हि एका म्हतारीची आणि तिच्या तावडीत अडकलेल्या तरुणीची कथा आहे, थकलेल्या वाघ जसा नरभक्षक होतो तसच हि म्हातारी निघाली आहे एका तरुणीच्या शिकारीला, त्या दोघी मधला चालणार हा जीवघेणा मनाचा भुताटकी खेळ असणार आहे. चला बघू कोण जिंकत शिकार कि सावज ?
तुरुंगाचे दरवाजे उघडताच एक म्हतारी सूर्यप्रकाशात बाहेर पडली, चमक विरुद्ध डोळे मिचकावत. तिने ताज्या हवेत श्वास घेतला, आराम आणि भीती यांचे मिश्रण वाटत होते. तिचे केस विस्कटलेले होते. चेहरयावर बाहेर पडल्याचा आनंद होता. वय सत्तर च्या आसपास असेल.
सूर्याची उब असूनही, ती अनैच्छिकपणे थरथर कापत होती, तिला वाटत होते की कारागृहांमागील तिचा वेळ अजूनही तिला चिकटून आहे. तुरुंगाबाहेरील गर्दी बघत असताना तिचे हृदय धडधडत होते, तिला अभिवादन करायला घरी घेऊन जायला कोणी नव्हतं. तिची चेहरा पट्टी वरून असं वाटत हि नव्हतं कि ती कोणाची अपेक्षा करत आहे, कोणाची वाट बघत आहे.
"आयला कशाला बाहेर आली र हि.." जवळचा गार्ड म्हणाला
"मधी राहिली असती तर अजून चार दिवस जास्त जंगली असती" तोच गार्ड परत दुसऱ्या गार्ड ला म्हणाला
दुसरा गार्ड काही ना म्हणता ऐकत होता. परत तो गार्ड त्या म्हतारीच्या जवळ गेला
"अयं.. आजी रिक्षा दिवू का आणून , रिक्षा माहित आहे ना काय असते ?", असं म्हणून तो हसू लागला.
म्हतारीच त्याच्या बोलण्या कढे लक्षच नव्हतं.
"हे घ्या.." म्हणत त्याने पन्नासची नोट तिला द्याल खिशातून काढली.
म्हतारी ने त्याच्या पैशा कढे हि न बघता पुढे पावला उचली. हातात एक गठुडं घेऊन ती पुढे निघाली, नवीन जग, नवीन माणसं कशाचा काहीतील आतापत्ता नव्हता. तरी अंगात जोर असल्यागत ती पुढं निघाली..
तसं तो गार्ड परत पहिल्या गार्ड जवळ आला.
"हिला बाहेर काढायचं काम नव्हतं ..." एवढा वेळ शांत बसलेला गार्ड म्हणाला.
हलकस हसत दुसरा गार्ड बोलला. "का र?.."
"तू ला माहित च नाही कसली खतरनाक बया आहे हि ते, माझ्या बापानं सांगितलं होत हिच्या बद्दल .., आता म्हतारी झाली आहे पण जोर काही कमी नाही झाला हीच" गार्ड तिच्या पाठमोऱ्या आकृती काढे बघत होता.
रात्रीचे ७:३० वाजले आहेत. मिनलच नुकतंच ऑफिस मधलं काम संपलं आहे. तिने डेस्कच्यावर मान काढून डोकावून आजू बाजूला पहिले. अजून तिघेजण तिच्या सोबत ओव्हरटाईम करताना दिसले. तिने मान वाकडी करून मोडली. टाइप करून दुखणारी बोटे तिने हात लांब करून मोडली व डोळ्याचा चष्मा काढून डोळे चोळले व कॉम्पुटर तिने बंद केला. व फोने उचलून ती ऑफिस मधील केबिन कडे निघाली. समोर केबिन वर विशाल साठे असे नाव होते.
केबिनच दार न वाजवता ती थेट आत गेली. आत विशाल कॉम्पुटर वर काम करत होता.
"निघायचं?" मीनल
"मोजून दहा मिनिटे थांब. झालच आहे" विशाल
"लवकर बरं मला जाम भूक लागली आहे" मीनल
"होय" विशाल
मीनल बाहेर आली. व ती वॉशरूम मध्ये गेली. तिने डोळे धुतले. व बाहेर बाल्कनीत येऊन ती थांबली. बाहेर मस्त गार वारं लागत होत. समोर हायवे होता त्यावर जास्त गर्दी नव्हतीच पण अधून मधून भर्रकन जाणाऱ्या गाड्यांचे आवाज तेवढे येत होते. थोडावेळ तेथेच थांबल्यानंतर तिला विशालची हाक ऐकू आली.
"मिनल" तिने मागे वळून बघितले. त्याने निघण्याचा इशारा केला.
ती आत आली व डेस्क वरची बॅग तिने उचलली व दोघे खाली निघाले.
"काय खायचं आज ?" मीनल
“बघू काही तर खाता येईल” विशाल
"मी तर पोट भरून खाणार आहे. घरी गेल्या गेल्या झोपणार. शनिवार रविवार तसं ही सुट्टी आहे .." मीनल
दोघंही बोलत बोलत पार्किंग लॉट मध्ये आले. गाडी काढून ते मुख्य रस्त्याला लागले. मीनल गाडी चालवत होती. विशाल त्याच्या ऑगस्ट मध्ये फिरायला जायच्या प्लॅन बद्दल बोलत होता. त्याच बाहेर एका पंजाबी हॉटेल कडे लक्ष गेले.
"हे बघ इथे जेवायचं का?"
मीनलने स्पीड कमी करून गाडी कडेला घेतली.
"मी सुप्रियाला या हॉटेल ची तारीफ करताना ऐकलं होत " विशाल
मीनलने वाकून हॉटेल बघितले
"गर्दी पण नाही. शांत वातावरण पण आहे. "
मीनल ने एका कडेला गाडी लावली.
दोघे आता आले. बसल्यावर वेटरने मेन्यू कार्ड दिले.
विशाल ने दोघांसाठी ऑरडर दिली.
वेटर ऑर्डर घेऊन निघाला होताच. कि त्याला काही तरी आठवले. व त्याने परत हाक मारून त्याला बोलावले
"आणि चार प्लेट पावभाजी पार्सल हवी आहेत". ऑर्डर घेऊन वेटर परत निघून गेला.
"चार पावभाजी कोणाला घेत आहेस पार्सल ..." मीनल
"अगं त्याच झाला काय ? सकाळी मी त्या उड्डाण पुलाजवळ थांबलो होतो. तिथं एक भिकारीण तिच्या पोराला शांत बसावे म्हणून रागावत होती. आणि ते पोर रडायचं काही थांबवत नव्हतं.. आपल सहज मी विचारलं तर कळलं कि त्या छोट्याचा बर्थडे आहे. पोरग केक चा हट्ट करत होत. म्हणून त्या म्हण्टलं केक देण्यापेक्षा त्यांना थोडं खायला घेऊन जातो. "
तेवढ्यात वेटर ने जेवण आणले.
८:३० पर्यंत दोघांचं जेवण झाल्यावर मीनल व विशाल घरी जायला निघाले.
अगदी १५ मिनिटे मध्ये ते उड्डाण पुलाजवळ आले. पुलाखाली झोपलेली ती सकाळची भिकारीण गाडीचा आवाज एकूण जागी झाली.. व कोण आहे त्याचा अंदाज घेऊ लागले. गाडी लावून विशाल व मीनल पार्सल घेऊन पुला खाली त्यांच्या जवळ येऊ लागले. विशालला बघून तिने लेकराला उठवले.
"ये उठ .."
"ये संजू उठ ते बघ ते सकाळचे दादा आलेत. "
तीच पोरग तसच झोपेतून उठून डोळे चोळत बघू लागलं. विशाल व मीनल ने पार्सल ची पिशवी त्यांना दिली. विशाल खाली बसून त्या संजू सोबत बोलत होता. त्याने आणलेले पुस्तक त्याला देत तो त्याच्याशी बोलत होता.
"हे बघ संजू . असं हट्ट करायचा नाही .. अभ्यास करायचं मोठं व्हायचं ..."
मीनल ते जवळ थांबून बघत होती. तेवढ्यात तिची नजर पुढे गेली.थोडं पुढं पूल जिथं संपत होता तिथं पुलाखाली पत्र्याचा आडोसा घेऊन कोणीतरी झोपलेल तिला दिसल. पत्र्यामाग पूर्ण शरीर झाकलं गेल होता बाहेर फक्त पाय दिसत होते.
"ताई तिथं कोणी झोपलय का?" मीनल
"व्हयं. दुपारच्याला एक म्हतारी आली आहे. तेव्हा पासून झोपली आहे. मी गेले मघा बोलायला तर माझ्यावरच वसकली. बघा तुम्हीच द्या तिला खायला, म्हणत तिने दोन पाव व थोडी भाजी प्लेटवर काढून मिनलच्या हातात दिली.
"विशाल मी आलेच त्या आजींना देऊन येते." म्हणत मीनल ने पत्र्याकढे इशारा केला.
विशाल ने एकदा तिकडे बघीतले. व "बरं " म्हण्टलं
मीनल त्या पत्र्याच्या आत गेली. ती म्हातारी सिमेंट चा पत्र्याचा आडोसा घेऊन तोंडावर फाटकी शाल पांघुरून झोपली होती. मीनल ने लांबूनच आवाज दिला.
"आजी" एकाच हाकेत तिने डोळे उघडेल पण तोंड शालेत असल्यामुळे मीनल ला ते जाणवले नाही. म्हतारी तोंडावर असलेल्या फाटक्या शालीच्या एका बारक्या छिद्रातून तिला बघत होती .
त्या उठत नाही म्हणून मीनल ने पुन्हा आवाज दिला. "आजी "
म्हतारी ने शाल बाजूला केली. व उठून बसली.
"तिचे केस पूर्णपने विस्कळलेले होते. सुरकुत्यांनी भरलेलं चेहरा भंकस होता थकलेला होता.
"तुम्हाला भूक लागली असेल. हे घ्या थोडं खाऊन घ्या. म्हणून मीनल ने उभ्या उभ्याच थोडं वाकून प्लेट त्यांना हातात द्याच्या हिशोबाने पुढे केली.
ती म्हतारी अजून पण मीनलला न्याहाळत होती. ती एकटक मीनलला बघत होती. तीच लक्ष प्लेट काढे नव्हतंच तीच पूर्ण लक्ष मीनल काढे होत.
ती प्लेट घेत नाही म्हणून मीनलने खाली बसून त्याच्या हातत द्याच ठरवलं. व ती खाली बसली. तिला लक्षात आली ती म्हतारी तिच्या वरून नजर हटवत नाहीये . आता मात्र तिला अवघडल्यासारखा वाट होत. तिला तीच तास बघणं आता नकोस वाट होता.
"हे बघा यात पाव भाजी आहे. भूक लागली असेल तर खाऊन घ्या म्हणत मीनल ने ते त्यांच्या पुढ्यात पार्सल ठेवल व हात मागे घेणार इतक्यात त्या म्हतारीने करकचून तीच हात धरला व खरडत ती पुढं सरकली. एका झटक्यात ला मीनल च्या हृदयाचे ठोके वाढेल होते. म्हतारीच अस हात धरण तिच्यासाठी अनअपेक्षित होतं. तिला काहीच सुचत नव्हतं तिने म्हतारी कढे बघितल. तिला जाणवलं तिची पकड खूपच घट्ट आहे.
ती म्हतारी तिला बघतच होती. तिची पकड आता घट्ट होत चालली होती.
"आजी हात.." मीनल कळवळून म्हणाली
"मीनल ." अचानक मागून विशालने आवाज दिला. विशाल तिथे मागे लांब होता. सिमेंट च्या विटा मागे मीनल व ती म्हतारी होते. त्याला
लक्षात नवहत आलं कि त्या म्हतारी ने मीनल चा हात धरला आहे. विशालला बघताच त्या म्हतारी ने तिचा हात सोडला. मीनल उठून विशाल जवळ आली . तिचा घाबरलेला चेहरा बाघून विशाल ने विचारले.
"काय झालं " विशाल
तिला सुचत चा नव्हतं काय सांगावं म्हणून तिने " काही नाही" म्हण्टले व ती गाडी कढे निघाली.
विशाल ने एकदा त्या म्हतारी कढे बघतील. व तो हि मीनल च्या मागे मागे गाडी कढे गेला.
आता ते पुढं निघून आले होते.
..........................................................
कोण आहे ती म्हातारी ? एवढे दिवस तुरुंगात का होती ? आणि ती मीनल ला असं का बघत होती?, मिनलच्या नशिबात पुढं काय वाटून ठेवलं आहे? यासाठी पुढील भाग नक्की वाचा