Ankilesh - 38 - Last Part in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 38 - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 38 - अंतिम भाग

३८

@ अंकिता

इतक्या वर्षांनी ही सारी कथा आठवताना परत तरूण झाल्यासारखं वाटतं. तरूण म्हणजे त्या काॅलेजच्या दिवसांसारखं. अगदी यंग ॲट हार्ट! केअरफ्री आणि आॅलवेज लुकिंग फाॅर्वर्ड टू समथिंग. डोळ्यांत सदा स्वप्नं. करियरची नि आयुष्याची. त्यात एका मुलीच्या स्वप्नात येणार तो राजकुमार! मी तशी स्वप्नं विशेष पाहिली नाहीत. कारण घोड्यावरून कुणी राजकुमार येतो यावर माझा विश्वास नव्हताच. आणि आजकाल घोड्यावर कोण बसतं नाहीतरी! पण अखिलेशला पाहून माझ्यात काहीतरी झालं असावं. आय न्यू ही इज द वन चोझन फाॅर मी. तोच एक होता ज्यासाठी मी ते शेकिंग स्टीव्हन्सचे 'यू ड्राइव्ह मी क्रेझी' म्हणू शकत होते.. ॲज इफ आय स्टार्ट फ्लोटिंग इन द पॅराडाईज.. मग पुढे सारी लव्ह स्टोरी घडत गेली.. थोडीफार मी घडवून आणली. पण टू टेल द ट्रूथ इट वाॅज अ बाय लॅटरल वन. म्हणजे अखिलेशला ही तेच हवं होतं..

आता अखिलेश इज आॅलवेज बिझी कारण तो आणि त्याचं सर्जिकल डिपार्टमेंट आर हिज फर्स्ट लव्ह. एनी वे, मी हे अगदी लहानपणापासून घरी पाहात आलेय. पपा युज्ड टू बी लाइक धिस. काही झालं की इमर्जन्सीसाठी कुठल्या ना कुठल्या हाॅस्पिटलात. ममी तशी नाॅन इमर्जन्सी डिपार्टमेंट मधली म्हणून ठीक होतं. आमचं हे तसंच काहीतरी झालंय. मी तसा वेळ मिळावा म्हणूनच ही फार्म्याकाॅलाॅजी ब्रांच चूझ केलेली. ते बरंच आहे, नाहीतर मुलांकडे बघणार कोण? द लाइफ इज गोइंग आॅन. मुलगी मोठी झालीय. पुढे मागे शी विल हॅव हर ओन स्टोरी टू टेल. तोवर आपली ती स्टोरी नि ते गोल्डन डेज आठवत रहायचे आणि एंजाॅय द नाॅस्टॅल्जिया इटसेल्फ!

तशी मी लहानपणापासूनच स्मार्ट! ओरेशन म्हणजे अंकिता! मला पहिलं प्राइझ ठरलेलं. पण मराथीत असं काही करेन मी असं वाटलं नव्हतं मला. त्या दिवशी जीएस मेडिकल काॅलेजच्या ॲन्युअल प्रोग्रमला मी गेलेले.. आमचा मोठा ग्रुप होता. प्रत्येकाला असतो तसा आपल्या काॅलेजचा आम्हाला अभिमान होता. हू आर वुई.. नायराइट्स म्हणून आम्ही मध्ये मध्ये ओरडत होतो. त्या मराठी वन ॲक्ट प्रोग्रामची अनाऊन्समेंट झालेली. सगळे मागे लागले, अंकिता यू मस्ट.. यू विल क्रॅक इट.. मी म्हणालेले, आय डोन्ट माइंड, पण मला इतकं मराथी येत नाही की डायरेक्ट वन ॲक्ट करू. मग कुठून कोणास ठाऊक पाठून कैलास आला. तेव्हा अर्थात मी ओळखत नव्हते त्याला. हातात ती 'इंग्रजीने केला मराथी भ्रतार' ची स्क्रिप्ट! म्हणालेला, धिस विल सूट यू! खरंच होतं ते. एक सदा इंग्रजीत बोलणारी मुलगी नि एक अस्सल मराठी मुलगा. दोघांची कहाणी, ती नॅरेट करतेय. त्यात कितीतरी इंग्रजी वर्डस होते. काही वाक्येच्या वाक्ये इंग्रजीत होती. थोडक्यात अगदी माझ्यासाठी ॲप्ट होती स्क्रिप्ट. आॅब्व्हियसली आय वन. मग रेस्ट इज द हिस्टरी! आय टेल यू, ती स्क्रिप्ट अखिलेशनीच लिहिलेली हे मला त्यानेच खूप नंतर सांगितले. ही हॅड गाॅट दॅट स्क्रिप्ट विथ हिम. मला पाहून त्याला वाटलेले, हू बेटर दॅम मी टू एनॅक्ट दॅट! त्यामुळे ती कैलासकडून माझ्याकडे स्पेशियली पाठवलेली. आमची प्रेमकथा माझ्याकडून सुरू झाली असं तो सांगत असला तरी फॅक्ट्स आर अदरवाईज! नाहीतर अपोझिट काॅलेजातल्या कुणाला अखिलेशनी अशी मदत का करावी? मी एकदा तसं म्हणालेही तर म्हणाला,"ते वयच वेडं असतं. इट वाॅज द लव्ह ॲट फर्स्ट साइट. पण आय हॅड टू बी केअरफुल विथ द माॅडेस्ट बॅकग्राउंड." आणि आज म्हणतो, तेव्हाच केलं असतं कंट्रोल तर आज तू गळ्यात नसती पडलेली! गळ्यात पडली! आणि हाऊ!

आमचं दोघांचं पोस्ट ग्रॅज्युएशन संपलं. ही गाॅट द लेक्चरर्स पोस्ट. मग क्वार्टर्स इन द कँपस. आमचा राहण्याचा प्रश्न सुटला. अवर मॅरेज वाॅज ॲब्सोल्यूटली लो की. अखिलेशचाच अशा लॅव्हिश मॅरेजरसवर विश्वास नाही. तो म्हणतो, धूमधडाक्यात लग्न केल्याने कोणाचं मॅरीड लाईफ हॅपी झालंय असं नाही. आणि गर्ल्स साइड इज मेड टू स्पेंड सो मच.. त्यामुळेच मुलगी जन्माला आली की पीपल आर नाॅट हॅपी म्हणतो तो. खरंय ते, इमॅजिन डावरी, वेडिंग.. आणि एखाद्याला दोन तीन मुली असतील तर तो अगदी बँकरप्ट होऊन जाईल. अखिलेश वाॅज व्हेरी क्लियर. फक्त एकदा पपांना म्हणालेला, तुम्हाला अंकिताच्या कोडामुळे मी असं रजिस्टर मॅरेज करायला सांगतोय असं वाटत असेल तरच वुई विल हॅव अ बिग फंक्शन! अदरवाईज हर व्हिटिलिगो इज अ पार्ट आॅफ अवर लाईफ, विथ नो काॅन्सिक्वेन्सेस! अखिलेश इज व्हेरी क्लियर अबाऊट आॅल धिस. बिग फॅट इंडियन वेडिंग म्हणजे मुलींच्या जन्मापासून तिच्या पेरेंटसना टेन्शन. एक्सेप्ट फाॅर द मॅरेज इंडस्ट्री नो वन बेनिफिट्स बाय धिस! फक्त इकाॅनाॅमीला हातभार आणि काही जणांसाठी एम्प्लाॅयमेंट जनरेशन!

त्या 'इंग्रजीने केला मराथी भ्रतारची स्टोरी' तशी छान होती. एक काॅन्व्हेंट एज्युकेटेड ख्रिश्चन मुलगी. एका गावातल्या मुलाच्या प्रेमात वेडी होते. तो शुद्ध शाकाहारी. मराथी बोलणारा. त्र्यंबकेश्वरातला. पुजाऱ्यांच्या घरातला. हिचं इंग्रजी विथ ॲन ॲक्सेंट. त्यात ती ॲनाबेल शुद्ध मांसाहारी! जोडी तर जमते. रीतसर अगदी. मग उडते ती दोघांची तारांबळ! अखिलेश हॅड रिटन इट वेल. म्हणजे वन ॲक्ट साठी इट हॅड आॅल द एलिमेंट्स. ड्रामा, काॅमेडी अँड सरप्राइज ट्विस्ट. सगळे काही. इन जस्ट टेन मिनिटस.. मी नंतर अख्खिला म्हणालेही,"तू मला ते स्क्रिप्ट का पाठवलंस?" तर म्हणाला,"आय हर्ड युवर चिटर चॅटर. आणि सगळे म्हणत होते, यू कॅन विन. तर धिस वन विल डेफिनेटली बी फाॅर यू. इन्सिडेंटली इट हॅड लाॅट आॅफ इंग्लिश वर्डस!" थोडक्यात काय, होणारे टळत नाही. कैलास म्हणतो, 'भगवान को जिसको गले में बाँधना है वह गला अपने आप तुम्हारे सामने आ ही जाता है. फिर सिच्युएशन्स प्रोव्हाइड्स द डोरी फाॅर टाइंग यू! मग ती प्यार की डोर हो या फांसी का फंदा!'

तर ही अशी इंग्रजीने केला मराठी भ्रतार ने सुरू झालेली कहाणी.. माझ्यासारख्या अँग्लिसाइझ्ड मुलीने मराठमोठ्या मुलाशी लग्न करून कंप्लीट झाली. फेअरी टेल्स 'अँड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर' वर संपतात. खरीखुरी प्रेमकथा तशीच तिथे संपते म्हणता येत नाही. फेअरी टेल्स हॅव टु बी फेअर अँड एंड समटाइम आॅन अ हॅपी नोट. आमची प्रेमकथा तशी अजून सुरूच आहे. त्यातला नव्याच्या नवलाईचा भाग संपला असला तरी. पण तो संपायचाच होता कधी ना कधी. नाहीतर त्याला नवलाई कसं म्हटलं असतं? आता प्रेम म्हणजे रोमॅंटिक असण्यापेक्षा काळजी घेणे नि काळजी करणे अधिक झालंय. त्याला इलाज नाही.

पण आमची ही यशस्वी म्हणावी अशी लव्ह स्टोरी जुळली. अजून वुई आर गोइंग स्ट्राँग! अशी कित्येक मॅरेजेस जुळतात. डिफरन्ट बॅकग्राउंडच नाही तर डिफरंट कल्चर, भाषा, रिलिजन, कंट्रीज वगैरे. बाकी डिफरन्सेस कितीही असले तरी या सर्वांत काॅमन एकच गोष्ट, प्रेम. इट्स द लव्ह व्हिच ड्राइव्हस द वर्ल्ड. नाहीतर हे जग आजवर संपून गेलं असतं.

आमचंही हे असं जग आहे. अंकिता अखिलेशचं जग. आजच्या भाषेत 'अंकिलेश'चे जग! इट स्टार्टेड अराउंड ट्वेंटी फाइव्ह इयर्स अगो. ते जग आम्हा दोघांभोवती फिरत होतं आणि अजूनही तसंच फिरतंय.. वुई वेअर हॅपी देन..हॅपियर नाऊ.. ती लव्ह स्टोरी कन्सिव्ह झाली, प्रेमाच्या खतपाण्याने फुलली.. इट ब्लूम्ड. आणि इज स्टिल ब्लुमिंग!

आज विचार करत मागे पाहते तेव्हा कार्पेंटरच्या जुन्या गाण्यातले हेच शब्द आपोआप ओठांवर येतात..

आॅन द डे दॅट यू वेअर बाॅर्न द ॲंजल्स गाॅट टुगेदर

अँड डिसायडेड टू क्रिएट अ ड्रीम कम ट्रू..

तर सांगायचं ते एकच, सारं जग प्रेमावर चालतं आणि प्रेमावरच चालत राहिल.. जीव तोडून कोणावर जीव लावा.. प्रेम द्या नि घेत रहा.. तिथे जात धर्म पंथ भाषा वगैरे आड येऊ नये. मग कुणी इंग्रजी असो की अजून काही नि मग तो भ्रतारही कोणत्याही भाषेचा का असेना!

अंकिलेश ची ही प्रेमकथा.. जगात जोड्या जमत राहतात.. पीपल रिमेन कमिटेड.. आपल्यापुरता आपला स्वर्ग उभा करतात.. दे लिव्हड् हॅपीली एव्हर आफ्टर हा फेअरी टेलचा शेवट असेलही पण प्रत्यक्षात आयुष्याची ती सुरूवात असायला हवी. जीव जडवा, जीव तोडून झोकून देऊन प्रेम करा.. आजच्या भाषेत सांगायचं तर वुई लिव्ह ओन्ली वन्स.. सो मेक द मोस्ट आॅफ इट आणि मेक द लाईफ ब्युटिफुल..

लव्ह कॅन टच अस वन टाइम

अँड लास्ट फाॅर अ लाइफटाइम

अँड नेव्हर लेट गो टिल वुई आर गाॅन

लव्ह वाॅज व्हेन आय लव्हड् यू

वन ट्रू टाइम आय वुड होल्ड टू

इन माय लाइफ, वुई विल आॅल्वेज गो आॅन..

#############