Cyber Suraksha - 1 in Marathi Anything by क्षितिजा जाधव books and stories PDF | सायबर सुरक्षा - भाग 1

Featured Books
Categories
Share

सायबर सुरक्षा - भाग 1


अनुराधा कदम, गातेगाव मधील जिल्हा परिषद शाळेत गेली ८ वर्ष शिक्षिका म्हणून रुजू आहेत. तो त्यांच्या साठी नवा दिवस नव्हता. २:३० ते ३:३० च्या ऑफ तासात चौथीचे गणिताचे पेपर तपासात स्टाफ रूम मध्ये त्या बसल्या होत्या. तेवढ्यात त्याचा स्मार्टफोन व्हायब्रेट झाला 'झझ्झ झझ्झ'. त्याना एक एस एम एस आला होता बँके कढून, त्यात असा लिहलं होता कि त्यांच के वाय सी न केल्यामुळे त्यांचे अकाउंट बंद ब्लॉक केले जाईल. खालील लिंक वरती क्लिक करून तुमचा पॅन कार्ड नंबर उपडेट करा. आणि खाली एक लिंक दिली होती. दुसरा तिसरा काही विचार न करता कदम मॅडम नि पर्स मधून पॅन कार्ड काढले व लिंक वर क्लिक केले व आलेल्या फॉर्म मध्ये पॅन कार्ड चा नंबर अकाउंट नंबर आणि अजून नाव , मोबाइल नंबर अशी माहिती टाकल्यानंतर वेरिफिकेशन साठी आलेला ओ टी पी भरून तो फॉर्म सबमिट केला. त्यांच्या हिशोबाने त्यांनी तर सर्व व्यवस्थित केले होते. आता अकाउंट बंद होऊ नये म्हणून एवढे तर करावेच लागेल, नाहीतर परत बँकेत चकरा कोण मारणार. पण त्याना हे माहित नव्हते के त्या लिंक वर क्लिक केल्याचं क्षणी त्या सायबर गुन्हेगारीच्या बळी झाल्या होत्या. मग काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले कि त्यांच्या खात्यातून सर्व पैसे संपले आहेत. मग पुढं काय ? , त्यांना झालाय काय आणि पुढे करायचं काय हेच कळत नव्हते. हॅकर्स नि फिशिंग नावाची युक्ती वापरली आणि कदम मॅडम कढून बँकेची माहिती - अकाउंट नंबर वगैरे घेतला आणि पैसे ट्रान्सफर करून घेतले. फक्त एका क्लिक मध्ये त्याची पूर्ण जमा पुंजी गायब झाली.

तुम्ही सांगा तुम्ही महिन्या अखेरीस बँकेत गेलात आणि तुम्हाला कळले कि तुमच्या अकाउंट मध्ये पैसेच नाहीत. तुम्हाला तुमच्या मोबाइलला वर पैसे ट्रान्सफर केल्याचा बँके कढून मेसेज आला जे कि तुम्ही केलेच नाही. पुढं काय करायचं. पैसे मिळणार कि गेले ते गेलेच.

फिशिंग हि तर फक्त एक गुन्हेगारीची पद्धत आहे. हॅकर्स म्हणा वा सायबर गुन्हेगार नवीन नवीन पद्धती वापरून तुम्हाला फसवायला बघत आहेत. मोबाईल हा अपल्या जीवनाचा भाग झाला आहे. ५ वर्षा च्या पोरापासून ते साठीं तील सर्वांच्या हातात मोबाइल हा आला आहे. हुळहुळ का होईना आपण मोबाईल कसा वापरायचा ते शिकलो आहोत, पण मोबाइलला काळजी पूर्वक कसा वापरायचा हे आपण नाही शिकलो, मोबाइल वापरतना कोणत्या गोष्टी पासून सुरक्षित राहायचे आपल्या परिवाराला सायबर गुन्हेगारी पासून कसे वाचवाचे ते आपल्या हातात असलेलं साधन आपण किती काळजी ने वापरतो त्या वरती अवलंबून आहे.

जसा जसा टेकनॉलॉजि चा वापर वाढत आहे, तस तस नवीन नवीन गुन्हेगारी पद्धती वाढत आहेत. सायबर हल्ल्याचे परिणाम हे फक्त आर्थिक नुकसानाचेच नाहीत तर मानसिक आणि शारिरीक हि आहेत. आणि आता तर जागतिक पातळीवर सायबर वॉर देखील होत आहेत.

शेवटी, सायबर सुरक्षा ही एक गंभीर समस्या आहे जी आपल्या सर्वांना एकत्र येऊन सोडवायला हवी. इंटरनेटमुळे अनेक फायदे मिळत आहेत, परंतु यामुळे नवीन जोखीम आणि आव्हाने देखील निर्माण झाली आहेत ज्यांची तुम्हाला जाणीव असणे आणि त्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे. स्वतःचे आणि आपल्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, जसे की मजबूत पासवर्ड वापरने ऑनलाइन काय शेअर करतो याबद्दल सावधगिरी बाळगणे आणि विश्वसनीय सुरक्षा सॉफ्टवेअर वापरून आपण सायबर धोक्यांपासून असुरक्षा कमी करू शकतो.

मोबाइल काळजी ने वापराने म्हणजे काय?, सायबर सुरक्षा म्हणजे काय?, नवीन सायबर गुन्हेगारी चे प्रकार काय?,कस ओळखायच जर आपण सायबर गुन्हेगारीचे बळी झालो आहोत का?, त्या नंतर काय काय करायचे? अशा बारीक सारीक गोष्टी माहित असणे खूप महत्वाचे आहे. कारण सायबर सुरक्षा आणि जागरूकता या वरती आपले भविष्य अवलंबुन आहे.