इतका पन मोठा नाही आहे यार मी तिच्याहून फक्त 7-8 years नेच मोठा असेल.... ती 19 चि मी 27 चा तर आहे..... म्हातारा तर नाही झालो ना......!!
सगळं कस एकदम डिफिकल्ट होऊन बसल आहे , तो हातातील सिगरेट फेकत म्हणाला....
राग हि येत होता पश्चाताप हि होतं होता पुढे काय होईल हे सुचेना....
हम्म आता बघू पुढे काय होतय.....!!
मिताली पुन्हा तिच्या घरी आली होती....सगळे खुश होते पण यावेळेत तनुजा ही खुश होती हे पाहून जरा आश्चर्य च वाटल...
पण असो तिचा आणि आपला काहीच संबंध नाही...!!
बाबा : मितु आता तरी खुश आहेस ना...?
मिताली : हो.....
मिताली ने तिच्या आई च्या मांडीवर डोकं ठेऊन झोपली होती....
मिताली : आई आज मस्त पाव भाजी बनव ना.......खूप दिवस झाले मी तुझ्या हातच काहीच खाल्ल नाही.....
आई : हॉस्पिटल मध्ये कोण खात होतं मग.??
मिताली : त्या आजारपणात चव लागते का ह्या सगळ्यांची... तू बनव ना मला पाव भाजी खायची आहे.....
आई : बर बाई बनवते मी नको चिडूस....... तू आराम कर
मिताली : हम्म...
आई आणि बाबा दोघेही तिच्या खोली मधून निघून गेले... मिताली तिची रूम डोळे भरून बघत होती, याच रूम मधून ती तीच सगळं सामान घेऊन आली होती....
या घरात कधीच पाऊल नाही टाकणार नाही कोणाशी संबंध ठेवणार पन आता ती पुन्हा त्याच घरात आली होती...
आता किती तरी दिवसांनी तिला सुखाची झोप लागणार होती.....
मिताली तशीच झोपून गेली........!!
....
.......
संध्याकाळचे 8 वाजले तस मिताली ला जाग आली.... ती पटकन उठली तिला स्वतः चच आश्चर्य वाटलं कि ती इतकी कशी काय झोपू शकते.... दुपारी 2 वाजता झोपली ते डायरेक्ट 8 ला उठली.....
( माझ्यासारखीच हि पन... 🙂 मी पन 2 वाजता झोपून 8 ला उठते... 😂 कुंभकर्ण 😌❤ )
मिताली पटकन तोंड हात पाय धुवून हॉल मध्ये आली , बाबांनी तिच्याकडे पाहून स्माईल केल....
बाबा : झाली का झोप.....
मिताली : हो.. ☺️
बाबा : मग आता भूक तर लागलीच असेल मग जा जेवून घे आणि औषधं खाऊन पुन्हा झोपुन घे......
मिताली : हम....
मिताली ने थोडंसं खाल्लं , औषधं घेऊन , मग सगळ्यांसोबत थोड्या गप्पा मारल्या आणि आपल्या रूम मध्ये निघून गेली.......
बेड वर पडल्या पडल्या तिला लगेच झोप लागली.........!!
....
........
इथे अभि मिताली च त्या रूम मध्ये असंन miss करत होता खूप....
कधी कधी हॉल मध्ये ती अभ्यासाला बसायची तर कधी भूक लागली कि किचन मध्ये काहि आहे कि नाही हे चेक करत बसायची.....
हॉस्पिटल मध्ये तो तिला जेवण भरवायचा पन ती तेव्हाहि त्याच्याशी काही बोली नाही......
...
.....
........
मिताली आता पूर्ण पणे ठीक झाली होती , ती कॉलेज ला हि जाऊ लागली सगळं काही यावेळेस मना सारख होतं होतं...... या सगळ्यात ती हे पन विसरून गेली होती कि तीच लग्न झालं आहे.....
इथे दिवसांनदिवस अभि ला मिताली चि आठवण येत होती........!!
1 महिना असाच निघून गेला...
अभि चे आई बाबा आणि अभि आले होते.......... रुचिता ने मिताली चि विचारपूस केली , थोड्यावेळ अश्याच गप्पा चालू होत्या....
अ बाबा : मग मिताली बाळा तू काय विचार केलंस??
मिताली ला काही समजलंच नाही कि ते कश्या बद्दल बोलत आहेत....
मिताली : म्हणजे..??
सगळे एकमेकांकडे पाहू लागले........शेवटी मिताली चे बाबा तिच्याजवळ बसत म्हणाले....
बाबा : त्यांचं असं म्हणणं आहे कि तू अभि बद्दल काय विचार केला आहेस?? तुला त्याच्याबरोबर राहायचं आहे का...??? तुम्ही दोघ एकमेकांना husband wife म्हणून स्वीकार कराल का..??
मिताली शांतच बसली तिला काय बोलाव काही सुचेना ती सगळ्यांकडे आळीपाळी ने पाहत होती.....!! तीच लक्ष अभि कडे गेलं जो तिच्याकडेच पाहत होता.......
तिला मागच पटा पट सगळं आठवू लागलं..
रुचिता : तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल... आम्ही तुझ्यावर कसलीच जबरदस्ती करणार नाही.......
मिताली ने एक मोठा श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.......!!!
मिताली : माझं अभिवर प्रेम नाही आणि पुढे जावून होईल याची गॅरेंटी मी देऊ शकत नाही.....
आणि हे लग्न जबरदस्ती ने नाही म्हणता येणार ऍक्सिडेन्टली झालं आहे....
अभि च ताई वर प्रेम आहे माझ्यावर नाही मग आम्ही एकत्र राहण्याचा प्रश्न च येत नाही....
मिताली म्हणाली तस अभि चे बाबा म्हणाले..." मग यावर काय उपाय आहे तुझा... "
मिताली : सिम्पल आहे मी आणि अभि डिवोर्स घेतो तुम्ही तनुजा च आणि अभि च लग्न लावून द्या.....
मिताली असं म्हणतात अभि तिच्याकडे पाहतच राहिला...... खरंच डिवोर्स बोलणं इतकं सोपं होतं तिच्यासाठी....... तिने जरा माझं काय मत आहे हे विचारायचे कष्ट हि नाही घेतले....
अभि ला कस तरीच होतं होतं... त्याला आता इथे थांबण मुश्किल जातं होतं....!!
मितालीचे बाबा : ठीक आहे पन अभि आणि मिताली तुम्ही दोघ एकमेकांशी बोलून पुन्हा एकदा तुमच्या नात्याचा विचार करा.......!!
तोच मिताली बाबांना तोडत म्हणाली " बाबा माझा विचार झालाय.. " मिताली.....
मिताली असं बोलतच कोणी काहीच म्हणाल नाही.....!! एकीकडे तनुजा खुश च झाली....
" तुम्ही ताई च आणि अभि च लग्न लावुन द्या... " मिताली असं बोलतच अभी ला खूपच राग आला त्याला असं वाटत होतं कि आता उठून तिचा गळा दाबावा...
थोड्या कोणी काहीच म्हणाल नाही... तोच शांतता तोडत अभि म्हणाला...
" मिताली बोलतेय ते खरंच आहे तिच्या आणी माझ्या डिवोर्स नंतर तुम्ही माझं आणि तनुजा च लग्न लावून द्या.... " अभी.......
मिताली त्याच्याकडे पाहू लागली पन अभि तिच्याकडे पाहत न्हवता....
आता जर का त्याने तिच्या कडे पहिले असंत तर त्याला तिच्या डोळ्यातले भाव नक्कीच कळाले असते...!!
दोघ हि मनात नसून सुद्धा आपला निर्णय सांगून मोकळे झाले होते......!!!
थोड्यावेळाने अभि चि फॅमिली निघून गेली........ तस सगळे आपापल्या कामाला लागले....!
मिताली आपल्या रूम मध्ये गेली आणी तशीच बेड वरती स्वतः ला झोकून दिल......
तस तिला त्यादिवशीची रात्र आठवली......!! तेव्हा मिताली तिचा स्टडी करत बसली होती..!! तोच तिच्या रूम मध्ये तनुजा आली.. तिला पाहून मिताली च्या कपाळावर आठ्या पसरल्या....
तनुजा तिच्या बाजूला येऊन बसली , मिताली तिच्याकडेच पाहत होती...!!
तनुजा : i know मितु तू विचार करत अशील कि मी इथे का आली आहे.....
देईल तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल मी...
मिताली ला काही कळतच न्हवत ती नक्की बोलतेय तरी काय...???
तनुजा : मिताली... माझ अभि वर खूप प्रेम आहे ग.... जीव तुतोय माझा तुम्हाला दोघांना एकत्र बघून... मान्य आहे त्या दिवशी मी वेळेवर नाही आली.... त्यामुळे तुम्हाला दोघांचं लग्न झालं आणि माझ्यामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं......
आणि मी जे तुझ्याशी वागले त्या साठी पन मला माफ कर ग.... राग होता डोक्यात माझा तेव्हा आणि ते सगळं बघवत हू न्हवत मला....
म्हणून मनात जे आलं ते करत गेली....
मिताली : मग तुझं काय म्हणणं आहे मी काय कराव???
तनुजा : जेव्हा अभि चे आई बाबा येतील तेव्हा त्यांना नकार देऊन टाक..... म्हणजे अभि माझा तरी होईल आणि तसही तुला तुझं करियर करायचं आहे मग उगाच हे नातं जपण्यात काही अर्थच राहत नाहि.....
तू तू सरळ नकार दे ना मितु.....
तनुजा तिच्यासमोर रडून आणि खूप इमोशनल होऊन बोलत होती.....!!
मिताली : अग ताई तू रडू नको.... मी मी नकार देईलच आणि हो तू बरोबर बोलीस मला माझ्या करियर वरच फोकस केल पाहिजे... ह्या सगळ्यात पडून मला काहीच मिळणार नाही..... तू नको काळजी करुस मी नकारच देईल....
तनुजा : प्रॉमिस......
मिताली..: प्रॉमिस
.....
........
मितु ने डोळे उघडले तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं अर्थात ती रडत होती....
तिला कालचा दिवस आठवला जेव्हा अभि तिला कॉलेज बाहेर भेटला होता.......
क्रमशः
पुढच्या भागात पाहू अभि काय बोला होता...... आणि आता अभिमित च नातं कोणत्या वळणावर जाईल हे आता आपल्याला स्टोरी वाचूनच समजेल...