आजच्या 21 व्या शतकात पण असे काही अनुभवावे लागेल, असं जर कोणी म्हणेल तर आपण त्याची गंमत करू. परंतु, ज्याची तुम्ही गंमत कराल तो मीच. नक्की वाचा हा एका युवकाचा लेख आणि जाणून घ्या आजच्या जगातले विचार .......
कॉलेजच्या वयात जर आपल्याला एखादी मुलगी आवडली तर आपल्या समजातले वरिष्ठ लोक त्याला attraction म्हणतात. पण,मला है attraction झालं नाही मला एकच मुलगी आवडली आणि मी तिच्या वर खूप प्रेम केलं. तिचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे. आम्ही दोघे खूप आनंदात होतो.आमच्या मध्ये भांडण लावायला उचापती मंडळी होतीच मध्ये मध्ये परंतु त्यांना आम्हाला काय वेगळं करता आलं नाही. प्रेम हे असच असतं...
परंतु आमच्या प्रेमाला वळण मिळाले ते आमच्या वेगवेगळ्या जाती मुळे. तिने मला आधीच सावध केले होते की जाती मुळे आपले प्रेम जास्त काळ टिकणार नाही .पण, आपला युवा जोश असतो ना , मी तिला एकदम फिल्मी स्टाईल मध्ये बोलायचो "अरे हम है तो क्या गम हैं ".
पण माझ्या ह्या डायलॉगच रूपांतर "हम है इसी लिये तो गम है" असं होईल असे मला अजिबात वाटले नव्हते.मला वाटायचे की खूप यश मिळवले की आपण काही पण साध्य करू शकतो पण तिच्या घरी काही तरी वेगळे विचार एक मुलगा कमी यशस्वी असला तरी चालेल पण आपल्यालाच जातीचा पाहिजे . आमच्या ह्या प्रेमाचं अंत होईल म्हणून बिचारी ती पण उदास होऊन बसायची आणि तेच झालं . माझं हे प्रेम इतकं लवकर संपेल वाटलं नव्हतं,
तिच्या मते inter caste love marriage केल्याने तिच्या आई वडिलांची समजतील प्रतिष्ठा कमी होऊन जाईल त्यांना मान खाली घालून जगावं लागेल
त्यांना त्यांचा परिवरातून काढून टाकलं जाईल...
असे अनेक परिणाम तिने मला सांगितले .......
हे सगळं ऐकून मी हादरून गेलो मला काही कळेनासे झाले ......रात्र भर जागरण करून मी ठरवले की आता हे नात संपवायचं ठरवलं कारण माझ्या मुळे कोणाची अब्रू पणाला लागेल असे मला आवडणार नाही मग तिला विश्वासात घेऊन मी तिला सगळे सांगितले . सांगताना खूप रडायला येत होते पण आयुष्य आहे कुठे तरी जाऊन थांबायचे आहेच आणि असाच मी थांबलो आणि माझी प्रेम कहाणी थांबली
माझे या समजतील लोकांना एकच सांगणे आहे की या जातीवादच्या खेळात तुमच्या मुलांना घेऊ नका . तुम्ही घरात काही चर्चा करत असतात कधी कधी एखद्या जातीच्या लोकांना विषयी वाईट साईट बोलतात हेच तुमचे विचार तुमच्या मुलांच्या डोक्यात बसतात आणि मग ते समाजात जातीवाद पसरवतात. मिच नव्हे तर माझ्या सारखे खूप युवक आहेत ज्यांना ह्या जातीवादातून मिरवावे लागते ....
माझे काही प्रश्न आहेत
1) हा जातीवाद नक्की कोणी निर्माण केला ?
2) दोन जीवांना वेगळे करून कोणते पुण्य तुम्हाला लाभेल ?
3) या समजाचे विचार कधी बदलतील ?
एक तरुण प्रेमी
PP