RIMZIM DHUN 4 in Marathi Love Stories by siddhi chavan books and stories PDF | रिमझिम धून - ४

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

रिमझिम धून - ४

''नाष्टा करून घ्या मॅडम. गुंड मागे लागले तर पाळण्याची ताकद हवी ना?'' तो तरुण अधिकारी पुन्हा म्हणाला. आणि उठून जुई खायला बसली. गुंड शब्द उच्चारल्या बरोबर तिची भीतीने थरथर झालेली त्याने पहिले. पण साहजिक होत. एक मुलगी, त सुद्धा एकटी रात्रीचा प्रवास करणार, आणि त्यात अचानक ओढवलेला प्रसंग यामुळे घाबरली होती. हे त्याच्या लक्षात आल.

मंगेश काही कामानिमित्त बाहेर गेला. ते पोलीस अधीकारी बेड्वर डोळे मिटून पडलेले होते. नाश्टा उरकून जुई पुन्हा सोफ्यावर बसली. तिचे कुठेही मन लागेना. एकाकी पानाची भावना मनाला पोखरत होती. कुठे फसलो आपण? आणि घरचे लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील? आपण फसवलं सगळ्यांना. या विचारात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते, तिने ते लगेच पुसले. पण त्या तरुण अधिकाऱ्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. ती मुलगी एकटीच रडतेय. कदाचित घाबरली असावी. हे त्यांनी ओळखले.

'मंगेश काही कामानिमित्त हॉटेल बाहेर निघून गेला. तो पोलीस अधीकारी बेड्वर डोळे मिटून पडलेला होता. नाश्टा उरकून जुई पुन्हा सोफ्यावर बसली. तिचे कुठेही मन लागेना. एकाकी पानाची भावना मनाला पोखरत होती. कुठे फसलो आपण? आणि घरचे लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील? आपण फसवलं सगळ्यांना. या विचारात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते, तिने ते लगेच पुसले. पण त्या तरुण अधिकाऱ्याच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही. ती मुलगी एकटीच रडतेय. कदाचित घाबरली असावी. हे त्यांनी ओळखले.'

''जुई मॅडम, पाणी देता का? प्लिज.''

''होय सर, आले.'' म्हणत जुईने एक पाण्याचा ग्लास त्याच्या समोर धरला.

''बाय द वे आपण सोबत आहोत, तर मी माझी ओळख करून देतो. मी अर्जुन दीक्षित, (M. E. S.) स्क्वाडचा हेड आहे. त्यामुळे इकडे कुठेही येणे जाणं होत असत. पण तुम्ही सर म्हणत जाऊ नका. प्लिज.'' अर्जुन पाण्याचा ग्लास हातात घेत जुईला म्हणाला.

''ओह. मग तर तुम्हाला साहेब म्हणावं लागेल. तुम्ही पण विनाकारण मला मॅडम म्हणता.'' जुई बाजूला उभी राहिली होती.

''अर्जुन ठीक आहे. मी तुम्हाला जुई म्हणत जाईन. त्या ड्रॉवर मध्ये माझं कार्ड आहे, ठेवा तुमच्याकडे. केव्हा लागलं तर. '' तो म्हणाला आणि जुईने बाजूच्या ड्रॉवर मधून एक कार्ड घेऊन ते पाहिलं. कार्डवर नजर टाकल्यावर तिच्या काळजात धस्स झालं. नाव 'अर्जुन धंनजय दीक्षित, बांद्रा वेस्टचा ऍड्रेस.' बघून थोडी घाबरली ती. तिला त्याची ओळख पटली होती. अर्जुनला मात्र काहीच कल्पना नव्हती. कारण त्याला तीच पूर्ण नाव माहित नव्हतं.

ती थोडी बावरली आणि घाबरली सुद्धा. ते त्याच्या लक्षात आलेलं होत. पण त्याने विषय बदलला.

''तुम्ही इथे अशा एकट्या? आणि काल रात्री त्या स्टेशनवर काय करत होतात?'' अर्जुन.

''चुकले, म्हणजे चुकून अडकले नको त्या भानगडीत. आता परतण्याचा मार्ग दिसत नाही.'' जुई अचानक बोलून गेली. आणि अर्जुन तिच्याकडे बघत राहिला.

''म्हणजे, कोणी फसवलं कि कसं? आय मिन, मी तुमची मदत करू शकतो, म्हणून खोलवर जाऊन विचारतोय.'' तो म्हणाला.

''मला इथून मुंबईला सुखरूप घेऊन चला. ती मोठी मदत होईल. आयुष्यात पुन्हा केव्हा भेट झाली, तर बाकी मी तुम्हाला माझी स्टोरी नक्की सांगेल.'' जुई पुन्हा सोफ्यावर जाऊन खिडकीतून बाहेरचा पाऊस बघत म्हणाली.

''तुम्हाला मुंबईला सुखरून सोडण्याचं माझं कर्तव्य आहे, काळजी करू नका. आणि अजून काही मदत लागली तर जरूर सांगा. कारण तुमच्यामुळे काल मी मारता मारता वाचलोय. नाहीतर त्या बिहारी गुंडांनी माझ्या पोटात सूरा खुसून मला रुळावर ढकलण्याचा प्लॅन केलाच होता.'' अर्जुन.

''म्हणजे त्यांनी तुम्हाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला?'' जुई डोळे मोठे करून विचारू लागली.

''तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला ते नैनितालचे गुंड, पण माझ्या पोटात चाकू खुपसून मला रेल्वे खाली रुळावर ढकलण्याचा प्रयत्न बिहारी गुंडाच्या एका टोळीने केला. तुम्ही आडव्या आलात आणि मी प्लॅटफॉर्म वर पडलो. नाहीतर तिथे तुम्ही त्या गुंडांच्या तावडीत सापडला असता आणि मी टाटा बाय करू डायरेक्ट ढगात गेलो असतो.'' अर्जुन अगदी बेफिकीरपने म्हणाला.

''ओह, आपण दोघांनी एकमेकांना वाचवलं तर. मी समजत होते, तुमच्या मुळे मी त्या गुंडांच्या तावडीतून सुटले. असो, केव्हा नाही ते माझ्या सोबत तुम्ही आणि माझं नशीब दोन्ही होत. नाहीतर एरवी एकट्यानेच लढावं लागत, सोबत असतेच असं नाही.'' जुई म्हणाली. आणि अर्जुन तिच्याकडे बघत राहिला.

''जरा जास्तच विचार करता तुम्ही.'' अर्जुन जुईला म्हणाला.

''ते जाऊ दे, तुम्हाला आता बरं वाटतंय का? म्हणजे आराम मिळाला आहे का?''

''होय, बरं असं नाही , पण आधीपेक्षा ठीक आहे. असं म्हणता येईल.''

''तुमच्यावर का हल्ला झाला? आय मिन कोण होते ते लोक?'' जुई

''माहित नाही, असे बरेच अजात शत्रू असतात माझ्या मागे. त्यापैकी कोणी होते. हे असं माझ्या बाबतीत रोजच आहे. फक्त काल जीवावर बेतल होत. नाहीतर मी त्यांना पुरून उरतो. तरीही एकट्याने काल तीन इनकॉउंटर करून आलोय मी. ''

''बापरे, तीन इनकॉउंटर.'' जुईच्या अंगावर काटा उभा राहिला. ती शांतच बसली. बाहेर पुष्कळ पाऊस होता. अवकाळी पाऊस पडत होता, तिने तिकडे आपली नफर वळवली. जुई ची नजर बाहेरच्या पावसावर होती. ती अधून मधून गर्जना करणाऱ्या मेघांकडे बघत होती.

''इथे पाऊस फारच असतो. आणि रस्ते बंद होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याचीच मला भीती आहे, तसे झाले तर आपण काही दिवस इथे अडकून राहू. कुठेही जात येणार नाही.'' अर्जुन बाहेर बघत म्हणाला.

''म्हणजे सगळी वाहतूक ठप्प होते का?''

''होय, मला इथे आल्यावर खूप वेळा असाच अनुभव आला आहे. होप, यावेळी असं काही होऊ नये.'' अर्जुन घड्याळाकडे बघत म्हणाला. आणि त्याने शेजारचा मोबाइल घेऊन फोन लावला.

'हॅलो, शहराची काय स्थिती आहे? पूरस्थिती नाहीय ना?' त्याने फोनवर विचारले. आणि पलीकडच्यांचे ऐकून फोन 'आय सी.'' म्हणत ठेवून दिला.

''काय झालं? ऑल ओके ना?'' जुई त्याला विचारत होती.

''पूरस्थिती आहे, सगळी वाहतूक ठप्प.'' तो म्हणाला.

''ओह, बातम्या बघायला पाहिजेत. पण माझ्याकडे मोबाइल नाही.'' ती म्हणाली.

''तुमच्याकडे मोबाइल नाही. या जनरेशनमध्ये सगळ्यांकडे मोबाइल असतो. तुमच्याकडे का नाही?'' अर्जुन आश्चर्याने तिला विचारत होता.

''असतो, म्हणजे होता. पण आत्ता नाही. निघताना ही बॅग तेवढी माझ्यासोबत घेता आली ते नशीब. नाहीतर माझी सुटका होणे अशक्य होते, मोबाइल ची काय अपेक्षा ठेवणार.'' जुई निराश होत म्हणाली.

''तुम्ही कुठून पळून आलात का?'' अर्जुन आपल्या पोलीस शब्दात तिची उलट तपासणी घेत होता.

''होय, डोक्यावर अक्षदा पडण्याआधी लग्नाच्या मंडपातून पळाली आहे, नाहीतर सगळं संपलं होत.'' जुई म्हणाली.

''काय तुमच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देत होते का? '' अर्जुन पुन्हा तिला प्रश्न विचारू लागला.

''मी महाराष्ट्रीयन आहे, इथे इच्छेने लग्न करायला कशी येणार म्हणा. चार दिवसनापूर्वी एका मैत्रिणीच्या लग्नाला इथे आले होते, तिथून माझं किडण्यापिंग झालं, आणि काल माझं लग्न एका इथल्या स्थाईक माणसा बरोबर बळेच लावण्यात येत होत, त्याआधी मी संधी साधून जे मिळालं ते सामान या बॅगमध्ये भरलं आणि तिथून पळाले.'' जुई शांतपणे सांगत होती.

''विश्वास बसत नाही, आणि तुम्ही हे एवढ्या शांतपणे सांगताय. तरी तुम्हाला पाहिल्यावर मला काहीतरी वेगळं वाटलेले होत. नाहीतर तुम्ही एवढ्या रात्री त्या सुनसान स्टेशनवर काय करत असणारा?'' म्हणत तो उठून बेडवर बसला.

''नाइलाज होता, इथून सुटकेसाठी होते ते पैसे वापरून एक दिल्लीची ट्रेन बुक केली. पण ती ही चुकली आहे. आज इथे आहे म्हणून सेफ आहे, नाहीतर ते गुंड लोक मला इकडे तिकडे शोधत होते. ते कमी की काय? म्हणून त्यात ते ट्रेनमधील गुंड भरीला भर म्हणून मागे लागले.''

''डोन्ट वरी, मी सोडतो तुम्हाला मुंबईला तुमच्या घरी, माझा मोबाइल पाहिजे तर घ्या, आणि घरी फोन करून कळवा की तुम्ही सुखरूप आहात.'' त्याने उठून हातातला मोबाइल तिच्याकडे दिला, पण जुईने तो घेतला नाही.

 


क्रमश