Kaay Nate Aaple? - 9 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | काय नाते आपले? - 9

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

काय नाते आपले? - 9

मिताली ने दरवाज्या बाजूची बेल वाजवली... तस थोड्यावेळ्यात अभिजित ने दरवाजा ओपन केला......

मिताली आत येणार तोच अभिजित ने तिला दारातच थांबवलं आणि तीच सामान तिच्या समोर घराबाहेर फेकुन दिल....

अभिजित : जा तु मुक्त आहेस आता...... तुला आजपासून या घरात राहायची मुळीच गरज नाही.... आणि मुद्दाम घरा बाहेर पडून बॉयफ्रेंड ला भेटायची तर मुळीच गरज नाही.... आता तु आझाद आहेस या पिंजऱ्यातून या बंधनातून......

आणि हो हे मंगळसूत्र पन घालायची गरज नाही असं म्हणत त्याने ते जोरात तिच्या गळ्यातून खेचून घेतलं इतकं कि ते पार तुटूनच गेलं......

मिताली तशीच गळ्याला हात लावून बसली......

आई बाबा पन काही यावेळेस अभि ला बोलस्ट न्हवते ती कितीही चुकत असली तरी ते बाजू घ्यायचे... पन यावेळेस कोणी पुढे नाही आलं........

" आई बाबा मी केल काय नक्की?? पन " मिताली....

" हे तु आम्हाला विचारूच नकोस.... तु या घरात थांबायच नाही इतकंच.... " अभि.. असं म्हणत त्याने हात धरून तिला घराबाहेर काढले ते पन तिच्या सामाना सकट..........


आणि पटकन दरवाजा लावून घेतला..... सगळं इतकं पटकन झाल कि मिताली तशीच दरवाजा समोर उभी होती....तिची नजर फेकलेल्या सामनावर गेली , सगळं काही इकडे तिकडे पसरल होत....

आता डोळे पुन्हा काटोकाट भरले होते , ती तशीच खालती बसली आणि सगळं उचलू लागली....

वरचा फ्लोर पूर्ण अभिजित च्याच घराचा होता त्यामुळे आजूबाजूला कोणी राहायचा प्रश्न च येत न्हवता...!! मिताली ने खालती पाहिलं तर काही काळे मनी इकडे तिकडे पडले होते........

तिने एकदा गळ्याला हात लावला आणी ते खालती पडलेले मनी उचलून स्वतः जवळ ठेवले.......

आणि सगळं सामान घेत ती निघाली...............!!

कुठे ते तिला पन न्हवत माहीत..... मनात इतकं नक्की होत कि या घराच्या पायऱ्या पुन्हा चढायच्या नाहीत.........

खूप सहन केल , पन या पुढे नाहि..........!!



.....
........


अभि ने दार बंद केल आणि आपल्या रूम मध्ये तसंच निघून गेला....

आई आणि बाबा त्याला पाहतच राहिले...!! त्यांना पन मिताली च वागण पटलं न्हवत पन????

असो........


अभि रूम मध्ये आला सोबत बिअर च्या दोन तीन बाटल्या होत्या....तशीच ती बॉटल त्याने तोंडाला लावली आणि पियायला सुरुवात केली.....!!

काय माहीत नाही का पण त्याला मिताली ला राहुल सोबत पाहून वेगळच फील झालं.....

त्याची बॉटल संपत आली पन डोक्यातले विचार नाही....!! तो तसच जागेवर झोपून गेला......!!! त्याच्या फोन बराच वेळ वाजत होता....

पन त्याला फोन उचलायची शुद्ध हि न्हवती...... True कॉलर वर " mitaali " नाव झळकत होत...


......
..............


सकाळी पहाटेच अभि ला जाग आली.. दारू ची सवय असल्या मुळे डोकी दुःखी वैगेरे असं काही न्हवत त्याला.... त्याने पायाने त्या बॉटल बाजूला केल्या आणि मोबाईल मध्ये टाईम पाहिला.....

सकाळचे 5 वाजले होते..........


सोबत भरेच unknown नंबर वरून मिसकॉल हि आले होते....!! अभि कडे मिताली चा नंबर हि सेव न्हवता , त्याने त्या नंबर वरून कॉल लावला.....

True कॉलर वर नाव दिसायला लागलं पन त्या आधीच त्याने फोन कानाला लावला......

समोरून कॉल उचला......

Hello...


" आपण कोण..?? " अभि.. ने प्रश्न केला

" मी संजीवनी हॉस्पिटल मधून डॉक्टर प्रशांत बोलतोय... आमच्या कडे एक पेशंट आलं होत त्यांनी शेवटचा कॉल तुम्हालाच केला होता म्हणून आम्ही कॉल करून पाहिला... "

अभि ने नंबर चेक केला तर मिताली म्हणून येत होत.. त्याने डॉक्टरांना लगेच प्रश्न केला.... " कोणी मिताली नावाची मुलगी आहे का....??? " अभि......

" हो.... तिचा accident झाला होता तर तिथल्या kahi लोकांनी तिला इथे आणलं....साध्या त्या iCU मध्ये आहेत जोडीला त्यांचा एक मित्र हि आहे......पन तुम्ही कोण आहात पेशंट चे........??? " डॉक्टर.....

" हे महत्वाचं नाही तुम्ही मला तुमच्या हॉस्पिटल चा ऍड्रेस द्या.. मी आलोच......" अभि.......


डॉक्टरांनी त्यांना ऍड्रेस सांगितलं तस अभि ने तो लिहून घेतला.......

आणि तो धुवून तो तसंच निघाला.... हॉस्पिटल अंधेरी ला होत...

म्हणून त्याने कार ने जाणच पसंद केल......!! त्याने पुन्हा एकदा तो नंबर चेक करून पाहिला तो मिताली चाच आहे का.....?? तीच नाव आणि फोटो दोन्ही येत होत , आता तिथे गेल्यावरच समजेल.....

तो गाडी एकदम फास्ट मध्ये चालवत होता या वेळेत तो काल घडलेली गोष्ट हि विसरून गेला होता.....!!

......
............

इथे मिताली ला ICU मध्ये ठेवण्यात आलं होत , एकदम शांत पडून होती ती...!! हाताला प्लास्टर लावल होत , डोक्याला हि लावल होत....

जागो जागी जखमा होत्या....हाताला सलाईन हि लावली होती......

7-7:30 च्या दरम्यान अभि हॉस्पिटल मध्ये आल्या , डॉक्टर ने आधीच तिला कुठे ठेवली आहे हे समजलं होत......

अभि 7th फ्लोर वर आला.... ICU मध्ये तर जावू देणार नाहीत हे आधीच माहीत होत त्याने बाहेरूनच काचे मधून तिला पाहिले......

तिची अवस्था पाहून तो सुन्न झाला , काल तिच्या डोळ्यातले ते अश्रू.... आणि तिची आताची अवस्था यात बराच फरक होता......!!!

तो पाठी वळला तर समोर राहुल होता.......!!

त्याला इथे पाहून अभि ने काहीच react नाही केल....


राहुल : का आलात इथे....???? अजून काही राहील आहे का , कि अजून तिला त्रास द्यायचा आहे , जे कि तुम्ही तिला इथे भेटायला आला आहात.....

घरा बाहेर काढली होती ना तिला तुम्ही , मग का इथे आला आहात..??? खुश असाल ना ती इथे अश्या अवस्थेत आहे हे पाहून.... तुम्हाला पण हेच हवं असेल नां......

अभि : उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस......


राहुल : काय खोटं बोलतोय मी? खरंच त्या दिवशी मितु जे बोलत होती ते खरंच होत " तुम्ही अजून किती त्रास देणार आहात तिला.....?? तिच्या बहिणीच्या चुकीची शिक्षा तिला का...??? आणि आता तर तिला तुम्ही घरातून हि हकलून दिल......

आणि मिठी काय फक्त बॉयफ्रेंड लाच मारली जातं आहे..मान्य आहे माझं तिच्यावर प्रेम आहे ( तस अभिजित ने त्याच्याकडे पाहिले..)पन तिच्या मनात माझ्याबद्दल एका मित्रा शिवाय बाकि कोणतीच फिलिंग नाहि....

त्यादिवशी हि तुम्ही तिला निघून जा बोला होता ती येत हि न्हवती पन मिच तिला कस तरी समजावलं......म्हंटल जाऊदे एवढ्या छोट्या कारणावरून का निघून जायचं
तेव्हा कुठे ती यायला तयार झाली....... आणि तुम्ही म्हणताय ना कि मिताली कॉलेज च्या नावाने फिरते तर तस काहीच नाही आहे....

मितु ला जॉब करत शिकायचं होत म्हणून आम्ही तेच शोधायला गेलो होतो.... इतकं काय कि तिची कॉलेज ची फीज देखील मिच भरली आहे......

तुम्हाला लोकांना त्रास नको म्हणून , तिला कोणावरती ओझं म्हणून राहायला मुळीच आवडत नाही....

ती कशी पन असली ना तरी मुलं फिरवण्यातली तर अजिबात नाही.....

हे तर नक्कीच त्या तनुजा ने भरवून दिल असेल... स्वतः कमी शिकली म्हणून दुसऱ्यांच्या चांगल्यावर टपून बसली आहे.........

आणि हो याद रखा.....जर मिताली ठीक नाही zali नां...तुमच्यावर मी केस ठोकायला सुद्धा कमी नाही करणार......

राहुल खूपच चिडला होता......

त्याच रागावण हि सहाजिकच आहे... आपल्या best फ्रेंड ला अश्या अवस्थेत पाहणं त्याला खूप कठीण जातं होत... त्यात तो तिच्यावर प्रेम हि करत होता......

राहुल : इतकंच काय तर रक्ताच्या थारोळ्यात असून सुद्धा तिने तुम्हाला कॉल केला......

तस अभि ने चमकून वर पाहिल... त्याला आता समजलं इतके miss कॉल्ड का आले होते...

त्याला आता खूपच गिल्टी फील होत होतं....कि तेव्हा तो नशेत का होता आणि आपल्या फोन ची रिंगटोन का नाही ऐकू आली......

अभि काहीही न बोलता तिकडच्या बेंच वर जाऊन बसला.... त्याला मिताली च्या कॉलेज च्या फीज च पन आज समजलं.....
ती घर सोडून जाण्याचं प्लॅनिंग आधी पासूनच करत होती का..???

त्याला आईचा चा कॉल आला करण तो घरी कुठेच दिसत न्हवता.....

त्याने मिताली बद्दल पन सगळं सांगितलं... तस त्या पन लगेच यायला निघाल्या........

अभि तसाच डोळे मिटून शांत पडून राहिला........!!


" प्रेमाची गरज आहे तिला..... Hope so या पुढे तुम्ही तिला कधीच हर्ट नाही करणार... एकदा जीव लावून तर पहा कि... शेवट पर्यंत तुमची साथ नाही सोडणार..... जशी आमच्या मैत्री ची साथ तिने सोडली नाही..... लहानपणापासून " राहुल.......

अभि ला म्हणाला........




तेरे दिल में मेरी धड़कने थी
तुझको ना आई नज़र
मेरा इश्क मुझमें
सांस ले रहा था
तुझको हुई ना खबर...❤