्हणत होते. शेवटी न राहवून तिने त्याला विचारले.
''काही अरेंजमेंट झाली का? नाहीतर मी तुमची काही मदत करू?''

''मला डॉक्टरची गरज वाटते. ऑपेरेशन च्या जागी खूप पेन होतंय. इथे बाहेरून कोणी येऊ शकत नाही, आणि हॉटेल मध्ये तेवढा स्टाफ आलेला नाही, जवळपास सगळे रोड पाण्याखाली आहेत, काय करू काही समजत नाही.'' तो एक पिलो आपल्या पोटावर दाबून बेडवर बसून होता.

''कदाचित पस वेगैरे झाला असेल. तुम्ही खूप हालचाल करताय, आणि अंघोळ सुध्दा केली, पाणी जाऊन जखम दुबरण्याची शक्यता आहे. तुमची काही हरकत नसेल तर, मी बघू का? '' जुई म्हणाली. 

''बघू शकता, आत मला ते पेन सहन नाही होत, बघा काही करता येत असेल तर.'' 

''बिटाडाइन आणि कॉटन पाहिज होता. बँडेज तर तुमच्याकडं आहेच. मी रुम सर्व्हिस ला फोन करते आणि मागवून घेते.'' म्हणत तिने लँडलाईन वरून हॉटेलच्या १०२ नंबर ला फोन केला, आणि पाहिजे असलेल्या वस्तू काहीही मेडिसिन्स मागवून घेतले.

पाच दहा मिनिटात तिथं येऊन एका वेटरने सगळे साहित्य आणून दिले. एक बॉक्स जुईच्या हातात देऊन तो निघून गेला.

''एवढं सगळं लागणार आहे का?'' अर्जुन तो प्लास्टिक बॉक्स बघत विचारत होता.  

''जे लागेल ते वापरूया, पण सेफर साइडला हा मेडिसिन किट असू देत तुमच्या जवळ, कदाचित पाऊस अजून वाढला तर हे देखील मिळाणार नाही. कधीही गरज लागू शकते, अश्या गोष्टी आहेत या.'' म्हणत जुई येऊन त्याच्या बाजूला बसली. 

बॉक्स उघडून तिने हॅन्ड ग्लॅब्ज हातात घातले आणि एक कॉटन रोल हातात घेतला. अर्जुन तिच्याकडं बघत होता. त्याचा टीशर्ट थोडा वरच्या बाजूला फोल्ड करून ऑपरेशनची जागा चेक केली. तिच्या शक्यते प्रमाणे त्या जागी पस जमा झाला होता. आणि जखम पूर्णपणे दुबरलेली होती. 

''सॉरी हा, पण थोडस दुखेल, कॉटन दाबून पस बाहेर काढला नाही तर जखम लवकर बरी नाही होणार.'' 

''दॅट्स फाईन. यू कॅन डू.'' 

''ओक.''

 जुईने कापसाने हळूहळू जखम साफ केली,  सगळा पस पुसून काढला, आणि त्यावर थोडी पावडर पसरून पुन्हा बँडेज गुंडाळले. आपले ग्लॅब्ज काढून तिने हात साबणाने स्वच्छ धुवून कोरडे केले. आणि त्याच प्लॅस्टिकच्या मेडिकल बॉक्स मधून एक पेनकिलर काढून ती अर्जुनच्या हातात ठेवली. 

''ही पेनकिलर घ्या, सध्या त्रास थोडा कमी होईल. चार-पाच तास आराम करा, नंतर जखम जास्त दुखणार ही नाही आणि लवकरच टाके सुकून जातील.'' तीने पाण्याचा ग्लास त्याच्या समोर धरला. त्याने गोळी तोंडात टाकू त्यावर दोन घोट पाणी पिऊन घेतले. 

''आज तुम्ही एक जागेवरून अजिबात उठू नका, हालचाल पूर्णपणे बंद. आणि ऑपरेशनच्या जागी बिलकुल पाणी लागू द्यायचं नाही. थोडी काळजी घेतली तर लवकरात लवकर बर वाटेल.''  तिने ग्लास बाजूला ठेवून दिल मेडिसिन बॉक्स टेबलवर ठेवून ती सोफ्यावर येऊन बसली.

''अजून काही?'' अर्जुन आपला टीशर्ट खाली करत म्हणाला. 

''होय, तो टीशर्ट होता तसाच ठेवा. ऑपरेशन ची जागा थोडावेळ ओपन राहूदे. थोडी हवा लागल्यावर जखम सुकायला लागेल, पुन्हा पस धरणार नाही.'' जुई हसत म्हणाली. 

''ओके, डॉक्टर जुई. सो आर यु डॉक्टर? कि नर्स?'' 

''डॉक्टर आहे, पण तुमच्यासाठी आज दोन्हीही काम केली.'' म्हणत जुई हसली. अर्जुनच लक्ष तिच्याकडेच होत. ती हसताना फार सुंदर दिसत होती. मुळात दोन दिवस सतत त्रासिक आणि चिंताग्रस्त असणारा तिचा चेहेरा आज हसताना पाहून अर्जुनला छान प्रसन्न वाटलं. 

निळ्या फिकट अशा सुटी चुडीदार ड्रेसवरून वाऱ्यानं उडणारी तिची झिरझिरीत लांब ओढणी सांभाळत ती खिडकीतून बाहेरचा पाऊस बघत होती.  अर्ध्या बांधलेल्या लांबसडक केसांच्या वाऱ्यावर उडणाऱ्या बटा, जुईच्या फुलासारखा गोरापान रंग, आणि आखीवरेखीव नाकीडोळी. त्यातही अगदी नाजूक शरीरयष्टी, तीच ते अगदी लोभस आणि सोज्वळ रूप. त्यातून साधेपण अगदी भरून ओसंडताना दिसत होता. तो तसाच तिच्याकडे बघत बेडवर पडून राहीला. जुईच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती आपल्याच विचारात मग्न होती. एखादा मुलीला एक न्याहाळून बघण्याची हि पहिलीच वेळ होती. त्याला स्वतःच विसर पडला. तिच्याकडे बघत बघत त्याचे डोळे हळुवार मिटले आणि पेनकिलरचा असर होऊन तो झोपून गेला.  

*****
खिडकीची एकमेकांवर आदळणारी तावदाने बंद करून जुईने पडदे ओढून घेतले. बाहेर वीज कडाडत होत्या. रात्र बरीच झाली होती. अर्जुन अजून का उठला नाही म्हणून तिने स्टेथोस्कोपने त्याला चेक केले. जखम दुखत नसल्याने त्याला आराम पडला होता. म्हणून तो झोपला होता. चेककरून ती उठणार होती. पण कोण जाणे तिला काय आठवले,आणि झोपलेल्या अवस्थते असलेलता त्याच्या चेहऱ्याकडे ती बघत राहिली. तिला तिचेच नवल वाटतं होते, अर्जुन तिला इथे अशा अवस्थेत पुन्हा भेटेल तिने केव्हा स्वप्नातही विचार केला नव्हता. ते हि एवढ्या वर्षेनंतर पुन्हा भेट होईल हे केवळ स्वप्नवत होते. 

त्याच्याकडे बघताना विचारांच्या तंदरीत ती पुन्हा १०-१५ वर्षे मागे गेली. लहान वयातील अर्जुन आणि त्याचा चेहेरा तिला आठवला, आत्ताच तो आणि तेव्हाचा तिचा मित्र अज्जू यात कितीतरी बदल झाला होता, पण तो कितीही बदलला तरी ती त्याला थोडी विसरणार होती. कित्येक वर्ष लोटली होती. असाच बरसणाऱ्या पावसात हातात हात धरून तळ्याकाठी धावणारे ते दोघे, लपाछपी खेळताना एकमेकांना लपवून स्वतःवर डॅम घेणारे ते दोघे. लहान मुलांच्या उनाड खोड्या काढत बागडणारे ते दोघे. गेलेले दिवस पुन्हा तिच्या डोळ्यासमोरून तरळू लागले. नाव ऐकताच क्षणी तिने अर्जुनला ओळखले होते, आणि विसरायचे म्हणावे, तर एवढ्या वर्षात ती त्याला विसरूच शकली नव्हती. तो मात्र आपल्याला विसरला असावा, असे तिला वाटले. 

 

 क्रमश