The Author लेखक सुमित हजारे Follow Current Read लग्नाची बोलणी (भाग 4) By लेखक सुमित हजारे Marathi Short Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books तेरी मेरी यारी - 10 (10)मीडिया में करन के किडनैपिंग की खबर फैल जाने से किड... सामने वाले की पहचान आज के युग मैं जरूरी हैँ सामने वाले की पहचान उसकी भाषा मैं बो... नागेंद्र - भाग 7 गायत्री जी से हमें पता चलता है कि किस तरह से वर्धा ने उसकी प... डेविल सीईओ की स्वीटहार्ट भाग - 75 अब आगे,अपने बड़े पोते राजवीर की बात सुन कर कि वो कुछ दिन बाद... मंजिले - भाग 2 ( मोक्ष ) " ------ आप को भगवान समझना... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by लेखक सुमित हजारे in Marathi Short Stories Total Episodes : 4 Share लग्नाची बोलणी (भाग 4) (1) 3.2k 8.9k हो हो माझा होकार आहे. तू निश्चिंत उद्या सकाळी पुण्याला जा आबा म्हणाले. त्यावर विश्वनाथ म्हणाला ठीक आहे. माई आणि आबा मी आत्ताच माझ्या खोलीमध्ये जाऊन बॅग पॅक करतो.सकाळी मला लवकर निघायला लागेल सहा वाजताची एक्सप्रेस आहे माझी. ठीक आहे. पण मी काय म्हणते विश्वनाथ तूझ एक्सप्रेसच ठरलं कधी? अग माई झाल असं की आपण ज्या वेळी चर्चा करत होतो त्याचवेळी रमाने कधी धनंजय ला सांगून माझं टिकिट बूक केल मलाच माहीत नाही. हा पण नंतर रमाने मला सांगितलं दादा मी धनंजय दादा ला सांगून तुझ पुण्याचं टिकिट बूक केल आहे. मी म्हणालो बरं झालं मला तितकाच दिलासा मिळाला नाही तर माझी किती घाई गडबड झाली असती. ठीक आहे तू जा तुझ्या खोलीत बॅग पॅक कर आणि लवकर झोपी जा घड्याळाला अलार्म लावून ठेव म्हणजे सकाळी उठायला उशीर होणार नाही लवकर उठून पटापट आवरून देवाला नमस्कार करून निघ. त्यावर विश्वनाथ म्हणतो चालेल माई आता मी माझ्या खोलीत जातो तुम्ही पण तुमच्या खोलीत जाऊन झोपा रात्र फार झाली आहे. हो हो आम्ही ही जातो चला हो उशीर झाला आहे फार, रात्रीचे साडे बारा वाजले आहेत आपल्याला आता खोलीत जाऊन झोपले पहिजे सकाळी लवकर उठायचं पण आहे ना. त्याच्यावर आबा म्हणाले हो हो चला आपण आपल्या खोलीत जाऊन झोपू. हा पण झोपण्याआधीच्या तुमच्या गोळ्या घ्या आठवणीने विसरू नका हा. हो ग माई किती काळजी करशील माझी तू घेतो मी आठवणीने गोळ्या तू आपल्या खोलीत जाऊन झोप बरं तस नाही हो तू आता काही ही एक शब्द बोलू नकोस. बरं ठीक आहे मी जाते आपल्या खोलीत तुम्ही लवकर या हं .हो हो मी येतो लगेच गोळ्या घेऊन तू जा बरं खोलीत आणि माई आपल्या खोलीत निघून जाते थोड्या वेळा नंतर आबा ही झोपण्यासाठी खोलीत निघून जातात. तिथे रमा आपल्या खोलीत लग्नाची स्वप्न रंगवत असते ती खूपच खुश असते उद्याच्या दिवसाची वाट पाहत असते त्या आनंदात तिला झोपच येत नाही काय करावं काहीच तिला समजत नाही. दादा कधीचा एकदा पूणे ला जाऊन येतो अस तिला झालं होतं आणि अखेर तो दिवस उजेडतोच विश्वनाथ पूणे ला जाण्याची तयारी करतो सकाळी सकाळी त्यांची खूपच घाई गडबड होते कारण अलार्म लाऊन ही उठायला जरा उशीरच होतो त्यामुळे सकाळची फार धावपळ होते कसं बस आवरून देवाला नमस्कार करून विश्वनाथ घरातून पूणे ला जाण्यासाठी निघतो निघताना तो रमेला आवाज देतो अग रमा ऐकलस का मी काय म्हणतो स्टेशनला जाण्यासाठी टॅक्सी बूक केली आहे का? हो दादा तू काळजी करू नकोस मी टॅक्सी बूक केली आहे. ती दहा मिनिटांत येईल ठीक आहे. आणि बॅग घेतली आहेस ना बरोबर तू अग हो बॅग घेतली आहे मी,. मग कुठे आहे तुझी बॅग? ही काय माझ्या पायाजवळ आहे. दिसत तर नाही आहे बॅग कुठे? अरेच्या मला वाटत निघण्याचा घाई गडबडीत बॅग आताच्या खोलीत विसरलो वाटत जा रमा बॅग घेऊन ये माझी. तुझ दादा हे नेहमीच आहे बाहेर जाण्याच्या वेळी तू काय ना काय विसरतोच बरं बाबा मला माफ कर आणि जा आता बडबड करू नकोस बॅग घेऊन ये माझी मला निघण्यास उशीर होतो आहे. आणि रमा बॅग घेण्यासाठी खोलीत जाते तो पर्यंत टॅक्सी ही दारात येते. आणि विश्वनाथ टॅक्सी मध्ये बसतो तेवढ्यात रमा त्याची बॅग ही घेऊन येते विश्वनाथ हाता मधली बॅग घेऊन.....क्रमशः ‹ Previous Chapterलग्नाची बोलणी (भाग 3) Download Our App