संध्याकाळी 5 वाजता मिताली घरी आली , सगळे हॉल मध्येच बसले होते.....
ती इतक्या लेट आलेल पाहून आईनी तिला विचारलं " तुझं कॉलेज 1 ला सुटत ना? मग इतका लेट कसा... "?
मिताली : actully ते आमचे एक्साम्स जवळ आलेत तरकाय नाते आपले...?
मिताली तिच्या रूम मध्ये गेली....मिताली एवढी खोटारडी कशी असू शकते हे अभिला सहन नाही झाल.....
आता त्याला तनुजा खरी आणि मिताली खोटारडी वाटत होती.......!! आपण खरच तनुजाचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजेच.....
अभि ला आता मिताली ला जाब विचारायचा होता , कि ती खोटं का बोली आईशी.....
मी माझ्या स्वतः च्या डोळ्यांनी पाहिलं आहे तिला ती तिच्या...... 😡
त्याला बॉयफ्रेंड हा शब्द बोला पण जातं न्हवता , अभि हॉल मधून आपल्या रूम मध्ये जायला निघाला....पण त्याची पावल
मितलीच्या रूम कडे वळली......मिताली तिचे कपडे तिच्या कपाटात व्यवस्थित लावत होती....
तीच लक्ष न्हवत कि रूम मध्ये अभि आला आहे , अभिला तिच्या परमिशन ची गरज हि पडली नाही..
अभी तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो...मितलीला कोणाची तरी चाहूल लागताच ती पाठी बघते.....आणि ती थोडी दचकतेच ....
ती मनातल्या मनात म्हणते ( हा आता का आलाय? कधी येत तर नाही ) तिला आश्चर्यच वाटल जरा...
' तू का केलंस अस? तू का खोटं बोललीस ?...अभिने विचारल
' काय मी ...? आणि खोट..? तुम्ही काय म्हणताय तुम्हाला तरी कळतंय का..? मिताली म्हणाली
' तुझ्याईतकी खोटारडी मुलगी मी आजपर्यंत कधी पाहिली नाही....माझी आई तुझ्यासाठी सकाळी सकाळी उठून एवढ्या प्रेमाने डब्बा बनवते....तुझी एवढी काळजी करते...तू इथे रमून जविस यासाठी वेगवेगळे प्रयत्न करते ....तुला त्याच काहीच वाटत नाही का ग..? तुला लोकांच्या फिलिंग तरी कळतात का...? 😡..अभी रागाने बोलला
' हे बघा तुम्हाला गैरसमज झालाय..तुम्हाला काय म्हणायचय मी खोटं काय बोलले ते सांगा..? आणि तुम्हाला काही माहित नाही तर का बोलतय...... मिताली ही आता वैतागत बोलत होती
' खरच बोलतोय मी...काय म्हणाली तू आईला की तुझे एक्स्ट्रा क्लासेस होते आणि तू लायब्ररी मध्ये अभ्यास करत होतीस.....अभी कुस्तित्पणे हसत बोलला
' हो मी करतच होते मग अभ्यास.....मिताली बोलली
' किती खोटं बोलतेस ग...मी तुला स्वतःच्या डोळ्यांनी तुला एका पोरासोबत बाईक वर जाताना पाहिलंय आणि ते पण एक दोनच्या दरम्यान....म्हणजे तुझ कॉलेज केव्हाच सुटलेलं आणि तू घरी आलीस पाच वाजता.......अभी बोलला
ती म्हणाली ' म्हणजे तुम्ही सतत माझ्यावर लक्ष ठेवून आहात का....तुम्ही माणसे लावलीत का माझ्यापाठी मी काय करते ? कुठे जातेय? हे कळण्यासाठी...पण ह्याची गरज तुम्हाला का आहे ? ना तुम्ही मला बायको मानता....आपल्या दोघांचं तर पटत ही नाही....
' मी कधी येते का तुमच्या मध्ये बोलायला नाही ना....मी माझं माझं काम करते आणि तुम्ही तुमचं तुमचं..आणि मी म्हटले आहे का माझी काळजी घ्या..माझी दया करा...मी भिक मागते आहे का तुमच्याकडे की मला जेवायला द्या नाही ना....मी म्हटले होते मला तुमची दया नको आहे मी माझं बघून घेईन....बास...मग काळजी कशाला दाखवत आहेत.'.....मिताली ही आता रागात बोलत होती.,.
तो म्हणतो..' तनुजा बोलते ना तेच खर आहे...तू एक नंबरची नीच आणि characterless मुलगी आहेस..... कॉलेजच्या नावाने तू पोरांसोबत फिरत असते..आणि म्हणतेस मला शिकायचं आहे तू एक नंबरची खोटारडी आहेस कळलं का......अभी रागात रूमच्या बाहेर जातो...
तस ती मनातच म्हणते...मनातच म्हणते ( हा माणूस वेडा आहे का..? ह्याला काय करायचं आहे की मी काय करतेय आणि काय नाही स्वतःच बोलतो की एकमेकांमध्ये पडायचं नाही आणि आता स्वतः माझ्या लाईफ मध्ये ढवळाढवळ करतोय मूर्ख नाहीतर....😡 आणि म्हणे मी पोरांबरोबर फिरते ईडीयट माणूस....
पूर्ण सत्य माहीत नाही तर माणसाने बोलू पण नये...." मिताली रागात बडबडत च तीच काम करू लागली....!!
रात्री नऊ ल अभी ची आई मितलीचा रूम मध्ये येते
' मिताली चल बाळा जेवायला जेवण तयार आहे....अभी ची आई म्हणाली
त स...मिताली चे डोक्यात अभी चे मागाचे वाक्य घुमायला लागतात..( माझी आई तुझ्यासाठी काय काय करते आणि तुला त्याची कदरही नाही....तुला माणसांच्या फिलिंग कळतात का..? )
' हे बघा उगाच काळजी असल्याचं नाटक करू नका तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या जाळ्यात फसेल...अस कधी होणार नाहीये...कशाला येवढं काळजी करण्याचं आव आणता आहे नका काळजी करू माझी...मला काहीच नकोय तुमचं......मिताली रागाच्या भरात काहीही बोलत होती अभिच्या आई ला......
अभीच्या आई ल तर धक्काच बसला होता तिला वाटल ही नवत की मिताली अस काही बोलेल...त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते..तेव्हाच अभी तिकडून जात असतो खाली तो तिचं बोलणं एकूण थांबतो....त्याला खूप राग येतो व तो त्याच्या आई ल बोलतो...
' आई हीची एवढी काळजी करायची गरज नाही नाही आहे तिला काय करायचय ती तिचं तिचं बघून घेईल..तिला नसेल जेवायचं तर नको जेवूदे तू चल......
आणि अभी त्याच्या आई ल खाली नेतो...
अभिच जेवून झाल्यावर तो रूम मध्ये येतो व विचार करत असतो..की तनुजा ल कधी भेटायचं...त्याने मग ठरवलं की आता टाईम भेटल्यावर च भेटू अस विचार करून तो झोपी जातो.......
--------------------
मिताली च परीक्षा आता जवळ आलेल्या असतात ती त्यासाठी सगळ बाजूला ठेवून अभ्यासाला लागली होती...आता ती फक्त त्या घरात राहण्यासाठी च राहत होती....ना ती कोणाशी बोलत होती ना तिच्याशी कोण.....
एक दिवस ती दुपारची नेहमी प्रमाणे अभ्यास करत होती....अभी त्याच्या ऑफिस ल गेला होता आणि त्याचे आई बाबा एका पार्टी साठी गेले होते जे उद्या येणार होते...ती आत्ता घरी एकटी होती आणि अभी ची अज्जी होती त्या रूम मध्ये होत्या....
मिताली पाणी पिण्यासाठी खाली हॉल मध्ये आली....अभी चे अज्जी ची रूम ही खालीच होती...तिला त्या रूम मधून जोर जोरात श्वास घेण्याचे आवाज येऊ लागले ती खूप घाबरली होती....नंतर काहीतरी पडण्याचा खूप मोठा आवाज आला....तशी ती पळत पळत त्यांच्या रूम मध्ये गेली....आणि बघितल तर आजी खाली जमिनीवर पडल्या होत्या..... ती खूप घाबरली होती...तिने तिथल्या एका नोकराला बोलवून गाडी काढायला सांगितली आणि त्यांना लवकरात लवकर एका जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली......
त्यात अभी चा फोन ही बिझी लागत होता........ते हॉस्पिटल मध्येपोहोचले.......मिताली ने लवकरात लवकर त्यांना चेक करायला सांगितल तर तिकडची रिसेप्शन मधली मुलगी बोलली..
' हे बघा तुम्ही पाहिले काही formalities पूर्ण करा तेव्हाच आम्ही ह्यांना चेक करू......मिताली कडे तर पैसे ही नवते ती परत अभी ल फोन ट्राय करत होती आणि नशिबाने त्याने फोन उचलला तिने त्याला लवकर हॉस्पिटल च लोकेशन पाठवल तो तिथे दहा मिट हजर होता.....एव्हाना आई बाबा ही आले होते.......
डॉक्टर ने सांगितल की त्यांना छोटासा हार्ट अटॅक आला होता इथून पुढे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल......
आजी ल येवून दोन विक झाले होते मिताली ची परीक्षा आता चालू झाली होती.....ती तिच्या अभ्यासात मग्न होती.....
आणि एकदिवस असच ती जरा बागेत थोडा टाईमपास करण्यासाठी गेली अभ्यास करून करून कंटाळा आला होता.....आणि तेवढ्यात आजी च आवाज आला..ती पळत गेली तर आजी चेस्ट वर हाथ ठेवून होत्या...
आता यांना परत काय झालं??? या विचारानेच तिला पुन्हा धडकी भरली....मिताली पटकन आजी जवळ गेली आणि त्यांना विचारू लागली...
" आजी तुम्ही शांत व्हा , काय होतय तुम्हाला , पाणी....पाणी देऊ का तुम्हाला?? " मिताली आजी ला विचारत होती..
पण त्या तिचा हात झटकत होत्या , तिला कळतच न्हवत कि त्या अश्या का वागत आहेत....
तिने आजी ना पुन्हा धरलं , पण त्या काहि ऐकतच न्हवत्या , तिने बाजूचा फोन घेऊन पटकन अभि ला कॉल केला....
आजी च्या फोन वरून केल्यामुळे त्याने पटकन उचला , मिताली ने घाबरून त्याला पटकन यायला सांगितलं...मिताली आजीला हॅन्डल करत होती....
पण आजी नी तिला धक्का मारल्या मुळे तीच डोकं बाजूच्या टेबल वर जोरात आपटलं......
" आह.. आई ग " मिताली ला आता रडूच आलं होत , तिने डोक्याला गच्च पकडलं..
तर कपाळाच्या इथे रक्त येत होत , ते पाहून तिला अजूनच रडू आलं... तिने आजी कडे पाहिलं तर त्यांना त्रास होत होता.... ती तशीच स्वतःला सावरत उठली...
आणी त्यांना सावरायला लागली......अभि पटकन घरी आला.......
तो पण एव्हाना घाबरला होता , मिताली त्याच्याशी काही बोलायला जाणार तोच तो तिच्याकडे दुर्लक्ष करत आजी कडे गेला ....
अ्ब्युलन्स त्याने येतानाच आणली होती.....
अभी ही लवकर आला त्याच्या ओळखी मुळे आता काही येवढ्या अडचणी आल्या नवत्या....आई बाबा ही आले होते...
सगळे घाईने हॉस्पिटल मध्ये आले होते , मिताली च्या डोक्याला इतकं लागलं होत आणि आता तिला ते दुखत हि होत.....
.मिताली एकटीच दुसऱ्या बेंच वर जाऊन बसली होती......तिला मनोमन वाईट वाटले होते....की कोणी आपल्याकडे लक्षच दिले नाही , आपल्याला लागलय तर साधी विचार पूस करावी......पण नाही...
....आधीच काल रात्री पासून खालं नाही...,...तिला आजी बद्दल येवढं वाईट वाटत नवत कारण ती सारखी तिला काहीनाकाही बोलयचीच...मिताली ल तिने येवढं केलं तरी कोणीच काही बोललं नाही तू बरी आहेस ना वैगेरे......
तोच तिथे एक नर्स आली आणि तिने मिताली ला आपल्या जोडीला यायला सांगितलं.....
मिताली हि गेली कारण दुखत तर खूप होत, आणि त्रास हि खूप होत होता.....
आणि तेवढ्यात ot मध्ये हिरवा बल्ब बंद झाला आणि डॉक्टर बाहेर आले...
त्यांनी अभि च्या बाबांना सांगितलं.. " sorry त्यांना आम्ही नाही वाचवू शकलो... "
क्रमशः
आता पाहूया आजी च्या जाण्याने अभिमित च्या आयुष्यात अजून किती दुरावा येईल..?? मिताली हे पात्र कस वाटत आहे तुम्हाला??? कथा आवडत आहे णा मग 😒❤ कंमेंट्स का नाही करत..... 🙂😒 छोटी केली तरी चालेल पण करा yaar 😌😭😭 कोणी स्टिकर पण देत नाही yaar 😭कट्टी मी... 😡